Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 26, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » Archive through March 26, 2007 « Previous Next »

Reshim
Thursday, March 08, 2007 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, तुमचे खरच खूप अभिनंदन हा उपक्रम चालू केल्याबद्दल. माझ्यासारख्या वाचकांची चंगळच आहे. आणखी एक request आहे. प्रत्येक गजल बरोबर स्वातीजींचे रसग्रहण(विवेचन) अवश्य द्यावे. माझ्यासारख्या "ग ज ल" ही तीन अक्शरे सोडून काहीही माहीत नसणाय्रा लोकांना ते छान वाटत वाचायला व गजलचाही आनंद जास्त घेता येतो.

Shilpag
Friday, March 09, 2007 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, शतश्: आभारी आहे आपली. रेशिम प्रमानेच मलाही गजल ची ओलख फ़क्त appretiate करन्यापुरतीच आहे.. पन या कार्यशालेमुले मला basic knowledge/definitions समजली आहेत.
i m enjoying all..great going...
कल्पना कागदावर उतरवायला थोदा वेल लागेल

Pendhya
Monday, March 12, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक विचार आला की, कार्यशाळेतील सर्व गजलांना चाली लाऊन, मायबोलीसाठी, त्यांचा एक संग्रह तयार करता येईल का?
त्याची ऑडियो लिंक सुद्धा, ईथे देता येईल.
असा प्रयत्न कदाचित अवघड असेल. बहुदा, ज्यांना गायनाची, गजल स्वरबद्ध करण्याची जाण आहे, ते जाणकार निश्चितच, ह्यावर जास्त प्रकाश टाकू शकतील.


Bhramar_vihar
Monday, March 12, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"कही एक नाजुक और मासुमसी लडकी" या गाण्याच्या चालीवर बसतात कि!

Aaftaab
Wednesday, March 14, 2007 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी गाऊ शकतो.. आणि संगीत देण्यास कुणी असेल तर काही inputs सुद्धा देऊ शकतो.
सगळ्याच गज़ल्स छान आहेत. पण बैरागी यांची गज़ल (काही शेर) घेउन एक छान रोमन्टिक गाणं होईल असे वाटते..


Vaibhav_joshi
Thursday, March 15, 2007 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



प्रिय मित्रांनो

गज़ल कार्यशाळेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रेरित होऊन फक्त मराठी गज़लसाठी वाहिलेले एखादे संकेतस्थळ का असू नये असा विचार डोक्यात आला आणि
www.marathigazal.com ची निर्मिती झाली .

गुरुवर्य सुरेश भट यांच्या स्मृतीदिनी म्हणजे काल ह्या संकेतथळाचं प्रकाशन करायचं ठरलं तेव्हा हाताशी फक्त ४ दिवस होते . पण प्रसाद शिरगावंकर याने रात्रंदिवस मेहनत घेऊन मुहूर्त साधला आणि काल सुरेश भटांना गुरुदक्षिणा म्हणून ह्या संकेतस्थळाचे प्रकाशन झाले . www.marathigazal.com वर सुरेश भटांनी लिहीलेली गज़लेची बाराखडी प्रकाशित कराण्याची परवानगी श्री चित्तरंजन भट यांनी दिल्याने नवोदित गज़लकारांना मदत होण्यास प्रचंड हातभार लागणार आहे .

मायबोलीशी असलेली बांधिलकी अबाधित राखत केवळ मराठी गज़ल साठी काहीतरी करावे या हेतूने प्रेरित होवून सुरू केलेल्या या संकेतस्थळाला सर्व मायबोलीकर , मॉडरेटर्स व मा. ऍडमिन यांना भेट देण्याचे व परिवार सदस्य होण्याचे आग्रहाचे आमंत्रण



प्रसाद शिरगांवकर
वैभव जोशी
www.marathigazal.com टीम


Gajanan1
Thursday, March 15, 2007 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्ज किया है.....

अरे वैभवा हे तुला काय झाले?
कसे काय हे वेड डोक्यात आले?

नवे काव्य कानी पडो हीच वान्छा.
तुझ्या या प्रयोगास माझ्या शुभेच्छा.

'सुरेशा' स्मरू, पेन हातात घेऊ.
चला वैभवाचे नवे गीत गाऊ..

लगागा लगागा बरा मार्ग सोपा.
शब्बा खैर आता घरी शान्त झोपा..


Lalu
Thursday, March 15, 2007 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान! अभिनंदन!!
गजानन, .. :-)


Pendhya
Friday, March 16, 2007 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रसाद, वैभव आणी
www.marathigazal.com टीम चे अभिनंदन आणी त्यांना शुभेच्छा.

Suvikask
Friday, March 16, 2007 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सकाळीच "सकाळ" मध्ये मराठी गजल कॉम ची बातमी वाचली. खुप आनंद झाला. प्रसाद आणि वैभव आपल्या दोघंचेही हार्दिक अभिनंदन!!!

Pulasti
Monday, March 19, 2007 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कार्यशाळेत सामसूम आहे.. अजून काही गझला बाकी आहेत असे वाटते..
-- पुलस्ति.

Mansmi18
Wednesday, March 21, 2007 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार

गझल कार्यशाळा सुरु आणि यशस्वी केल्याबद्दल अभिनन्दन.

येथील गझला वाचुन अत्यन्त आनन्द झाला. इतके प्रतिभावन्त कवी आणि कवयित्रि आपल्याकडे आहेत हे पाहुन धन्यता वाटली.

आज गाडीत ताजमहल मधील साहीर चि गाणी ऐकत होतो. विशेषत्:
"पाओन छू लेने दो फूलोन्को इनायत होगी"
"वर्ना हमको नही इन को भि शिकायत होगी"

"दिल कि बेचैन उमन्गो पे करम फर्माओ"
"इतना रुक रुक के चलोगी तो कयामत होगी".

ही दोन कडवी वाचून एक कल्पना सुचली.
साहीरच्या किन्वा आणखी इतर कवीन्च्या उर्दु आणि हिन्दि मधील गझल मराठित रुपान्तर कोणी करु शकले तर आम्हाला वाचायला खुप आवडेल.
आणि जर त्याच चालीत केले तर दुधात साखर.

क्रुपया यावर विचार करा.

धन्यवाद.


Mayurlankeshwar
Friday, March 23, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कार्यशाळेत इतका शुकशुकाट का आहे?

Gajanan1
Friday, March 23, 2007 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूर्ण गजल करणे जमलेले नाही. पण तरीही अधून मधून एखादे शेर सुचतात. असाच एक..

हरीभोवती नीत मेळा जनान्चा
विना भक्त त्या काय देवात होते!!


Desh_ks
Monday, March 26, 2007 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो,

कार्यशाळेला सध्या सुटी तर नाही ना? कुणी काही सांगेल का?

:-)
-सतीश


Vaibhav_joshi
Monday, March 26, 2007 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुट्टी नाही सतीशजी. फोल्डर्स तयार करणारे मॉड आज न भेटल्याने आजच्या गज़ल पोस्ट करायच्या राहिल्या आहेत. क्षमस्व. उद्या होईल

Desh_ks
Monday, March 26, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव जी,

एक विनंती आहे. तुमच्या अशा उत्तरांमधले 'क्षमस्व, दिलगीर आहे' वगैरे सारखे शब्द काढून टाकाल का? सहज म्हणून केलेली असते काही विचारणा. :-)

इतरांनीही यावर मला पाठिंबा द्यावा अशी आशा आहे.

-सतीश.


Vaibhav_joshi
Monday, March 26, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतीशजी

तुमच्या सहज विचरण्याने मला त्या लोकांची माफी मागायची संधी मिळाली ज्यांच्या गज़ल आज पोस्ट व्हायच्या होत्या . मनातल्या मनात का होईना काही लोकांना शब्द दिला गेलेला असतोच , म्हणून क्षमस्व ....


Imtushar
Monday, March 26, 2007 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव,

सतीषजींना पाठिंबा.

तुम्ही वेळ काढून आमच्यासाठी एवढं करताय, आणि वर दिलगिरी व्यक्त करता. आम्हाला खूपच संकोचल्यासारखे होते.

-तुषार


Moderator_7
Monday, March 26, 2007 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, तुम्ही feedback बीबी वर पोस्ट केले असते तर एक तरी मॉड नक्कीच उपलब्ध झाला असता :-)
कोणते फोल्डर्स करायचे आहेत?





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators