Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 01, 2008

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मायबोलिकर उखाणे » Archive through May 01, 2008 « Previous Next »

Chinya1985
Friday, April 25, 2008 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स टन्या आणि च्यायला!!!

अरे तिथे खाकी ऐवजी 'चड्डी' लिहिणार होतो पण म्हटल तु चिडायचास म्हणुन नुसतच खाकी लिहिल



Giriraj
Saturday, April 26, 2008 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ठरल्यावर बोलावलं म्हणून
गेले 'नाज़'मध्ये भेटायला
ऑर्डर काय देऊ विचारलं तर
लाजतच म्हणाले 'च्याय ला'!



Chinya1985
Saturday, April 26, 2008 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठे असते चड्डीची सक्ति तर
कुठे कार्यकर्ते सैनिकांची शक्ती
पण काहीही केल्या कमी होत नाही
विजयरावांची आंधळी सोनियाभक्ती!!!!


Yogesh_damle
Sunday, April 27, 2008 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बंदूक करते सरबत्ती,
बंदुकीचं नाव 'बज़ूका',
वाटेला नका जाऊ तिच्या-
- चाळणी करेल 'अज्जुका'!!

'च्यायला', 'चिन्या' आणि 'चाफा',
मायबोलीवर सुरेख 'ची-ची'
'झकास' जमून गेली भट्टी,
लाडतुषार व झक्कीजींची!

ह्या बाफ़वर आज उगवलो,
हे तुमच्या नशिबाचे भोग,
कितीही चुकवा तरीही येती
ठरून चुकले काही 'योग'. :-)


Dakshina
Monday, April 28, 2008 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश.... सुभान - अल्लाह
चिन्या हाण तू नुसता....



Dakshina
Monday, April 28, 2008 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज आहे सोमवार....
वाटले घ्यावी ऑफ़िसला रजा
मग म्हटले काम ठेऊ जरा बाजूला
दिवसभर "मायबोली"वरच करू मजा...


Chinya1985
Monday, April 28, 2008 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई सारख विचारुन त्रास देते
'कुठे चाललास लेका'
आणि नवनविन बाफ़ उघडायचा
घेतलाय 'माणसाने' ठेका

मायबोलीवरचा फ़ळा पुसायला
लागत नेमस्तकांच डस्टर
अन मैत्रीणीला सारख सारख प्रपोज
करुन त्रास देतात दामले मास्तर!!!!



Dakshina
Tuesday, April 29, 2008 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी निंदा कोणी वंदा
ज्यावर त्यावर उखाणा लिहीणे
हाच चिन्याचा धंदा.....

चिन्या, कृपया हलकेच घे हं!


Cinderella
Tuesday, April 29, 2008 - 4:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रीती, सिंड्रेला, किट्टु, पन्ना नि अमृता
शीट्टीकरांचा जमलाय चांगला कट्टा,
गुरुवारीच विचारतात शुक्रवारचा पत्ता
सगळ्या बायकांमधे माणुस बिचारा एकटा
.
.
.
मिळायला लागलाय सगळी कडे हापुस
माझ्याच हापीसात काम करतो कि माणुस

जडते कि काय ह्याची नवव्या मजल्यावालि वर प्रीती
माझी मैत्रिण चोरुन नेइल ह्याचीच मला भीति

तळमजल्यावरची नेन्सि पण ह्याच्यावर फ़िदा
आवडली मायबोली करांना ह्याची कलाकारी अदा
.
.
.
दुर्गभ्रमण करण्यात आहेत नंबर वन
गुढिपाडव्याला करतात सिमोल्लंघन

उखाण्यांच्या बी बी वर आमचा राम राम घ्यावा
ताज्या भटकंतीचा वृतांत लवकरच टाकावा





Cinderella
Tuesday, April 29, 2008 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंगीबेरंगी पानावर फुलली आहेत फुले
मायबोलीकर मंडळी ह्यांची लहान मुले :-)

विचारा तुम्ही प्रश्न आहे उत्तर तयार
मायबोली(करां)वर आहे प्रेम अपार


Cinderella
Tuesday, April 29, 2008 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चालवते स्कुटी, करते भटकंती
नाव आहे आरती....
फुलवली आहे तिने बाल्कनीत शेती :-)


Chinya1985
Tuesday, April 29, 2008 - 5:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा,मी विनोद 'हलके'च घेतो!!!नो टेन्शन!!!!

दिपिकाची लफ़डी वाचता वाचता
कळत की पोरगी आहे चांगलिच चालु
अन हिलरीला जिंकवण्याचा
विडा उचलतात मायबोलिच्या लालु!!!!

(वरती दिपिका अभिनेत्रीबद्दल लिहिलय)

सिंड्रेला येउ दे अजुन.


Maanus
Wednesday, April 30, 2008 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही :-) आता मला देखील मित्र हवा असा सुरु करावा लागेल, म्हणजे CT मी एकटाच माणूस रहानार नाही.

बर आणि ती कॉफीवाली फक्त मायबोलीवरच रहानार आहे, का कधी प्रत्यक्षात भेटणार देखील आहे?


Dineshvs
Wednesday, April 30, 2008 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिंड्रेला, अगदी खुष करुन टाकलं.

Itsme
Wednesday, April 30, 2008 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिंड्रेला, मायबोलीचा चांगलाच परीणाम आहे की ... अजुन येउदे :-)

Ajay
Wednesday, April 30, 2008 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो आजकाल Itsme पेक्षा सिंड्रेला जास्त दिसते मायबोलीवर :-)

Gs1
Wednesday, April 30, 2008 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरती आणि सिंडरेला बघा, चक्क कोण दखल घेतय, अस भाग्य फार थोड्यांना लाभत. तेंव्हा आता नियमित लिहायला लागा.
हे सिंडरेला लिहितांना वाचतांना सारख पुलंच्या तोंडच त्यांनी उसासा सोडून म्हटलेले 'सिंडरेला' आठवत रहात

Cinderella
Wednesday, April 30, 2008 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

*** सिंड्रेला, अगदी खुष करुन टाकलं ***
तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादांनी मला पण खुष करुन टाकलं...नाही तर अगदिच अनुल्लेखाने मारल्या सारखं व्हायचं.....:-)

*** चक्क कोण दखल घेतय ***
हो ना...मुठ भर मांस चढलय खरे आज

*** तेंव्हा आता नियमित लिहायला लागा ***
आरती ला तर ऑफीस मधे "ऑफीशिअल" परवानगी आहे मायबोली वर पोस्टायची असे काहीसे कानावर आले होते मध्यंतरी :-)

*** अजुन येउदे ***
पुढची स्टेटस मीटिंग दोन आठवद्यांनी आहे :-)
त्यात अजुनही काही महत्वाची कामे जसे- चित्रे काढणे, मेंदी ची डीसाईन्स, कोणि ब्लॅ़क पँट वर ब्राउन बुटं घातलित, कुठला गुल्ट सगळ्यात जास्त दोनट्स हादडतो हे बघणे इ. इ. असतातच कि...:-)
so I'll see but can't promise now ha....

Amruta
Thursday, May 01, 2008 - 12:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिंड्रेला अगदी फॉर्मात आहेस ह. येउदे अजुन. :-)
आणि अजुन माणुस भेटलाच नाहिये का त्या 9th floor वालिला??


Cinderella
Thursday, May 01, 2008 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता, धन्यवाद. अगं तो भेटला तर मला कॉफ़ीची लाच देणार नाही ना म्हणुन मीच त्यांची ओळख करुन देत नाहीये :-)

बर हा अजुन एक्-

करुन करुन करणार कोण
येउन येउन येणार कोण
ऐकुन तर घ्या माझे कारण
बा रा त पसरले ए वे ए ठि चे लोण


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators