Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पाळीव प्राणी - पक्षी ...

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » पाळीव प्राणी - पक्षी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through April 18, 200820 04-18-08  8:19 am

Savyasachi
Friday, April 18, 2008 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे तुषार, मी नेमस्तकांनाच विनंती केली होती रे. आणि तू माझे नाव तेवढे ईंग्लीशमधे का लिहीलेस म्हणे? :-)
नेमस्तक, धन्यवाद.
दक्षिणा, ते लास्ट वन डे सर्च अजूनही चालत. मी तरी ते बघतो. तिथे मिळतात दुवे गुलमोहर, रंगीबेरंगी आणि हितगूजच्या नवीन लिखाणाचे. बाकी नवीन मायबोलीवर शोधाशोध करावी लागते हे खरय.


Yogesh_damle
Saturday, April 26, 2008 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या पाचवीला कुत्री-मांजरं पुजली असावीत. घरात एका वेळी २०-२० कुत्री असत (आमची दोन 'सख्खी' कुत्री, प्रत्येकाची एक-एक बायको, आणि प्रत्येकाचं लेंढार... 'प्रत्येक पावलावर फुलं विखुरल्या'प्रमाणे आमच्या प्रत्येक पावलावर कुत्री विखुरली असायची. तेव्हढ्या सगळ्यांच्या भुका सांभाळणं, शी-शूच्या वेळा पाळणं, फिरवणं, गोंजारणं- ह्यातूनही आम्ही अभ्यासाला वेळ काढायचो. :-)

दाराचं पेंट ओरखडून झिजे, आणि दारात एक्-एक सेंटीमीटर खोल खणल्या जाऊन लाकूड दिसे. कारण बर्‍या बोलाने आम्ही दार उघडलं नाही की प्रत्येक कुत्रं तितक्या आर्ततेने दार उघडे.

कुत्रीला पिल्लं व्हायची वेळ आली की शेंबड्या योगेशला आई म्हणायची, "भाऊ, आता तू मामा होणार!", आणि मग मी हुरळून नाचायचो.

आम्ही ह्यांना प्रेमाने 'सहना: ववतु, सहनौ भुंकतू' म्हणत असू.
लहान पिल्लांच्या अंगाचा वास, बोटावरून दुधाची धार सोडून पाजताना त्यांची मऊ-बोळकी तोंडं गुदगुल्या करून जात. उभ्या उभ्या सुसू करून्- तिथेच उभे राहून आधी निर्विकारपणे पाहणार, मग तिथेच फतकल मारणार हे ठरलेलं. त्यांची आई त्यांना मोठ्या विश्वासाने आम्हावर सोपवून फिरायला जायची. मग आम्ही पावसात-थंडीत एक रांजण आडवा करून आत गोधडी पसरून मायलेकांसाठी आसरा-उबारा करायचो.

सगळीच पिल्लं जगत नसत, ती मेल्यावर त्यांचे उघडे डोळे, थंड्-लाकडी स्पर्श सहन करत खड्डा खणून मीठ पसरून पुरायचो. पिल्लांची आई पण बरोबर यायची. ह्या गोष्टीचं मला नेहेमी नवल वाटत आलंय. मग आईबाबांचे फटके पडेपर्यंत त्यांच्या थडग्यांवर दिवा लावणं चालू असे- :-)

उरलेली पिल्लं तितक्याच लाडाने वाढवायचो. त्यांच्याबद्दल नंतर... :-)


Karadkar
Sunday, April 27, 2008 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश, अमच्या घरी हेच आख्यान असे पूर्वी कुत्र्यांच्याबाबतीत आणि आता मांजराच्या बाबतीत :-)

Yogesh_damle
Sunday, April 27, 2008 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वान्याबद्दल किती सुंदर लिहिलंय! काल रात्री प्रिंट-आउट्स आढून घरी नेऊन वाचलं. शेवटी नुसता बसून रहिलो थोडा वेळ...

Dineshvs
Monday, April 28, 2008 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुत्री तर आमच्याकडे होतीस. मला अगदी लहानपणीच कुत्रा चावला होता. तोही सगळ्या वाड्याचा पाळीव कुत्रा होता. आमच्या पायरीवर झोपला होता, माझाच त्याच्या शेपटीवर पाय पडला.
मला चावला म्हणुन वाड्यातले कोणी त्याला जेऊ घालीना, ( त्याकाळी फ़्रीज नव्हते त्यामुळे उरलेले जेवण कुत्राच्या मुखी पडत असे ) त्याने आमच्या घरापासून दूर असलेल्या रेल्वेखाली जीव दिला. खरे तर असे लोक म्हणत होते पण तो सगळ्यानी हाड हाड केल्याने भरकटला असावा. मला मात्र ती वेदनादायक आठ इंजेक्शन्स घ्यावी लागली होती.
एवढे होवुनही माझी हौस फ़िटली नव्हती. पुढे घरात दोन कुत्र्या आल्या. एक बॉबी आणि दुसरी डिंपल. एक पामेरियन, सोनेरी तपकिरी रंगाची तर बॉबी, देशी पण पांढरीशुभ्र.
दोघी कुत्र्या असूनही दोघींची नीट पटायचे.
त्या दोघीना टिव्ही बघायला खुप आवडत असे, आणि आम्ही जिथे असू तिथेच त्या येऊन बसत असत. टिव्हीवर कुत्रा आलेला मात्र त्याना चालत नसे. आम्ही बेल वाजवायच्या आधीच, त्यांच्या कृतिवरून बाहेर कोण आलेय, ते आईला बरोबर कळत असे.
त्या दोघी बरीच वर्षे जगल्या. पण त्या दिवसात आजुबाजुला कुत्रे नसल्याने, त्याना बाळं मात्र झाली नाहीत. पुढे मनेकाजींच्या कृपेने कॉलनीभर कुत्रेच कुत्रे झाल्याने, खास घरी पाळण्या इतकी कुणाची हौस राहिली नाही.


Ladtushar
Wednesday, April 30, 2008 - 4:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>घरात एका वेळी २०-२० कुत्री असत

बापरे !!!

>> दोघी कुत्र्या असूनही दोघींची नीट पटायचे.

अजब आहे!

हे अनुभवले आहे.. आमची जुनी जर्मन शेफर्ड शेर्ली.. नविन आलेल्या डोबर म्यान रानो ला घरात सहन करत नसे, ती लहान असून पण तिला जरा तरी खोली बाहेर सोडले की ही भली मोठी आर्दांड शेर्ली बिचारया छोट्या रानो चा गळा धरत असे, तिला एक क्षण सुद्धा सहन करत नसे कारण शेर्ली चा एकमेव सखा म्याक्स नविन आलेल्या रानो वर लाइन मारत असे . नेहमी लक्ष ठेवून त्याना वेग-वेगळ्या वेळेला बाहेर अंगणात सोडावे लागे.
तसे ही सुरवातीला नविन आलेल्या छोट्या पाहूण्या ना हे जेष्ठ कधीच सहन करत नाहीत.

Dineshvs
Wednesday, April 30, 2008 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वी लव्हबर्ड्स पाळायची पण फ़ॅशन होती. आमच्याकडेही होते. यांच्याबरोबर मुनिया नावाचे छोटे तपकिरी पांढरे पक्षी सहज राहतात.
हे लव्हबर्ड्स म्हणजे पोपटाची छोटी आवृत्ती. हिरवा, पिवळा, निळा आणि पांढरा या रंगाचे असतात. यांच्यासाठी खास पिंजरे असतात.
याना खायला कांग नावाचे धान्य, कोथिंबीरीच्या काड्या आणि कॅल्शियमसाठी माखल्या नावाच्या माश्याची पाठ लागते. एवढे मिळाले कि ते खुष असतात. भयंकर चिवचिवाट करतात.
आमच्याघरी बाहेरच्या चिमण्याही यांच्या पिंजर्‍यावर येऊन बसायच्या आणि मग सगळ्यांच्या मिळुन छान गप्पा होत. त्या काय बोलत असाव्यात याचा आम्ही विचार करत असु.
या पक्ष्यांची खासियत म्हणजे, पिंजर्‍यातदेखील याना पिल्ले होतात. थोडासा आडोसा दिला कि झाले. हे सगळे बघायला खुप छान वाटते.
हे पक्षी दिसायला खुप सुंदर असतात. आता यातले आणखी काहि प्रकार मिळतात. तसे फारसे लक्ष द्यावे लागत नाही, फ़क्त चिवचिवाट सहन करावा लागतो.
हे पक्षी खास काहि शिकत नाहीत. पण सहज माणसाळतात. बाहेर काढले तर हाता खांद्यावर बागडतात. आपल्या बोटाला लागलेले दाणे चोचीने खातात.
पुढे पक्ष्याना पिंजर्‍यात ठेवणे हि कल्पना असह्य झाल्याने तो नाद सुटला.


Yogesh_damle
Thursday, May 08, 2008 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या कुत्र्यांना बोललेलं सगळं कळायचं!! (मराठी विशेषकरून)

आम्ही कुत्र्यांना फिरायला नेतांना "चला! फिरायला चला!" अशी प्रस्तावना करत असू. त्या शब्दाची त्यांना सवय झाली, आणि मग "चला" चा cue ऐकल्यावर ती वेडी कानात वारं शिरल्यासारखी खुश व्हायची, आम्ही त्यांना साखळी घालायचो, आणि मग 'कुत्री आम्हाला फिरायला न्यायची'! :-)

पुढे ह्या शब्दाचा इतका त्रास व्हायला लागला की आम्ही मानव जरी आपसात 'चला' म्हणालो तरी कुत्री चारी पायांवर तयार! मग जाऊन माझ्या इस्त्रीच्या शर्टावर किंवा आईच्या साडीवर जाऊन बसणार- 'आम्हालाही न्या'!! " Let's get going" "Shall we?" असले विंग्रजी पर्याय पण काम करेनासे झाले, तेव्हां आम्हाला डोळ्यांनी बोलणं भाग पडलं!! :-)


Arch
Thursday, May 08, 2008 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश, डोळ्यांची भाषा कुत्र्यांमुळे शिकलास?

Yogesh_damle
Friday, May 09, 2008 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तरीच!! All my romances have gone to dogs!!

Slarti
Saturday, May 10, 2008 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) हा चांगला होता, योगेश.

Ajjuka
Saturday, May 10, 2008 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Brilliant! YoDa!

4 shabd 4 shabd 4 shabd!!

Slarti
Saturday, May 10, 2008 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Yoda ?! मग तो या ओळी अशा वाचत असणार -
Gone to dogs all my romances have.
होता चांगला हा, योगेश.
शब्द ४ शब्द ४ शब्द ४


Asami
Saturday, May 10, 2008 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खल्लस रे योडा. too good

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators