Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
MUST see in the USA

Hitguj » My Experience » भटकंती » अमेरिका » MUST see in the USA « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through July 01, 200435 07-01-04  6:21 pm
Archive through May 15, 200620 05-15-06  1:29 pm
Archive through October 08, 200720 10-09-07  2:51 am

Amruta
Tuesday, October 09, 2007 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, सव्या आणि असामी

Savyasachi
Tuesday, October 09, 2007 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद सावनी. खरय या वेळेस रंग एवढे चांगले नाही आलेत. बहूतेक मी पोकोनोसला जाईन. ते जवळ आहे.
असाम्या, skip WM मस्त पर्याय. ना रहेगा बास... :-)


Sunidhee
Wednesday, January 09, 2008 - 9:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोक हो, मला लवकरात लवकर मदत कराल का? आम्हाला alaska cruise वर july मधे ७ दिवस जायचे आहे. तर कोणाला अनुभव असेल तर प्लिज़ लिहा. मला ही माहिती हवी आहे.
१. कोणते cruise चांगले आहे? seattle पासून जाऊ का?
२. चांगले deals कुठे मिळतील
३. कोणता route चांगला असतो
४. काय टाळायला हवे
५. साधारण थंडी कशी असते तिथे july मधे
६. ते महाराजा,मसाला cruise वगैरे ने गेले तर चांगले आहेत का?
७. cruise वर कोणत्या मजल्यावर रूम घेऊ नये?
८. काय काय activities करता येतात?
९. शाकाहारी मिळेल का?
१०. अबब.. किती ते प्रश्न?????

alaska झपाट्याने फूल्ल होते, म्हणुन कोणाला कसलीही ऐकीव माहीती असेल तरी लिहा. गेला असाल तर उत्तमच.


Ajay
Thursday, January 10, 2008 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अलास्काची नाही पण करेबियनची क्रूझ केली आहे. माझ्या मते क्रुझ सारखा दुसरा सुखद सुट्टीचा अनुभव नाही. (परदेशात तरी).
१. आम्ही carnival ने गेलो होतो. चांगला, अनुभव नक्की परत जाईन.
६. मला तरी महाराजा, मसाला क्रुझ आवडणार नाही. सगळ्याप्रकारचे लोक असलेली जास्त आवडेल.
७. जितके वर तितके पैसे जास्त. ज्या खोल्यात अजिबात बाहेरचे दिसत नाही त्या स्वस्त असतात. पण त्यापेक्षा १ मजला वर, जिथे बाहेरचे दिसू लागते त्या थोडे जास्त पैसे पडले तरी घ्याव्या अशा मताचा मी आहे. पण खूप वरच्या घ्यायचीही आवश्यकता नाही. कारण तुम्ही फक्त झोपायचा वेळच खोलीत घालवता.
८. काय करता येत नाही ते विचारा. उलट जेवढे शक्य आहे ते करा (सगळे करणे वेळेअभावी शक्य होत नाही)

९. जेवण हा या प्रवासातला सगळ्यात आनंददायी अनुभव. बाकी कुठ्ल्याही सुट्टीवर गेलात की बाहेर जेवणाचा कंटाळा येतो तो इथे येत नाही कारण तुम्हाला हवे ते बनवून मिळते. २४ तास जेवण. आजकाल सगळ्या बोटीवर काम करणारे भरपूर भारतीय असतात. त्यामुळे शाकाहारीच काय पण हव्या त्या देशातले हव्या त्या प्रांतातले सगळे मिळते. आम्हाला तर मराठी वेटर मिळाला होता (प्रत्येक कुटुंबाला एक वेटर असतो तो सगळे मिळवून देतो). त्याला रोज संध्याकाळी शाकाहारी भारतीय जेवण सांगितले होते. त्यामुळे अगदी भरल्या वांग्याची भाजीही मिळाली. अर्थात सगळे पदार्थ मिळतिलच असे नाही कारण बोटीवर गोदामात ते शिल्लक असावे लागते. आधी हा माणूस बरीच वर्षे ताज हॉटेलात कामाला होता.

तुम्हाला हवे ते जेवण करून घालणे हा त्या त्या आचार्‍यासाठी साठी एक व्यावसायिक अभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा भाग असतो. कारण दररोज त्याना मुख्यालयातून आलेल्या आदेशावरून तेच तेच पदार्थ करून घालावे लागतात. त्या ठराविक पाककृतींमधे त्याना स्वत:च्या मनाचा बदल करण्याचे स्वातंत्र्य नसते. त्यामुळे अशी काही खास मागणी केली (नुसती मागणी, हट्ट नाही) तर त्याना आपली सृजनशीलता पणाला लागली याचा कमालीचा आनंद होतो

आणि असे स्पेशल जेवण सांगितले म्हणून इतरांबरोबरचे मिळत नाही असे नाही. हवे असल्यास हे ही मिळते आणि तेही मिळते.
आपल्यालाच ते वाया जाऊ नये असे वाटते.

( Atlantic lobseter बरोबर भरली वांगी काय फर्मास लागतात म्हणून सांगू !)


pampering या शब्दाचा अनुभव घेण्यासाठी एकदा क्रुझवर जायला हवेच. :-)

आणि ते बोट वगैरे लागेल अशी भिती बाळगायचे कारण नाही. कारण ते प्रकरण इतके मोठे असते(१२-१५ मजली) की १-२ तासानंतर आपण बोटीवर नसून एका भल्या मोठ्या हॉटेलात आहोत असे वाटू लागते. मुद्दाम समुद्राकडे बघितल्या शिवाय ती चालत आहे हे कळत नाही.


Ajay
Thursday, January 10, 2008 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेगवेगळ्या फळांचे रस फुकट असतात पण coke, pepsi अशा शीतपेयांना वेगळे पैसे पडतात. (रात्रीचे जेवण सोडून). आम्ही शीतपेये एरवीही कधी पीत नसल्यामुळे फरक पडला नाही. पण काही जण एकरकमी जास्त पैसे भरून अमर्याद शीतपेयांची सुविधा घेतात.

Sunidhee
Thursday, January 10, 2008 - 5:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, खूप चांगली आणि उत्साहवर्धक माहीती. चांगले deals कुठे मिळतील? AAA पहात आहे, अजून काही? खूप धन्यवाद.

Sas
Monday, May 26, 2008 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Departure San Fransisco CA USA असणार्‍या Cruise ची कोणाला माहीती आहे का?. २ night cruise or 3 night cruise आहेत का?

Sunidhee
Tuesday, July 22, 2008 - 4:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय तुम्ही दिलेल्या माहितीचा उपयोग झाला. झक्किंनी पण भरपूर माहिती दिली होती ई-मेल वर. . आम्ही अलास्का ला जाऊन आलो. खूप मजा आली. थोड्या गोष्टी अपेक्षेपेक्षा वेग्ळ्या निघाल्या, जसे Holland America cruiseline वर भारतीय आचारी नाही त्यामुळे भारतीय्-शाकाहार मिळायला अडचण झाली. त्यानी प्रयत्न केला बनवायचा पण असफल. बोट जेमतेम अलास्काच्या दक्षिण टोकाला जाऊन येते, उत्तरेला फार जात नाही. पण हिमनग पहाणे फारच सूंदर!!! एकूणच अलास्का खूप स्वछ आणि सूंदर आहे. नुसते सर्वात वरील डेकवर बसून समूद्र पहाणे पण अप्रतीम!! आणि आराम तर इतका केलाय की बास.
बर्‍याच गोष्टी आहेत.. आम्ही पुन्हा cruise वर जाणारच. Royal Caribbian वर खूप भारतीय लोक कामाला आहेत आणि लहान मूलांसाठी पण खूप गोष्टी असतात म्हणे. . कोणाला जायचे तर त्यावर जावे.


Moderator_10
Wednesday, July 23, 2008 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे सदर खालील ठिकाणी हलवण्यात आले आहे.
/node/2758

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators