Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 29, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » स्वाती आंबोळे » Archive through March 29, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Thursday, March 29, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



स्वाती आंबोळे

ऋतू येत होते , ऋतू जात होते
सुने पावसाळे , रिते हात होते

खुणा फक्त चर्येवरी सुरकुत्यांच्या
किती सोसले आतल्या आत होते

कुशंका तुझ्या त्या नजर चोरताना
खुलासेच माझे दिमाखात होते

नकारातही जो तिरस्कार होता
मला दुःख त्याचे अतोनात होते

पुन्हा आसवे पाहुनी गुंतलो मी
किती भोवरे त्या प्रवाहात होते

तयारीस कोठे कधी वाव होता
तुझे सर्व घाले अकस्मात होते

नवे देव घडवी चिमुट शेंदराची
जुन्यांच्या कपाळी घणाघात होते


Vshaal78
Thursday, March 29, 2007 - 5:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, राग मानू नका, अपेक्षाभंग झाला....कुठलाच शेर हटके वाटला नाही

Zakasrao
Thursday, March 29, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुणा फक्त चर्येवरी सुरकुत्यांच्या
किती सोसले आतल्या आत होते
हा आवडला. पण अजुन जास्त अपेक्षा होती तुमच्याकडुन

Mayurlankeshwar
Thursday, March 29, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतक्या 'जाणकार' गझलेबद्दल काय प्रतिक्रिया द्यावी?
तरीही...
वाहवा वाहवा वाहवा

पुन्हा आसवे पाहुनी गुंतलो मी
किती भोवरे त्या प्रवाहात होते

तयारीस कोठे कधी वाव होता
तुझे सर्व घाले अकस्मात होते

नवे देव घडवी चिमुट शेंदराची
जुन्यांच्या कपाळी घणाघात होते

हे खूप आवडले!



Meenu
Thursday, March 29, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती शेवटचे चार शेर सुंदर गं ..!!
पहील्या तीन बद्दल मलाही विशालसारखच वाटलं तुझ्या लौकीकाच्या उंचीचे नाही झालेत ते .. तु अजुन खुपच छान काहीतरी लिहु शकली असतीस असं वाटलं वाचताना ..


Sanghamitra
Thursday, March 29, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती अतीव सुंदर.
मला तुझ्या भाषेच्या उपयोगाचा नेहमी हेवा वाटतो. कल्पना साधी असो वा खास, शब्द कायम चपखल असतात.

>> नकारातही जो तिरस्कार होता
मला दुःख त्याचे अतोनात होते
क्याब्बात!

Psg
Thursday, March 29, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती... मस्त! मतला आणि मक्ता विशेषकरून आवडला

Vaibhav_joshi
Thursday, March 29, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मी ,

U got it समोर बसून ऐकल्यासारखी वाटते ही गज़ल .. मस्त फ्लो आहे .


Zaad
Thursday, March 29, 2007 - 6:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच!!
पुन्हा आसवे पाहुनी गुंतलो मी
किती भोवरे त्या प्रवाहात होते
'त्रास' आहे हा शेर......


Daad
Thursday, March 29, 2007 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, अप्रतिम!
सहजता हा तुझा स्थायीभाव! सन्मी म्हणतेय ते खरय चपखल शब्द. तो म्हणजे तोच.
सगळे शेर आवडले पण तरीही
कुशंका, तिरस्कार, भोवरे, घाले (अप्रतिम कल्पना, अप्रतिम शब्द) - मला आवडले.
खासच!


Nachikets
Thursday, March 29, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'झाड'शी सहमत. खलास आहे तो शेर!!!
'नकारातला तिरस्कार'ही आवडला...


Mi_anandyatri
Thursday, March 29, 2007 - 8:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुन्हा आसवे पाहुनी गुंतलो मी
किती भोवरे त्या प्रवाहात होते
झाडाशी सहमत...

खुणा फक्त चर्येवरी सुरकुत्यांच्या
किती सोसले आतल्या आत होते
खास शेर...

नकारातही जो तिरस्कार होता
मला दुःख त्याचे अतोनात होते
किती सहज! एक सरळ वाक्य आहे, आणि शेर ही आहे... वा!! मानलं स्वाती ताई! :-)

मतला मात्र साचेबद्ध वाटला...
बाकी गझल सुंदर आहे..


Mankya
Thursday, March 29, 2007 - 9:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती ... सहजता, बोलकेपणा अन आशयघनता यांचा अतिसुंदर मिलाप ! तरीही स्वाती या नावाखाली येण्यासाठी या ग़जलेत काहितरी कमी पडलय !
कदाचित पहिल्या ओळीची चौकट अन बंधन तुझ्या लेखनीला कुंपण ठरलं असं वाटतय मला ! शब्दसंग्रह, शब्दांची जाण, सहजता, मनाला कडकडून भेटणारे विषय अश्या कित्येक गोष्टी अन स्वाती अंबोळे हे वेगळे होऊच शकत नाहीत अस मी तरी म्हणेन !

चर्येवरी, खुलासे, तिरस्कार, घाले ... आशय अन शब्दरचना खूप खूप आवडल्या !
आसवे .. कायम लक्षात राहिल हा तर !
मक्ता ... खूपच छान वेध घेतलायेस ... प्रचंड आवडला !

माणिक !


Desh_ks
Thursday, March 29, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती साधे आणि अर्थवाही शब्द!

पुन्हा आसवे पाहुनी गुंतलो मी
किती भोवरे त्या प्रवाहात होते

हा शेर तर फारच छान!

-सतीश


Jayavi
Thursday, March 29, 2007 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती.... गुरु गझल :-)
तुझं काव्यातून प्रकटणं नेहमीच आनंद देतं. आम्ही तर वाटच बघत असतो. गझल छानच.

नकारातही जो तिरस्कार होता
मला दुःख त्याचे अतोनात होते
ह्या दु:खाची तीव्रता अगदी आरपार.....!

पुन्हा आसवे पाहुनी गुंतलो मी
किती भोवरे त्या प्रवाहात होते
आई गं! गुंतणं खूप छान जमलंय!

तयारीस कोठे कधी वाव होता
तुझे सर्व घाले अकस्मात होते
घाले.....हा शब्द एकदम चपखल.

नवे देव घडवी चिमुट शेंदराची
हा मिसरा खूपच आवडला.


Bairagee
Thursday, March 29, 2007 - 1:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



स्वाती,

माझे मत-


गझल छान आहे.

ऋतू येत होते , ऋतू जात होते
सुने पावसाळे , रिते हात होते
सुने पावसाळे उगाच वाटते. (इतर ऋतूंनाही वाईट वाटू शकते ते वेगळे).सुना हा इथे चपखल वाटत नाही. असो. "रिते हात" उत्तम आले आहे. सुने पावसाळे बदलून बघा. अर्थात, सुन्या पावसाळ्यांचे तुमच्याजवळ स्पष्टीकरण असेलच.

खुणा फक्त चर्येवरी सुरकुत्यांच्या
किती सोसले आतल्या आत होते
चांगला शेर आहे.

कुशंका तुझ्या त्या नजर चोरताना
खुलासेच माझे दिमाखात होते
जमला नाही.

नकारातही जो तिरस्कार होता
मला दुःख त्याचे अतोनात होते
लहजा चांगला आहे. पण नेहमीचा आणि जरा सपाटच.

पुन्हा आसवे पाहुनी गुंतलो मी
किती भोवरे त्या प्रवाहात होते
वा! चांगला शेर आहे.
'गुंतलो'पेक्षा दुसरा शब्द चालला असता. गुंतणे योग्य वाटत नाही. भोवरे बघून तिथे "थरकणे" योग्य वाटले असते. असो, स्पष्टीकरण असेलच.

तयारीस कोठे कधी वाव होता
तुझे सर्व घाले अकस्मात होते
छान. प्रतिकाराची संधीसुद्धा मिळाली असे सुचवायचे असावे. मग कुठल्या तयारीस वाव हवा होता, हे स्पष्ट झाल्यास बरे झाले असते.

नवे देव घडवी चिमुट शेंदराची
जुन्यांच्या कपाळी घणाघात होते
ह्मह्म. घणाघात हा फार चांगला काफिया होता. वरची ओळ जरा कमजोर वाटते खालच्या ओळीच्या तुलनेत. अर्थात पसंद अपनी-अपनी, खयाल अपना-अपना. हा शेर कुणाला भारी वाटू शकतो. मला तरी भरीचा वाटला.

चू. भू. द्या. घ्या.
बैरागी


Maitreyee
Thursday, March 29, 2007 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त आहे. आवडली!

Ashwini
Thursday, March 29, 2007 - 2:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गझल सुंदर आहे. साधी आणि सहज वाटतेय.

Mrinmayee
Thursday, March 29, 2007 - 2:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्येक ओळीचा अर्थ लावता आला आणि मन:पूर्वक रसग्रहण (आपल्यापरीनं) करता आलं अशी पहीली गझल! खूप आवडली!

Chinnu
Thursday, March 29, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसं सुचतं इतकं सुंदर लिहायला? यातले एक अक्षर जरी लिहिता आले तरी साधना सफल!

ऋतू येत होते , ऋतू जात होते
सुने पावसाळे , रिते हात होते

मतला प्रचंड आवडला. सुने पावसाळे खूप सुंदर. डोळ्यासमोर कुणाची तरी वाट पाहणारी एक जराजर्जर स्त्री आली. भेगा पडलेली जमीन रित्या हातांनी दान मागतेय असा विचारही सर्रकन येवुन गेला. पुन्हा एकदा शब्दांचे सामर्थ्य अधोरेखित झाले!

खुणा फक्त चर्येवरी सुरकुत्यांच्या
किती सोसले आतल्या आत होते

मस्त!

कुशंका तुझ्या त्या नजर चोरताना
खुलासेच माझे दिमाखात होते

माझ्या खुलाश्यांना नजर चोरायची गरज नाही, हे 'दिमाखात' सांगणे आले!

नकारातही जो तिरस्कार होता
मला दुःख त्याचे अतोनात होते

फार सुंदर! सर्वांना generally नकाराचे दु:ख होते, पण त्याहीपलीकडे जो तिरस्कार जाणविला त्याचेच दु:ख जास्त झाले. छान मांडले आहे.

पुन्हा आसवे पाहुनी गुंतलो मी
किती भोवरे त्या प्रवाहात होते

क्या बोलु? आसवे फसवतात, जवळ बोलावितात आणि प्रवाहाजवळ जाताच जीव भोवर्‍यात हकनाक अडकतो. सहीच!

नवे देव घडवी चिमुट शेंदराची
जुन्यांच्या कपाळी घणाघात होते

उपरोधिकपणा सुंदर मांडलाय. पुढचे पाठ आणि मागचे सपाट करणार्‍यांचे पितळ या दोन्ही ओळीत स्पष्ट झालेत! याहीपेक्षा गहन अर्थछटा आहे मक्त्यात.

एकुण एक ओळ भावली. तयारीस कोठे.. हा शेर जरा साधा झाला. इतर सर्व शेर सुंदर. Classic!
आम्हा सर्वांच्या बाळगझला (निदान माझी तरी!) सोशिकतेने :-) सावरत सावरत देखिल एवढे सुंदर लिहिल्याबद्दल, स्वातीताई तुझे किती कौतुक केले तरी कमीच!





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators