Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 07, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » Archive through March 07, 2007 « Previous Next »

Bcharu
Monday, March 05, 2007 - 8:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा फ़ारच छान चाललय हे
मलाहि शिकायला आवडेल:-)


Swagat_samiti
Monday, March 05, 2007 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी चारु, तुमचं स्वागत आहे मायबोली वर :-)


Amolt
Monday, March 05, 2007 - 11:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही खुप आवड आहे. मलाही सहभागी करून घ्याल ना रे? मला ही गझल व कविता करायला व वाचायला खुप आवडतात.

Sanghamitra
Tuesday, March 06, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> तुला का न माझे इरादे कळाले...
इशा-यात होते ,शहा-यात होते...

अभिजीत... ... ...
बाकी गज़लही भारदस्त आहेच. पण वरचा शेर.. काय बोलू?
पण घोंघवावे हे एक जरा खटकलं. पण अर्थाचा जोर त्यामुळेच पोचतोय बहुतेक.

मीनू सुरेख झालीय गज़ल. अशी का कुठे सोय स्वप्नांत होते ही ओळ (ओळीलाच मिसरा म्हणतात ना.) आणि कुणी रिक्त गेले हा शेर अगदी सहज आणि जमलेला वाटला.

जया सगळ्यांनीच इतकं बोलून झालंय तो शेर मलाही आवडला. गज़ल छानच झालीय पण तुझ्या कवितांइतकी काही ती भिडली नाही.

मिल्या मस्तंय रे. सहज आणि छान. लाघवी तीरांनी घायाळ झाल्यावर अगदी लगेच सुचल्यासारखी वाटतेय. :-)
फक्त मखमली श्वास खटकले. म्हणजे इतकी स्पेसिफिक उपमा द्यायची असेल तर तसंच काहीतरी स्पष्टीकरण असायला हवं त्याच शेरात.(असं मला वाटतंय. cbdg )

वैभव गज़लेची terminology कुठेतरी help सारखी हाताशी असायला हवी रे.
मला तर लय भारी कन्फुजन आहे.
मतला(म्हणजे पहिला शेर न ज्यात दोन्ही ओळीत यमक असते? ),
मक्ता(?),
मिसरा (ओळ?),
सानी मिसरा (शेराची दुसरी ओळ?)
रदीफ (अंत्ययमक जे इथे 'होते' आहे. )
काफिया (अलामतीने संपणारे दुसर्‍या ओळीतले शब्द. रदीफच्या आधीचे?)
अलामत (रदिफाच्या आधीचा स्वर. इथे आ आहे?)
हे रदीफ आणि काफिया त्या सांडणीस्वाराच्या उदाहरणामुळे लक्षात राहिलेत. तरी ऍसिडिक आणि अल्कलाईन प्रॉपर्टीजसारखे होतेच अधेमधे पण रदीफ म्हणजे अंत्ययमक अशी घोकंपट्टी केलीय त्यामुळे... :-)


Vaibhav_joshi
Tuesday, March 06, 2007 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो

कार्यशाळेत तयार झालेल्या प्रत्येक गज़लसाठी एक एक folder तयार करण्यात आले आहे . जेणेकरून केव्हाही त्या गज़ल वाचता याव्यात . त्या गज़लशी संबंधित सर्व पोस्ट्स तर तिकडे हलवण्यात येत आहेतच . पण आपल्या यापुढील शंका / प्रतिक्रिया त्या त्या folder मध्ये पोस्ट कराव्यात म्हणजे प्रत्येक गज़लवरची चर्चा एकसंध अबाधित राहील .

धन्यवाद


Mi_anandyatri
Tuesday, March 06, 2007 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुर्जी,

हे बाकी ब्येस केलंत!
प्रत्येकाला स्वतंत्र आकाश दिलंत!! :-)

Swaatee_ambole
Tuesday, March 06, 2007 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्मी आणि इतरांसाठी..
( वैभवला विचारलंय तरी मी आगाऊपणा करून) मला माहीत आहेत तेवढ्या व्याख्या सांगायचा प्रयत्न करते. चुभूद्याघ्या.

उदाहरणासाठी
ऋतू येत होते, ऋतू जात होते
फुलावे कसे हे कुणा ज्ञात होते

हा मतला घेऊ.

शब्दअर्थउदाहरण
शेरस्वतंत्रपणे जिचा अर्थ लागतो अशी वृत्तादि नियम पाळून लिहीलेली द्विपदी.वर उधृत केलेली द्विपदी.
मतलागज़लचा पहिला शेर. हा महत्वाचा असतो कारण या शेर मुळे गज़लची ज़मीन ठरते.वर उधृत केलेली द्विपदी.
ज़मीनबेहेर,रदीफ़,काफ़िया आणि अलामत यांनी बनलेली चौकट. ही चौकट मग कुठल्याही शेराला ओलांडता येत नाही.
बेहेरवृत्त.येथे भुजंगप्रयात, अर्थात लगागा * ४.
मिसराएक ओळ.ऋतू येत होते, ऋतू जात होते
उला मिसराशेरातली पहिली ओळ.ऋतू येत होते, ऋतू जात होते
सानी मिसराशेरातली दुसरी ओळ.फुलावे कसे हे कुणा ज्ञात होते
रदीफ़(अंत्ययमक)मतल्यात दोन्ही मिसर्‍यांच्या शेवटी आणि त्यानंतरच्या प्रत्येक शेराच्या सानी मिसर्‍याच्या शेवटी येणारा common शब्दसमूह.होते
काफ़िया(यमक)रदीफ़च्या आधीचा असा शब्द, ज्यातली शेवटची एक वा अधिक अक्षरं common असतात.जात,ज्ञात
अलामतकाफ़ियामधल्या common अक्षरसमूहाच्या आधी येणारा common स्वर. हा स्वर common असतो, व्यंजन बदलते. ' आ'. जात आणि ज्ञात मधे ' त' हे common अक्षर, त्याआधीच्या अक्षरांमधला ( जा,ज्ञा - व्यंजनं ज् आणि ज्ञ्) common स्वर.
मक्ताशेवटचा शेर. पूर्वी ज्या काळात पुस्तकं छापली जात नव्हती, तेव्हा गज़ल कोणी लिहीली हे कळण्यासाठी या शेरात लिहीणार्‍याचं नाव वा टोपणनाव ( तखल्लुस) गुंफायची पद्धत होती. आता तशी गरज राहिलेली नाही.लढे जो तमाशी, लढे प्राक्तनाशी.. ' मिनू', जीत त्याचीच समरात होते


Hems
Tuesday, March 06, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, तू तुझ्या मते हा जो आगाऊपणा केलास त्याबद्दल अगदी थ्यांकू !



Vaibhav_joshi
Tuesday, March 06, 2007 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती
मनःपूर्वक धन्यवाद . माझ्याकडून इतकं झालं नसतं .


Mankya
Wednesday, March 07, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती,
आगाऊपणाबद्दल ठांकू गं !
खुपच Conceptual माहिती दिलीस बरं !

माणिक !


Chinnu
Wednesday, March 07, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, ते गैर मुसलसल वगेरे पण add करा ना प्लीज. धन्यवाद!

Mi_anandyatri
Wednesday, March 07, 2007 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती,
एक नम्र सूचना...
ह्या पोस्ट ची लिंक कार्यशाळेच्या पहिल्या पानावर दे...
खूप उपयोग होईल...

Sanghamitra
Wednesday, March 07, 2007 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती झक्कास झालाय हं आगाऊपणा! (काव्यधारेवर फक्त असल्याच टायपाच्या प्रतिक्रिया टाईप होतात माझ्या कीबोर्डातून. )
तर या तथाकथित आगावपणाबद्दल ठांकू.
फक्त हे सगळे कालौघात वाहून जाऊ नये म्हणून त्याला कुठंतरी ध्रुवपद मिळायला हवं.
(माझे बरेच कॉन्सेप्ट्स क्लियर आहेत हे एक अजून :-) )



Nachikets
Wednesday, March 07, 2007 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, कोष्टक post केल्याबद्दल धन्यवाद!!!

अजून दोन व्याख्या आहेत पण नक्की शब्द आठवत नाही.
१. रदीफ़ नसलेली गज़ल - (गैर-मुरद्दफ़ ??)
२. मतल्याचे नियम पाळणारा अजून एक शेर जर गज़लेत असेल तर त्या शेराला काहीतरी म्हणतात. कदाचित मतला-ऐ-सानी??


Vaibhav_joshi
Wednesday, March 07, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

( स्वातीला विचारलंय तरी आगाऊपणा करून ) मला माहीत आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो .
:-)
नचिकेत .. बरोबर आहे
१. गैरमुरद्दफ़.
२. सानी मतला


Shyamli
Wednesday, March 07, 2007 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब-याच शंकांच निरसन झालय तरीही :D
गझलेची जमीन म्हणजे गझलेची पहिली ओळ ना? का १ला शेर?
काय बिनडोक आहे म्हणलात तरी हरकत नाही. पण हा प्रश्ण पडलाय खरा :-)

Imtushar
Wednesday, March 07, 2007 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



वैभव,

मी काल माझी गझल पठविली आहे. खूपच उशीराने पाठविली, पण शक्य असल्यास (बिन बक्षिसांच्या यादीसाठी का होईना,) दखल घ्यावी.

कामाच्या व्यापामुळे इकडे फिरकणे आणि (गझल लिहून) प्रवेशिका पाठविणे शक्य झाले नव्हते.

कार्यशाळा फारच जोरात चालू आहे :-) आतापर्यंत वाचलेल्या सर्व रचना छान आहेत.


--तुषार


Suruchisuruchi
Wednesday, March 07, 2007 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव
खरंतर मी गझल लिहु शकतच नाही अस वाटल्यानेच मी ह्या कार्यशाळेत सहभाग घेतला नाही..पण आता मलाही हुरुप आला अन मी ही एक प्रयत्न केला...

तुषार प्रमाणेच (बिन बक्षिसांच्या यादीसाठी का होईना,) दखल घ्यावी अशी विनंती



Vaibhav_joshi
Wednesday, March 07, 2007 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली

पहिल्या शेरवरून ज़मीन स्पष्ट होते . दुसरी ओळ लिहील्याशिवाय रदीफ़ , काफ़िया आणि अलामत काय घेतलाय कळणार नाही .

तुषार , सुरुची ... उशीरा आलेल्या सर्व गज़ल नीट तपासून एकत्र पोस्ट करण्याचा विचार आहे . त्यामुळे नाव ( बिन बक्षिसांच्या यादीत ) आहेच .
:-)


Chakrapani
Thursday, March 08, 2007 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी एक तांत्रिक संज्ञा म्हणजे, दोन मतले असलेल्या गझलेस हुस्न-ए-मतला गझल म्हणतात. वरच्या एका पोस्ट मध्ये सानी मतल्याच्या उल्लेख वाचला, त्यावरून आठवण झाली.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators