आफताब सही आहे गज़ल. मैफलीचे शेर आहेत सगळे. "व्यसन रोज जडते" हे ही छान वाटतेय वाचायला. म्हणजे रोज तो प्रयत्न करतोय सोडवायचा तरी सुटत नाहीये ते व्यसन असा अर्थ वाटतोय. आणि रोज मरणात सांगता होतेय म्हणजे पुन्हा सगळे पहिल्या पासूनच होणार की. लिहीत रहा.
|
Milya
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:41 pm: |
|
|
आफ़ताब मस्त तबाही.व्यसन दोन्ही छान I agree with sanmi.. व्यसन जडते सुद्धा छान वाटते.. उलट सानि मिसर्यात मरण आल्याने जास्त सयुंक्तिक वाटतेय
|
Daad
| |
| Tuesday, March 27, 2007 - 10:30 pm: |
|
|
आफताब क्या बात है! तुमच्या "तबाही"वर खुष (??) आहोत आपण. व्यसन रोज जडते! पहिल्याच वाचण्यात आवडला शेर आणि पटलाही. हे म्हणजे रोज एक नवीन जिंदगी मिळतेय (कारण आजच्या व्यसनाची सांगता मरणात आहे) आणि रोज परत तेच व्यसन "जडतय". रोज नवीन आयुष्य पण व्यसन तेच आणि त्यामुळे सांगताही तीच. - फिदा! मक्ता बेफाम आहे, महाराज! लिहीत रहा ही वैभव म्हणतोय तशी "तबियत" आहे लिहिण्यात!
|
Aaftaab
| |
| Wednesday, March 28, 2007 - 4:56 am: |
|
|
धन्यवाद मित्रांनो खूप छान वाटतय तुमचा अभिप्राय वाचून. अजून अर्थपूर्ण आणि चांगली ग़जल लिहिण्याचा प्रयत्न करत राहीन...
|
Chinnu
| |
| Wednesday, March 28, 2007 - 1:58 pm: |
|
|
आफ़ताब! क्या बात है!! आज दोनदा तुमच्या रचनेवर दाद द्यायचा योग आलाय मला. 'उगा' बद्दल तुम्ही लिहिलेच आहे. मतल्यातच सिक्सर! अरे पुढे तर वाचु दे. तबाही, सुभान अल्लाह! जयुच्या शब्दात आपके शेरने मार डाला!! कितीदा बुडालो आणि तरलो पण मस्त. मक्त्याला काय म्हणु? केवळ तुझ्या श्वासांमुळे अटळ असा मृत्यु टाळता आला, ही कल्पनाच लाखमोलाची! तबियत खुष झाली हो वाचुन
|