Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मीनाक्षी हर्डीकर ...

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » मीनाक्षी हर्डीकर « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through March 02, 200748 03-02-07  5:59 pm

Chakrapani
Friday, March 02, 2007 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू, वृत्तांतात्मक धाटणीतले शेर वाचकांच्या प्रतिक्रिया मर्यादित ठेवतात. त्या शेरांमधून काहीतरी नवीन कल्पना प्रकाशात आल्याचा आनंद, एखाद्या साध्याच पण तरीही सुंदर शब्दाचा चतुराईने वापर केल्याबद्दल मिळणारी दाद कदाचित हरवू शकते. "ह्म्म्म ह्म्म", "ओके...ओके" पेक्षा "वावा!", "सहीच!" अशा प्रकारची प्रतिक्रिया ऐकायला-वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल की नाही? :-) थोडक्यात सांगायचं तर असे शेर नसले तर गझलेचा जिवंतपणा वाढतो, असे मला वाटते आणि म्हणूनच ते टाळले पाहिज़ेत.एकटी हे एकली च्या ऐवजी जास्त चांगले वाटते. समरात सुचण्यात उत्स्फ़ूर्तता असेलही, पण युद्धात हा शब्द अधिक सोपा आहे आणि त्याची व्याप्तीही समरापेक्षा मोठी आहे. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत आहे.

Chinnu
Friday, March 02, 2007 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

CP वाह्यात अबोल्यांच्या बाबतीत मला 'ति'चा सदर्भ लक्षात आला नव्हता. आता अर्थ स्पष्ट झाला. खुलाश्याबद्दल धन्यवाद.
मीनु, नाव काढुन पोस्ट केलेला शेर पण छान आहे. :-) वारंवारता टाळण्याबद्दलचे CP चे म्हणणे पटले.
भाई, कुठल्या रंगात न्हाले? होळी जवळ आहेच :P :-)


Pramoddeo
Tuesday, March 06, 2007 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिलाच प्रयत्न असून गजल छान जमलेय.

कवाडे मनाची, भले बंद केली ..
अशी का कधी सोय स्वप्नात होते ?

कुणी लावते फास सहजी गळ्याला ..
असे काय एका नकारात होते ?

कुणी एक राधा, झपाटून जावी,
असे सावळ्या काय रंगात होते ?

कुणी राज्य केले, कुणी रिक्त गेले ..
अखेरीस सारे, स्मशानात होते .. हे शेर विशेष आवडले.

कुणी एक राधा, झपाटून जावी,
असे सावळ्या काय रंगात होते ? हा शेर सर्वोत्तम वाटतोय.

एक रावसाहेबी सुचना!
असे सावळ्या काय रंगात होते?.... ह्या ओळीतला क्रम (व्याकरणानुसार नाही बरं का!) 'असे काय सावळ्या रंगात होते?' असे केल्यास जास्त अर्थवाही होईल.
इथे 'सावळ्या' शब्दात श्लेषही होतोय.




Swaatee_ambole
Tuesday, March 06, 2007 - 4:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी कोणाला काही मूलभूत शंका असल्यास
इथे उत्तर सापडतं का बघा.

Maitreyee
Wednesday, March 07, 2007 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनू, सहीच गं! सगळे शेर एक से एक आहेत

Bee
Thursday, March 08, 2007 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनू सहज सुंदर आहे गझल. सोबत प्रतिक्रियाही खूप आवडल्यात मला.

Bairagee
Thursday, March 08, 2007 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मीनाताई, गझल पुन्हा एकदा वाचली. ह्यावेळी अधिक आवडली.
आता माझे वस्तुनिष्ठ मत देतो. आतापर्यंत जे अस्मादिकांना थोरा-मोठ्यांनी सांगितले ते इतरांसोबत शेअर करण्याचा हा प्रयत्न आहे. (रसास्वाद झाला आहेच) फायदा होईलशी अपेक्षा.

तर,
ऋतू येत होते, ऋतू जात होते ..
परी चांदणे तेच, स्पर्शात होते ..

छान!

कुणी मारवा गात जातो दिवाणा ..
तुझी याद येते, सुनी रात होते ..

वाव्वा, लहजा फारच आवडला. "रात" हा काफिया फार चांगला बांधला आहे. मारवा आणि मरवा दोन्ही लक्षात घेतले तर अधिकच मजा.

अवांतर:
"ग़ज़ल इमकानात (पॉसिबिलिटिज़, शक्यता) की पोएट्री है" असे काहीसे गझलेचे मर्मज्ञ आणि ग़ालिबवरील एक अथॉरिटी शम्सउर रहमान फ़ारुक़ींनी तफ़हीमे-ग़ालिब (ग़ालिब एक आकलन)मध्ये लिहून ठेवले आहे. ग़ालिबचा थोरपणा ह्या शक्यतांमुळे आहे. थोडक्यात, सपाट किंवा वृत्तान्तात्मक लिहू नये. "हिंसेत ५ ठार, १० जखमी " किंवा त्या प्रकारचे मथळे किंवा बातम्या म्हणजे चांगला शेर नाही.


उरी एकली मी, असूनी सवे तू ..
अशी जिंकुनीही कशी मात होते ?

एकली ऐवजी एकटी हवे. ठीक. तसेच दोन शेरातला संबंध कमकुवत. "मला तुझी साथ लाभली. माझी जीत झाली. आता तू माझ्यासवे असूनही माझ्यासवे नसतो. (हापिसातच, कामात अधिक वेळ असतो वगैरे. सुबह और शाम कामही काम टाइप.) एकंदर अशाप्रकारे तुला जिंकूनही माझी हार झाली आहे." अशी एकंदर कथा डोळ्यांसमोर येऊ शकते. पण त्यासाठी डोक्याला होमवर्क. आणि शेरात विचारगुरुत्वही (म्हणजे वेगळा, भारी विचार वगैरे) नाही. मग कशाला ताण द्यायचा वाचकांच्या डोक्याला. साधे लिहायचे.

मनीचे ऋतू आगळे, जाणले मी ..
सदा आठवांचीच, बरसात होते ..

ठीक.

कवाडे मनाची, भले बंद केली ..
अशी का कधी सोय स्वप्नात होते ?

वा! लहजा आवडला.

कुणी लावते फास सहजी गळ्याला ..
असे काय एका नकारात होते ?

ठीक.

कसा लागतो फास सहजी गळ्याला?
असे काय एका नकारात होते?

असे केल्यास "असे काय एका नकारात होते"चे दोन्ही अर्थ नीट लागतील. म्हणजे, "त्या" नकारात असे काय होते हा एक अर्थ. आणि दुसरा, एका नकारामुळे हे असे कसे होऊ शकते. असो.


ऋतूंचा कशाला कुठे दाखला द्या ?
तशीही अवेळीच बरसात होते ..

वरची ओळ थोडी बदलायला हवी. "कुठे" भरीचे.
खालचा मिसरा उत्तम.
"उगा दाखले द्यायचे का ऋतूंचे?" असे काहीसे

कुणी एक राधा, झपाटून जावी,
असे सावळ्या काय रंगात होते ?

वाव्वा.

"तुझ्या सावळ्या काय रंगात होते" केल्यास सावळ्यालाही स्पष्ट संबोधन होईल. अर्थपदर ठळक होईल.

भले ताल बदलो, भले चाल बदलो
तरी जीवना, गीत मी गात होते ..

ओक्के. ओक्के.

कुणी राज्य केले, कुणी रिक्त गेले ..
अखेरीस सारे, स्मशानात होते ..

ठीक. ठीक. दाद मिळेल.

लढे जो तमाशी लढे प्राक्तनाशी ..
' मिनू' जीत त्याचीच समरात होते ..

ठीक. शब्दबंबाळ आहे. "तमाशी, प्राक्तनाशी, समरात" वगैरे. जमेल तिथे चपखलसे हाय फ्रीक्वेन्सी (उच्च वारंवारिता असलेले) शब्द वापरावेत. युद्धात चालले असते.

असो. तूर्तास एवढेच. (खरेतर खूप झाले:-))
पुढच्या गझलेसाठी शुभेच्छा.


Mi_anandyatri
Thursday, March 08, 2007 - 11:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"दोन्ही मारवे (फूल आणि राग) लक्षात घेतले तर अधिकच मजा. "

मारवा नावाचे फूल ही असते? अधिक माहिती द्यावी...


Bairagee
Thursday, March 08, 2007 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आनंदयात्री,

कधीकधी एखादा शब्द उच्चारला की त्यासोबत त्याच्या जवळचा एखादा(उच्चाराने जवळच्या) शब्द आणि त्या शब्दाचा अर्थही जाणिवांना स्पर्श करून जातो आणि घाईत अशा चुका होतात. मरव्या, तूही माफ कर.

अधिक माहिती:-)
तर, फुलझाड मरवा नावाचे असते. झुडुपच म्हणा. हिरवीहिरवी पाने असतात. मरव्याची फुलं खूप बारीक आणि नाजुक असतात. ह्यांच्या पानांना चुरगळले की मोहक वास येतो.
आनंदयात्री, वेळीच माहिती विचारल्याबद्दल धन्यवाद.



Meenu
Friday, March 09, 2007 - 4:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे ..!! बैरागी .. आपलं ते हे धन्यवाद बैरागी ..!!!

मैत्रेयी, बी धन्यवाद ..


Manuswini
Friday, March 09, 2007 - 8:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज सुट्टीच्या दिवशी सगळे सग्ळ्यांचे शेर वाचुन काढले.
अप्रतीम!!

एक प्रश्ण, असे म्हणतात की वेदना माणसाला हळवी बनवते तेव्हा एका कवितेचा किंवा गझलेचा जन्म होतो.. हे खरे आहे का?

सगळ्यांच्या गझलेत एक प्रकारची वेदना, आभास, अशा अशी व्याक्त होते म्हणुन हा प्रश्ण.

माझे काही चुकले असेल तर क्षमस्व.






Athak
Saturday, March 10, 2007 - 8:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनाक्षी , छानच , शेवटच्या कडव्यात तुझे नांव गुंफुन एकदम original , no chance for any विडंबनकार :-)

Milya
Saturday, March 10, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो अथक विडंबनकार ते नाव पण बदलेल की
जसे की

'मिल्या' हार त्याचीच लग्नात होते असे काहीसे



Athak
Saturday, March 10, 2007 - 7:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिल्या विडंबनकर , वाटलच होतं :-)
'मिल्या' हार त्याचीच लग्नात होते लाघवी तीराने दुसरे काय होणार :-)

Lopamudraa
Saturday, March 10, 2007 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा मीनु great ग.. गज़ल खुप आवडली
(आज वाचेनच असे ठरवले होते..)

मनुस्व्नी कवी लोक हळवेच असतात or हळवे लोक कवि असतात. कसही समज..(विडंबनकार असले तरिही)

हे बघ संदीप खरेंचे विचार
कविता त्या त्या वेळच्या mood चे reflection आहे असं मला वाटतं. कविता हे आत्मचरित्र नसून एका साध्या सरळ आयुष्याचं प्रतिक आहे जे विसंगतीने भरलेलं आहे. ती प्रचारासाठी वापरायचे साधन नाही. माझ्यासाठी ते व्यक्त होण्याचे माध्यम आहे. कविता ही कवीची कधीच नसते.ती त्याला मिळालेल्या, अन भिडलेल्या अनुभवाची असते. त्यामुळे ह्या दोन्ही प्रवृत्ती एकाच माणसात असू शकतात नव्हे असतातच!

Manuswini
Monday, March 12, 2007 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम पटले लोपा संदीप खरेंचे विचार




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators