Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Pleej maarg suchavaa...

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » Pleej maarg suchavaa... « Previous Next »

Supermom
Tuesday, July 08, 2008 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मायबोलीची नियमित वाचक आहे हे आता बहुतेकांना माहीत आहेच.
गेले दोन तीन दिवस मी मायबोलीवर येत नाहीय. मला मोठाच प्रश्न पडलाय. भयंकर अस्वस्थ आहे मी. माझ्यासारखा प्रश्न असणारे अनेक लोक असतील इथे असं समजून लिहितेय. प्लीज मला काहीतरी मार्ग सुचवा.

माझे वडील दोन वर्षांपूर्वी गेले. तेव्हापासून आई तिकडे एकटीच आहे. तिच्यासाठी दिवसभराची बाई ठेवली आहे. पण मधून मधून ती आजारी पडली की शेजार्‍यांची मदत लागतेच. तशी तिची तब्येत बरी आहे. वय वर्षं पंच्याहत्तर असलं तरी तशी खुटखुटीत आहे. पण गेले काही दिवस कुठे पित्त झालं, कुठे सर्दीताप आला असं सारखं सुरू आहे. त्यामुळे शेजारीपाजारी, नातेवाईक यांच्यावर नाही म्हटलं तरी थोडंफ़ार पडतंच. त्यातच मधे उलट्या, पित्त असं जास्त होऊन तिला दवाखान्यात दाखल करावं लागलं. दोन तीन दिवसांमधे डिस्चार्ज मिळणार आहे. या काळात नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यावर डबा पोचवणं, इतर कामं हे आलं. तेव्हा आता तिला इकडे का घेऊन जात नाही असं त्यांना वाटतंय. काही जण बोलून दाखवत नसले तरी त्यांना स्वतचे व्याप सांभाळून करायचा खूप त्रास होतोय हे मलाही कळतंय.

यावर काय मार्ग काढावा हे मला सुचेनासं झालंय. आम्ही सगळ्या मुली परदेशात असलो तरी अजून ग्रीनकार्ड झालेले नाहीत. याआधी ती दोनदा इथे परदेशात येऊन गेलीय. पण आमचे अजून ग्रीनकार्ड नसल्याने तिला नेहमीकरता आणणे शक्यच नाहीय. इच्छा असूनही ते करता येत नाहीय. वृद्धाश्रमाचा विचारही शक्य नाहीय कारण ती मनाने आधीच एकटं रहावं लागतं यामुळे खचलेली आहे. अशात तिला वृद्धाश्रमात ठेवलं तर ती आणखीच डिप्रेशन मधे जाईल. काय करावं ते कळतच नाहीय.

मला प्लीज मार्ग सुचवा.


Swaatee_ambole
Tuesday, July 08, 2008 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, NRI's च्या पालकांची काळजी घेणार्‍या काही संस्था आहेत महाराष्ट्रात. त्यांची मदत घेता येईल. मी स्वतः अनुभव घेतलेला नाही पण ऐकून आहे. सहसा मुलं परदेशात असलेले पालक सारख्याच मनःस्थिती आणि परीस्थितीतून जात असल्यामुळे त्यांच्या अश्या communities तयार होतायत ही चांगली बाब आहे. इथे सगळेच एकमेकांच्या वेळेला मदत करत असल्यामुळे आणि आपण त्याचं (मोल होणं शक्य नसलं तरी) शुल्क भरत असल्यामुळे आपल्यालाही obligation वाटत नाही.

या काही लिंक्स सापडल्या बघ नेटवर :
http://www.guardian-pune.com/default.html
http://www.nripo.org/

आता यांचं काम फक्त पुण्यातच चालतं की कसं त्याची चौकशी करावी लागेल.

Cinderella
Tuesday, July 08, 2008 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यांना प्रवास झेपणार असेल तर सहा महिने तर नक्कीच तुमच्याकडे राहु शकतील. किंवा जी बहिण त्यातल्या त्यात भारता जवळच्या देशात (जसे यु के) असेल तिथे त्या जाउ शकतात. परत जाण्याच्या वेळी तुम्ही त्यांच्या बरोबर जाउन १५ दिवस राहुन येउ शकता. म्हणजे कमीत कमी सहा साडे सहा महिन्यांचा प्रश्न सुटेल. तसेच एका बाई ऐवजी सकाळी एक आणि दुपारनंतर एक असे ठेउ शकता. म्हणजे एक आली नाही तर दुसरी असेल. किंवा एखादी चाळीशीतली तब्येतीने बरी अशी बाई (नात्यातली किन्वा ओळखितली) कायम येउन राहु शकेल का असे बघा.

Chinnu
Tuesday, July 08, 2008 - 3:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, कुणी नातेवाईक त्यांच्याबरोबरीने राहू देउ शकत असेल तर उत्तम.
ओळखीच्या दवाखाना अगर हॉस्पिटलशी संबंधीत हेल्थ कार्ड घेवून ठेवावे. इमर्जन्सी फोनची लिस्ट देखभाल करणार्‍या बाईकडे देवून ठेवावी. गरज पडल्यास ambulance बोलविता येईल एवढी तजवीज असावी.
त्यांना येणे जमत नसेल तर कुणीतरी तिकडे जाणे, जात राहणे बरे. फोनवरून विचारपुस चालु ठेवावी. वाढविता आली तर उत्तमच. आणि फार काळजी करू नकोस.


Ashwini
Tuesday, July 08, 2008 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, अथश्री नावाच्या संस्थेबद्दल पण काही चांगल्या गोष्टी ऐकून आहे. प्रत्यक्ष अनुभव नाही. खालील लिंक पाहा.

http://www.financialexpress.com/news/Housing-A-Retirement-Plan/108126/

पुण्यात कुणालातरी प्रत्यक्ष पाहून यायला सांग. खूप छान काळजी घेतात असे ऐकले आहे.


Chinoox
Tuesday, July 08, 2008 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अथश्री ही परांजपे स्कीम्सची योजना आहे. आणि खूप चांगलं ऐकलं आहे त्याबद्दल. चांदनी चौक आणि बाणेरला आहे.
सुमॉ, आनंदवनात काही वृद्ध राहतात. हा वृद्धाश्रम नाही. प्रत्येकासाठी इथे सगळ्या सोयींनी युक्त अशी स्वतंत्र घरं आहेत. अनेक प्रसिद्ध राजकीय नेते व लेखकांचे आप्त तिथे आहेत. वृद्धाश्रमापेक्षा हा पर्याय अनेकांना आवडतो.

Supermom
Tuesday, July 08, 2008 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्यांना धन्स.
स्वाती, यातल्या संस्थांबद्दल मला माहीत आहे ग. nirpo ची मेंबरशिप घेऊनही दिली आहे मी तिला. पण ते सगळेच म्हातारे असल्याने त्यांची अशा वेळी मदत कशी expect करायची?

बाई तर ठेवलेलीच आहे दिवसभराची. आता रात्रीची पण अरेंज केलीय. पण नातेवाईकांचं म्हणणं की त्यानं प्रश्न सुटायचा नाही. बाई ठेवली तरी आम्हाला त्या आजारी पडल्या की करावंच लागतं. लक्ष द्यावंच लागतं. :-(

चिनू, कोणी नातेवाईक जवळ राहणारे असते तर हा प्रश्न आलाच नसता ग.:-(

chioonx , आनंदवनाची अजून थोडी माहिती देणार का?


Sashal
Tuesday, July 08, 2008 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

discourage करण्याचा हेतू नाही पण पालकांना इथे आणण्याबाबत एक महत्वाचा प्रश्न म्हणजे insurance .. ते कसं काय manage करणार? तशी ह्यावर चर्चा झालीये बहुतेक आधी, pre-existing conditions cover करणार्‍या insurance वर .. पण एकूणच इथे healthcare जरा महागच आहे .. बर्‍याच cases ऐकायला मिळतात त्याबाबतीत पाण्यासारखा पैसा खर्च झालेल्या ..

Chinnu
Tuesday, July 08, 2008 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नातेवाईकच हवेत असे काही नाही. जर कुणी ओळखीची चांगली फ़ॅमिली paying guest ठेवायला तयार असेलेत तर चांगलेच.

Lalu
Wednesday, July 09, 2008 - 12:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'अथश्री' ची ही साईट आहे-
http://www.pscl.in/athashri.html



Admin
Wednesday, July 09, 2008 - 1:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा विभाग इथे हलवला आहे
/node/2577

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators