Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
लक्षात राहीलेल्या शिक्षा, गंमती इ. ...

Hitguj » My Experience » बालपणीचा काळ सुखाचा » लक्षात राहीलेल्या शिक्षा, गंमती इ. « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 12, 200535 05-12-05  4:50 am
Archive through May 25, 200535 05-25-05  2:36 pm
Archive through May 27, 200535 05-28-05  3:10 am
Archive through June 21, 200535 06-21-05  9:25 pm
Archive through July 07, 200520 07-07-05  10:05 am

Senapatee
Thursday, July 07, 2005 - 10:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aro ikÉÊ
%yaa vaaLucaI savaya ksalaI laagatIya.... ]laT Qasakaca basalaaya... vaaLucaI cava kaya spXa-sauwa nakÜ vaaTtÜ.


Moodi
Wednesday, September 06, 2006 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही बीबी आहे हा. आधी वाचला होता पण प्रत्येकवेळी इथे लिहायला विसरत होते.
आमच्या इथे लहान तसे आम्ही दोनच जण होतो, बाकी सार्‍या मोठ्या ताया होत्या. मी अन माझ्या बाबांच्या मित्राचा मुलगा जो माझ्याहून २ वर्षाने लहान होता. आमचे आणखीन एक शेजारी जे नोकरीनिमीत्त आमच्या इथे रहात होते, त्यांचे कुटुंब मात्र परगावी होते, सुट्टी मिळाली की मग ते दोघे भाऊ बहिण अन बाकीच्यांची नातवंडे जी आमच्या वयाची होती ती पण यायची. अन मग आम्ही सगळे मिळून जो उच्छाद मांडायचो की बस.

घराशेजारच्या दिव्याखाली(विजेचा खांब) आमची अंगत पंगत असायची. प्रत्येकजण घरुन ताट वाढुन आणायचा. आणि मग आम्ही ते एकमेकाना द्यायचो. पण हे आमचे शेजारची मुले, ती नुसतेच रिकामे ताट घेऊन यायचे आणि मग आम्ही आमच्यातले द्यायचो. जाम वैतागलो होतो त्यांच्यावर. त्यांना टाळायचा पण प्रयत्न करायचो पण दोघे भाऊ बहिण भलतेच चिकट हो, अज्जीबात मागे हटायचे नाही. अर्थात त्या वयात तरी आम्हाला काय कळत होते? म्हणून त्यांना बाजूला ठेवायचो. कधी विचारले तर म्हणायचे आमची आई म्हणते की बाहेरचे खाऊ नये, मग आम्ही विचारायचो आम्ही आणलेले कसे चालते?

स्वतच्या घरातही हे येऊ द्यायचे नाही, पण आमच्या घरात दंगा. मग काय मोठ्यांनी आम्हाला बाहेर खेळायला पाठवणे नित्याचे झाले होते. सगळ्यात धमाल म्हणजे आमच्या घरमालकांच्या घरी मी अन आमच्या बाईंचा नातू दोघे आळी पाळीने जेवायला जायचो. नुसते टपलेले असायचो की आधी कोण जातो ते. समजा तो गेला की मी बाहेरुन त्याला म्हणायची काय हावरट आहे. आणि समजा मी गेले की तो मला म्हणायचा काय हावरट आहे.

एकदा तर आम्ही दोघेही जाऊन बसलो आणि काकुंना बिचार्‍यांना भाजी पण ठेवली नाही. काकू खरच सुगरण. कुठलाही पदार्थ अगदी मन तृप्त करणारा असायचा.

खरच कितीही लिहीले तरी कमीच आहे. चाळ आणि वाड्यात जी मजा होती आणि लहानपणाची जी गंमत होती ती आता नाही राहिली. गेले ते दिन गेले.


Sayuri
Tuesday, September 26, 2006 - 3:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या लहानपणी आम्ही एकूण चार मांजरं पाळली. त्यातलं पहिलं खूपच शहाणं होतं. त्याचा आम्हाला कधीही त्रास झाला नाही. ते लहान पिल्लू असतानाची गोष्ट.

माझ्या आईची एक जुनी सुती साडी होती. तिच्यात गुरफ़टून खेळायला त्याला खूप आवडायचं. तेव्हा आम्ही पहिल्या मजल्यावर रहात होतो. खिडकीच्या बाहेर वीतभर रुंदीचा दगडी कठडा होता. त्यावर बसून बाहेरचे चिमण्या कावळे पहायला त्याला खूप मजा वाटत असे. एक दिवस तिथे बसल्या बसल्या त्याला झोप लागली आणि झोपेत महाशय खाली पडले. पण जमिनीवर नाही तर तळमजल्याच्या घराच्या खिडकीवरील स्लॅबवर पडले. धड खाली नाही आणि वरही नाही. आता म्याव म्याव चालू झालं. छोटं पिल्लू पाहून टपून बसलेले कावळेही घिरट्या घालू लागले. त्याचं ओरडणं ऐकून मी खिडकीतून पाहिलं तर महाशय खाली. आता काय करावं असा विचार करत असताना मला एकदम आयडिया सुचली. त्याला आवडणारी गुलाबी सुती साडी खिडकीतून खाली सोडली. आणि आपली आवडती साडी पाहून, तिला आपल्या नख्यांनी धरून महाशय वर आले की!

या पिल्लाच्या किंवा पाळलेल्या इतरही मांजराच्या खूप sweet memories आहेत. :-)

Ankt
Friday, October 13, 2006 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शाळेतले पहिले काही दिवस:
तसा माझा पुर्ण शिक्षण औरंगाबादलाच झाल पण शिक्षणला सुरूवात झाली ती शिरपुरला.
त्या शिरपुरच्या काही लक्षात राहिलेल्या आठवणी
माझ्या आईच्या इच्छेनुसार मी शाळेत जायला तयार झालो.
पहिल्या दिवशी मी तर मी शाळेत पोहचल्यावर भोकाड पसरल....खुप रडलो. बाई पण घाबरून गेल्या म्हणाल्या याला घेउन जा उद्या समजाउन आणले तरी चालेल. (मिशन पुर्ण झाले आणि आई मला घेउन परत आली)
दुसरा दिवशी पासुन माझी नाटक सुरु झाली, कधी पोटात दुखायचे तर कधी कुठे तरी लपुन बसायचे.
पण माझी आई पण काही कमी नाही तिने मला शाळेत बसवाचे ठाम ठरवलेच होते.
नंतरचे काही दिवसतर ती माझ्या वर्गाच्या बाहेर बसायची (आणि मी बावळटा सारखा थोड्या थोड्या वेळाने बाहेर पहायचो की आई आहे की नाही.)
एकदा तर गंमत झाली, आमच्या बाजुला राहणारे काका आईला म्हणाले "कसा जात नाही हा शाळेत आज मीच सोडतो त्याला" मग त्यानी मला गोड गोड बोलून तयार केले आणि त्यांच्या मोटरसायकलवर बसावून शाळेत नेले. मी पण खुषिखुषित त्यांच्या सोबत गेलो. त्यांनी मला शाळेच्या ओट्यावर सोडले आणि टाटा केला. मी पण हात हलवुन काकांना टाटा केले. काका दिसेनासे होइपर्यन्त मी ओट्यावरच उभा होतो. काका नाहिसे झाले आणि मी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. (शाळा तशी घराच्याजवळच होती, आणि मला रस्ता माहिती होता)
आज विचार करतो काय मस्त दिवस होते ते, ती बडबड गीते, त्या गोष्टी, ती गाणी आता परत आयुष्यामधे येणार नाही. खरच "बालपणीचा काळ सुखाचा"


Chyayla
Wednesday, November 08, 2006 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़िशपॉन्डच्या किस्स्यावरुन आठवले, आमच्या शाळेतल्या एका वजनदार, टुणटुण मुलीला "चन्द्र वाढतो कला कलाने, @!$#&* वाढते किलो किलो ने" ... अस्सा राग आला होता तिला. आता कोणी पण अशी मुलगी दिसली की मला ही कमेन्ट नक्की आठवते.

Sneha1
Thursday, April 12, 2007 - 8:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशी माझी एक लहानपणची मजेदार आठवण आहे. मला कुत्रे खूप आवडतात. आणि तेव्हा शेजारी कुत्र्याचे छान पिल्लू आणले होते.मी सारखी जाउन त्याच्याशी खेळायची. ते पिल्लू पण माझ्याशी छान खेळायचे.
एक दिवस मी आणि माझी मैत्रीण एका दूरच्या पार्क मधे खेळायला गेलो होतो. बाजूने कुत्र्याच्या पिल्लाचा अगदी केविलवाणा आवाज ऐकू आला. पाहिले तर शेजार्‍यान्चा कुत्रा. मला पाहून ते पिल्लू माझ्याकडे आले होते.इतक्या दूर ते पाहून मला आश्चर्य वाटले. बहुधा रस्ता चुकून आले असावे. मला खूप दया आली. मी लगेच त्याला उचलून घेतले, आणि आम्ही त्या पिल्लाला घेउन घरी निघालो.
शेजारी गेलो आणि फाटक उघडून आत शिरलो. आवाज ऐकून काका समोर आले. पिल्लाला पाहून त्यांच्या चेहर्‍यावर आश्चर्याचे भाव दिसले, आनंदाचे नाही. मी सांगायला सुरूवात केली की काका मला पार्क मधे तुमचे पिल्लू दिसले म्हणून. माझे बोलणे ऐकुन त्यांनी शांतपणे खुलासा केला की त्यांना ते पिल्लू नको होते म्हणून ते पिल्लाला दूरवर सोडून आले होते!
तेव्हापासून मी अनोळखी रस्त्यावर ( कुत्र्यासाठी अनोळखी ) ओळखीचे कुत्रे दिसले तरी त्याच्या वाटेला जात नाही.....


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators