Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 04, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » Archive through March 04, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Friday, March 02, 2007 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, मित्रहो.

यापुढच्या दोन प्रवेशिकांच्या लिंक्स सोबत देत आहोत.
चक्रपाणि,
पुलस्ति

खरंतर कार्यशाळेसाठी लिहीलेल्या गज़ल आधी इथेच प्रकाशित व्हायला हव्या होत्या.
निदान इतरत्र त्या प्रकाशित करताना त्या का आणि कश्या लिहील्या गेल्या हे नमूद करायचं सौजन्य गज़लकारांनी दाखवायला हवं होतं.
पण अर्थात या आमच्या अपेक्षा आहेत. असा लिखित नियम नव्हता.
त्यांच्या रचना कुठे, कधी आणि कश्या प्रकाशित कराव्यात हा त्यांचाच प्रश्न आहे.
तरी एक उपचार म्हणून या लिंक्स देत आहोत.

चक्रपाणि यांची गज़ल मुळातच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष होती.
पुलस्ति यांची प्रवेशिका व्याकरण पाळत होती, पण ती अधिक अर्थपूर्ण आणि परिणामकारक करण्यासाठी नियामक मंडळाच्या सदस्यांनी बरंच काम केलं होतं.

असो.

कार्यशाळेत सहभागी झाल्याबद्दल आम्ही या दोघांचे मनःपूर्वक आभारी आहोत.

- नियामक मंडळ


Chakrapani
Friday, March 02, 2007 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सारंगराव, प्रतिसादाबद्दल अनेक आभार. "सुद्धा" मधला सु नंतरच्या जोडाक्षरामुळे दीर्घ होत असला, तरीसुद्धा या शब्दाचा उच्चार "सुद्धा" असा न करता निव्वळ 'सुधा' असा केल्यास हा शब्द वृत्त पाळतो, असे मला वाटते. "सुद्धा" तसेच "सुधा" हे दोन्हीही उच्चारणाच्या दृष्टीने योग्यच आहेत. काही गझलकारांशी बोलून मी याची खात्री करून घेतलीच आहे.
वैभव, माझी गझल माझ्या ब्लॉगवर तसेच मनोगतावर प्रसिद्ध केलेली आहे. गझलेची पार्श्वभूमी काय आहे, हे मनोगतावर आधीच नमूद केलेले असल्याने मी माझी गझल प्रकाशित करताना त्याची पुनरावृत्ती केलेली नाही. ब्लॉगवर मात्र मायबोली तसेच तुमच्या सौजन्याची नोंद घेतलेलीच आहे.
कार्यशाळेत सहभागी होता आल्याचा आनंद आहेच. येथे प्रकाशित होणार्‍या गझलांच्या तसेच संबंधित चर्चेच्या अनुषंगाने माझाही पुन्हा अभ्यास्/ उज़ळ्णी होतच राहील, यात शंका नाही.
धन्यवाद.


Vaibhav_joshi
Friday, March 02, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चक्रपाणि ,

ब्लॉगवर नोंद घेतल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद . अर्थात जो काही खेद व्यक्त झाला तो कुणा एकट्याचे नाव घेण्याबद्दल नसून तुमची गज़ल आधी या कार्यशाळेत प्रकाशित करावी असा नियामक मंडळाचा हेतू होता . इथे एकंदर या कार्यशाळेचा प्रामाणिक दृष्टिकोण सर्वांनीच पाहिला आहे . मायबोलीवरच्या नवोदित गज़लकारांना जास्तीत जास्त शिकण्यासाठी मदत व्हावी म्हणून हा उपक्रम. त्यात आपण व पुलस्ति यांच्यासारख्यांच्या रचना सर्वांसमोर ठेवून त्यावर "इथे" चर्चा झाली असती तर खूप बरं वाटलं असतं . आणि अर्थातच त्या निमित्ताने मायबोलीच्या ऍडमिन नी जे सहकार्य केलं आहे त्याचा मान राखला गेला असता इतकंच . आता ज्या एक एक निर्दोष रचना पोस्ट होत आहेत त्या क्रमाने नसल्या तरी त्यामागे एक विचार आहे . जेव्हा जेव्हा उदाहरण म्हणून गज़ल दाखवावी लागेल तेव्हा आधीपासून लिहीणार्‍या गज़लकारांच्या गज़ल पोस्ट करावयाचा विचार होता . त्या आधीच अपरोक्षरित्या इतरत्र प्रकाशित झाल्याने थोडा फार बदल करावा लागला इतकेच . असो .
:-)

"सुध्दा" बद्दल माझं प्रामाणिक मत असं आहे की अशी सूट घेणं गरजेचं आहे का ? मी ऐकलेल्या बर्‍याच गज़ल सादरीकरणात " पुन्हा " हा शब्द"पु" वर जोर देऊन वाचला जातो आणि ते अक्षर दीर्घ घेतलं जातं . पण म्हणून ते कानाला खटकायचं रहात नाही . अर्थात ही चर्चा इथे नको . तू , मी सारंग ह्यावर बोलू शकतो .

मीनूच्या गज़लमधले ११ च्या ११ शेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला कारण इथे अभ्यासाच्या दृष्टीने ते उपयोगी ठरेल असं वाटलं . बाकी गेल्या आठवड्यापर्यंत गज़ल मध्ये जास्तीत जास्त ६ च शेर असावेत ह्या मताचा मी होतो पण " जेव्हा तुम्हाला सुचत असतात तेव्हा शेर लिहून ठेवावेत जेणेकरून सादर करताना प्रेक्षकांचा कल बघून निवडता येतात " हे मत मला पटलं . अर्थात हे " सुचत असेल " तरच हे अधोरेखित आहेच . माझा अनुभव असा आहे की एकदा त्या गज़लकडून दुसरीकडे वळलं की पुन्हा येणं खूप कठीण जातं . त्यापेक्षा ती गज़ल लिहेतानाच तिला अधिकाधिक वेळ दिला गेला तर लिहीलेले शेर चांगले व त्याहूनही अधिक . चांगले शेर सुचण्याची शक्यता वाढते . मीनूच्या गज़लवरच्या आपल्या एका मुद्द्यावर मी बोललो कारण " जितके शेर उत्स्फूर्तपणे सुचतात ते सगळे लिहून ठेवावेत " हे मत मला पटलं होतं आणि ते सर्वांसमोरच ठेवण्याचा उद्देश होता . बाकी चर्चा चालू द्या .

धन्यवाद




Mi_anandyatri
Friday, March 02, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलस्ति,
जरी शांत आता, पहारे असू द्या -
इथे सर्वकाही अकस्मात होते!
व्वा..... लय भारी!!! :-)

रिकामीच मैफ़िल तरी दाद येते
असे दर्द-गाणे कुणी गात होते
हे रत्न असंच आणखी एक..... जियो!!!


Chakrapani
Friday, March 02, 2007 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव आणि सारंगराव,
सुद्धा-सुधा, पुन्हा, मध्ये-मधे या सगळ्याच शब्दमित्रांमध्ये उच्चारणावरून त्यांचे अंगभूत लघु-गुरु गुणधर्म बदलत ज़ातात, असे मला वाटते. 'पुन्हा' मधला पु किंवा सारंग म्हणतायत त्याप्रमाणे सुद्धा मधला सु चा दीर्घ उच्चारणे मला खटकते, हे खरे; पण मध्ये मधील 'ध्ये', सुद्धा मधील 'द्धा' यांचे उच्चारण धे आणि धा करणे छंदाच्या दृष्टीने योग्य तसेच गेय असेल, तर अशी सूट घेण्यास हरकत नाही, या मताचा मी आहे. युद्ध या शब्दाचे उच्चारण युध असे होणे कदापि शक्य नाही किंवा योद्धा या शब्दाचे उच्चारण योधा असे होणेही शक्य नसल्याने शेवटच्या शेराच्या बाबतीत समरात ऐवजी युद्धात असे केल्यास छंद पाळला ज़ातोय, असे मला वाटते. यावरची अधिक चर्चा यापेक्षा व्यापक स्वरूपात झाल्यास उत्तम!


Chinnu
Friday, March 02, 2007 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चर्चा घडावी आणि आम्ही पामरांनी त्यातुन शिकत रहावे! चक्रपाणि, सारंग, वैभव गझल निर्दोष आणि सुंदर व्हावी यासाठी वरील तुमची चर्चा कौतुकास्पद आहे.

चक्रपाणि,
मिरवले तुझे घाव मी राजबिंडे
विव्हळणेसुद्धा बघ दिमाखात होते
हा शेर आवडला. तसेच शेवटल्या ओळी वाचुन मान हलली आणि मोठा सुस्कारा निघुन गेला! :-)
चुकत असेन तर नक्किच सांगा, पण
नको शांतता 'आतल्याआत' होते
असं कसं? शांतता आतल्याआत हो'ती' ना, असं म्हणतो ना? होते कसं? निव्वळ शिकण्याच्या दृष्टीने विचारले, राग नसावा.
तुम्ही 'तिला' (गझलेत) मारलेली कवडश्यातली मिठी सुंदर!
अजुन एक न समजलेला शेर म्हणजे "खुलाश्यातही प्रश्न..". विरोधाभास साधायचा प्रयत्न असावा तुमचा, अबोले प्रश्न मांडणे थोडं वेगळच वाटलं.
तुमचे मिनुच्या गझलेवरचे विवेचन आवडले. तुमचे इतरस्त्र प्रकाशित झालेले लिखाणही छान आहे. पुढील लेखनासाठी शुभेछ्छा!

पुलस्ति, साधी तरी सुंदर गझल आहे तुमची.
"येणार्‍या जाणार्‍या ऋतूंचा रंग काय शाश्वत धरावा?" तसेच कुठे भुक आहे कुठे घास आहे, रिकामीच मैफील..,जरी शांतता.. या सार्‍या कल्पना सुंदर. मला सर्वाधीक भावले ते शेर म्हणजे:
खरी वेळ येता म्हणे "कुंजरोवा"
असे सत्यवादी समाजात होते.
"जमाना बदलना चाहिये" हे तुमच्या गजलेची चळवळ आणि सद्य परिस्थीती बद्दलची नाराजी अतिशय प्रकटपणे मांडतो हा शेर. छान! तसेच "तमा आसरा आज कोठे मिळावा?" हाही शेर फार अर्थपुर्ण झालाय. पुढील लेखनासाठी शुभेछ्छा!



Mrinmayee
Friday, March 02, 2007 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीनु, चक्रपाणि, पुलस्ती..
तुमच्या गझलांचं रसग्रहण करून त्यावर इथे काही शब्दात मांडता यावं असे शब्दही माझ्याकडे नाहीत! सगळ्याच नितांत सुंदर!
चिन्नु, "नको शांतता 'आतल्याआत' होते" मधे 'होते' हे 'नको' साठी आलेलं क्रियापद आहे! शांतता नकोशी होते.. असं साधं वाक्य करून बघीतलं! बरोबर की चुक ते माहिती नाही!


Anilbhai
Friday, March 02, 2007 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे काय त्या श्याम रंगात होते
सख्या रंगल्या श्याम रंगात होते

हा चांगला मतला होवु शकेल का?

Chinnu
Friday, March 02, 2007 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई, मध्ये बोलल्याबद्दल सॉरी हा. तुम्ही लिहिलेला मतला नक्कीच चांगला आहे, पण कदाचित तुमच्या गझलेची भरारी लिमीट होईल त्याने असे वाटते. असा specific मतला न घेता general घेतलेला बरे, ज्यामुळे गझल पुढे व्यवस्थित मांडता येवु शकेल. Btw, I just entered the boat! त्यामुळे खरच भुलचुक माफ़ी! :D

Swaatee_ambole
Friday, March 02, 2007 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाई,
१. अर्थ स्पष्ट होण्यासाठी ' सख्या, रंगले (मी) श्यामरंगात होते' असा काहीसा बदल करावा लागेल. मग technically हा मतला होऊ शकेल.
२. पण मग पुढचे सगळे शेर 'श्याम रंगात होते' हा रदीफ़ पाळू शकतील का?


Anilbhai
Friday, March 02, 2007 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


चिन्नु,
मी ही नविन आहे या विभागात. तेव्हा थॅंकु.

स्वाती,
माझ अर्थ जरा वेगळा होता.
पहिल्या ओळीत श्याम म्हणजे रंग.
व दुसर्‍या ओळीत श्याम म्हणजे कृष्ण आणि रंगात म्हणजे (त्या रंगलेल्या सख्याना पाहुन त्याच्या बरोबर रंगले होते).


Anilbhai
Friday, March 02, 2007 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढचा शेर हा कसा वाटतो.

कसा कंस झाला उन्मत्त असा हा
कळेना कसे श्या मरण गात होते

गात होते हा रदिफ़ चालेल का?.
आणि 'रण' दोन रस्व चा एक दिर्घ. चालेल ना?.


Swaatee_ambole
Friday, March 02, 2007 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

* तरी ऑर्कुटवर वॉर्निंग होती!! :-)
अच्छा, मग ' सख्या रंगल्या, श्याम रंगात होते' असं ( स्वल्पविराम देऊन) लिहावं लागेल.
तसंच दुसर्‍या शेर मधला पहिला ( उला) मिसरा मीटरमधे येण्यासाठी
' कसा कंस उन्मत्त झाला असा हा' असं करावं लागेल.
पण भाई, इथे
१. ' आ' ही अलामत भंग झाली. ( कळेना कसे' मधल्या ' से'च्या जागी आकारांत शब्द हवा.
२. आता ' मरण गात होते' नाही लिहून चालणार. ' श्याम रंगात होते'च हवं.
३. गज़ल मधे ' श्या'?????
( सॉरी, शाळेत हसल्याबद्दल गुरूजी ओरडणार आहेत, पण हे जरा..)


Anilbhai
Friday, March 02, 2007 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उद्याला भविष्य चांगल असेल तरच इथे याव म्हणतो. * :-)

अलामत ही रदिफ़ च्या आधीच्या अक्षरावर असते ना?.


Meenu
Friday, March 02, 2007 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरी ऑर्कुटवर वॉर्निंग होती!! >>> कसली गं स्वाती ...? मला पण सांग ना गुर्जी नाहीयेत तेवढ्यात बोलुन घेउ या ... कुणी नाव नका रे लिहु फळ्यावर आमची दंगा करत होत्या म्हणुन

Swaatee_ambole
Friday, March 02, 2007 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> अलामत ही रदिफ़ च्या आधीच्या अक्षरावर असते ना?
नाही, काफ़ियाच्या आधीचा common स्वर म्हणजे अलामत. म्हणून तुमच्या मतल्यानुसार ' श्याम रंगात होते' हा रदीफ़, ' त्या', ' रंगल्या' इत्यादींनी संपणारे शब्द हा काफ़िया..
अरेच्च्या, हा काफ़िया tricky आहे.
गुरुजी, इथे अलामत त्या जोडाक्षरामागचा ' अ'कार होणार का मग?

मीनू, तो संदर्भ मराठीचं माहेरघर असलेल्या NJ BB वर सापडेल बघ. :-)


Yog
Friday, March 02, 2007 - 7:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, बाकीच्या गझल्स टाक रे.. इथे जरा अती चर्चा होतीये, रसभन्ग होतोय. खर तर प्रत्त्येक गझलेवर फ़क्त त्या गझलकाराचे मत अन कार्यशाळेतील मार्गदर्शकाचे मत इतपतच पुरेसे नाही का? रसग्रहण वगैरे आवश्यक आहे का (कितीही चान्गले असले तरी)? कारण एकाच शेरातून अनेक अर्थ वा सन्दर्भ घेता येतील, तेव्हा मला वाटते फ़क्त गझल, अन सौन्दर्यस्थळे एव्हडे पुरेसे आहे. :-(

Swaatee_ambole
Friday, March 02, 2007 - 7:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं अशी चर्चा व्हावी, त्यातून शिकता यावं हाच कार्यशाळेचा उद्देश आहे. चर्चा वाचायची कोणावरच सक्ती नाहीये.
रसास्वादासाठी काव्यधारेतील इतर BB सुरू आहेतच.


Pulasti
Friday, March 02, 2007 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडा उशीरच झालाय पण असो...
मायबोलीच्या BB चा, या सर्वांच्या मार्गदर्शनाचे ऋण मी वेळोवेळी व्यक्त केले आहे. माझ्या गझलेवर स्वातीबरोबर पूर्ण चर्चा झाल्यानंतर आणि प्रवेशिका submit करायची मुदत संपल्यावरच मनोगतावर टाकली. शिवाय तेथे मला आधीच काही "ऋतू" गझला दिसल्या होत्या. मनोगतावर सुद्धा काही जाणकारांकडून उपयुक्त सूचना मिळाव्या हाच प्रामाणिक उद्देश होता. अर्थात कार्यशाळेचा उल्लेख न केल्याचे मला कुठल्याहीप्रकारे समर्थन करायचे नाहिये. तो उल्लेख वेळीच न करून कळत नकळत माझ्यामुळे मने दुखावली गेली आहेत... स्वाती, वैभव, admin यांची मनापासून क्षमा मागतो. यापेक्षा मी अधिक आता काय करू शकतो? कृपया मोठ्या मनाने चूक पोटात घ्यावी हीच विनंती.

-- पुलस्ति.

Gajanan1
Saturday, March 03, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव मी माझी गजल आता correct करुन पाठवू शकतो का?




 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators