|  
 
 
Chafa
 
 |  |  
 |  | Friday, February 03, 2006 - 2:23 pm:    |  
 
 
 |   
  |   
 एकूण एक वाक्य मनापासून पटावं असाच लेख आहे. धन्यवाद ललिता!    मैत्रेयी,   
 
  |  
Supermom
 
 |  |  
 |  | Friday, February 03, 2006 - 2:59 pm:    |  
 
 
 |   
  |   
 ललिताताई खूप दिवसानी भेटलात.फ़ारच सुन्दर लेख. 
 
  |  
Storvi
 
 |  |  
 |  | Friday, February 03, 2006 - 9:50 pm:    |  
 
 
 |   
  |   
 interesting coincidence ..  
 
  |  
 >>>> आता इथलेच काही लोक पुलं कसे हिन्दू विरोधी, ब्राह्मण विरोधी आहेत इ. इ. म्हणून तावातावाने मोठ मोठे परिच्छेद लिहायला लागतील   आऽऽणि मग विषकन्येला अवतार धारण करायला लागेल, असच ना?      आधी हिन्दू सन्स्कारान्चे वर्णन करीत मग  ... " सन्स्कारान्चे वर्तुळ अशा धार्मिक मानल्या गेलेल्या जुन्या  ( ? )  रुढिन्पुरतेच मर्यादित केलेले असल्यामुळे त्या रुढी पाळणारे ते सु सन्स्कृत आणि बाकीचे असन्स्कृत असे सोयिस्कर गणित मान्डले जाते "  इथेच माझा आक्षेप हे!   सार्वजनिक शिस्त आणि देवोपासनेची धार्मिक विधिन्मार्फतची शिस्त यात लेखकाने सोइस्कर गैरसमज करुन घेवुन व करुन देत त्या दोन्ही बाबी एकच हेत किन्वा एकमेकान्वर अवलम्बुन हेत असे दर्शवित शेवटी टीकेचा अप्रत्य्क्ष रोख या धार्मिक विधिन्बाबत जे प्रमुख असतात त्या ब्राह्मण समाजावरच रोखला हे! मात्र, बारा बलुत्याची पद्धत, त्यातिल शिस्त वगैरे बाबी आम्हाला त्याज्य, त्या नकोत! वारान्प्रमाणे अमुक कृत्ये करा नका करु हे त्याज्य! गावागावात अजुनही चालू असलेली पन्च पन्धत, त्यातिल शिस्त, मानापमानाचे व त्या मार्फत समाजरचनेच्या उतरन्डीचे योग्य नियन्त्रण आम्हाला दिसत नाही! दिसल तर त्यातल कुसळच दिसत आणि मग जो जाणुनबुजुन केलेला वैचारीक घोळ होतो त्यात सार्वजनिक ठिकाणी बहुजनान्कडुन होत असलेल्या अस्वच्छतेच्या बेशिस्त वागण्यास धार्मिक मन्त्रोच्चाराना जबाबदार धरण्यात येवुन त्यान्चा सम्बन्ध जोडला जातो ज्या मन्त्रोच्चारान्चा, सन्स्कारान्चा सम्बन्ध खरे तर केवळ दैवी उपासना किन्वा उपासना पद्धती याचेशी हे! बादरायण सम्बन्ध म्हणतात तो असाच लावला जात असेल का?    शाळाकाॅलेजेस, यस्टीस्टॅण्ड येथिल अस्वछ मुतार्या आणि सन्डास याच्या आधिच दुरान्वयाने मुन्ज व लग्नातील होमहवनादी धार्मिक कृत्त्यान्चा उल्लेख करुन बादरायण सम्बन्ध लावला हेच! आणि हेच लेखकाचे कौशल्य की आधी तो उल्लेख केल्याने सम्पुर्ण लेखातील अन्य बाबी जरी बरोबर असल्या तरी त्या खराब घाऽऽण सन्डास मुतार्यान्ची जबाबदारी किन्वा सम्बन्ध होअमहवनादी मन्त्रोच्चारात शुचिर्भुतपणे केल्या जाणार्या हिन्दुन्च्या धार्मिक कृत्त्यान्वर कसा काय बरे असेल? पण तो सम्बन्ध जोडला गेला ना! केवळ सन्डास मुतार्या आणि सन्स्कारान्विषयी बोलायचेच होते तर तिथेही हिन्दु धार्मिक विधिन्बाबतची आपली अनास्था उघड करुन दाखविण्यास प्रस्तुत लेखकही विसरला नाही हे!  खर तर या सर्व ठिकाणची अस्वच्छता हाच केवळ विषय नसुन स्त्रीसमानता जपू पहाण्याची नाटके करणार्या तेव्हान्च्या व आत्ताच्या समाजव्यवस्थेत अजुनही स्त्रीला सार्वजनिक ठिकाणी मुतारी किन्वा सन्डासान्ची पुरेशी सोय नाही हे पुण्यामुम्बैतसे वास्तव हे! सुलभ ची सोय हे पण तिथे पुरुषाना फुकट मुतारी तर स्त्रियाना दोन रुपये! आणि असला विषय काढताना येथे हिन्दु धार्मिक सन्स्कारान्चा प्रश्न येतोच कुठे? धार्मिक सन्स्कार तर पुर्णपणे शुचिर्भुत होवुन करायचे असतात! त्यान्चा सम्बन्ध समाजातील बेशिस्त वर्गाच्या वागण्यामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेबरोबर जोडुन पुलनी काय मिळविले हे त्यान्चे त्यानाच माहिती पण पुलन्सारखा लेखक हिन्दु धार्मिक रितीपरम्परान्वर टीकेची झोड उठविण्याकरता, किन्वा त्याकडे कुत्सित नजरेने वाचकान्कडुन पाहीले जावे म्हणुन विषयान्ची सरमिसळ करीत उपदेशात्मक बोधामृताचे लेखन करतो तेव्हा पुलन्चे पायही मातीचेच होते आणि बव्हशी ही माती कम्युनिस्ट विचारधारेतील होती हे लक्षात येते!  सार्वजनिक बेशिस्तीला अस्वच्छतेला तिथे वावरणारी प्रत्येक व्यक्ती जबाबदार असताना सार्वजनिक वागणुकीच्या सुसन्स्कारान्ची जबाबदारी एकट्या धार्मिक विधिन्वर खापर फोडुन काय साध्य होणार होते आणि झाले?   अजुनही सन्त गाडगेबाबा महाराज स्वच्छता अभियान एकविसाव्या शतकात करावेच लागते अन तरीही भिती जिन्याचे कोपरे येथे लोकानी थुन्कु नये म्हणुन देवान्च्या तसबिरीही लावाव्या लागतात! पुलनी उल्लेखिलेल्या धार्मिक रुढी सन्स्कारान्बद्दलची तळमळ की खळखळ येवढी वर्षे गेली तरी जिन्याजिन्यातल्या कोपर्यात बसवलेल्या देवदेवतान्च्या टाईल्स्च्या रुपाने त्यान्च्याच विचारान्शी विरोधाभास दर्शवित हे हे खर तर त्यान्च्या हिन्दू धार्मिक विधिन बाबतच्या विचाराचे अपयशच नाही का?   हे माझे मत हे! अन ते वेगळे असु शकते, अन ते मान्डण्याचे स्वातन्त्र्य मला हे असे मी धरुन चालतो हे!  
 
  |  
 कान्द्या हल्ली हल्लीच हरी ओम असा जप करु लागला हे, त्याला उद्देशुन सिन्हगड रोड बीबी वर टाकलेले पोस्ट सन्दर्भाकरीता देत हे जेणेकरुन माझ्या वरील भल्याऽऽथोरल्या पोस्टचा सारान्श कळेल.. तर ही ती पोस्ट..   >>> कान्द्या, हरीऽऽ ओम म्हणण्याच्या तुझ्यावर नुकत्याच झालेल्या सन्स्काराने व तसे म्हणण्याने शाळा कालीजेस यस्टी स्टाॅण्ड येथिल सार्वजनिक मुतार्या व सन्डास यातिल घाण दुर कशी काय होइल यावर काही प्रकाश टाकू शकशील काय?  DDD   आणि जर तुझ्या हरी ओम म्हणण्याने ती घाण दूर होणार नसेल तर तू हरी ओम का बर म्हणावे? त्या पेक्षा लौकरात लौकर परत येवुन पुर्वी ठरविल्याप्रमाणे सारसबागेत जावुन तेथिल कचरा गोळा करावयास सुरुवात करावी हे बरे नाही का?  
 तुझ्या असे हरी ओम म्हणण्यामुळे  आता तर कचर्यासोबत सन्डास मुतार्यान्मधिल घाणीच्या स्वच्छतेच्या कामाचीही वाढिव जबाबदारी तुझ्यावर पडली हे असे तुला भासत नाही काय? DDD
 
  |  
Zakki
 
 |  |  
 |  | Saturday, February 04, 2006 - 5:50 pm:    |  
 
 
 |   
  |   
 लोक काय वाट्टेल त्याचा संबंध वाट्टेल त्याच्याशी लावतात! संस्कारावर जास्त लक्ष दिल्याने, स्वच्छता, नियमितपणा, संवेदनाशीलता हे गुण शिकवायला वेळ नसतो म्हणून का त्या संस्कारांविरुद्ध बोलायचे?  मग शाळेतले शिकणे खेळणे, करमणूक याच्या विरुद्ध का नाही बोलायचे? काहीतरी करून एकदम प्रक्षोभक असे काहीतरी लिहून प्रसिद्धी, पैसा मिळवायचा बास. स्वच्छता, नियमितपणा न पाळणार्याला चार कानफटात हाणल्या की लग्गेच सुधारणा होईल, मग त्यावर जास्त वेळ लागणार नाही, नि संस्कार शिकवायला वेळ मिळेल!  ज्याप्रमाणे गणित, शास्त्र या विषयातले  'funda. s नीट समजले की हुषार लोक स्वत :  हून नविन नविन शोध लावतात,  theories  तयार करतात, तसे थोडे चांगले संस्कार झाले की सगळे लोक चांगले वागतील.  '  अयोध्या मनुनिर्मित नगरी '  ह्या गीतरामायणातल्या गाण्याप्रमाणे सगळ्या देशाची  '  अयोध्या '  होईल. 
 
  |  
Moodi
 
 |  |  
 |  | Saturday, February 04, 2006 - 10:50 pm:    |  
 
 
 |   
  |   
 काही गोष्टी अशा घडतात की ते वाचल्यावर हसावे की रडावे हेच कळत नाही. साधारण १० ते १२ वर्षापूर्वीची घटना देतेय, अन नेमकी तशाच प्रकारची घटना आज भारतात घडतेय.    तर जर्मनीत १०  -  १२ वर्षापूर्वी एक भारतीय रस्त्याने जात होता कुठेतरी. चालता चालता या बाबाने खिशातुन एक कागद काढला, वाचला अन हातात चुरगाळुन त्याचा बोळा करुन तो रस्त्यात फेकला. तिथे गस्त घालणार्या जर्मन अधिकार्याने ते पाहुन त्या माणसाला बोलावले अन सार्वजनीक ठिकाणी कचरा, अस्वच्छता केली म्हणुन दंड भरायला लावला, त्या दंडाची पावती त्याने त्या माणसाच्या हातात दिली. काहीशा नाराजीनेच त्याने दंड भरला, अन पावती घेऊन चालू पडला.     हा अधिकारी तो माणूस काय करतोय ह्यावर लक्ष ठेवुन होता. थोड्या दूरवर जाऊन त्या माणसाने ती दंडाची पावती तशीच चुरगाळुन परत रस्त्यात फेकली. त्याच्यावर लक्ष ठेवलेल्या त्या अधिकार्याने कपाळावर हात मारला अन त्या माणसाला कायद्याचा अपमान केला या नियमाखाली परत दंड भरायला लावला. अन अर्थातच ती बातमी आधी जर्मन अन नंतर भारतीय पेपरापर्यंत आरामात पोहोचली.    भारतीय स्वताच्या घराची आरशासारखी काळजी घेतात अन बाहेरच्या जगात कसे वावरतात हे विचारायलाच नको. युरोपातील एक देश तळे अन निसर्ग सौंदयाकरता अतिशय प्रसिद्ध आहे. तिथे त्या तळ्याशी जाऊन सुद्धा आपल्या भारतीयांनी प्लॅष्टीकचा मस्त कचरा केलाय, तिथले प्रशासन वैतागलेय आता.    अन लोकसत्तातली अगदी उद्याची ताजी बातमी बघा. कोकणात पर्यटन बहरास आलय आंब्याच्या मोहरासारखा. अन आतापर्यंत निर्व्याज राहिलेली ही परशुरामाची भूमी काही मुर्ख अन अती उत्साही पर्यटक परत प्लॅष्टीकच्या पिशव्या टाकुन, कचरा करुन घाण अन विद्रुप करीत आहेत. काय करावे यांना. खूप संताप येतो. असे वाटत खाजकुयली टाकावी अंगावर अन मग मजा बघावी प्रत्येक नाच प्रकाराची. फुकटात करमणूक होईल.    ३ वर्षापूर्वी भारतातली गोष्ट. मी औषध आणायला दुकानात गेले. तिथे रस्त्यावर एका गोर्या पर्यटकाभोवती गर्दी झाली होती. मी माझ्या ओळखीच्या मुलाला विचारले काय झाले तर तो म्हणाला की त्या पर्यटकाने केळी अन संत्री खाल्ली पण साले टाकायला त्याला कचरा पेटी सापडत नाहिये म्हणुन तो हातात घेऊन हिंडतोय. लोक हसत होते. मग मी त्या मुलाला, अजयला म्हटले की जा त्याला दाखव ती पेटी. मग तो त्याला घेऊन गेला.    का नाही आपले भारतीय असे वागत हो? नियम पाळण्यात लाज का वाटते?      
 
  |  
Lalitas
 
 |  |  
 |  | Saturday, February 04, 2006 - 11:32 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मूडी, एकदा दंड भरूनही त्या भारतीय माणसाने रस्त्यावर कागदाचा बोळा परत फेकला इतके भारतीय संस्कार या बाबतीत बळकट आहेत यात शंका नाही. तू चार कानफटात हाण, खाजकुयली टाक काही फरक पडणार नाही याची खात्री बाळग. 
 
  |  
Gurudasb
 
 |  |  
 |  | Sunday, February 05, 2006 - 6:18 am:    |  
 
 
 |   
  |   
 विंदा करंदीकर  ,  मंगेश पाडगावकरानी किंवा अलिकडच्या नायगावकरानी या अशा संस्काराबाबतीत काही काव्य केले आहे का  ?   .....  एक पृच्छा 
 
  |  
Bee
 
 |  |  
 |  | Sunday, February 05, 2006 - 9:11 am:    |  
 
 
 |   
  |   
 का आमच्या साधू संतांनी हे थोर काम केले नाही का? तुम्ही उल्लेखलेल्या कविंनी संस्कार दृष्टीकोन ठेवून फ़क्त तसेच काव्य केले नसेल पण ह्या कविंच्या बर्याचशा कविता काहीतरी सांगून, शिकवून जातात आणि आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. 
 
  |  
Lalitas
 
 |  |  
 |  | Sunday, February 05, 2006 - 10:05 am:    |  
 
 
 |   
  |   
 जीडीने मुंबईला मला सुधा मूर्तीचं गोष्टी माणसांच्या पुस्तक भेट दिलं. इथल्या आताच्या चर्चेच्या संदर्भात, त्यांत जे वाचल ते इथे टाकते...      Qoute  जिल्ह्याचं ते गांव फार गलिच्छ होतं. भारतात आपण आपली घरं स्वच्छ, टपटिपीत ठेवतो, पण सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आपण मुळीच पाळत नाही. सार्वजनिक मालमत्ता दुसर्याची आहे, त्यामुळे त्याच्यासाठी आपला वेळ किंवा पैसा आपण का खर्च करायचा, अशी आपली वृत्ती असते. आपल्याला सर्वांनाच तेनाली रामन याची कथा माहीत आहे. एकदा त्याने सर्व लोकांना आपापल्या घरून पेलाभर दूध घेऊन येण्यास सांगितलं. प्रत्येकाने ते दूध एका बंद टाकीत टाकायचं होतं. टाकीला केवळ दूध ओतता येईल एवढंच छिद्र ठेवण्यात आलं होतं. प्रत्येकाने असाच विचार केला - बाकी सगळे दूध आणणारच आहेत, ती टाकी दुधाने भरून जाणारच आहे. मग आपण त्याऐवजी पेलाभर पाणी नेलं तर कुठं बिघडलं! ठरलेल्या दिवशी ती टाकी उधडण्यात आली, तो काय ती निव्वळ पाण्याने भरलेली होती. ही कथा पाचशे वर्षांपूर्वी घडलेली असेलही. पण आपली सर्वांची मनोवृत्ती मात्र अजुनही तशीच आहे. आपण पहिला विचार करतो तो आपल्या भल्याचा. समाजाच्या भल्याचा विचार नंतर येतो.    आपण आपली देवघरं स्वच्छ ठेवतो. पण सार्वजनिक स्वच्छतागृह मात्र कमालीची अस्वच्छ असतात. बसस्टॅंडवर अनेक माणसं त्यांचा वापर करतात व ती दुर्गंधी असह्य होऊन जाते. तेथे उभं राहून बसची वाट पाहाणं मुश्किल होऊन बसतं.   Unquote 
 
 
  |  
Zakki
 
 |  |  
 |  | Sunday, February 05, 2006 - 3:12 pm:    |  
 
 
 |   
  |   
 पहा आता कुणितरी येऊन लिहील की अहो, भारताच्या चांगल्या गोष्टींवर लक्ष द्या की, हजार वर्षापूर्वी भारतीय कसे जगात सर्वात सुधारलेले होते, भारतातून परदेशात जाऊन त्यांनी कशी कामगिरी केली  (president of bell labs  , homail inventor, etc. etc. , forgetting that they did not do it in India, but after they got out!)  वगैरे, वगैरे.  
 
  |  
Moodi
 
 |  |  
 |  | Sunday, February 05, 2006 - 3:13 pm:    |  
 
 
 |   
  |   
 ललिताताई खरय तुमच. अशी किती उदाहरणे द्यावीत या प्रसंगांची.    खालील लेख बघा.       http://www.loksatta.com/daily/20060205/ravi06.htm   .    केरळमधील कुझीकोडी अन आपल्या मुंबईतील एक ठिकाण असेच लोकांच्या श्रमातुन अन मदतीमधुन स्वच्छ अन कचरामुक्त बनलय.    अस म्हणतात अन ते खरे पण आहे की समुद्र आपल्या पोटात काहीच ठेवत नाही, ते लाटांच्या रुपाने किनार्यावर परत फेकतो. नद्या या तर जीवनवाहिन्या पण आज त्यांची माणसांनीच किती गळचेपी केलीय. मुंबईत मिठी, पुण्यात मुळा अन मुठा तसेच पवना अन अश्या कित्येक नद्या, धबधबे अन तळी मानवांच्याच बेफिकिरीचे बळी झालेत.  नुसते वर्तमानपत्रांनी टाहो फोडुन अन लोकांच्या समोर आणुन काय उपयोग.    माझ्या विधानानी काही जणांची मने दुखावतील पण नाईलाज आहे. आपल्या बर्याच भारतीयांना टॉयलेट कसे वापरायचे याचे पण प्रशिक्षण दिले पाहिजे. खुप विचित्र वाटेल हे असे माझे बोलणे. पण इथे परदेशात येणारे  IT  मध्ये काम करणारे साऊथकडील लोक कारपेटवर पाणी टाकुन त्याचा चिखल करतात हे इथे ब्रिटनमध्ये अन माझ्या दिराच्या ऑफिसमध्ये पुण्यात प्रत्यक्ष घडलय. अन तो एकदा सांगायला गेला की तिथे पाणी साचलय असे करु नका तर  "  तुम मराठी लोक हमको क्या सिखायेगा जी?  "  म्हणुन त्यालाच वेड्यात काढले. आता तो अजीबात बोलत नाही त्यांच्याशी. इथले लोक तर त्यावरुन भारतीयांना खुप नावे ठेवतात.    मला कल्पना आहे की हा चुकुन   v&c  चा बीबी बनलाय पण लेखाच्या अनुषंगाने हे अनुभव लिहावेसे वाटले. नेमस्तक आपण वाटल्यास हे डीलीट करु शकता.   
 
  |  
 खर हे ग मुडी तुझ! सार्वजनिक ठिकाणी कुणाला काही स्वच्छतेच सान्गायच धाडस माझात तर नाही बुवा! अन अस काही चान्गल सान्गायला गेल तर माझ्या जातीचा झालेला उद्धारही मला खपत नाही पण अन्गी बळ आणि हातात सत्ता, अगदी रखवालदाराच्या खाकी वर्दीचीही नसल्यामुळ मी त्या भानगडीत पडतच नाही!   पण तुझ्या पोस्ट वरुन, विशेषतः कचर्याचा डब्बा शोधत हातात साली घेवुन फिरणार्या त्या परदेशी माणसाची गोष्ट वाचुन आठवले की पुण्यात असे प्रसन्ग बरेच वेळा पाहीलेत जेव्हा ओशो ओशो बनायच्या आधीचे भगवान रजनीश होते!   हे आठवायचे कारण म्हणजे लोकाना स्वच्छतेच्या सवै लावाव्यात, त्याना हे नाही हे अन ते नाही हे म्हणताना स्वच्छतेकरता काही मुलभुत व्यवस्था देखिल पुरवावी लागते याकडे कसे दुर्लक्ष गेली पन्नासपेक्षा जास्त वर्षे होत हे? माझ्या वरच्या पोस्ट मध्ये मुतारीचा उल्लेख केला हे! अन आठवल की मुम्बईच्या नरिमन पाॅइण्टवर कुठेही मुतारी नसण्याच्या त्या कालखन्डात  ( सद्ध्याही आहे की नाही माहित नाही, असेल अस वाटत नाही, असली तर पुरेशी सोय असेल का? )  परत चर्चगेट स्टेशनवर जाणे शक्य होणार नसल्याने रस्त्याकडला कम्पाउन्डच्या भिन्तीलगत उभ्या केलेल्या फेरीच्या बसचा आडोसा घेवुन लाजत लाजत व भीत भीत उरकलेली लघुशन्का आठवली नी मग वाटल की आमच्या वरचे सन्स्कार केवळ लाजण्या अन घाबरण्यापुरतेच उपयोगी पडले!   साऊथ इन्डियनान्च तु सान्गतेस अगदी तस्साच नव्हे तर त्याहुनही घाणेरडा अनुभव आम्ही घेतला हे, घेतो हे! त्यातली एक व्यक्ती वेस्टर्न कमोडवर पाय ठेवुन उकीडवी बसायची अन काय होत असेल त्याची वर्णने शब्दात करणे मला शक्य नाही! या पासुन सुटका जेव्हा ती व्यक्ती रिटायर झाली तेव्हाच झाली!   पण या बाबी झाल्या गेल्या दहावीस वर्षातील! त्या आधी काय परिस्थिती होती? पाटीचे निरनिराळ्यापद्धतीने बान्धलेले सन्डास ज्या चाळी वाड्यात असायचे ते निदान तुलनेने सुखी पण बाकीचे रस्त्यावरच उजाडायच्या आत उरकुन घ्यायचे ही पुण्यातील तसेच मराठवाड्यातील स्थिती मी प्रत्यक्ष बघितली हे! आजही खेडोपाडी वयक्तीक मालकीच्या सन्डासान्ची सन्ख्या ५००० रुपयान्च्या अनुदानाच्या स्कीमनन्तरही मोजकीचे हे अन सार्वजनिक सन्डास उभारलेले हेत त्यान्च्या सन्रक्षणासाठी शिपाई नेमणे शक्य नसल्याने त्यान्ची अवस्था समाजातील उपद्रवी शक्तीन्कडुन काय झालेली असते ते स्वतः डोळ्यानी बघणे केव्हाही चान्गले! आणि तरीही या विषयावरील चर्चेत किन्वा या विषयावर बोधामृत पाजताना पुलन्ना धार्मिक मन्त्रोच्चारान्च्या सन्स्कारान्चा उल्लेख करीत ते निरुपयोगी हेत असे सान्गायचा किन्वा दरान्वयाने दर्शविण्याचा अट्टाहास का बर करावासा वाटला? मुडी तू किन्वा ललीता व इतरानी वर केलेल्या चर्चेत कुठही विनाकारण धार्मिक रितीरिवाजान्चा उल्लेख केला हेत का? तशी गरज स्वच्छतेचा मुद्दा चर्चेला घेताना तुम्हाला पडली का? नाही तर का नाही? मग पुलन्नाच ती का पडावी? आणि क्षणभर असे जरी मानले की धार्मिक सन्स्कारच जनमानसावर राज्य करीत होते व करताहेत तरीही जर कहाण्या, व्रतवैकल्ये, गावगन्नाच्या रुढी व त्यातिल स्वच्छतेचे नियम वगैरेन्चा नीटपणे अभ्यास केल्यास असेच दिसुन येते की या सर्व कहाण्या वगैरे नुसत्या श्रवण जरी केल्या तरी दैनन्दीन जीवनात कसे वागले जावे हे उमगते! केवळ स्वच्छताच नव्हे तर करारे हाकारे पिटारे डान्गोरे गावात कुणी उपाशीतापाशी हे का यातिल तथ्य जर कुणास समजत नसेल तर दोष तथ्याचा नसुन त्यात्या व्यक्तीचा हे हे सत्या मानण्याची मानसिक तयारी दर्शविली पाहीजे. पण जिथे सत्यानारायणाच्या कथेतला साधू वाणी आज का वाचावा नी त्यान काय नी कसल पुण्य मिळत की पाप मिळत या विचारधारेत अडकलेल्या तथाकथित पुरोगामी सुधारणावादी बुद्धिवाद्याना धार्मिक सन्स्कारात देखिल अन्तर्भुत असलेली स्वच्छतेची वि निरनिराळी अन्य शिकवण कशी काय उमजणार? वर दन्डाचा प्रसन्ग कुठेतरी आला हे! कचरा केला म्हणुन दन्ड नी परत ती दन्डाची पावती फेकुन कचरा केल्याबद्दल पुन्हा दन्ड! अशा या समाजातील काही निगरगट्ट टाळक्यान्चे वागणे पाहून व त्यान्चे निमित्त करुन कुणी धार्मिक सन्स्काराना निरुपयोगी, कालबाह्य वगैरे ठरवीत त्यावर सातत्त्याने टीकास्त्र सोडत राहीले असेल तर त्यात कोणत्या सत्सद्विवेक बुद्धीचा वास दिसतो?  माॅड्स, यातील निवडक पोस्ट वाटल्यास जरुर  V&C  वर हलवाव्यात!  
 
  |  
 >>>>> आपण आपली देवघरं स्वच्छ ठेवतो. पण सार्वजनिक स्वच्छतागृह मात्र कमालीची अस्वच्छ असतात. बसस्टॅंडवर अनेक माणसं त्यांचा वापर करतात व ती दुर्गंधी असह्य होऊन जाते. तेथे उभं राहून बसची वाट पाहाणं मुश्किल होऊन बसतं.   <<<<<<  फक्त देवघरच स्वच्छ ठेवतो? अन्य घर नाही ठेवत? आपण स्वार्थापुरते स्वतःचे तेवढेच स्वच्छ ठेवतो हे तथ्य सान्गण्यास मद्ध्यात देवघर किन्वा देवदेवतान्चे पुजनाची भावना आणण्याचे काय कारण?  आणि तसेही बर्याच घरात देवघरात धुळ अन्गार्याची काजळीची पुटे चढलेली देखिल पाहिली हेत, तर बर्याच घरात आम्ही देवाला भजत किन्वा पुजत किन्वा मानत नाही म्हणुन देवघर नावाचा प्रकारच अस्तित्वात नसतो, त्यामुळे हा देवघराचा उल्लेखही तितकासा बरोबर नाही पण सार्वजनिक ठिकाणच्या नालायक माणसान्च्या बेजबाबदार वागण्याबद्दल तुलनेस आम्ही एकदम देवान्नाच का वेठिस धरतो? आणि तेही हिन्दुन्च्या? देवघरा ऐवजी आपण आपले नी आपल्या पोराबाळान्चे नाक स्वच्छ ठेवतो, कान ठेवतो, तोन्ड थेवतो, अगदी ढुं XXX ही स्वच्छ ठेवतो असे म्हणले अस्ते तर नस्ते का चाल्ले?   बहुदा नस्ते चाल्ले! कारण ज्या लोकान्ना स्वच्छतेचे धडे द्यायची गरज हे अशा सर्व थरातल्या लोकान्मध्ये मुलाबाळान्ची व स्वतःच्या अन्गाची स्वच्छता राखणे हेही रोज आन्घोळ स्नान करावे हे शिकवावे लागुन होते, तिथे हे उदाहरणही काय कामाचे? नाही का?   मग त्यातल्यात्यात दगडाचा धातू पितळ्याचा देव बरा उदाहरणाला! तो काऽऽही तक्रार करणार नाही आणि जे खरच देवघर स्वच्छ ठेवतात आणि वर पुन्हा सार्वजनिक व्यवहारात स्वच्छतेची शिस्त पाळतात ते काॅलर ताठ करुन घेणार, त्या वाक्याने सुखावणार! आणि जेव्हा केव्हा ते सार्वजनिक मुतारीत जातिल तेव्हा स्वच्छतेच्या नियमाकरता त्याना मुतारीच्या स्वच्छतेसाठी देवघर आठवणार! पण वैयक्तीक शिस्त जबाबदारी म्हणुन काही नाही आठवले तरी हरकत नाही! असच ना?    काऽऽय पण विरोधाभास हे हा?   सूधा मूर्ति स्वच्छतेचे डोस पाजण्यासाठी तरी देवघराचा आश्रय घेतात, देवघर तरी स्वच्छ असावे या भावनिक, अन्ध म्हणा हव तर पण श्रद्धेतून आलेल्या देवाविषयीच्या आदराप्रित्यर्थ करीत असलेल्या स्वच्छतेचा आधार घेतात  नेमके याउलट पुलना धार्मिक सन्स्कारात स्वच्छतेची शिकवणच दिसत नाही पण तेही सार्वजनिक स्वच्छतेच्या सुधारणेची आवश्यकता प्रतिपादताना विरोधाभासासाठी तरी का होईना, धार्मिक सन्स्कारान्चाच आधार घेतात! अर्थात निगेटिव्ह अर्थान!  माझी तर बोलतीच बन्द होती हे!   तुम्हाला काय वाटत?  V&C  वर चला!  
 
  |  
  LT  एक सूचना करू का?  तुला जे लिहायचे आहे ते लिहिण्यापूर्वी जरा  precise  करून टाकणार का?  माझ्या बुद्धिला नेहमीप्रमाणेच तुझ्या पोस्टमधून तुला नक्की काय म्हणायचे आहे ते कळत नाहीय. तू असे केलेस तर मला मदत होईल आणि मी तुझा आभारी राहीन.    आता तू पूर्वी एकदा म्हणाला होतास की बहुतेक वेळा तू जे लिहितोस ते तुला स्वत् लाही कळत नाही.   तर असे असेल तर मग राहू दे!    
 
  |  
 नुकतीच भारतातून आले आहे म्हणून बघितलेले काही. हे दुकानदार किंवा होॅटेलवाले एखादी कचर्याची टोपली बाहेर ठेऊ लागले तर हा प्रकार बराचसा कमी होईल. नुसताच कचरा हातात घेऊन तरी किती हिंडणार?  असो,  V&C  नाही करायचे. पण इथे जशा पावलोपावली कचरापेटी असतात तशा तिथेही केल्या तर मी सगळी म्हणत नाही पण बरीचशी घाण कमी होईल. 
 
  |  
 >>>> इथे जशा पावलोपावली कचरापेटी असतात तशा तिथेही केल्या   अग रचना, त्या चोरीला जातील!  इकड गटारान्ची, लाईटटेलिफोनवाल्यान्च्या बाॅक्स्ची झाकणेही बिजागर्यान्सहीत चोरीला जातात! असले बाॅक्स कोणता चोर ठेवणार हे शिल्लक? इलेक्ट्रिकच्या भल्याथोरल्या ट्रान्स्फाॅर्मरची त्याच्यातल्या ताम्ब्याच्या तारेसाठी आणि आॅइल साठी चोरी होते तिथ या कचरापेट्यान्चा काय पाड?   जोक्स अपार्ट, पण भेळपुरीपाणीपुरीवाले, मिठाईवाले पुठ्ठ्याचे बाॅक्स ठेवतात! तुझी सुचना रास्त हे!      गजाभाऊ, तुझी सुचना एकदम मान्य! नेक्स्ट टाईम जरुर प्रयत्न करीन सारान्श लिहायचा, अर्थात पोस्टच्या आधी किन्वा नन्तर!   
 
  |  
Champak
 
 |  |  
 |  | Monday, February 06, 2006 - 8:32 am:    |  
 
 
 |   
  |   
 अर्थात पोस्टच्या आधी किन्वा नन्तर! >>>>>>>>>> हम कभी नहीं सुधरेंगे!    लिम्ब्या, तुम जिओ हजारो साल, मायबोलीके पन्ने हो पचास हजार   
 
  |  
Moodi
 
 |  |  
 |  | Monday, February 06, 2006 - 9:37 am:    |  
 
 
 |   
  |   
 लिंबु चंपक....     लिंब्या खरय रे गजाननचे. बर्याच वेळा मला पण कळत नाही की तुला एवढ्या मोठ्या पोस्टमध्ये नक्की काय म्हणायचय ते. थोडा सारांश आधी टाकत जा.    रचना मी वर ज्या परदेशी माणसाचे उदाहरण दिले तो पण मला काय करायचय अशा बेफिकीर वृत्तीचा असता तर त्यानेही त्या फळांच्या साली हातात ठेवुन कचरापेटी शोधायच्या ऐवजी कुठे रस्त्यात फेकुन दिल्या असत्या तर इतरांच्या कंबरेचे पण फ्रॅक्चर करायला तो आपल्या भारतीयांच्या पंक्तीत जाऊन बसला असता.     पण बर्याच वेळा मी अश्या केळाच्या साली अन प्लॅष्टीकच्या पिशव्या रस्त्यातुन बाजुला सारल्यात कारण कुणी त्यावरुन घसरु नये अन कंबर, पाय मोडु नयेत म्हणुन. मला लाज नाही वाटली कधीच. माझ्या डोळ्यापुढे कायम वयस्कर माणसे येतात. ज्यांचे उतारवयात जर कंबर अन पाय मोडुन हाल झाले तर काय होईल असे वाटते. अगदी सुपरमार्केटपासुन साध्या रस्त्यापर्यंत मी हे करते, म्हणुन मला अधिकाराने माझा मुद्दा इथे मांडावासा वाटतो.    ज्या दिवशी प्रत्येक माणुस देश हा आपले घर आहे हे समजेल त्या दिवशी स्वच्छता होईल. 
 
  |  
Moodi
 
 |  |  
 |  | Monday, February 06, 2006 - 9:42 am:    |  
 
 
 |   
  |   
 आणी हो आपल्या भारतात आणखी काय काय चोरीला जाते अन जाऊ शकते यावर एखादी व्यक्ती मोठा प्रबंध लिहू शकते. नशीब आपल्या देशाच अन कायद्याच.   
 
  |  
Moodi
 
 |  |  
 |  | Monday, February 06, 2006 - 9:47 am:    |  
 
 
 |   
  |   
 हे एक मस्त उदाहरण.        http://www.esakal.com/static/baimanus9.html   . 
 
  |  
 >>>>> यावर एखादी व्यक्ती मोठा प्रबंध लिहू शकते. नशीब आपल्या देशाच अन कायद्याच.  आणि मायबोलीकरान्च!  अस लिहायला विसरलीस की ग!    DDD
 
  |  
Moodi
 
 |  |  
 |  | Monday, February 06, 2006 - 11:37 am:    |  
 
 
 |   
  |   
 लिंबु धार्मीक संस्कारांवर तर कायम टीका होते त्यात काही नवल नाही. देव कुठे आहे हे म्हणणार्यानी एकदा त्याचा मनापासुन अनुभव घ्यावा. देव त्याना माणसात अन सृष्टीच्या लाखो कणात सापडेल, अन तो तिथुनच बघतोय म्हटल्यावर तथाकथीत सुशिक्षीत लोक मग या संस्कारांची टिंगल अन टवाळी पण थांबवतील.     आमच्या कॉलेजमध्ये कुणी मुली टॉयलेटमध्ये जाताना दिसल्या की तिथे कोपर्यावर मुलांचे टोळके येऊन थांबायचे. तक्रारी करुनही हे त्यांचे चाळे अन टिंगल कधीच बंद झाली नाही. मुली मात्र घाबरुन तिथे जायच्या बंद झाल्या, आता काय घडतेय मला माहीत नाही.    मुंबई, नागपूर,  पुण्यात राहिलेल्याना हे ग्रामिण भागातील संतापजनक अनुभव कधीच अनुभवायला मिळाले नाहीत म्हणुन हे प्रश्न क्षुल्लक वाटु शकतात. कारण ग्रामिण भागातील संस्कृती काही अंशी अशिक्षीत पणात मोडते. हे ग्रामिण लोक मूलभुत सोयी याचा अर्थ काय हे समजुन घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे हे प्रश्नही लवकर सुटु शकणार नाहीत.  
 
  |  
Chandya
 
 |  |  
 |  | Monday, February 06, 2006 - 9:50 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मला वाटते पू. लं. च्या लेखात संस्कार हा फक्त पारंपारिक धार्मिक रुढींपुरता  ( मुंज इ. )  मर्यादित न राहता त्यात वैयक्तिक, सामाजिक आचारप्रणाली  ( स्वच्छ्ता, वक्तशीरपणा इ. )  अंतर्भुत असावी आणि त्याचा पाठपुरावा आईवडिलांनी, शिक्षकांनी मुलांच्या जडणघडणीत करावा असा आशय आहे. मुंज, शुभं करोति निरर्थक आहे असे कुठे म्हटल्याचे दिसत नाही.      LT  तुला बरे दिसले सर्व न लिहिलेले   
 
  |  
Soha
 
 |  |  
 |  | Tuesday, February 07, 2006 - 6:40 am:    |  
 
 
 |   
  |   
 Gurudasb  आपल्या पृच्छेचे उत्तर हे होईल असे वाटते     /hitguj/messages/34/63486.html?1106026677    २८ जानेवारी १९८० ही कविता वाचावी.   एकाप्रकारे ही कविता ह्या समस्येचे कारण ही देते. 
 
  |  
 
 | 
| चोखंदळ ग्राहक | 
  |  
 
| महाराष्ट्र धर्म वाढवावा | 
 |  
 
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत | 
 |  
 
|  पांढर्यावरचे काळे | 
 |  
 
|  गावातल्या गावात | 
 |  
 
|  तंत्रलेल्या मंत्रबनात | 
 |  
 
|  आरोह अवरोह | 
 | 
 
|  शुभंकरोती कल्याणम् | 
 |  
 
|  विखुरलेले मोती | 
 | 
 
 
  | 
 | 
 
 
 हितगुज दिवाळी अंक २००७ 
 | 
   |  
 
 
 
 
 |