Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 06, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » अभिजीत दाते » Archive through March 06, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Tuesday, March 06, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो ,.... पहिल्याच प्रयत्नात जवळपास निर्दोष आणि काही खास कल्पना असलेली ही गज़ल . मला ह्यातील शेरांमधून तीव्रपणे येणारी खिन्नता , बेदरकारी फार आवडून गेली .


अभिजीत दाते ..... ( mi_abhijit )

ऋतू येत होते ऋतू जात होते...
मला जे हवे तेच अज्ञात होते...

जुन्या वादळांनी पुन्हा घोंघवावे...
असे काय आव्हान स्पर्शात होते...

प्रकाशून स्वप्ने अशी लुप्त झाली
जशी वीज उध्वस्त दर्यात होते...

झुरावे कशाला तुझ्या आठवाने...
उगा आसवांचे बळी जात होते...

तुला का न माझे इरादे कळाले...
इशा-यात होते ,शहा-यात होते...

नको आणखी घाव देऊस आता...
जुन्याचेच देणे मला खात होते...



Vaibhav_joshi
Tuesday, March 06, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा अभिजीत

तुला का न माझे इरादे कळाले...
इशा-यात होते ,शहा-यात होते...

आह !!!


Shyamli
Tuesday, March 06, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रकाशून स्वप्ने अशी लुप्त झाली
जशी वीज ऊध्वस्त दर्यात होते... >>>

वाह!! :-)
सगळीच गझल खरचच छान


Psg
Tuesday, March 06, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mi_abhijit ! वा! काय सुरेख गजल.. सर्वच शेर सुंदर आहेत..

प्रकाशून स्वप्ने अशी लुप्त झाली
जशी वीज ऊध्वस्त दर्यात होते...
.. किती सुरेख कल्पना..

झुरावे कशाला तुझ्या आठवाने...
उगा आसवांचे बळी जात होते...
.. आसवांचे बळी!! वा!

तुला का न माझे इरादे कळाले...
इशा-यात होते ,शहा-यात होते...
.. अगदी 'हाय' असा शेर आहे हा! :-)

मस्त. इतक्य सुरेख कल्पना मांडल्या आहेत की त्यामानानी मतलाच थोऽऽऽडा ineffective वाटतोय. अजून सशक्त करता आला असता का? सॉरी मला अजिबातच कळत नाही गजलमधलं, चुभुदेघे..

शोनू, चिन्नु :-) भापो!





Mankya
Tuesday, March 06, 2007 - 6:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिंकलं दोस्ता ... अभिजित खरच जिंकलस !

इरादे, जुनी वादळे, घाव, वीज .... कुर्बान यार कुर्बान या शेरांवर !!
पहिल्या शेरांत तर प्रत्येक मनाचा ठाव घेतलायेस ... खरच अज्ञात असतं ते म्हणून तर सगळा शोधप्रपंच .... जीवनभर चालतो तो !

माणिक !


Mi_anandyatri
Tuesday, March 06, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wanna post comment, but i m getting "aceess denied" message while posting in window after clicking devnagari button.. :-(

Anyways, Abhijeet...
APRATIM.....



Meenu
Tuesday, March 06, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऋतू येत होते ऋतू जात होते...
मला जे हवे तेच अज्ञात होते...

जुन्या वादळांनी पुन्हा घोंघवावे...
असे काय आव्हान स्पर्शात होते...

प्रकाशून स्वप्ने अशी लुप्त झाली
जशी वीज ऊध्वस्त दर्यात होते...

तुला का न माझे इरादे कळाले...
इशा-यात होते ,शहा-यात होते...

वा हे चार शेर मस्त !!! आवडले एकदम

Jayavi
Tuesday, March 06, 2007 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजित, क्या बात है.....! प्रत्येक शेर अगदी ताकदीचा आहे.

जुन्या वादळांनी पुन्हा घोंघवावे...
असे काय आव्हान स्पर्शात होते...

तुला का न माझे इरादे कळाले...
इशा-यात होते ,शहा-यात होते...

हे शेर एकदम खतरनाक.... :-)

शोनू :-)

चक्रपाणी, तुझ्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

Desh_ks
Tuesday, March 06, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत,

कल्पनेचं सौन्दर्य, रचनेचा डौल आणि गज़लच व्याकरण सारंच छान जमून आलंय.

अभिनंदन


Chakrapani
Tuesday, March 06, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिय अभिजीत,
इशारे-शहारे, आसवांचे बळी निव्वळ अप्रतिम!!! खूपच छान! मक्तासुद्धा छान आहे. निराशा आणि बेदरकारीबाबत वैभवरावांच्या मताशी मी सहमत आहे.
गझलेतील कल्पना आवडल्या आणि शब्दयोजनाही अगदी निर्दोष. मला घों'घ'वावे मात्र खटकलं अभिजीत. 'घोंघावणे' असा शब्द आहे. त्यामुळे ती ओळ बदलता आली तर पहा. मला 'ज़ुन्या वादळांना पुन्हा बोलवावे' असे काहीसे सुचले. अर्थछटा यामुळे बदलते आहे, हे नक्कीच, पण कदाचित त्यामुळेसुद्धा शेराला एक नवीन गंमत किंवा सौंदर्य येईल का, याचा विचार करतो आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते?
ऊध्वस्त असे न लिहिता उध्वस्त लिहिले तरी वज़नात बसतेच आहे. त्यामुळे कृपया तो बदल करू शकाल का?


Vaibhav_joshi
Tuesday, March 06, 2007 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चक्रपाणि
उध्वस्त चा बदल केलाय . माझ्याकडून टायपो होती ती . धन्यवाद .


Meghdhara
Tuesday, March 06, 2007 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत सही.. पण मी पी एस जी शी सहमत..
प्रकाशून.... व्वा!


Jo_s
Tuesday, March 06, 2007 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत छानच जमल्ये गझल, सगळेच शेर मस्त
"मला जे हवे तेच अज्ञात होते... "
ही कल्पना छान आहे.


Nandini2911
Tuesday, March 06, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुन्या वादळांनी पुन्हा घोंघवावे...
असे काय आव्हान स्पर्शात होते...

मस्तच आहे....


Zakasrao
Tuesday, March 06, 2007 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रकाशून स्वप्ने अशी लुप्त झाली
जशी वीज उध्वस्त दर्यात होते........


वा एकदम मस्तच रे.

Mayurlankeshwar
Tuesday, March 06, 2007 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत.. निव्वळ अप्रतिम...
आसवांचे बळी... फारच टचिंग!
छान मित्रा...
फक्त 'घोंघवावे' च्या जागी दुसरा शब्द बसतो का ते पाहा... :-)


Princess
Tuesday, March 06, 2007 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत, इशारे अन शहारे खुप्पच आवडुन गेले. सगळीच गझल छान पण या एका शेरामुळे नंबर वन झालायेस तू.:-)

Zaad
Tuesday, March 06, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केवळ अप्रतिम!! मतला खूपच आवडला!!

Manishalimaye
Tuesday, March 06, 2007 - 10:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही खुपच आवडली विशेषत: इशारे-शहारे...छानच!
आणि "मला जे हवे तेच अज्ञात होते...."


Nachikets
Tuesday, March 06, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिजीत,

सुंदर गज़ल!! मजा आ गया.

पण मला शेवटच्या शेरात काहीतरी खटकते आहे.
'नको आणखी घाव देऊस आता' ह्या वर्तमान किंवा भविष्यात असलेल्या मिसर्‍यानंतर सानी-मिसर्‍यातले भूतकाळातले 'खात होते' येत आहे. त्यामुळे मला तिथे थोडा disconnect झाल्यसारखा वाटतो आहे. तुम्हाला याबाबत काय वाटते?

कदाचित माझ्या वाचण्यात / समजण्यात काहीतरी घोळ होत असेल तर चू. भू. दे. घे.







 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators