Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 29, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » गिरीराज » Archive through March 29, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Thursday, March 29, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो ,

बर्‍याच शेरांमध्ये एका विषयाचे विविध कंगोरे आलेली ही गज़ल . बाकी गिरीराजच्या लेखनावर मी काय बोलणार ... आपण आधी त्याच्या कविता व ललित लिखाण वाचलेलं आहेच

गिरीराज

ऋतू येत होते , ऋतू जात होते
अभागी कहाणी जणू गात होते

कशी आस ठेवू तुझ्या हासण्याची
जिथे हुंदकेही पहार्‍यात होते

किती वाकली ती दिसाच्या श्रमाने
जरा सावरू लागता रात होते

मला चेहरेही तुझ्या भावनांचे
तुला जे हवे तेच डोळ्यात होते

तुला सोसणे भाग अन्याय अजुनी
इथे जन्म होताच सुरुवात होते

कसा अंत नाही, ऋतू निर्दयी हे
असे येत होते , असे जात होते


Mayurlankeshwar
Thursday, March 29, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशी आस ठेवू तुझ्या हासण्याची
जिथे हुंदकेही पहार्‍यात होते
वा!! खूप touching !


Vshaal78
Thursday, March 29, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरिराज, आसू हुंदके छान

Zakasrao
Thursday, March 29, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशी आस ठेवू तुझ्या हासण्याची
जिथे हुंदकेही पहार्‍यात होते
आवडेश रे गिरि. पण पुर्ण गजल थोडी डोक्यावरुन गेली.

Sanghamitra
Thursday, March 29, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> किती वाकली ती दिसाच्या श्रमाने
जरा सावरू लागता रात होते
वा झकास.

>> तुला सोसणे भाग अन्याय अजुनी
इथे जन्म होताच सुरुवात होते
आवडला.
बाकी गज़लही छान आहेच. पण हे दोन खास आहेत.


Zaad
Thursday, March 29, 2007 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती वाकली ती दिसाच्या श्रमाने
जरा सावरू लागता रात होते

प्रचंड आवडला हा शेर! केवळ सुंदर!!


Daad
Thursday, March 29, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्त्रीच्या जन्मजात "स्त्री" असण्याची कहाणी सांगणारी गजल. खूप खूप आवडली, गिरीराज.
हर एक शेर प्रभावी आणि नेमक्या शब्दात (अपवाद मला चेहरे.... कळला नाही. please कुणीतरी मदत करा किंवा गिरिराज, तुम्हीच)


Vaibhav_joshi
Thursday, March 29, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शलाका ..

गिरीसोबत जी चर्चा झाली त्यावरून सांगतो ...

माझा चेहरा हा समोरच्याच्या भावनांचं फक्त प्रतिबिंब आहे .. त्यांना शेवटी तो चेहरा त्यांना "हवा " तसाच दिसतो .


Nachikets
Thursday, March 29, 2007 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गज़ल आवडली, गिरी. सगळेच शेर छान!!

Mankya
Thursday, March 29, 2007 - 7:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरीराज ... अगदी वेगळाच विषय हाताळला आहेस रे अन तोही पुर्णपणे यशस्वी !
हुंदकेही पहार्‍यात .. मन भरून आलं वाचताना !
दिसाच्या श्रमाने ... खूपच बोलका, खूप भावला !
तुला सोसने ... किती खरंय !
मक्ता ... वेगळेपणा ईथही टिकवलास !
एका वेगळ्याच विषयात रंगलेली ग़जल, मक्त्यातही खूप वेगळेपणं आहे, त्यातही ऋतूंचा उल्लेख आल्यामुळे विषयाला पुर्णविराम मिळालाय, एक आवर्तन पुर्ण झाल्यासारखं वाटलं ! एकंदरीत विषय खूप सुरेख हाताळला आहेस !

माणिक !


Mi_anandyatri
Thursday, March 29, 2007 - 8:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती वाकली ती दिसाच्या श्रमाने
जरा सावरू लागता रात होते
या शेराचं कौतुक करायला शब्द नाहीत... :-) फ़ारच भारी...


Desh_ks
Thursday, March 29, 2007 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरिराज,

किती वाकली ती दिसाच्या श्रमाने
जरा सावरू लागता रात होते

हा शेर अतिशय संयत, सूचक आणि तरीही मर्मस्पर्शी आहे. इतरही सारेच छान!


Psg
Thursday, March 29, 2007 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! मस्त गजल गिर्‍या..

Jayavi
Thursday, March 29, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहा....गिर्‍या..... तुम तो गझल नवाज हो गये :-)
गझल खूप खूप आवडली.
मतल्यापासूनच हळवं केलंस.

हुंदक्यांवरही पहारा.... कल्पना अप्रतिम!

किती वाकली ती दिसाच्या श्रमाने
जरा सावरू लागता रात होते
हा शेर.....शेरे बब्बर! Ultimate! कौतुक करायला शब्द अपुरे आहेत रे..!

चेहर्‍याचा शेर मात्र अजूनही नीट कळला नाही.
मक्त्यामधे ऋतूला आणल्यामुळे माणिक म्हणाला तसं आवर्तन पूर्ण झालंय. खूपच सुरेख!!
आता तुला काय द्यावं बरं बक्षिस....! तुला जे जे हवेसे....ते ते मिळो :-)




Mankya
Thursday, March 29, 2007 - 10:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेहर्‍याच्या शेराबद्दल मला एक वैभवच्या दोन ओळी आठवतात, बघा काही मदत होते का ...
चेहरा बोलेल तुम्हास हव ते
डोळ्यात डोकावून पाहू नका ...! असं काहिसं !
मला वाटतं पहिल्या ओळीत आशय येतोय त्याचा बहुतेक ! तुझ्या मनात ज्या भावना आहेत तोच माझा चेहरा आहे असा काहिसा अर्थ लागतोय ! एक उदा. द्यायचा प्रयत्न करतो ... समजा एखादी Burnt case आहे, तर ती व्यक्ती जखमा बर्‍या झाल्यावर स्वतःला दुसर्‍याच्या नजरेतूनच बघते म्हणजे त्यांनी जर किळसवाणे अविर्भाव दाखवले तर ती स्वतःला तसच समजते आणि जर कोणी त्याला नेहमीसारखेच पाहिल्यावर जसे दिसतात तशेच अविर्भाव दाखवले तर ती व्यक्ति स्वतःला नेहमीसारखेच म्हणजे Normal समजते ! तसच चेहर्‍याचा संदर्भ घेता येइल नाही !

तुला जे हवे तेच डोळ्यात होते .. अर्थ स्पष्ट आहे !

माणिक !


Bee
Thursday, March 29, 2007 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा सावरू लागताच रात होते.. खूप सुंदर!

खरे आहे पण स्त्रीपुरताच मर्यादीत का केला काहींनी.. :-)



Bairagee
Thursday, March 29, 2007 - 1:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कशी आस ठेवू तुझ्या हासण्याची
जिथे हुंदकेही पहार्‍यात होते
वा,
किती वाकली ती दिसाच्या श्रमाने
जरा सावरू लागता रात होते
वाव्वा!



Ashwini
Thursday, March 29, 2007 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, मस्तच आहे रे, मतल्यापासून मक्त्यापर्यंत.

Maitreyee
Thursday, March 29, 2007 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, सुरेख आहेत कल्पना! या गझलेत एकदम वेगळाच मूड वाटला. छानच!

Chinnu
Thursday, March 29, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी, पहार्‍यातले हुंदके सुंदर. मक्ता साधा सरळ आला आहे. कसा अंत नाही, ऋतू निर्दयी 'हे' च्या ऐवजी ऋतू निर्दयी 'ते' बरं राहील का? CBDG!




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators