Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 13, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » देवदत्त » Archive through March 13, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Tuesday, March 13, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो ...
देवदत्त ने पाठविलेल्या काही गज़लांपैकी ही सर्वात योग्य वाटलेली गज़ल . मीटरची बर्‍यापैकी समज आधीपासून असली तरीही ह्या गज़लमधला चौथा शेर वगळता काही बदल करावे लागले नाहीत हे विशेष .

देवदत्त

ऋतू येत होते ऋतू जात होते
तसे भाव हिंदोळ शब्दांत होते

कुठे भावनांची मला भ्रांत होती?
उन्हा सावल्यांचे करी हात होते

जसा शांत भासे नदीचा किनारा
तसे मूक संगीत ओठांत होते

कुणी पुण्य प्राप्तीस जावे कुठेही
मला सौख्य हे प्राप्त काव्यात होते

न ठावे मलाही कसे वागणे हे
शिकवले तुम्ही की स्वभावात होते

न केले कुणालाच घायाळ देवा
जरी शब्द गांडीव हातात होते


Mi_anandyatri
Tuesday, March 13, 2007 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न केले कुणालाच घायाळ देवा
जरी शब्द गांडीव हातात होते

वा!!!
सही... :-)


Mankya
Tuesday, March 13, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा ... काय बोलयचं यार .. अप्रतिम रचना !
एक प्रकारच्या ओघाने मनात आतपर्यंत उतरते हि गजल,
पण मनातून जाता जाणार नाही हे हि तितकच खरं !

सगळेच शेर अप्रतिम उतरलेत .. वाचल्यावर वाटलं हि गजल म्हणून जरी वाचली नसती तरी, ' छोड दो यार, जैसी है बहोत खुबसुरत है !! ' पण व्याकरणामुळे सौंदर्य अजूनच खुललंय रे !

शांत किनारा ... मूक संगीत .... खुप खुप आवडून गेलं रे !

माणिक !


Mayurlankeshwar
Tuesday, March 13, 2007 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्ता... जिंकलास रे मित्रा!!
किती सौम्य आणि शांत वाटले वाचताना! :-)
दुसरा शेर खूप आवडला.
पाचव्या शेरात 'की' च्या जागी 'जे' टाकले तरी छान वाटेल.
पुढच्या गझलेसाठी शूभेच्छा! :-)


Ganesh_kulkarni
Tuesday, March 13, 2007 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्त,
किती छान!
भावनेला किती अलगद शब्दांत माडंलय....!
जसा शांत भासे नदीचा किनारा
तसे मूक संगीत ओठांत होते.
------------------------
प्रत्येक कवीचे सुख......

कुणी पुण्य प्राप्तीस जावे कुठेही
मला सौख्य हे प्राप्त काव्यात होते
------------------------
हळव्या कवीचे जगणे...

न केले कुणालाच घायाळ देवा
जरी शब्द गांडीव हातात होते.

देवदत्त, खुप आवडली गज़ल!



Jayavi
Tuesday, March 13, 2007 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा.... खूप शांत गझल :-)
जसा शांत भासे नदीचा किनारा
तसे मूक संगीत ओठांत होते
अहा.... किती सुरेख!!

कुणी पुण्य प्राप्तीस जावे कुठेही
मला सौख्य हे प्राप्त काव्यात होते
वा.... काव्याची तुलना पुण्य प्राप्तीसोबत.... मजा आ गया :-)

न केले कुणालाच घायाळ देवा
जरी शब्द गांडीव हातात होते
क्या बात है....... हा शेर शेरे गब्बर :-)


Psg
Tuesday, March 13, 2007 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा! बेस! छान लिहिली आहेस..

न ठावे मलाही कसे वागणे हे
शिकवले तुम्ही की स्वभावात होते
.. हा आवडला खूप.. आणि मक्ता लाजवाब! :-)


Sanghamitra
Tuesday, March 13, 2007 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवदत्ता सहज आणि छान उतरलीय.
जसा शांत भासे.. या शेरासारखीच.
चौथ्या शेरातले दोन्ही मिसरे वेगवेगळे सुरेख आहेत पण पुण्य आणि सौख्य यांचा नीट मेळ बसत नाहीये. दोन स्वतंत्र शेर झाले असते दोन्ही मिसर्‍यांचे.
बाकीचे शेर छान. मक्ता तर खूपच.


Abhiyadav
Tuesday, March 13, 2007 - 9:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"शब्द गांडीव" हा सुटा न लिहिता एक हवा असे मला वाटते. कर्मधारेय समासानुसार. शेर खत्री आहे.


Giriraj
Tuesday, March 13, 2007 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा,दुसरा शेर आणि मक्ता जबरीच आहे...

मित्रा,सौख्य म्हणजे पुण्यप्रप्तीचं सौख्य असा अर्थ होतोय ना,तुला नक्की कुठे गडबड वाटली.. मात्र तू म्हणतेस तसे दोन वेगळे शेरही चांगली कल्पना आहे...



Zaad
Tuesday, March 13, 2007 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान! देवदत्ता, मक्ता खूप आवडला.

Sanghamitra
Tuesday, March 13, 2007 - 9:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी
सौख्यप्राप्ती आणि पुण्यप्राप्ती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत (असे मला वाटतेय). आणि त्यात काही कनेक्टिविटी असेलच तर त्या शेरातून ती स्पष्ट होत नाहीये(फक्त प्राप्ती हा शब्द कॉमन आहे.). जर काव्यसौख्याबद्दल बोलायचे असेल तर उला मिसरा थोडासा वेगळा हवा. जसे..
न पैसा, न कीर्ती, नको राजसत्ता.
मला सौख्य हे प्राप्त काव्यात होते.
असे काहीसे....
असो जे देवदत्ताने लिहीलेय ते वाचायला छानच वाटतेय.


Mankya
Tuesday, March 13, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कदाचित मध्ये बोलतोय पण
मित्रा ... लोकं पुण्यप्राप्तिसाठी कुठं कुठं जातात, काय काय सोपस्कार करतात, पण कविला काव्यातच त्याप्रकाच्या पुण्यप्राप्तिपेक्षाही जास्त सुख मिळतंय असा अर्थ असेल असं मला वाटतं आणि हे तर व्यवस्थित so called connected वाटतंय !

हे आपलं मत आहे ओ, बाकि चालुद्या !

माणिक !


Mayurlankeshwar
Tuesday, March 13, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्राला पूर्ण अनुमोदन.
पुण्यप्राप्ती आणि सौख्यप्राप्ती ह्या गोष्टी भिन्न असू शकतात.
देवदत्त असे केले तर कसे वाटेल--

कशाला सुखाची करू याचना मी?
मला सौख्य हे प्राप्त काव्यात होते.

तरीही देवदत्त मूळ शेर छान आहे.
पुण्य आणि सौख्य ह्या दोन्हींवर दोन नवे उत्तम शेर होऊ शकतील :-)


Giriraj
Tuesday, March 13, 2007 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(असे मला वाटतेय)>>> काय पण पॉलिटिकली लिहितेस :-)... मला म्हणायचे आहे की सुख हे पुण्यप्रप्तिमध्ये आहे असा अर्थही बरोबर वाटतो..
उलट पुण्यप्रप्तिच्या अनुभुतिशी कव्यानुभुतिला जोडून एका spiritual level ला आणलेय असे वाटते... नक्की काय तो 'देव'च जाणे :-)






Meghdhara
Tuesday, March 13, 2007 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही सन्मित्राने म्हंटलय तेच म्हणायचं आहे. पुण्य आणि सौख्य.. अंहं.. नाही कळलं.
दुसरा शेर कळला नाही. :-(
गिरी, महाराज काय हे..बक्षीसं कुठेत? .. हा बदल म्हणायचा का? :-)


Meghdhara
Tuesday, March 13, 2007 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हं.. गिरी म्हणतोय तसे पुण्यप्राप्तीचं सुख.. त्याही पेक्षा कुणाला पुण्यप्राप्तीत सुख मिळतं..तसं माझं कवितेत..
पण तरी शेराचं पहिलं रुप थोडं अजुन स्पष्ट हवं असं वाटतं..





Sanghamitra
Tuesday, March 13, 2007 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरी अरे पॉलिटिकल काय त्यात?
"असे मला वाटतेय" अशी पुस्ती जोडली की माणूस समोरच्याचेही म्हणणे ऐकून घ्यायला तयार आहे हे कळते ना. :-)
देवदत्त आधीपासून (आणि छान) लिहीतो ना म्हणून अपेक्षा जास्त. बाकी काही नाही.

तू आणि माणिक सांगताय तसा अर्थ स्पष्ट होण्यासाठी असे केले तर जास्त सोपे वाटेल का?


कुणी पुण्य प्राप्तीस जावे कुठेही
मला मात्र ते प्राप्त काव्यात होते
किंवा
कुणी सौख्यप्राप्तीस जावे कुठेही
मला मात्र ते प्राप्त काव्यात होते.


शिवाय अभी म्हणतोय तसा शब्दगांडीव हा एकच शब्द हवाय.
(कर्मधारेय! बरे आठवते बाबा तुम्हा लोकांना ते कधीचे शिकलेले.)
बस आता इथे कलम बंद.


Ashwini
Tuesday, March 13, 2007 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा, अगदी वेगळ्या अंगाने जाणारी गझल आहे. शांत, मैत्रीपूर्ण आणि सहज वाटतेय.
नदीचा किनारा आणि शब्दगांडीव हे शेर विशेष आवडले.


Milya
Tuesday, March 13, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवा सहीच रे... मक्ता उच्च




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators