Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 25, 2007

Hitguj » Gulmohar » शालिवाहन शके १९२९ (२००७-२००८) » वैशाख » काव्यधारा » मायबोली गज़ल कार्यशाळा -1 » Archive through February 25, 2007 « Previous Next »

Vaibhav_joshi
Friday, February 23, 2007 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आतापर्यंत ' मायबोली गज़ल कार्यशाळा -1 ' मध्ये सहभाग निश्चित झालेली नावे

१)मीनू
२)जयावी
३)लोपमुद्रा
४)स्मिता
५)देवदत्त
६)मयूर लंकेश्वर
७)गणेश कुलकर्णी
८)झाड
९)प्रिंसेस
१०)मिल्या
११)माणिक
१२)मनिषा लिमये
१३)किशोर
१४)अपर्णा
१५)नंदिनी देसाई
१६)तुषार (imtushar)
१७)सुचेता पाठक
१८)मेघा देशपांडे
१९)पुलस्ति
२०)प्रिया ( चिन्नू)
२१)श्यामली

जे आधीच अप्रतिम गज़ल लिहीतात पण ह्या चळवळीस गज़ल लिहून वा इतरप्रकारे हातभार लावण्यास उत्सुक आहेत त्यांची नावे

१) प्रसाद शिरगावकर
२) सारंग
३) बैरागी
४) मानस
५) स्वाती

मित्रांनो लवकर लवकर कळवा . lets learn it together " गज़ल म्हणजे काहीतरी अवघड त्या पेक्षा कविता / मुक्तछंद बरा " ही कन्सेप्ट बदलून टाकू .. हा नितांत सुंदर काव्यप्रकार आत्मसात करूनच घेऊ या . आपण उद्या सकाळी एक मिसरा घेऊन कार्यशाळा सुरू करणार आहोत . त्यासाठी तुम्हां सर्व कवी मंडळींचं अनुमोदन , तुमची उपस्थिती आवश्यक आहे .

" एक ओळ वाचायची , १० ओळी लिहायच्या , मेल करायच्या . संपल काम "

Please join hands

सर्वोत्कृष्ठ गज़ल साठी आत्तापर्यंत आलेले प्रेमळ प्रोत्साहन

१)ऍडमिन च्या परवानगीने मायबोलीच्या मुखपृष्ठावर स्थान ( नक्की व्हायचे आहे )

२)प्रसाद शिरगावकर यांच्या अत्यंत लोकप्रिय वेबसाईट www.sadha-sopa.com वरती एक आठवड्या साठी मानाचं स्थान

३)स्वतःचे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दोन व्यक्तींतर्फे गज़ल संबंधित भेट

४)सारंग पत्की यांच्यातर्फे एक छोटीशी भेट

५)सुमतीताई वानखेडे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या " कृष्णडोह " ह्या काव्यसंग्रहाची प्रत त्यांच्या स्वाक्षरीसह .

६)सुप्रसिध्द गज़लनवाज़ भिमराव पांचाळे यांनी गायलेल्या मराठी गज़ल ची सीडी दादांच्या स्वाक्षरीसह

शतशः आभार



Mayurlankeshwar
Friday, February 23, 2007 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एका पायावर तयार आहे.१००% माझेही अनुमोदन...



Princess
Friday, February 23, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण मी पण...:-) पण मला फार भिती वाटते गझल लिहायची. गुरु लोक म्हणताय तर मग लिहिता लिहिता शिकेन :-)
lets make it a success


Jayavi
Friday, February 23, 2007 - 10:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता उद्याची अगदी आतुरतेनी वाट बघतेय :-)
लोपा म्हणाली तसंच माझंही होतं..... गझलांच्या बीबीवर यायचं धाडस होत नव्हतं. यायचे ते फ़क्त वाचायला.

आता बघूया तुमच्या मेहेनतीचं आमच्याकडून कितपत सार्थक होतं ते.

अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. आपल्या इतक्या बिझी वेळातून वेळ काढून करताय.... great !!


Swaatee_ambole
Friday, February 23, 2007 - 2:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव, सर्वप्रथम तुझं अभिनंदन!
मुळात तुला ही कल्पना सुचणं आणि त्यासाठी तुझं लिखाण आणि काम यातून वेळ आणि energy द्यायची तयारी तू दाखवणं हे खरंच प्रशंसनीय आहे. गज़ल लिहावी कशी, आणि वाचावी कशी हे शिकणं ही किती आनंदाची बाब आहे हे जितक्या जास्त लोकांपर्यंत पोचेल तितकं छानच. ( मुळात मला त्याची आवड आणि जी काय थोडीफार माहिती आहे ती तुझ्यामुळेच झाली हे इथे जाता जाता नमूद करायला हरकत नाही.)

मी लागेल ती मदत जरूर करीन ( गुरुदक्षिणा म्हणू हवंतर). पण माझं नाव चुकीच्या यादीत पडलंय. :-)

पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुला आणि सर्वांनाच शुभेच्छा!! :-)


Yog
Friday, February 23, 2007 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaibhav,
check your email (yahoogrp email)

R_joshi
Saturday, February 24, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव गजल या संगीत प्रकारासाठी कार्यशाळा आयोजित केल्याबद्द्ल अभिनंदन:-)
मलाहि गजल लिहिण्यास शिकणे आवडेल. या कार्यशाळेत नाव देण्यासाठी मी काय करु ते कृपया मला कोणीतरी सांगेल का?


Vaibhav_joshi
Saturday, February 24, 2007 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपडेटस ....

मायबोली गज़ल कार्यशाळेस मा. ऍडमिन यांचा पूर्ण पाठिंबा . सर्वोत्कृष्ठ गज़ल मायबोलीच्या मुखपृष्ठावर पोस्ट केली जाणार.

२)तयार झालेल्या निर्दोष पैकी एक गज़ल संगीतबध्द केली जाईल आणि SOULMATTER ह्या अल्बम च्या music launch मध्ये वापरली जाईल. "Music Launch" of SOULMATTER by Yog
(soulmatter.biz, copyrights: SOULMATTER LCC). ही गज़ल कार्यशाळेत सर्वोत्कृष्ठ ठरलेलीच गज़ल असेल असे नाही. मूड इमोशन्स अश्या बर्‍याच गोष्टी पाहून कुठलीही एक निर्दोष गज़ल निवडली जाईल.

कालच्या यादीत नवीन समाविष्ट नावे

१)रुपल . p जोशी
२)हेम्स
३)नचिकेत जोशी(मी_आनंदयात्री)
४)सुधीर( jo_s )




Mankya
Saturday, February 24, 2007 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं प्रिति, काही विशेष नाही करायचं !
एक मेल पाठव फक्त
vaibhav.joshee@gmail.com या संकेतस्थळावर !
बरोबर ना रे वैभवा ( मित्रा ) ! असं चालेल ना !

माणिक !

Vaibhav_joshi
Saturday, February 24, 2007 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल अतिशय अतिशय आभारी आहे . तर जास्त वेळ न दवडता कार्यशाळेला सुरुवात करू या .

सर्व सहभागी गज़लकारांनी व अजूनही २८-०२-०७ पर्यंत सहभागी होऊ इच्छिणार्‍या गज़लकारांनी इतकंच करायचं आहे . आता इथे एक मिसरा ( ओळ ) देण्यात येईल , त्याचं मीटर देण्यात येईल , व उदाहरण म्हणून एक नवी ओळ लिहून दाखवण्यात येईल . अतिशय सोप्प्या पण अत्यंत कर्णमधुर अश्या भुजंगप्रयात वृत्तातला ( उदा:- " मना सज्जना भक्ति पंथेचि जावे " ) हा मिसरा असा आहे . ही प्रत्येक गज़ल ची पहिली ओळ असेल

" ऋतू येत होते ऋतू जात होते "

मीटर असं आहे

ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा

र्हस्व दीर्घ दीर्घ र्हस्व दीर्घ दीर्घ र्हस्व दीर्घ दीर्घ र्हस्व दीर्घ दीर्घ


आता शेर पूर्ण करण्यासाठी दुसरी ओळ लिहायची झाल्यास

ऋतू येत होते ऋतू जात होते
फुलावे कसे हे कुणा ज्ञात होते

गज़ल ची प्रत्येक द्विपंक्ती / प्रत्येक शेर एक पूर्ण कविताच असते . फक्त तो एक शेर वाचला तरी काय म्हणायचंय ते कळून येतं . त्यामुळे प्रत्येक सुटा शेर हा वेगवेगळ्या विषयांवर / अनुभवांवर बेतलेला असू शकतो .

जसे वर पूर्ण केलेला शेर सांगतो की ऋतू त्यांच्या परीने येतच होते पण मला फुलायचेच माहीत नव्हते

आता हाच शेर कुणी असाही लिहील

ऋतू येत होते ऋतू जात होते
कळ्यांच्या कुठे काय हातात होते

आता स्त्री मनाशी संबंधित हा शेर पूर्ण अर्थ बदलून टाकतो

तर मित्रांनो आता इतकंच करायचं आहे .
" ऋतू येत होते ऋतू जात होते "
ही ओळ घ्यायची, प्रत्येक ओळीच्या शेवटी " त होते " येईल आणि त्या आधीचं अक्षर ' आ'कारांत असेल इतकंच अवधान पाळायचं, ( उदा : हात होते, दारात होते, अर्थात होते,घणाघात होते इ.), ' मना सज्जना'च्या चालीवर म्हणून बघायचं आणि थोडं जरी बसतंय असं वाटलं की कमीत कमी पाच व जास्तीत जास्त कितीही द्विपंक्ती असलेली रचना मला मेल कराय्ची . २८ तारखेपर्यंत माझा मेलबॉक्स व माझा मोबाईल नं ९८६००९८१९८ हा २४ तास आप्ल्या सर्वांसाठी आहे . साध्यातली साधी शंका असली तरी विचारायला संकोच करू नका . सुचत असताना सुध्दा .

सर्वांना शुभेच्छा! :-)


नियमावली

१. प्रत्येक गज़ल ची पहिली ओळ ' ऋतू येत होते ऋतू जात होते' अशीच असेल.
२. वर उदाहरण म्हणून दिलेल्या नं. २ च्या ओळी कुणीही वापरू नयेत.
३. प्रत्येक गज़ल मध्ये किमान ५ व कमाल कितीही द्विपंक्ती / शेर असू शकतील.
४. प्रत्येकाने आपली गज़ल
vaibhav.joshee@gmail.com ह्या पत्त्यावर मेल करायची आहे.
५. गज़ल ज्या क्रमाने येतील त्या क्रमाने त्यांच्यावर चर्चा सुरू होईल.
६. प्रथम नियामक मंडळ मेलम्ध्ये आलेल्या गज़ल वर चर्चा करून त्या त्या संबंधित गज़लकाराशी सम्पर्क साधेल व साधारण दोन ते तीन संभाषणांत निर्दोष गज़ल त्या गज़लकाराकडून लिहून घेण्याचा प्रयत्न असेल.
७. प्रत्येक निर्दोष गज़ल ह्या बीबी वर पोस्ट केली जाईल. हा क्रम मेल मध्ये आलेल्या गज़लांसारखाच असेल अशी शाश्वती नाही, कारण चर्चा करण्यास खुद्द गज़लकार उपलब्ध नसेल तर जश्या जश्या पूर्ण होतील तश्या पोस्ट केल्या जातील.
८. सर्व गज़लकारांचा आधीचा प्रयत्न व चर्चेनंतरचा प्रयत्न दोन्ही पोस्ट केले जाईल.
९. त्याबरोबर त्या गज़लेवर कुठ्ल्यातरी एका जाणकाराचे विश्लेषण असेल ज्यात गज़लेतली सौंदर्यस्थळं, कुठले कुठले शेर कसे बदलले गेले वगैरे माहिती असेल.
१०. सर्व चर्चा, विश्लेषण निःस्पृह पद्धतीने केले जाईल.
११. सर्वोत्तम गज़ल चा निर्णय सर्वस्वी नियामक मंडळाचा चा असेल.
१२. प्रत्येक निर्दोष गज़ल १ मार्च पासून २ २ दिवसांच्या अन्तराने पोस्ट केली जाईल. जेणे करून त्यावर चर्चा होवू शकेल.
१३. २८ फ़ेब्रुवारीनंतर कुणाचीही प्रवेशिका स्वीकारली जाणार नाही.

चला तर ' तरही' गज़ल लिहू पुढील मिसरा घेऊन :

" ऋतू येत होते ऋतू जात होते... "


Bhramar_vihar
Saturday, February 24, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान उपक्रम! म्हणजे आम्हा रसिकांसाठी पर्वणिच म्हणायची! :-). शुभेच्छा!

Vhj
Saturday, February 24, 2007 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान उपक्रम आहे. आमच्यासारख्यांनाही गजल करायला प्रोत्साहन मिळतेय.

Vaibhav_joshi
Saturday, February 24, 2007 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बोलता बोलता गज़ल ...

अरे मित्रांनो ,
तुम्हाला असे तर नाही वाटले ना की तुम्हाला काम देऊन आम्ही निघून गेलो ? असे होणार नाही . इथेच आहोत . प्रत्येकाने एक गज़ल लिहीपर्यंत आपण सगळे एकत्र आहोत . वरील " बोलता बोलता गज़ल " ही पाटी बघून तुम्हाला मी बोलबच्चनगिरी करतोय असे वाटले ना ? असं नाहीये मित्रांनो . चला आपण दोन मैत्रिणींमधला फोनवर चाललेला संवाद ऐकू या .

पहिली :- " अगं sss काल बाहेर गेलोच नाही . तुला काय सांगू ssss किती लोक आले . खरोखर सुचेनाच झाले मलाही ."

दुसरी :- " तुला काय बाई ! तुझे ठीक आहे . तरी सासर्‍याचा तुला त्रास नाही . अगं मान्य ! असतेच डावे नि उजवे . परंतू किती ssss त्रास होतो मनाला . "
:-)

काय मित्रांनो .. कळतंय ना ? नाही ?
:-)

अगं काल बाहेर गेलोच नाही .

तुला काय सांगू किती लोक आले .

खरोखर सुचेनाच झाले मलाही .

तुला काय बाई तुझे ठीक आहे

तरी सासर्‍याचा तुला त्रास नाही .

अगं मान्य असतेच डावे नि उजवे .

परंतू किती त्रास होतो मनाला .

लगागा लगागा लगागा लगागा

मना सज्जना भक्ति पंथेचि जावे

पहाटे पहाटे मला जाग आली


ऋतू येत होते ऋतू जात होते








Smi_dod
Saturday, February 24, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव..:-)...कळतय आता थोडे थोडे... .. अतिशय सोपे करुन सांगतोय तु..:-)

R_joshi
Saturday, February 24, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव प्रयत्न नक्किच करेन पण फारसे जमेल असे वाटत नाहि. गजल आधी इथे पोस्ट केली तर चालेल का? आणि या गजल मायबोलिच्या एखाद्या बीबीवर पोस्ट करुन तुला मेल केल्या तर चालतील?

Niru_kul
Saturday, February 24, 2007 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहभागासाठी नाव कोठे नोंदवायचे??

मलाही गज़ल शिकायला आवडेल.....
वेळ अजुन गेली नसेल तर मी पण भाग घेऊ इच्छीतो....

निरज कुलकर्णी.


Swaatee_ambole
Saturday, February 24, 2007 - 2:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्या बात है,वैभव!!!! :-)
' गुरूजी' बिरूद एकदम शोभतं तुला!!! :-)


Gajanan1
Saturday, February 24, 2007 - 2:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही गझला शिकाया मिळू दे

लगागा ४ वेळा..

बरोबर आहे का? झ हे अक्शर वजनदार आहे.. म्हणून ते गुरु consider करता येईल का?


Vaibhav_joshi
Saturday, February 24, 2007 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपल ..
इथे फक्त निर्दोष गज़ल पोस्ट करण्यासाठी ही कार्यशाळा धडपड करते आहे . तुम्ही तुमची रचना वर सांगितलेल्याच पत्त्यावर पाठवावी . शेवटी प्रत्येक रचनेवर चर्चा करून , ती नीट करून इथे पोस्ट होणारच आहे .

शुभेच्छा

नीरज , २८ तारखेपर्यंत कुणीही गज़ल पाठवू शकेल .

गजानन ... झ ह्या स्वतंत्र अक्षरावर दोन मात्रांचं वजन नाहीये . तुम्ही कल्पना जमेल तितक्या मीटरमध्ये लिहून पाठवा . कुठलेही अक्षर त्या मिसरयात कुठल्या पद्धतीने वापरलं गेलंय ह्यावर वजन ठरतं . त्याची चर्चा होईलच .

लगागा ४ वेळा .. अगदी बरोबर

स्वाती ....
:-)


Gajanan1
Sunday, February 25, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजल पाठवलेली आहे. तुमचे मार्गदर्शन उत्तम आहे.





 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators