Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
लहान मुलांच्या उचापती आणि खूप काही ...

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » लहान मुलांच्या उचापती आणि खूप काही « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 13, 200625 01-14-06  1:37 am
Archive through May 27, 200620 05-27-06  6:51 am
Archive through March 21, 200720 03-21-07  3:56 pm
Archive through June 04, 200720 06-04-07  3:25 pm
Archive through September 07, 200720 09-07-07  5:44 pm
Archive through December 11, 200720 12-11-07  5:03 am
Archive through January 23, 200820 01-23-08  2:41 pm

Anilbhai
Wednesday, January 23, 2008 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छ्या, हा बाबा पण ना...

Prajaktad
Wednesday, January 23, 2008 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माध्यम अशा गोष्टींची जबाबदारी घेत नाहीच...तेव्हा जबाबदारी आपणच घ्यायची..


Zakasrao
Thursday, January 24, 2008 - 2:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनिलभाई
.. .. .. ..
पोराना आचरट हिन्दी फ़िल्म तर अजिबात दाखवु नयेत. आणि ज्यात लहान मुल आचरट असत आणि काहीही बडबड करत असत अशा फ़िल्म तर बिलकुल नको.
आजकाल तर दुर्दैवाने बहुतांश हिन्दी फ़िल्म मध्ये लहान मुल आचरट असतात.


Bee
Thursday, January 24, 2008 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या दुसर्‍या बहिणीचा पहिला मुलगा मध्यंतरी शाळेतील मुलांकडून शिव्या शिकून आला होता आणि त्याला त्याचे अर्थही कळत होते. अशावेळी बहिण आणि भाऊजींनी हवी ती कानपिळनी केली त्याची. आता ह्या ४थ्या बहिणीच्या पहिल्या मुलीला ती जे शब्द वापरते कधीमधी त्याचे अर्थ अजिबात माहिती नसतात. त्यामुळे तिच्या निरागसतेला ठेच पोचू नये ह्या उद्देशाने तिने म्हंटला शब्द की आपण त्यावर त्वरीत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करणे आम्ही टाळतो. उलट बर्‍याचदा ती ज्या प्रकारे ते शब्द वापरते त्यातून मुले किती निरागस असतात हे दिसून येते. अशावेळी मुलांना असे शब्द वापरू नकोस असे सांगून आपण त्यांना त्या शब्दाच्या खर्‍या अर्थाच्या अधिक जवळ पोचवितो आहे असे नाही का? ह्यात दुसरा प्रश्न असाही आहे की चारचौघात असे शब्द वापरले तर आईवडीलांच्या इभ्रतेला धोका पोचतो. मान्य आहे पण निदान सुशिक्षित लोक चार वेळा तरी विचार करतात मुलांच्या मानसिकतेबाबत. आपली उठबस कुणासोबत आहे ह्यावर हे अवलंबुन आहे.

Bee
Thursday, January 24, 2008 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि फ़क्त एकुलते एक मुल असेल तर शक्य आहे आईवडीलांना असे पदोपदी मुलांवर पाळत ठेवणे. ज्यांना तीन तीन अपत्य आहे त्यांना ह्या गोष्टीचे फ़ार काही वाटत नाही. अपत्य जितके कमी तेवढे पालक जागरुक असतात. कधीकधी ही जागरुकता नको तितकी असते. चु. भु. दे. घे.!

Abhijeet25
Thursday, January 31, 2008 - 1:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या भावाच्या लग्नातला किस्सा.
बरेच नातेवाईक कोल्हापुर, इचलकरंजी, सांगली भागातले असल्याने लग्न सांगलीला झाले. जेवायला बुफे आणी पंगत दोन्हि प्रकार ठेवले होते. मी जेवायला जाताना माझा एक चुलत भाउ वय वर्षे आठ माझ्यापाशी आला मला बुफे कडे जाताना बघुन म्हणतो "दादा तिकडे नको जाउ जेवायला" मी कुतुहला ने "का रे बाबा?" तिकडे बघ म्हणे "शिळंच जेवण गरम करुन वाढतायत."


Anaghavn
Monday, February 04, 2008 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" अगं अस नाही ते तसं असतं तुला कळत नाही का? येडी कुठली"
हे "येडी कुठली" सारखं ऐकावं लागतं माझ्या ४ वर्षाच्या भाच्या कडुन.
शिवाय आमच अस ठरल आहे की तो म्हणजे "जेरी" आणि मी (त्याची मामी) म्हणजे "टॉम"-- अशाप्रकारच्या नाटकातुन त्याच्याकडुन वाट्टेल ते करुन घेतो आम्ही. उदा. सकाळी शाळेत जायला उशीर होत आहे आणि हे महाशय आरामात सोफ्यावर पहुडलेले असतात, बरं जबरदस्ती करुनही चालत नाही कारण लगेचच भोंगा असतो. मग, अशावेळी टॉम आईच्या मदतीला धाउन जातो. मग मागे लागायच, आणि भुलवत भुलवत त्याला बाथरुम मध्ये घेऊन जायच. तिथे त्याची आई तयारच असते. मग टॉम ने कस फसवलं अस म्हणत त्याची आंघोळ ब्रेकफास्ट असं सगळ होतं. आणि मग टॉम निघतो त्याच्या त्याच्या ऑफिस ला जायला.


Prachee
Wednesday, February 13, 2008 - 8:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या लेकीचे नाव आहे मिहिका, पण लाडाने ठेवलेली अनेक नावे आहेत... शोना, पिल्लु..... वगैरे वगैरे. हल्ली परीराणी हे नाव चालु आहे. 'परीराणी ' म्हटले की काय सांगाल ते करायला तयार बाईसाहेब.
तर नुकताच बाबा कामानिमित्त बाहेरगावी गेला. मग काय आईलेक दोघीच घरात धमाल करतो. एक दिवस लेक गेली एका मैत्रिणीकडे खेळायला आणि परत यायलाच तयार नाही. रात्रीचे १० वाजले तरी खेळ संपेनाच. मी फ़ोन केला तर मैत्रिणीची आई म्हणाली,"जेवण झाले आहे तिचे. पण घरी नाही जाणार असं म्हणते आहे. कदाचित घरी एकटं वाटत असेल." मी तिला फ़ोन द्यायला सांगितले.
"हॅलो आई, मी येणार नाही."
"अगं पण परीराणी मला खुप भीती वाटते आहे. आणि झोपही येत नाहीये. तु ये ना लवकर. प्लिज परीराणी"
"हो हो आलेच मी... लगेच येते."

आणि पुढच्या ५ मिनिटांत घराची बेल वाजली.
दरवाजा उघडताच गळ्यात पडुन म्हणते कशी," आता मी आले ना? आता घाबरु नकोस हं. चल आधी झोपवते तुला. मोठी झालीस ना तु? मग असं घाबरतात का मोठी मुलं?"
काय बोलावे हेच कळले नाही मला.....



Zakki
Wednesday, February 13, 2008 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी नात तीन चार वर्षाची असताना तिला तिच्या आईने सांगितले की अनोळखी लोकांकडे खाऊ मागू नको, बोलू नको. ते तुला घेऊन पळून जातील, नि मग तुला आई, बाबा कुणि दिसणार नाहीत पुन:.
यावर एकदोन सेकंद विचार करून ती मुलगी म्हणते, 'पण आई, ते मला खायला देतील ना?'




Sunidhee
Wednesday, February 13, 2008 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राची... कित्ती गो SSS ड!!!
ही परी खरेच फेमस आहे. माझ्या मुलीला एक छानसा फ्रॉक होता. तो नवीन असताना घातला के मी तिला टाळ्या वाजवत वगैरे म्हणायची 'आईची परी आली!!'. तिला ते खूप आवडायचे. आता तो फ्रॉक जूना, मळलेला,सर्व रंग गेलेला बिचा SS रा झालाय. तरी आता पण तोच फ्रॉक तिला घालायचा असतो. 'मला परी व्हायचे आहे' चालू होते, आणि मग फ्रॉक घालून स्वत:भोवती 'मी परी आहे' म्हणत आनंदाने गिरक्या घेणे चालू होते.

झक्की.. बरोबर कामाचेच बोलली की नात :-)


Prr
Wednesday, February 13, 2008 - 10:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

@Prachee
किती गोड आहे ग तुझी मुलगी....काय व कसे वळण लावलेस ग तिला?
इथे मुलावर कसे संस्कार करावेत यावर आहे का BB?

@zakki
एकदम व्यवहारी आहे बर तुमची नात!


Anaghavn
Friday, February 15, 2008 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"परीराणी"--किती सुंदर...
मी पण माझ्या भाचीला परीराणीच म्हणते--अर्थात ति अजुन ६ महीन्यांचीच आहे. बघु पुढे काय काय करते ते. बाकी "मिहिका" नाव ऐकुन मला माझ्या दुसर्या भाचीची आठवण झाली--दिसायला अतिशय गोड-सुंदर म्हणता येईल अशी--बोलके डोळे--वय वर्ष--२-- स्पष्ट बोलता येत नाही पण बोलण्याची भारी हौस--विशेषत: रागवण्याची!! नखरेही खुप. आपल्याला सगळे भाव देतात हे कस कळत या वयात काय माहीत. पण अतिशय लाघवी... आठवण आली.


Anaghavn
Thursday, February 28, 2008 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल माझ्या "परिराणी" कडे गेले होते.(वय ६ महीने). अर्धा तास होते, पण शहाणी माझ्याकडे "हा कोण विचित्र प्राणी बुवा?" अश्या आविर्भावात बघत होती.किती हासवण्याचा प्रयत्न केला पण नुसती आश्चर्याने बघत होती!!!!!--आता यात कसल आश्चर्य आहे? आणि मग तिचा बाबा आला बाहेरुन. आणि त्याला बघताच इतकी छान हासली म्हणता!!!! म्हणजे आम्ही म्हणजे आपले नुसतेच "हे" वाटतं!!

Bee
Tuesday, April 15, 2008 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी भाची मयुरी तीनेक वर्षांची असेल. मी भारतात गेल्यानंतर तिच्या आईला नावानी हाक मारली. इतक्यात मयुरी रडायला लागली. मी तिला विचारले लगेच काय झाले तर म्हणाली.. असे म्हणं 'मयुरीची आई'. बहिण म्हणाली सर्व जण मला सासरी मयुरीची आई ह्याच नावानी हाक मारतात, तिची त्यातही मालकीची भावना असते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators