Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 13, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » मेघधारा » Archive through March 13, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Monday, March 12, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो ...

एकाच थीम वर किती वेगवेगळ्या आणि सुंदर कल्पना समोर येत आहेत ते आपण पाहिलंच आहे . अर्थात ही खूप आधी मिळालेली गज़ल आणि आली तेव्हाच बर्‍यापैकी निर्दोष आणि सहज सुंदर होती . मेघधारा छान गज़ल लिहीत राहणार ह्यात शंकाच नाही .

मेघधारा

ऋतू येत होते ऋतू जात होते
तुझ्या आठवांना कुठे ज्ञात होते

मनाच्या तळी आर्त जागी विराणी
सुखाचा जरी जोजवा गात होते

कधी गुंफली सांग वचनात नाती
तरी मी तुझ्या मुग्ध पाशात होते

रुपाची जरी नोंद अंधारलेली
अरुपी पुरावे दिमाखात होते

उघड पापण्यांचीच फितुरी असे ही
कसे थोपवू , सैन्य दारात होते

चढे वेदनेला नवा कैफ आता
इरादे जुने धुंद बंडात होते


Mayurlankeshwar
Monday, March 12, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लयी भारी!!!
मेघधारा नावाप्रमाणेच तुम्ही पाऊस पाडलात कल्पनांचा!!
मक्ता खूप सुंदर!

'रुपाची जरी नोंद अंधारलेली
अरुपी पुरावे दिमाखात होते'
हे एवढेच फक्त समजले नाही पूर्णपणे.


Mi_anandyatri
Monday, March 12, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनाच्या तळी आर्त जागी विराणी
सुखाचा जरी जोगवा गात होते

वा...
खूप आवडला हा शेर...


Mankya
Monday, March 12, 2007 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है मेघधारा .... मान गये !
रुपाची ... अरूपी .... काय बोलायचं .... छे शब्दच नाहीत !
मक्ता .... कैफ वाचूनच अनुभवला बघ, आता यातून बाहेर येण होत का नाही काय माहीत !
एकंदरीच ... मनमोहक अविष्कार !

माणिक !


Kandapohe
Monday, March 12, 2007 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चढे वेदनेला नवा कैफ आता
इरादे जुने धुंद बंडात होते >>>>
सुंदरच.. :-)


Jayavi
Monday, March 12, 2007 - 6:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहा....मेघधारा.... खरंच अगदी नावाप्रमाणे बरसलीस.
मतला.....झकास....!

मनाच्या तळी आर्त जागी विराणी
सुखाचा जरी जोजवा गात होते

उघड पापण्यांची फितूरी असे ही
कसे थोपवू , सैन्य दारात होते
हे शेर अ प्र ति म!

पापण्यांची फ़ितुरी.... एकदम कातिल !
मेघधारा.... कवितेप्रमाणेच गझलच्या दुनियेत पण तुझा स्वैर विहार असाच सुरु राहू दे :-).


Jo_s
Monday, March 12, 2007 - 6:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारा, मस्तच आहे
हे शेर तर खासच
कधी गुंफली सांग वचनात नाती
तरी मी तुझ्या मुग्ध पाशात होते

रुपाची जरी नोंद अंधारलेली
अरुपी पुरावे दिमाखात होते

उघड पापण्यांची फितूरी असे ही
कसे थोपवू , सैन्य दारात होते


Sanghamitra
Monday, March 12, 2007 - 7:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारे सुरेख झालीय गज़ल.
दुसरा, चौथा आणि पाचवा विशेषच आवडले.
वचनाच्या शेरात तरीचे प्रयोजन कळले नाही. कदाचित मला अर्थ नीट लागला नाहीये त्या शेराचा.
आणि रुपाची, फितूरी, अरूपी हे शब्द खटकले. पण कल्पना फार छान आहेत त्या शेरांच्या.
एकूण गज़ल वाचायला छानच वाटली.


Psg
Monday, March 12, 2007 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उघड पापण्यांची फितूरी असे ही
कसे थोपवू , सैन्य दारात होते \
मेघधारा.. हा शेर खूप आवडला.. :-)

पण या खालच्या शेराचा अर्थ मला नाही समजला, सांगणार का? (माझेच अज्ञान..:-() -
रुपाची जरी नोंद अंधारलेली
अरुपी पुरावे दिमाखात होते




Sanghamitra
Monday, March 12, 2007 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम (मला वाटतं) त्याचा अर्थ असा असावा, तुझे रूप जरी आठवत नसले (किंवा माहीत नसले) तरी तुझ्या अस्तित्वाचे माझ्या आयुष्यावर असलेले ठसे ठळकपणे दिमाखात उभे आहेत.
उर्दू शायरीत प्रेयस आणि देव या दोघांना लागू पडतील अशा काव्यपंक्ती असतात. तसे वाटतेय हे. मला फार आवडतं असं भौतिक आणि ईश्वरी आसक्ती एकत्र गुंफलेलं काव्य.
मेघा सांगेलच खरं काय ते पण मला रहावलं नाही म्हणून. :-)


Psg
Monday, March 12, 2007 - 9:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! सन्मी, छान सांगितलस. 'अरूपी पुरावे'चा अर्थ समजला नव्हता.. आत एकदम क्लीयर आहे.

मेघा, मस्तच आहे हा शेरही! :-)


Mi_anandyatri
Monday, March 12, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारा,
"कसे थोपवू, सैन्य दारात होते"
हा मिसरा वरच्या ओळीशी सुसंगत वाटत नाहिये..
एक बदल सुचवतो, म्हणजे मी या शेर चा अर्थ काय लावला ते लगेच कळेल -

उघड पापण्यांची फितूरी असे ही
परी पूर/लोट माझ्याच डोळ्यात होते (लोट- अश्रूंचे या अर्थी)

चुभूद्याघ्या.

Meghdhara
Monday, March 12, 2007 - 12:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मित्रांनो.
संघमित्रा फितुरी शब्दाबद्दल शोधाशोध चालू होती. वैभव धन्यवाद.

मयूर, पी एस जी आणि सन्मित्रा..

रुपाची जरी नोंद अंधारलेली
अरूपी पुरावे दिमाखात होते.
हे अशाही अर्थाने घेता येईल.. भले घरंदाजी वैभव राहिलं नाही.. पण करारीपणा तेज अजुन तसेच अबाधीत आहे.
किंवा
तारुण्यातलं सौंदर्य मावळलं असेल.. पण त्या सौंदर्यामगचा मानीपणा तसाच आहे.

किंवा दुसर्‍या अर्थी तरुणपणची नितळता गेली पण संवेदनशीलता अजुन तशीच आहे.

आनंदयात्री..
सैन्य.. अश्रूनांच म्हंटले आहे.. आपल्यावर आक्रमण करुन आपल्याला कमकुवत करणारे सैन्य कसे थोपवू..

बाकी मयूर म्हणतो त्याप्रमाणे शुद्धलेखनाच्या खडतर रियाजाची गरज आहे.

पुन्हा एकदा आत पोचवल्याबद्दल धन्यवाद.

मेघा



Chinnu
Monday, March 12, 2007 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारा फार छान ग! फ़ितूरी, विराणी आणि अरुपी एकदम classic!

Ashwini
Monday, March 12, 2007 - 4:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारा छान आहे ग. दुसरा आणि तिसरा शेर विशेष आवडला.

Paragkan
Monday, March 12, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उघड पापण्यांची वाअह! क्यात बात है!

Pulasti
Tuesday, March 13, 2007 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारा,
अरुपी आणि मक्ता मस्तच! "इरादे जुने धुंद बंडात होते" - वा! कल्पना, शब्दरचना -- क्या बात है!
मतला नाही आवडला :-(
पापण्यांच्या शेरातली कल्पना खूपच छान आहे. जरा पहिला मिसरा असा केला तर - "कसा पापण्यांनी दगा आज द्यावा"?
-- पुलस्ति.


Zakasrao
Tuesday, March 13, 2007 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उघड पापण्यांचीच फितुरी असे ही
कसे थोपवू , सैन्य दारात होते >>>>>>वाचल्या वाचल्या मनात भरला हा शेर. सहीच आहे गजल.

Yog
Tuesday, March 13, 2007 - 5:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाह! शेवटचा शेर खूप आवडला.

Abhiyadav
Tuesday, March 13, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटचा शेर एकदम 'शेर' आहे.




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators