Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 22, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » मला काही सांगायचे आहे » Archive through May 22, 2008 « Previous Next »

Saee
Thursday, June 07, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबू, नोकरी करणार्‍या प्रत्येकाने बोध घेण्यासारखं लिहिलंत. फक्त नवीन नोकरीवाल्यांनाच नव्हे तर मुरलेल्या लोणच्यांनाही क्षणोक्षणी उपयोगी पडणारं आहे हे. मी माझ्या संगणाकावर मोठ्या font मधे प्रिंट काढून लावूनही टाकलं! माझ्या आजूबाजूच्यांना आणि boss लाही दिसेल असं!

Giriraj
Friday, June 08, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्ब्याने public relation वर लिहायचे म्हणजे धमालच आहे

Sheshhnag
Friday, June 08, 2007 - 9:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बु... मस्तच लिहिलंस हं.

Limbutimbu
Saturday, June 09, 2007 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठमोळी, दिशा, झकासराव, यशवन्त, गोबू, उपास, सई, गिरीराज, शेषनाग, आपणा सर्वान्च्या प्रतिक्रियान्बद्दल मनःपुर्वक धन्यवाद! :-)
खरे तर, यशवन्तचा प्रॉब्लेम हा माझा स्वतःचाही आहे, त्यावेळेस लिहिताना मी याच गोष्टीन्चा माझे बाबतीत विचार करत होतो, थोडा उदास आणि निराशही झालो होतो! मात्र यशवन्तची पोस्ट वाचल्यावर मी माझ्याच परिस्थितीचे विशेलेषण केले आणि इथे यशवन्तला उद्देशुन लिहीले! :-)
आपणास ते आवडले हे बघुन आनन्द झाला!
त्या दिवशीच्या पोस्ट नन्तर ह्या बीबीवर गिर्‍याची पोस्ट बघुन मी आजच आलो त्यामुळे प्रतिसादाला उशिर झाला त्याबद्दल क्षमस्व!
जेव्हा सुचेल ते, जमेल तस लिहिन!
:-)




Dineshvs
Saturday, June 09, 2007 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबु, कुठल्याहि विषयावर सखोलपणे विचार करणे आणि तो नेमका शब्दात पकडणे, छानच जमते तूला.

Nalini
Thursday, September 13, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Do you know that there is also an expiry date for LPG cylinders. >>

यापुर्वीच ह्या विषयावर चर्चा झालेली आहे. आज लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचा दुवा
इथे देत आहे.


Hkumar
Friday, October 26, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बॅंकांच्या ATM मध्ये पुढील अडचणी लोकांनी अनुभवल्या आहेत:
१) आपले card यंत्रात अडकून ( capture ) राहणे
२) पैसे आपल्याला न मिळताही आपल्या खात्यातून वजा होणे.
३) कार्ड सरकवण्याच्या खाचेत जर वाळूचा बारीक खडा असेल तर कार्ड ओरखडले जाते व बाद होते.
ज्यांना अजून काही अनुभव आलेत त्यांनी जरूर भर घालावी.


Savyasachi
Friday, October 26, 2007 - 7:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हो ना, ठाणे जनताच्या एटीएम मधे २ वेळा असे झाले. कार्ड घातले, पैसे सांगितले. मग त्याने चक्क पैसे आतल्याआत मोजले सुद्धा ! मग दरवाजा उघडल्याचा पण आवाज आला, पण बाहेर काहीच आले नाही ! भलताच थरारक अनुभव. तेंव्हापासून त्यांच्या एटीएमच्या फंदातच पडत नाही मी :-)

Badamraja
Saturday, November 03, 2007 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे काका एकदा UTI च्या ATM मधे गेले होते
त्यांना ५०० Rs काढायचे होते
आणि गंमत म्हणजे १०० च्या चारच नोटा आल्या बाहेर
आणि जी पावती बाहेर आली तीच्यावर ५०० withdrwa झाल्याचे लीहीले होते. ती उरलेली एक नोट पुढच्या पैशे काढणार्‍याच्या नोटां मधे आली होती.
हल्ली यत्रं सुद्धा पैशांची अफ़रा तफ़र करायला लागलेत (ती सुद्धा माणसानेच बनवली असल्यामुळे असेल कदाचीत :-))


Supermom
Saturday, November 03, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा अनुभव मलाही आहे. पुण्याला एका एटीम मधून पैसे काढताना एक नोट कमी आली. पावतीवर मात्र मागितलेली रक्कमच लिहिली होती.

बॅंकेच्या कस्टमर सर्व्हिस ला फ़ोन केल्यावर आमच्या रेकॉर्ड मधे बरोबर रक्कमच दाखवली आहे. आम्ही काही करू शकत नाही असे 'अपेक्षित ' उत्तर मिळाले.


Dakshina
Thursday, December 13, 2007 - 6:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही दिवसांपुर्वी,, कोण्या एका व्हिजिटरचा चक्कं पासपोर्ट आमच्या तळवड्याच्या भव्य ऑफ़िसच्या आवारात हरवला. आणि मुख्यं म्हणजे त्याला ते कळलं पण नाही. मला ते कळलं कारण माझ्या तिथल्या कलिगने तो माझ्याकडे पाठवला. ड्रायव्हरला २ ते ३ वेळा पाठवलं पत्ता शोधायला, त्याला काही सापडला नाही. पत्त्यावरून फोन नंबर मिळवायचा प्रयत्न केला, एक्स्चेंज कडून पण असमाधानकारक उत्तर मिळालं. शेवटी मी स्वतः तो पासपोर्ट घेऊन गेले. शिवाजीनगरचा कुठलातरी पत्ता होता, प्रत्येक न प्रत्येक माणसाला विचारलं आणि आखेर पत्ता शोधून काढला, मुलांचं नाव होतं सचिन.... एका बाईने दार उघडलं मी विचारलं तो आहे का.. तिने असा एक जळजळीत कटाक्ष टाकून विचारलं 'क्या काम है"? मी चक्रावलेच.. मी म्हणलं त्याचा पासपोर्ट हरवलाय का? ती म्हणाली 'पता नही' मी अजून आश्चर्यचकित... इतका सगळा संवाद दरवाज्यात उभं राहून सुरू होता... बाई बहूतेक झोपली होती. मी म्हणलं तुम्ही त्याला मोबाईलवर फोन करा आणि विचारा. ती म्हणाली घरी रिलायन्सचा फोन आहे, आणि आऊटगोईंग बंद आहे. वाह!
वर म्हणाली, तूम तुम्हारे फोन से करो ना.. मोबाईल है ना तुम्हारे पास? म्हणजे हा उलटा न्याय. उद्या जर तो पासपोर्ट हरवला म्हणून मला रिस्पॉन्सिबल धरायला लागला, आणि ही बाई जर कुणी तिसरीच असती तर? म्हणून त्या मुलाशी बोलण्याचा खटाटोप करत होते. अखेर मीच फोन केला त्याच्याशी बोलले, हीच तुझी आई आहे का विचारून खात्री करून घेतली. अखेर पासपोर्ट तिच्या हवाली केला आणि निघाले.

खूप चरफ़डले, की काही लोक खरंच नशिबवान असतात. त्यांना कशाची तमा नसते. आपलं पासपोर्ट सारखं महत्वाचं डॉक्यूमेंट हरवतं, वर घेऊन येणार्‍या माणसाला ही ट्रिटमेंट? "नेकी कर और दरिया मे डाल" म्हणतात तेच खरं.


Manjud
Thursday, December 13, 2007 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सव्यसाची, ठा. ज. चा आम्हालाही अगदी असाच अनुभव आला होता. ATM मधून १००० रुपये withdraw केले पण पैसे बाहेर आलेच नाहीत. आम्ही ताबडतोब आमच्या ब्रॅंचमध्ये तक्रार नोंदवली. त्यानी उत्तर दिले की ATM बंद होण्याच्या वेळी आमचे स्क्रोलिंग चेक होते. म्हणजे cash चा book balance आणि physical balance चेक होतो. त्यावेळी लक्षात येईल. ATM ची चूक असेल तर आम्ही तुमचा account update करू. दुसर्‍या दिवशी account चेक केले असता व्यवस्थित ATM txn failure असा मेसेज देऊन पैसे debit आणि credit ही दाखवले होते. त्यामूळे असा काही अनुभव आल्यास आपल्या मुख्या ब्रॅंचला inform करणे महत्वाचे आहे.

Varsha11
Friday, February 15, 2008 - 6:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण असाच अनुभव आला.
मी State Bank च्या ऑफिस जवळच्या ATM मधे cash काढण्यासाठी गेले कार्ड घातले सगळी procedure पुर्ण केली आणि नंतर Screen वर आले की This ATM is not working मग परत मी सन्ध्याकाळी गेले तेव्हा मला cash मिळाली. त्याच्यानंतर मी १५ दिवसांनी पास बुक भरुन आणले तर माझ्या खात्यातुन दोन वेळा cash withdrawn दाखवले होते. दुसर्‍या दिवशी त्या शाख़ेत जाउन विचारले तर ते म्हणाले की असे काही वेळा होते पण तुमच्याकडे काय proof आहे कि तुम्हाला एकदाच पैसे मिळले, माझ्याकडे सन्ध्याकाळी cash withdraw केलेल्यची transaction slip होती ती दाख़वली. दोन दिवसांनी पास बुक भरुन आणले तर माझ्या ख़ात्यात revese entry झाली होती. written application करायला सांगितले होते पण काही न करताच मला माझे पैसे परत मिळले.

सगळ्यांनीच जरा काळजी घेतली आणि ATM Transaction Slip काही दिवस सांभाळुन ठेवली तर आपले नुकसान होणार नाही.


Kiran
Sunday, March 02, 2008 - 3:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Varsha, तुमच्याकडे एकच स्लिप होती ह्यवरून तुम्ही एकदाच पैसे काढलेत असे होत नाही. दुसरी स्लिप हरवलेलीही असु शकते. शेवटी आपल्या हातात काहीच नसते त्यांच्या record मध्ये descripancy आली नसेल तर पैसे परत मिळाले नसतेच. वरती सान्गितल्याप्रमाणे उर्लेले पैसे जर पुढच्या माणसाला जास्त गेले असते तर त्यांना फरक आढळला नसता.

ATM ही तशी risky गोष्ट आहे पण त्याशिवाय काम करणे पण कठीणच आहे. ईथे US मध्ये बरे आहे. Merchants कडेच Cashback मागता येते. आपल्याकडेही हळुहळु होइलच सुरु कधीतरी.

सुदैवाने मला तरी अजुनपर्यन्त ATM ने धोका दिला नहिये. एकदा असाच पैसे मोजल्याचा आवाज येउन transaction cannot be completed अले होते पण माझ्या खात्यातील रकमेवर काही परिणाम झाला नव्हता.

एकदा तर मझ्या अगोदरचा माणुस खुशाल त्याचे authenticated कार्ड तसाच ठेऊन निघून गेला होता! मी मग त्याला धावत जाऊन ते card परत केले. Receipt , पैसे वगैरे घेण्याच्या गडबडीत हे होऊ शकते त्याची मात्र काळजी घेतली पाहीजे.


Varsha11
Tuesday, March 04, 2008 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचे बरोबर आहे किरण. मी हा मुद्दा लक्शात घेउनच bank मधे गेले होते की माझे पैसे गेले पण तुम्ही म्हणता आहात त्याप्रमाणे त्यांना त्या दिवशी balance tally झाला नसेल म्हनुन त्यानी मला लगेच पैसे दिले नाहितर असे कोणि करणार नाही.

Dakshina
Thursday, May 22, 2008 - 4:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठे लिहू ते कळलं नाही म्हणून इथे लिहीतेय. खरंतर मला छोटीशी मदत हवीए.

माझ्या मैत्रिणिची थोरली बहीण आत्ता ३५ वर्षांची आहे. इयत्ता ८ वीत असताना तिला डायजेशन चा त्रास सुरू झाला, अगदी पाणी सुद्धा पचत नव्हते, ती मिरजेची आहे त्यामूळे बेस्ट हॉस्पिटल ट्रिटमेंट्स उपलब्ध होत्या, तरिही डॉक्टरांना निदान करता आले नाही की हा त्रास का होतोय ते. मग काहीतरी सांगायचे म्हणून त्यांनी तिला अपेंडीक्स आहे असं सांगितलं आणि ऑपरेशन केलं. पण त्रास काही संपला नाही. आणखिन दोन वर्षांनी अक्लायझो ऑफ़ कर्डिया.. म्हणजे अन्ननलिकेतून अन्न जठरात पास होतं ती जागा कॅल्शियम मूळे चोक झाल्याने ते ही ऑपरेशन केलं. होणार्‍या उलट्या थांबल्या, आणि डायजेशनचा त्रास पूर्णपणे नाही पण काही अंशी निकालात निघाला. पुढे लग्न झालं पहीला मुलगा सिझेरियन करून झाला. अधून मधून डायजेशनचा त्रास होतोच तिला. दुसर्‍या बाळंतपणात दिलिव्हरी डेट जवळ आल्यावर परत भयानक डायजेशनचा त्रास झाला, पोट फ़ुगलं डॉक्टरांना वाटलं डिलिव्हरीच्या पेन्स आहेत म्हणून आधी नॅचरल साठी ट्राय केला, पण ते काही झालं नाही, मग सिझेरियन केलं तेव्हा लक्षात आलं की 'त्या' पेन्स या डिलिव्हरीच्या नव्हत्याच.
अशा पद्धातीने तिच्या पोटावर एकूण चार शस्त्रक्रिया झाल्या. दोन आठवड्यांपूर्वी परत तिला तसाच त्रास झाला, पोट फ़ुगलं, गॅस साठून राहीले, मलावरोध तर ४ दिवस होता...
अखेर डॉक्टरांना सर्जरी करण्याशिवाय पर्याय उरला नाही. अशा पद्धातीने तिचं पाचवं ही ऑपरेशन पार पडलंय.
पण याचं कारण कोणीच ठोसपणे सांगू शकत नाहीए... तिचे रिपोर्ट्स टाटा (मुंबई) ला पाठवायला सांगितलेत. शिवाय इथे पूण्यात कोणी gastrointestinologist गॅस्ट्रोइंटेस्टेनोलॉजिस्ट आहे का ते पाहून त्याला ही रिपोर्ट्स दाखवा असं सांगितलंय.

तुमच्यापैकी कोणाला या अशा त्रासाबद्दल काही माहिती, अनुभव असेल तर प्लिज सांगा... आणि जर उपचार घेऊन बरं वाटलं असेल तर तसं ही सांगा.

शिवाय कोणी उत्तम गॅस्ट्रोइंटेस्टेनॉलोजिस्ट माहीत असेल तर नाव ही सुचवा... सध्या एक रेफ़रन्स मिळाला आहे 'डॉ. वाघोलीकर म्हणून.


Rajya
Thursday, May 22, 2008 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, आयुर्वेदात याच्यावर उपाय आहेत, पण कुणाला त्यात जास्त इंटरेस्ट दिसत नाही :-(
तुझ्या मैत्रिणीला विचारुन बघ माझ्या माहीतीत महाराष्ट्रातला टॉपचा आयुर्वेदाचार्य आहे :-)


Itsme
Thursday, May 22, 2008 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोज प्रणायाम करावे, सकाळ संध्याकाळ, अजुनही बरेच लोक प्राणायम seriously घेत नाहीत, पण ओउशधाने पडत नाही एव्हडा लवकर फरक पडतो. अर्थातच तज्ञांची मदत घ्यावी

Dakshina
Thursday, May 22, 2008 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही दोघंही सांगताय ते मान्य आहे, पण आयुर्वेद, होमिओपॅथी हे दोन्ही आजमावून झालंय. टाटा मध्ये तिचे रिपोर्ट्स पाठवण्याचा सर्वांनी धसका घेतलाय, कारण डॉक्टरांनी सांगितलं नसलं तरिही, कुठेतरी 'कॅन्सर' ची शक्यता वाटतेय असाच त्याचा अर्थ होतोय.
काहीच कळत नाहिए.


Shraddhak
Thursday, May 22, 2008 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

---- पोस्ट एडिट केले आहे. ----

दक्षिणा, जे झालं ते कितीही वाईट असलं तरी चारचौघात लिहिताना मर्यादा पाळणे आवश्यक आहे. असो.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators