Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
विसापूर - लोहगड ...

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » विसापूर - लोहगड « Previous Next »

Gs1
Monday, December 05, 2005 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



XainavaarÊ 3 iDsaoMbar.

ra~I jaa]na rivavaarI duparpya-Mt prtta yaošla Asao kuzotrI jaavao AAa ivacaar caalaU hÜta. saQyaa Aapaplyaa ]VÜgaat vyast AsalaolaI kaya-kto- maMDLI pNa yaotaT ka baGaavao mhNauna paca saha vaajata kUla AaiNa igarIlaa fÜna kolaoÊ AaiNa ra~I dhacyaa laÜNaavaLa laÜklalaa igarIÊ p`saadÊ imaihrÊ fdIÊ Ajau-naÊ Aimat AaiNa maI Asao saat jaNa jamalaÜ. saaDoAkralaa maLvalaI sToXanavar ]trlaÜ AaiNa lagaoca kUlahI daKla Jaalaa.

lagaoca caalaayalaa sau$vaat kolaI. ga`osaÊ igarI AaiNa p`Aadcyaa kivata eokt AQyaa- tasaat Baajao gaava gaazlao. barIca ku~I BauMkU laagalaIÊ PsNa ek ku~a AgadI p`omaanao AamacyaabarÜbar yao} laagalaa AaNaI %yaanao dusaáyaa idvaXaI sakaLI gaD ]tropya-Mt saÜbat kolaI. %yaalaa AamhI KaMD\yaa Asao naavahI do]na Taklao. dusaáyaa idvaXaI sakaLI purosao ]jaaDlyaavarca AamacaI gaflat laAat AalaI AaiNa maga %yaacao KMD\yaa ho naava badlaUna maMjauLa ho naava zovaNyaat Aalao....

tr AXaa yaa maMjauLocyaa saazInao majala dr majala krt dID tasaat laÜhgaDvaaDI AÜlaaMDlao AaiNa maga pa}Na ek tasaat payayaa- caZuna laÜhgaDavar daKla JaalaÜ.

laÜhgaDcao baroca drvaajaoÊ bau$ja vagaOro sauisqatIt Aahot %yaamaUlao Krca ikllyaavar AalyaasaarKo vaaTto. gauhopaXaI gaolaÜ tr kahI maaNasao itqao mau@kamaalaa hÜtIÊ baahor XaokÜTIhI poTvalaolaI hÜtI. pNa tÜ maÜh Aava$na qaÜDo puZo maÜkL\yaa pzaravarca ra~Icao caaMdNyaaMnaI gacca Barlaolao AaBaaL inarKt basalaÜ. ek sauroK ]lkapat paihlaaÊ ra~I tIna vaajata icavaDa - laaDU Asaa fraL Jaalaa. maga kQaItrI gauhot jaa}na JaÜplaÜ.

phaTo ]zuna ivaMcaukaTa maacaI. itqauna baraca vaoL dubaI-NaInao Aasapasacyaa dÜMgad-áyaa ikllao nyaahaLlao. tuMgaÊ itkÜnaaÊ ivasaapUr ho ikllaoÊ pvanaaÊ vaLvaNa QarNaoÊ D\yaU@sa naÜjaÊ jaamBauLI hI iXaKroÊ e@sap`osavaoÊ rolavao Asao sagaLo phaNyaat ekdma Aazca vaajalao.

Gaa[Gaa[nao prt ifrlaÜÊ gaDavaacaI- paNyaacaI TakIÊ maÜza baaMQaIva tlaavaÊ do}L Asao sagaLo baGauna BaraBar KalaI ]t$ laagalaÜ.

laÜhgaDvaaDIlaa pÜho Ka}na ivasaapUr ikllyaakDo kUca kolao. dgaD\ZaÐD\yaatUna var caZta caZta qaÜD\yaaca vaoLat qaoT var naoNaara katLrsta Qarlaa AaiNa kahI rÜmaaMcak tr kahI AaNaIbaaNaIcyaa xaNaaMnaMtr ikllyaavar daKla JaalaÜ. evhanaa idvasa caaMgalaaca taplaa hÜta AaiNa AamacaI 12caI laÜkla caukNaar hohI spYT Jaalao hÜto. maga qaÜDa vaoL Ajauna qaaMbaU Asao mhNat ikllyaacyaa tTbaMdIva$na ihMDlaÜÊ
paNyaacao ek mast Tko baGauna %yaat DuMbalaÜ.

ek vaaT sarL maLvalaIlaa ]trto Asao vaacalao hÜto. qaÜD\yaa saMXaÜQanaanaMtr payavaaTsadRXa ]tarava$na ]<arokDo ]t$ laagalaÜ. kahI maMDLI AvaGaD jaagaaMvar ADklaI. javaLcao paNa tr koMvhaca saMplao hÜto.

saumaaro dÜna ADIca tasaaMnaI kaT\yaakuT\yaaMnaI baroca jaayabaMdI hÜ]na maI AaiNa kUla Baajao gaavaat tr itGao jaNa qaoT maLvalaIlaa Asao ]trlaÜ toMvha thana AaiNa Baukonao vyaakuL JaalaÜ hÜtÜ.
qaÜD\yaa vaoLanao ]rlao itGaohI Aalao AaiNa caarcyaa saumaarasa maLvalaI gaazlao.

laÜhgaDvarcaa ra~Icaa mau@kama AaiNa ivasaapUr caZta ]trtaMnaacaa AnauBava T/okcaa Cnaca AanaMd do]na gaolaa.

Aata lavakrca hirXcaMd`gaD...




Dhumketu
Monday, December 05, 2005 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप दिवस चुकल्यासारखे वाटत होते. बरे वाटले वाचून.. मी लवकरच भारतात येणार आहे. मग मारु काही ट्रेक्स. मधे दिवाळी ला येऊन गेलो पण वेळ नाही मिळाला, ट्रेक आणी फोनही करायला.

लोहगडच्या गुहेत झोपलात? ढेकुण नाही का चावले? आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा १९९५-९६) जाम ढेकुण होते. रात्रभर आम्ही जागे... पाऊस असल्यामुळे गुहेच्या पार बाहेर जाता येत नव्हते.. पण गुहेच्या दाराबाहेर ओसरीवर बसून होतो... आतमधे एक साधू डाराडुर झोपलेला... आणी ते ढेकुण पिढ्यान पिढ्या तिथे रहात असावेत. मला कर्नाळ्याला एकज़ण भेटला की जो १९८०च्या आसपास तिकडे जाऊन गुहेत झोपला होता...त्याचाही डिट्टो अनुभव.
तुम्हाला कसा काय त्रास झाला नाही बुवा? कोणामुळे पळुन गेले?

विसापूर वरुन मळवली ला वाट मिळाली ना? वडाचा आधार घेउन उतरावे लागते. बुरुजावरच उगवले आहे. मुख्य दार दग़ड पडुन बंद झाले आहे. तिथे एक तोफ़ही होती. पडझड, मुख्य दरवाजाची गोची, पायर्‍या तुटलेल्या ही सगळी ब्रिटिशाची कमाल. (अनुस्वार गडतो आहे
विसापूर ला टाक्यात डुबलात? गाववाले म्हशी, रेडे तिथे न्हाहु घालतात रे... जाऊ दे. म्हशी नाहीतर नाही बाकीचे तर मिळाले टाक्याला :-)

असे ऐकले आहे की सिंहगडा वरून क्वचीत लोहगड दिसतो.. मला दिसला नाही.. शोधायलाही अवघड आहे. लोहग़डवरून कदाचीत सोपे जाईल..पण वातावरण स्वच्छ पाहीजे.

लोहगडवाडी वरुन मळवली कडे न जाता उलट्या दिशेने चालत गेले की थेट लोणावळा गाठाता येते. मी केला होता तेव्हा खडी टाकत होते. आतापावेतो डांबरी झाला असावा.. लोणावळ्यामधे भुशी धरणाकडे जाणारा फ़ाटा आहे तिकडे लागतो हा रस्ता बहुतेक. आता नक्की आठवत नाही.

हरीश्चंद्र करताय. मजा आहे.. तिथल्या नेढ्यातूनही वाट आहे. गावातल्याही कमीजणांना माहीत आहे. जराशी अवघड आहे. पण असे ऐकले की एकच मोठी चढण आहे आणी लवकर पोचतो वरती ( म्हणजे गडावरती ) गडावरती हॉटेल आहे तिथे कदाचीत आणखी माहीती मिळेल... पण तो बिबटयाची भीती घालतो...
परीसरात रानडुक्करे आहेत. पण आपल्याला पाहील्यावर पळून जातात. एकदा मी एकटाच तारामतीवर जात होतो तर एका रानडुकराशी गाठ पडली... मग काय....तो त्याच्या ... .ला पाय लाऊन वरती पळाला आणी खाली मी माज़्या....


Amitpen
Monday, December 05, 2005 - 11:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ढेकूण???.....मला तर कधीच ढेकूण दिसले नाहीत....कुठल्याच मुक्कामावर.. लोहगडावर कधी राहीलो नाही कारण कितीही वाजले तरी पुण्यात परत जाता येतं....एकदा राहीलं पाहिजे लोहगडावर पण.....:-)

धुमकेतू, जीएस मस्तच.....खुप दिवस झाले ट्रेक करुन....इथल्या डोंगरांना किल्यांचे फिलींग नाही..... इथल्या डोंगरावर वर गेल्यावर ना शंकराचे मंदिर असते, ना खोदलेले पाण्याचे टाके असते, ना बुरुज ना तटबंदी, ना जुन्या वास्तुंचे अवशेष, ना एखादी वस्ती....शिलालेख वगैरे तर सोडाच....

जीएस.... हरिश्चंद्रगडची वाट बघतोय.....
MIT मध्ये कधी आणि कुठल्या ब्रॅंचला होतास?

Bhagya
Tuesday, December 06, 2005 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच जी एस. मी वाटच बघत होते तुम्ही लोकं कुठेतरी जाण्याची आणी नंतर वर्णन लिहिण्याची.

अरे अमित, इथे डोंगर आहेत हेच नशीब नाही का? ब्ल्यू मांऊंटन ला जाऊन आलास की नाही? खरतर त्याच्यावर पण लिहायला हवं आहे कोणितरी.


Bhagya
Tuesday, December 06, 2005 - 3:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तच जी एस. मी वाटच बघत होते तुम्ही लोकं कुठेतरी जाण्याची आई नंतर वर्णन लिहिण्याची.

अरे अमित, इथे डोंगर आहेत हेच नशीब नाही का? ब्ल्यू मांऊंटन ला जाऊन आलास की नाही? खरतर त्याच्यावर पण लिहायला हवं आहे कोणितरी.


Gs1
Tuesday, December 06, 2005 - 3:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल अक्षरश : तीन मिनिटात लिहिला वृत्तांत. फारच चुका झाल्या आहेत शुद्धलेखनाच्या. क्षमा करा आणि कुणा माॅडला जमल्यास दुरूस्त करा.

अरे धुम्स कधी येतो आहेस रात्री कोराइगडाच्या गुहेत राहुन पहाटे घात उतरून थेट कोकणात सुधागडावर जायचा बेत तुझ्यासाठी राखून ठेवला आहे.

अमित, मी 91-95/comp

भाग्या तूच लिही की. छान लिहितेस तू.



Limbutimbu
Tuesday, December 06, 2005 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रविवार सार्थकी लावलात की रे तुम्ही! मजा हे राव!
जळवा लेको आमाला.. ..
साल सत्राशे साठ वेळा ट्रेनने जाताना अन एक्स्प्रेस हायवेवरुन लोहगड विसापुर दुरुन पाहिलेत, दुरुन चालत्या गाडीतुन फोटोबी काढलेत पण थित जायचा योग नाय आला!
अन जीयेस, तूच येकला काहुन लिवतो व्रुत्तान्त? ते बाकीचे ठोम्बेलोक्स काय कामाचे? त्याना बी लिवायला लाव.. आळशी कुठले! DDD
काही जण जुम्मेकाजुम्मा तर ह्यो गिर्‍या ट्रेकटूट्रेक
त्याला टाक्यात बुचकळुन काढला ते बर केल! मस्त दगुडान खसखसुन घासुन पुसुन काढला ना त्याला? उजळला असल आता त्यो! काम्पीटिशनला येकदम फिट्ट!
DDD

Bee
Tuesday, December 06, 2005 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रायगड, राजगड, तोरणगड, पन्हाळगड, विशालगड, प्रतापगड, सिंधदुर्ग, सज्जनगड, चितोडगड हे सर्व गड झालेत का फ़िरून? ह्या गडावर यायला मला आवडेल.

खुद्द शिवरायांनी जे गड बांधलेत त्या गडांची नावे कुणाला देता येतील का? आणि जे गड जिंकलेत त्याही गडांची नावे हवी आहेत.

छान चालली आहे भटकंती..

हा हळदीघाट कुठे आहे? राणा प्रताप ह्यांचा घोडा चेतकच ना.. तो हळदीघाटाच मरण पावला होता ना..

माफ़ करा इतिहास नीट आठवत नाही. शाळेनंतर हे कधी परत वाचायला मिळाले नाही.


Amitpen
Tuesday, December 06, 2005 - 4:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

seriously भाग्या.... तुच लिहू शकतेस निळ्या डोंगरांवर....

मी जाऊन आलोय तिकडे पण थोडा अपेक्षाभंग झाला तिकडे जाऊन.... तसं बघितलं तर ऊंचीच्या दृष्टीनेसुद्धा सर्वसाधारणपणे सह्याद्रीच उजवा ठरेल आपला.... आणि तिकडे पायवाटा पण बांधून काढलेल्या आहेत...सर्वकाही पर्यटकांसाठी....

पण अर्थात इथे बरंच काही वेगळं आहे...माती, झाडे, पक्षी, किटक, भु-रुपे सगळंच वेगळं...सह्याद्रीच्या चष्म्यातून पाहून चालणार नाही...या डोंगरांची जातकुळीच वेगळी आहे...

भाग्या, आपल्या सारखे
truly natural ट्रेकस केलेस का तू इकडे?

Amitpen
Tuesday, December 06, 2005 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबु लय भारी प्रतिक्रिया हे राव..!!!

बी, सिंधदुर्ग, सज्जनगड आणि
direct चितोडगड??

महाराजांनी स्वत: जास्त किल्ले नाही बांधले...बर्‍याचश्या किल्ल्यांची त्यांनी पुनर्बांधणी केलीये....सिंधदुर्ग, प्रतापगड मात्र त्यांनी बांधलेले खास...


Giriraj
Tuesday, December 06, 2005 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शनिवारी पाचच्या सुमारास फ़ोन करून GS ने ओव्हरनाईट ट्रेक करुयात का म्हणून विचारले म्हणण्यापेक्षा सांगितलेच.तोरण्याचा plan ठरत होता. पण नंतर लोहगड आणि विसापूर जायचं ठरलं. मी, GS आणि cool असे तीन जण तयार होतोच.पुढच्या दहा मिनिटांत फ़ोनाफ़ोनी करून प्रसाद मोकाशी,फ़दी,अमित सवाई,मिहीर आणि अर्जुन असे मिळून आठ जण तयार झाले.या वेळेस हा पुरुषांचा exclusive treck असल्याने अनेक निषेध संदेश आले.अम्ही निघणार असलेल्या लोकलवर दगडफ़ेक होण्याची शक्यताही निर्माण झाली होती. पण आठला निघण्याऐवजी दहाच्या गाडीने निघायचे असं ठरल्याने आम्ही एका मोठ्या संकटातून बचावलो.मात्र वेळ बदलतांना बदली वेळ अगदी गुप्त ठेवण्यात आली होती. तीन जण पुणे स्टेशन ,चार जण शि.न. स्टेशनहून निघालो.कुल पुढे मळवलीत भेटला.तिथूनच आमच्या ट्रेकची सुरवात झाली.

रात्री बाराच्या सुमारास मळवलीहून आम्ही लोहगडाकडे चालत निघालो. हे अंतर सहा किमी आहे.रस्ता तितका चढणीचा नाही. पण तिनेक महिन्यांच्या विश्रांतिनंतर ट्रेकला निघालो असल्याने थोडे दमायला होत होते.उजव्या बाजूला द्रुतगतिमार्ग,पुढे दिसणारं लोणावळा शहर आणि वर निरभ्र आकाशातल्या तारकांची सोबत पाहता मार्गक्रमण विनसायास चालू होते.अर्जुन हा आकाशनिरीक्षक आहे. त्याने दाखवलेले तारे आणि तारकासमूह ,प्रसाद,मी आणि मिहीरची गाणी असा एकूणच निवांतपणे आम्ही निघालो होतो.दोन तिनदा विश्रांति घेऊन आम्ही रात्री दोनच्या सुमारास गडावर पोचलो.अंधारातही गड किती उत्तम स्थितित आहे हे जाणवत होतं.आतापर्यंतच्या पाहण्यातला हा खूपच देखणा गड वाटत होता.गडावर वस्तीला राहता येईल अशी मोठ्ठी गुहा आहे. आम्ही पोचलो तेव्हा तेथे पाचसात जण शेकोटी करून शेकत बसलेले होते. गडावरच्या दर्ग्याला येणारे बरेचजण तिथे होते.गुहेत विसेक जण तरी झोपलेले होते.आम्ही आसपास भटकून येऊन मग झोपायचे ठरवले. थोडं पुढे गेल्यावर मोकळं पठार दिसताच तिथे तिथे बस्तान मांडले.हळूच चिवडा,लाडू असे पदार्थ बाहेर पडले.त्यावर ताव मारत आकाशनिरीक्षण चालू झाले.गच्च भरलेल्या आकाशातून अर्जुन बरोबर तारे शोधून काढत होता आणि आम्हाला माहीती पुरवत होता. लोहगडवाडीपासून आमच्याबरोबर एक कुत्री सोबत करत इथेही आली.गडावर असणार्या माकडांपासून तिच्यामुळे आम्हाला संरक्षण लाभले होते. अथांग विश्वाच्या पसार्यात मोठमोठे तारे ठिपक्यापमाणे वाटत होते. या पसार्यात स्वतःबद्दलचा विचार करत गुहेत झोपयला परत आलो तेव्हा तीन वाजून गेले होते.

सकाळी साडेसहालाच जाग आली.उजेड दिसत होता पण पूर्ण उजाडलेलं नव्हतं.ताबडतोब विंचूकाटामचीला जायला निघालो.माचीवर उतरतांना पंधरा फ़ुटांचा rock-patch पार करावा लागला. माचीवरून पवना धरणाचा रम्य परीसर डोळ्यांत मावत नव्हता. एका बाजूला तिकोना,धरणाच्या पलिकडचा तुंग,अगदी दूरवर दिसणारं ड्यूकाचं नाक (Duke’s Nose) मागे दिसणारा विसापूर पहात बराच वेळ निघून गेला. यावेळेस आणलेली दुर्बिण एकेकाच्या हातात फ़िरत होती. थोड्या वेळाने आम्ही गड उतरायला लागलो.

पुढचा टप्पा म्हणजे विसापूर! तिकडे जावं की न जावं यावर बरेच वाद होऊन शेवटी एक्मताने म्हणजेच केवळ GS च्या मताने विसाओपूरला जायचे ठरले.द्रुतगतिमर्गाच्या बरोब्बर विरुद्ध बजूने चढाई सुरू झाली.गडाचा विसतार पाहता अकरा वाजता प[अरत मळवलित पोचू याची शश्वति नव्हतीच.पण किमान बाराला तरी पोचूत असे वाटले.मध्ये एका ठिकाणी फ़दी वेगळ्याच वाटेने गायब झाला.झाडी,घळी आणि पाण्याचा मार्ग अश्या वाटेने एका ठिकाणी सर्वजण जमले. समोर सरळसोट चढ आणि गडाची तटबंदी दिसत होती.कुल,GS,अर्जुन त्या तटबंदीला आधीच भिडले होते.फ़दी कुठूनतरी आणि कसातरी गडावर पोचला होता. मी आणि मिहीर मिळून अमितला मदत करत होतो. त्याचा चपलेमुळे गुढगा त्रास देत होता. प्रत्येककवेळी चप्पलकर नेहेमीच अडचणीत सापडतात.अर्ध्या चढावरून GS ने कुलला तो रस्ता टाळण्याचा सला दिला. पण दोघांनाही परतणे अशक्य होते.तोपर्यंत मी cramp आलेल्या कुलपर्यंत पोचलो.वर चढून माझं सामान ठेवून परत कुलसाठी खाली आलो.तोपर्यंत अमितला एक सोपा रस्ता धरायला सांगितलं होतं.मिहिरलाही आही आलेल्या रस्त्याने न येण्याचा सल्ला दिला गेला. पण ते त्याला जरा जास्तच लागलं. आणि पठठा त्याच चढावरून वर आला.पंधरा वीस फ़ुटांचा शेवटचा नव्वद अंशातला चढ चढणे खरंच धोकादायक आणि आवघड होते. कारण आधारासाठी हात लावताच मोठमोठे दगडही सुटून खाली येत होते. पण हार मानणार्यातले आम्ही नव्हे! वर जाऊन पाहतो तर प्रसादने आधीच एका सावलीची जागा पहून पथारी टाकलि होती.पाण्याची शेवटची बाटली संपवली.GS पुढे रस्ता शोधून आला.तिकडे निघालो तर पाण्याचं एक कुंड दिसलं. त्यात पाय बुडवताच विविध आवाज आपोआपच तोंडातून निघावेत ईतकं पाणी थंड होतं.दगडावर बसून पाण्यात पाय सोडून बसण्याची चक्कर घेऊन अगदी न राहवल्याने दोन्तीन जण पाण्यात उअतरलेच आणि अर्धापाऊण तास त्यातच गेला.थोडं पुढे जाऊन पाहिलं तर अम्ही चढीन आलेला चढ दिसला. आणि आम्ही काय प्रकार चढून आलो हे नीटच कळलं.स्वतःलाच विश्वास बसत नव्हता.
आता हातात वीस मिनिटे होती आणि रस्ता उमजत नव्हता. बराची लोकल सापडणेही कठीण होते. एखाद किमी फ़िर्फ़िर करूनही अवढव्या गडावरून खाली उतरायला रस्ता सापडणे कठीन होते.समोर द्रुतगति मार्ग आणि रेल्वेरुळ दिसत होते.शेवटी एका मार्गाने उअतरता येईल असं वाटलं.पण सगळ्यांनी न उतरता आधी मी आणि मिहीर उतरायला लागलो.मार्ग जर निर्धोक असेल तरच वरच्यांना उतरायला सांगायचे असं ठरलं.तिथेच दोनतिनदा चुकत शेवटी मार्ग मिळाला.बाकिचेही उतरू लागले.पण पुढे अवघड वाट होती.अगदी जपूनच उतरावे लागत होते.लवकरच लक्षात आले की या वेगाने पाचची लोकल पकडणेही कठीण होईल.शेवटी घरी असणार्या जबाबदार्या लक्षात घेता मी,मिहीर आणि अर्जून असे अक्षरशः दौडत खाली निघालो.बाकीजण जमेल त्या वेगाने उतरत होते.आम्ही पळायला सुरवात केली तेव्हा शेवटचा मावळा अगदी उंचावर दिसत होता.

आम्हाला दोनची लोकल पकडायचिच होती.त्यामुळे सरळ पायवाट सोडून आम्ही जंगलात शिरलो.तिथेच सगळी गडबड झाली.एका ठिकाणि आल्यावर लक्षात आले की असेच खाली उतरणे आता अशक्यच आहे.मग वळसा घालून उजव्या डोंगरावरून खाली उतरायचं असं ठरलं.पाणी जवळ नव्हतंच.मध्येच धावाद्जाव करतांना वाटेत एक काळीकुट्ट बाई दिसली.तिच्या चेहर्यावर माती लागल्याने चेहरा भुरकट दिसत होता. आणि अगदी वाटेतच ती बसलेली होती.एकदम तिच्या समोर आल्याने मी दचकून थबकलो.मागून आलेला मिहीर मला आदळला आणि आम्हाला असं आडवाटेवर पाहून तीही भयानक घाबरली.धीर करून तिला विचारताच्ग तिने रस्ता सांगितला. आणि आम्ही पुड्झे जाउन एका घळीत उतरलो.बाजूला गर्द जंगल आणि समोर काट्यांतून जाणारी घळीची वाट! काही ठिकणि गुढग्यांवर रांगत पुढे जावं लागत होतं.मध्येच पुन्हा घळीतून बाहेर येऊन पुढची वाट कशी आहे ते पहायचं आणि पुन्हा चालायला लागायचं. इतका वेळ समोर दिसत असणारे रेल्वेरुळ आणि द्रुतगतिमार्ग आता दिसतही नव्हते.खाली किती उतरायचं याचाही अंदाज येत नव्हता.पण नेटाने उतरत होतो. अचानक गुरगुरल्यासारखा आवाज आला.मी आणि मिहीर एकदम दचकलो. मनात काही शब्द उठले.. बिबळ्या…. वाघ! अर्जुनकडे पाहिले तर तो अगदीच normal होता. आवाज कसला आला असं विचारलं तर म्हणतोय की ‘ढेकर आला’. आपल्याच मूर्खपणाला हसत परत उतरू लागलो. अचानक शेकडो फ़ुलपाखरं डोळ्यांसमोर उडतांना दिसलि. अहाहा! काय देखावा होता तो! असल्या वाटेने आल्याचं अगदी सार्थक करणारा! पण वेळ कमी होता.आता तीनची तरी लोकल मिळायला हवी असं वाटत होतं.आणि समोर रुंद पायवाट दिसली.त्याच वाटेने पुढे जाताच. आम्ही जमिनीवर आल्याचे जाणवले.समोर र्रस्त्याच्या कडेला असलेली तीन मजली ईमारत पाहून अगदी हायसं वाटलं. मागच्या तीन तासांत पहीलीच मानवनिर्मित वस्तू आमच्यापेक्षा उंच आहे हे पाहून आनंद झाला. तेव्हा दोन पंनास झाले होते.पुन्हा पळत निघालो.मळवली गावात येणारा overbridge crossकेला आणी धापा टाकत लोकल पकडली. त्यावेळी कुल आणि GS भाजे गावात पोचत होते आणि बाकीचे तीनजण वाटेवर होते. सगळेजण मार्गाला लागल्याचं कळल तेव्हा आम्ही शिवाजीनगरला पोचलो होतो. एका उत्तम ट्रेकची सांगता झाली आणि पुढच्या ट्रेकचे वेध लागले.


Bee
Tuesday, December 06, 2005 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरि वृतांत छान लिहिलास. मला गडाचे, तिथल्या निसर्गाचे, वेड्या भटक्यांचे फोटो बघायला आवडतील. कुणाकडे असतील तर मला इथे सोय नाही म्हणून मेल करून पाठवला का?

Gs1
Tuesday, December 06, 2005 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



गिरी मस्तच रे. तू किंवा कूलच लिहित ज बर वृत्तांत. तुमची पुढची हकीकत सविस्तर ऐकायची राहूनच गेली. आमच्या वाटेवर करवंद आणि निवडुंगाची गच्च झाडी होती.

अनुभव ही स्वत : घेण्याचीच गोष्ट आहे, तिथे दुसर्‍याचा अनुभव उपयोगी पडत नाही....

फदी आणि अर्जुन ओढ्याच्या वातेने वर पोहोचले होते. फदी वरुन आम्हाला बघुन त्याच वाटेने या, कातळावरून येऊ नका असे सांगत होता. पण मी तसाच पुढे गेलो. शेवटचा टप्पा अवघड आहे आणि कूलच्या पाठीवर माझी सॅकपण आहे हे लक्षात घेउन मी त्याला वर न येता मागे फिरुन ओढ्याच्या वाटेने जा म्हटले. त्याने ऐकले नाही, वर यायला लागला आणि गिरीला इकडुन येउ नकोस, पुढे अवघड आहे असे सांगू लागला. गिरीनेही ऐकले नाही, तो वर येउ लागला आणि मग आम्ही तिघांनी मिहिरला इकडुन येऊ नकोस असे सांगायला सुरूवात केली. त्यानेही ऐकले नाहीच.

गिरी आणि मिहिर हे आता by default वाटा शोधणे, कठीण जागा आणि अपघातप्रसंगी मदतकार्य या विभागाचे म्होरके झाले आहेत.




Cool
Tuesday, December 06, 2005 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सर्वप्रथम जी एस च्या संघटन कौशल्याला सलाम. पाच वाजता आम्ही दोघांनी जाण्यचं ठरवलं आणि इतर कुणी आलं नाही तर दोघंच जावुया अशी तयारी सुद्धा ठेवली होती पण थोड्याच वेळात जी एस ने फोन करुन एकुण आठ जण जाणार असल्याचं सांगितलं.

एकदरीत खुपच मस्त झाला ट्रेक, आम्ही ज्या गुहेत झोपलो होतो तिकडे अगोदरच दुसरी काही मंडळी झोपली होती. आणि थोड्याच वेळात एक एक जण झोपेच्या अधिन होउ लागला. पण लगेचच घोरण्याची स्पर्धा सुरु झाल्याने काही जणांच्या झोपेच खोबरं झालं. जी एस ने आठवणी करुन दुर्बीण आणली होती तिचा आम्हाला खुपच उपयोग झाला. म्हणजे लोहगडावरुन तुंग, तिकोना, पवनानगर सारखि प्रेक्षणीय स्थळे जवळुन बघता आली. सकाळी गड उतरायला सुरुवात केल्यापासुनच पोटात भुकेचा डोंब उसळला होता पण ज़ी एस ने पुर्ण ट्रेक झाला तरी जेवण मिळु दिलं नाही. आणि कहर म्हणजे भाजे गावात गेल्यावर आपण जेवुया असं आश्वासन संपुर्ण रस्त्याने दिलं आणि गावात गेल्याबरोबर जेवण्याची दिलेली ओर्डर कॅन्सल केली. ... एका कोमल जीवाला झोप आणि जेवण या Basic Rights पासुन वंचित ठेवल्याबद्दल जी एस चा जाहिर निषेध..

विसापुर चा सोपा ट्रेक आमच्या अति उत्साहामुळे आम्ही भलताच साहसी केला होता. शेवटच्या टप्प्यात एका कड्यावरुन वर जाता येईल अशी खात्री वाटल्याने जी एस आणि मी त्या कड्यावरुन पुढे जायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात तो कडा तितकासा सोपा नव्हता हे आमच्या लक्षात आले पण आम्ही मागे न परतता पुढेच जात राहिलो थोड्याच वेळात जी एस कसाबसा वर पोहोचला पण नेमक्याच वेळि माझ्या पायात Cramp आला आणि मी हतबल झालो, त्यातुन आधारासाठी दगड पकडल्यास तेच निघुन हातात येत होते. शेवटी गिरि माझ्या पुढे गेला माझ्या आणि मिहिरच्या पाठिवरील सामान त्याने वर चढवले आणि परत अर्ध्यात खाली उतरुन मला आधार देत वर घेउन गेला.. तो खुपच अवघड कडा होता हे आम्ही तो कडा दुसर्‍या बाजुने बघितल्यावर लक्षात आलं.

खाली उतरतांना ही वाट असेल असं वाटतं नसतांना तीच वाट निघावी अश्या " खडतर " वाटेवरुन आम्ही भाजे गावात उतरलो. सर्व पुण्याच्या दिशेने निघुन गेले पण मला मात्र भुकेने व्याकुळ अशा परिस्थितीत एक तास लोकलची वाट पहात थांबावं लागलं

गिरिने म्हटल्याप्रमाणे पुढच्या ट्रेक ची ओढ लावत हा ट्रेक संपला..


Limbutimbu
Tuesday, December 06, 2005 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

है शाब्बास गिर्‍याभाव! आता कसा लायनीवर वळणावर आलास!
कूल बी कुल, होता है होता है! पर तुह्या उपासाच्या दुखाःत म्याबी शामिल हे रे भो! पर मला एक समजत नाही...
तुमी लोक्स येवध सामान सुमानाच्या पिशव्या पाठीवर बान्धुन गेलेला, तेच्यात खायच प्यायच काय घ्यायच नाही का जास्तीच?
की तुमाला वाटल लोहगडावर पावभाजीच हाॅटेल असल, वडापाव्ची गाडी असल, रचनाची चाची टपरी असल????? पुण्याहुन जीयस न पाण्याचा टॅन्कर मागिवला असल????
न्येक्स्ट टायमाला लक्षात ठीवा, ट्रेकला निघायच तर आधी किराणाभुसारमालाच्या दुकानामन्दी जावुनशान पावकिलो सुक खोबर, अर्धा किलो शेन्गदाणे नि एक किलो गुळाची ढेप अस दर डोइ हिसाब करुन घ्यायच! अन ते पिवशीत सगळ्यात खाली कोम्बायच! अन ट्रेकमधी सगळ्यात शेवटी बाहीर काढायच! आधीच जमल तर त्याचे वाटे करुन ठेवावेत म्हन्जी येकदम सगळ काढल तर त्यावर एल्गार होऊन कुणी तुटुन पडल तरी प्राॅब्लेम होत नाही
अन पाण्याच बी तस्सच! येक दोन लिटरची बाटली दिखाव्यासाठी कमरला लटकवायची, अन बाकी दोन तीन अर्ध्या लिटरच्या बाटल्या पिवशीत पार खाली कोम्बुन कुणाला न दिसतील अशा ठेवायच्या! आमी तर येकदा रन्गपन्चमीच फुग पाण्यान भरुन टोपीत ठेवुन गेलेलो, थट्टा नाऽऽय मस्करी बी नाऽऽय, खर ते सान्गतो! तवा प्लॅस्टिकच्या बाटल्यान्चा जमाना नव्हता!
तर मुद्दा काय हे ना की राखिव राखिव म्हणुन काही साठा ठेवायचा की नाही?
पुढच्या बारीला काळजी घ्या!
:-)

Dhumketu
Tuesday, December 06, 2005 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विसापुर वरुन मळवली ला जाताना जवळपास विसापूर ला अर्धा वळसा घालून मळवली डावीकडे ठेवावे लागते. तिथुन एक रीज निघते ती मळवली च्या उजवीकडे पुण्याच्या बाजूला) उतरते.
खालून चढताना मळवली कडून भाजेकडे जावे आणी तिथून जरासे डावीकडे जाऊन लोहग़डकडे पाठ होते, पुर्ण नाही पण जराशी) भाजे ज्या डोंगरावर आहे त्याचे पठार गाठावे. ती रिज विसापूर च्या एका बुरुजाकडे जाते. बुरुजापाशी पोचल्यावर डावीकडे जाउन एक वडाचे झाड आहे त्याचा आधार घेउन चढता येते. दरवाजा बद झाला आहे. मला आत नक्की आठवत नाही की तो दरवाजा होता की बुरजातले सडास. हा बुरुज खालून नीट दिसतो. लोहग़डवरुन विंचुकाट्यावरुन) पाहील्यास विसापूरच्या बुरुज दिसतो.
असो. कुणी गेल्यास त्याला उपयोग होईल कदाचीत.

gs1 पाहू सुधागडचे.. जमेलसे वाटत आहे.. पण नाहीच जमले तर एक सल्ला. तैलबैला ला रात्रीचा मुक्काम ठोका. कदाचीत ताम्हीनी घाटातल्या गाड्याही दिसतील. ताम्हीणी घाटातून तैलबैला दिसतो...त्यामुळे तैलबैला वरून गाड्यांचे दिवे दिसायला पाहीजेत. जसे राजगड आणी वरधा घाट... बहुतेक गुहा नाही तिथे. पण पाणी आहे. तरीपण मित्राला विचारुन त्याला आठवत असेल तर पाण्याचे सांगतो. दगडीचा रस्ता आहे तैलबैलासाठी... बाईकवरून पाऊण तास लागला होता. चालत २ तास लागतील असे वाटते. रात्री गेलात तर तैलबैलाचा फ़ाटा चुकण्यासारखा आहे. प्यारी s.t. जाते त्या गावात. लोणावळ्याला चौकशी केलीत तर मिळेल माहीती कदाचीत.

btw ताम्हीणी घाटातूनही एक रस्ता कोरीगडाला जातो. कधी चान्स मिळाला तर तिकडेही जायचे आहे. ताम्हीणी घाट नुकताच सुरु झाला होता तेव्हा घाटाच्या बरेच आधी ( रायगड चीही हद्द सुरु होण्या अगोदर ) एक हॉटेल होते. बराचश्या एस.ट्या तिथे थांबायच्या. ( आता बंद पडले ते ) त्याच्या नतर फ़ाटा आहे. जर हॉटेल माहीती नसेल तर.. जेव्हा मुळशीचे बकवॉटर जिथे संपते ( एक पुल आहे छोटासा.... टाटाची पाईपलाईन जाते तिथला नाही.. ती पाईपलाईन बरीच पुढे लागते ) तिथुन पाण्याला वळसा घालून गाडी उजवीकडे वळते. ( पुलाच्या अगोदर हॉटेल होते ) . तिथून जरासे पुढे गेले की उजवीकडे एक फ़ाटा येतो. तिथे लोणावळ्याकडे असे लिहीले आहे. तो कोरीगडाकडे जातो.. नक्की कुठे लागतो ह्याबद्दल खात्री नाही पण तो एक रस्ता आहे...

असे बरेच रस्ते आहेत.. की आता फ़क्त खडीचे वा कच्चे आहेत.. ताम्हीणी आधी असाच होता. पण वरध बद पडल्यावर त्याची मागणी वाढली. असाच एक रस्ता पानशेत ते वेल्हा ( तोरणा ) आहे. असे ऐकिवात आहे की पांडवगाडाच्या ईथे एक घाट उतरतो...


Vinaydesai
Tuesday, December 06, 2005 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS, cool, girii आगे बढो, हम तुम्हारे साथ नाही हैं (Unfortunately) :-(


Rachana_barve
Tuesday, December 06, 2005 - 10:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच लिहिला आहे वृत्तांत.. पुण्यामध्ये पुर्वी एक club होता. ट्रेक करणार्‍यांचा. त्यांच्या सोबत थोडे फ़ार ट्रेक केले होते. लोहगद विसापुर त्यामानाने सोप्पे ट्रेक आहेत. पण कधी रहाण झाल नाही. you guys are lucky :-)
LT कुठे पण चहाची टपरी कशी असेल माझी :-O.. आधी ओर्डर दिली तर काहीतरी जमवता आल असत.


Bhagya
Wednesday, December 07, 2005 - 1:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरि तुझ्या पोस्टस चे squares केव्हा बंद होतील? माॅड, हा problem मलाच येतो आहे का?

Indradhanushya
Wednesday, December 07, 2005 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लय भारी... Gs , गिरी, कूल वृतांत मस्तच :-)
हरीश्चंद्रगड कधी ?


Tanya
Wednesday, December 07, 2005 - 6:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जी. एस. ,गिरी,कूल... सही! मी college मध्ये असताना साधारण ९१-९२ ला लोहगड्-विसापुर केल होत. college चा भला मोठा group होता, आणि मळवलीला उतरुन भल्या पहाटे चाल केली होती. आणि तु ज्या कातळरस्ताचे वर्णन केले आहेस, बहुतेक आम्हीदेखिल तिथुनच चढाई केली होती, आणि तेव्हा बरेच जण( especially अंगाने स्थुल असणारे) धडपडले होते.
जी एस.,गिरी,कूल असेच दुर्गभ्रमण करा आणि इथे लिहीत जा.:-)



Antu_barva
Friday, December 23, 2005 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

maI dÜnada gaolaÜya laÜhgaDavar. ekda Aaimh laÜhvaaiDtlyaa dovaLat JaÜplaÜ hÜtÜÊ rai~ XaokÜiT koila hÜitÊ itqalyaa ivaihirt pÜhlaÜ hÜtÜÊ to idvasa punha Aazvalao :-) Ê
%yaa AaiQa ekda itqao dovaacaa ]%sava hÜta tovha gaolaÜ hÜtÜ.
ivasaapur baGaNyaacaa rahuna gaolaaya. %yaavar daT jaMgala Aaho AiNa %yaat ibabT\yaacao vaastvya Aaho AsaM mhNatat.
hirXcad` krtayaÊ kra. mast T/ok Aaho. vaaTot jaatanaa tak Pyaayalaa ivasaÉ nakaÊ AaiNa rai~ dovaLacyaa maagacyaa gauhotca JaÜpa.
maaJyaa XauBaocCa.
malaaih yaayalaa AavaDola tumacyaa barÜbar T/ok laa. baGau ksaM jamatMya ...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators