Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 07, 2008

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » KarmBhumi » Archive through February 07, 2008 « Previous Next »

Zakki
Tuesday, January 22, 2008 - 10:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे एक मित्र, जे अनेक वर्षे पुण्यात राहिले होते, त्यांची खासियत म्हणजे त्यांना स्वत:चीहि माहीति सांगायला आवडत नाही, नि इतरांची पण ऐकायला आवडत नाही.

तर कुणि विचारले 'कामाला कुठे?' की उत्तर 'ऑफिसात.'
'रहायला कुठे' 'घरात.'

मग कंटाळून कधी काही जण स्वत:ची प्रौढी सांगू लागतात. 'मी अमुक तमुक ठिकाणी एव्हढ्या मोठ्या जागी आहे, माझा मुलगा हार्वर्डमधे आहे, वगैरे.' तर ते सांगतात, 'अहो पण हे मला का सांगता आहात? माझी मुलगी लग्नाची नाही आहे.'


Manuswini
Wednesday, January 23, 2008 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साला ह्या तीन चार प्रश्णाचा मला अतीशय राग येतो, लोकांना काय करायचे असते अशी माहीती गोळा करून तीही दुसर्‍याची. यार I never care whos who and what and how much he earns etc
जरासे friendly झालो की समजा हे प्रश्ण मारतीलच तोंडावर, कोणीतरी मला 'कीमान शब्दात कशी उत्तरे द्यायची ह्या प्रश्णांची जरा सुचवा बरे. खरे सांगते मला अजून तेव्हढा उद्धटपणा यायचा आहे. दुसरे हे की प्रश्ण विचारणारा आपल्याच group मधील असतो त्यामुळे राग देणे शक्य नसते.

१) how long is the project?
२) what rate you get or what percentage you work with employer?
३) last but most irritating questions, are you married? नाहीतर indirectly to know, your family is with you? or do you live by yourself? or when did you pass out? or how long did you wok. all this to know what is my age and status(single/married)?

काय लोणचे घालणार काय हे प्रश्ण विचारून. अजून तरी बर्‍यापैकी हसून(मनात मात्र चरफडून) उत्तरे द्यावी लागलीत.

जरा सांगाच की वाकड्यात न शीरता ह्यांची टाळकी कशी फोडायची की पुन्हा हे प्रश्ण कोणालाच विचारणार नाहीत.
जबरदस्त insecurity असते अश्या लोकांना एवढे मात्र जाणवते.


Jo_s
Wednesday, January 23, 2008 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा आणि इतर किस्से गंमतीशीर वाटले. पण असे नमुने भेटतातच सगळीकडे.
आमचे एक सिनियर पुर्वी नेहमी म्हणायचे ते याना लागू होतं.

"जे काहीच करू शकत नाहीत, ते काहीतरीच करत असतात"


Chinnu
Wednesday, January 23, 2008 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु, अश्या लोकांना insecurity असते हे अगदी बरोबर आहे. प्रत्येक उत्तराला दुसरा प्रश्न ठरलेला असतो. टाळकी फोडायचा विचार चांगला असला तरी अमलात आणण्यासारखा नसल्यामुळे :-) करायचे एकच्- जुजबी उत्तर देणे. तू त्यांना जेव्हढे entertain करशील तेव्हढी जास्त उत्तरं द्यावी लागतील तुला. paas out year वगेरे विचारले तर सरळ शिकलेच नाही असे सांगून मोकळी हो. छान हसून दाखवायला तेव्हढे विसरू नकोस :-)

Dakshina
Wednesday, January 23, 2008 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला पण कोणी शिक्षण विचारलं की सांगते ' मी बारावी नापास आहे'
(समोरचा माणूस गार)घाबरत घाबरत विचारतो, मग इथे कशी काय नोकरी मिळाली?
वर अणखिन एक बॉम्ब..... माझा जॅक होता ना इथे... म्हणून....


Chinnu
Wednesday, January 23, 2008 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

... ... ... दक्षिणा :-)

Dakshina
Wednesday, January 23, 2008 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एक कालच घडलेला किस्सा लिहून admin चे पर्व संपवावे म्हणते. गेले आठवडाभर एक सिनियर माझ्या मागे लागला आहे. त्याला जिम लावायची आहे, आणि त्याच्या मते admin ने ABS बरोबर कॉर्पोरेट टाय अप करायला हवा... जेणेकरून ऑफ़िसातल्या सर्वांना.. (आणि मुख्य म्हणजे याला) त्याचा फ़ायदा होईल. मी त्याला म्हणलं की इन्ड्युरन्स बरोबर आपला टाय अप आहे पहील्यापासून, तिकडेच जा. पण याला ABS च हवंय, का तर घराजवळ आहे ना... मी नं शोधून काढला, पण त्यांचा नं. काही लागत नाही. माझ्या कामातून त्याच्या अपेक्षेप्रमाणे मी या गोष्टीला काही पुरेसा वेळ देऊ शकत नाही. तर काल येऊन मला Sercastically म्हणतो कसा.... Hope you will do this tie-up before i loose my tempo for excersice. थोड्याश्या डिस्काऊंट साठी याने माझा जीव खाल्लाय नुसता. बर एखादा जर खरोखरी व्यायमाच्या बाबतीत सिरियस असता तर आमच्यावर कशाला विसंबून राहीला असता? आणि जर यांचा व्यायामाचा so called टेंपो गेला तर आमच्यावर आरोप?

Ladtushar
Wednesday, January 23, 2008 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग, अश्या तेरड्याचा रंग तिन दिवसच असतो, आमच्या ऑफिस च्या जिम मधे हे असे नमूने अधून मधून उगवतात!

>>admin चे पर्व संपवावे म्हणते.
कंटाळी का ?

Dakshina
Wednesday, January 23, 2008 - 1:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कंटाळलेय असंच म्हणावं लागेल. पण आता ही असली कामं करावी लागणार नाहीत.
मी प्रोजेक्ट मधे शिफ़्ट होतेय. विथ इफ़ेक्ट फ़्रॉम २५ जानेवारी.


Zakasrao
Thursday, January 24, 2008 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा
तुजी कं एवढे लाड करते का????
मजा आहे बुवा :-)


Ashbaby
Thursday, January 24, 2008 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मझ्या ऑफिसात घडलेला एक प्रसंग, जो मी कधीच विसरू शकत नाही....

एकदा ऑफिसात मी मैत्रिणीशी बोलत असताना पगाराचा विषय निघाला. एक सिनियर ऑफिसर बाजूला फ़क्सेस पाहात (आणि अर्थातच आमचे बोलणे ऐकत) होता तो चटकन माझ्याकडे बोट दाखवुन म्हणाला
your salary is secondary salary परत तिच्याकदे बोट दाखवुन तेच वाक्य.

मी तर अवाकच झाले ते ऐकुन. मैत्रिण लगेच सावरली आणि तिने त्याची चांगली खरडपट्टी काढली. ती स्वत्: घरातील एकमेव कमावती होती. त्याव्यतिरिक्त ऑफिसात अजुन चार्-पाच बायका अशा होत्या ज्यांचे नवरे काहितरी कारणाने घरीच होते आणि बायका कमावत्या होता. ऑफिसात हे सगळ्याना माहित होते. माझ्याही घरी फारशी वेगळी परिस्थिती नव्हती.(अर्थात हे मात्र कोणाला माहित नव्हते). मीसुध्दा मग त्याची खरडपट्टी काढली. तेव्हा
i didnot know you both would pounce on me like this असे म्हणून काढता पाय घेतला.

त्या माणसाबद्दल मला बराच आदर होता. पण या प्रसंगानंतर मात्र तो आदर पार लयाला गेला.

घराबाहेर पडुन काम करणा-या बायकांचा पगार दुय्यम, म्हणजे अर्थातच त्यांच्या नव-यांचा पगार प्रथम, तो जास्त महत्वाचा. आणि घराचे
bread winners हे फक्त पुरुषच असतात, बायका नाहीत.

आज असा विचार करणा-या पुरुषांची मी फ़क्त कीव करू शकते. बिचारे, समाजात आजुबाजूला पाहण्यासाठीचे डोळे त्याना दिले नाही देवाने.

मला नंतर वाटले की कदाचीत त्याला असे म्हणायचे नसेलही, तरिही कोणाच्या घरची परिस्थिती माहित नसतानाअसताना सरसकट असे उद्गार काढलेले मला कायमचे लक्षात राहीले.

दुस-या एका प्रसंगी, सरकारी नोकरीत असलेला माझा एक शेजारी मला म्हणाला, बायका केवळ टाइमपास म्हणून नोक-या करतात. यावर आता काय बोलणार? केवळ टाइमपास म्हणून बायका मुलांना त्यांच्या मनाविरुद्ध क्रेशमध्ये ठेऊन ट्रेनला लोंबकळत, २-२ तास उभ्याने डोम्बिवलि-व्हिटी, बेलापुर्-कुर्ला-दादर्-मालाड असा प्रवास करतात?
देवा अशा लोकांना खरंच क्षमा कर, कारण ते काय बोलताहेत ते त्यांना स्वत:लाच कळलेलेल नाही.

साधना


Dakshina
Thursday, January 24, 2008 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास, लाड कसले? ५ साल पापड बेले है इधर..
तेव्हा कुठे हे सुख मिळतंय.


Zakki
Thursday, January 24, 2008 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेत डॉक्टरांना प्रचंड पगार मिळतो. अभियंते, संगणकशास्त्रात काम करणारे अश्या अनेक पुरुषांच्या बायका डॉक्टर असल्याने भरपूर पगार मिळवतात. पण त्या पुरुषांना तुमचा पगार काय दुय्यम, तुम्ही काय वेळ जावा म्हणून नोकरी करता, चैन आहे बुवा तुमची असे उद्गार (तोंडावर) ऐकावे लागत नाहीत.

सहसा पुरुष डॉक्टर असतील तर बायका स्वत: हून सांगतात की वेळ जावा म्हणून नोकरी करते, किंवा चांगली नोकरी असली तरी 'मला पगाराचे आकर्षण नाही' असे सांगतात.


Zakasrao
Friday, January 25, 2008 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

५ साल पापड बेले है इधर.. >>>>>>>..
महिला गृहोद्योग वाल्याना तुम्हीच सप्लाय करता काय??? :-)
तुझे लाड म्हणत नाही मी बाकीच्या लोकांचे एवढे लाड अस म्हनतोय.
:-)
पगारावरुन अगदी खास अशा दोस्ताने पण मला ज्यावेळी विचारल आणि त्याच ते टोनिंग ऐकुन मला खुप वाइट वाटल होत :-(


}

Manjud
Friday, January 25, 2008 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझं ह्या कंपनीत सिलेक्शन झालं तेव्हा माझी मुलगी ५ महिन्याची होती. ह्या डिपार्टमेंटला पोस्टिंग मिळाल्यावर माझा आत्ताचा बॉस फ़ोर्मॅलिटी म्हणून इंटरव्ह्यू घेत होता. कौटुंबिक माहिती विचारताना सासू सासरे आमच्याबरोबरच राहतात (किंवा आम्हीच सासूसासर्‍यांकडे राहतो) हे ऐकून तो भयानक आश्चर्यचकीत झाला होता. मुलीला बेबीसिटींगमधे ठेवून येणार म्हटल्यावर मला म्हणतो मग सासू सासरे तुझ्याकडे राहून तुमचं काहीच काम करणार नाहीत का? मला तर त्याला दोन ठेवून द्याव्याश्या वाटत होत्या. कसाबसा आवाज नियंत्रणात ठेवत त्याला सुनावलं की त्यांनी मुलीला सांभाळायला मूळीच नकार दिलेला नाही. त्यांचं वय जास्त आहे आणि दिवसभर तिला सांभाळणं त्याना झेपण्यासारखं नाही म्हणून अर्ध्या दिवसासाठी केलेली ही सोय आहे. ते दोघेही माझ्या मुलीचं खूप करतात. त्यांचा पाठींबा आहे म्हणूनच मी नोकरीसाठी बाहेर पडू शकणार आहे. आणि आमच्याकडे सासूसासरे हे आमचे आईवडीलच असतात.
माझं शेवटचं ठाम स्वरातलं वाक्य ऐकून तो पार गारठलाच. जॉईन झाल्यापासून मला तो इतर कलिग्सना करतो तसं हॅरॅस करू शकलेला नाहीये.


Anaghavn
Friday, January 25, 2008 - 8:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या बोलण्यात, वागण्यात ठामपणा असला तर आपल्याला फार वेळ कोणी harress करु शकत नाही. पण काहीही कारणाने आपला ठामपणा ढीला पडला की फायदा घेणारे असतातच.


Zakki
Friday, January 25, 2008 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजूद यांच्या लिखाणासंबंधी:

असला अत्यंत नालायकपणा मला वाटते फक्त भारतातच होऊ शकतो. ज्या गोष्टीचा कामाशी काऽहीहि संबंध नाही त्या गोष्टी, विशेषत: खाजगी गोष्टी विचारल्या, तर इथल्या मॅनेजरला कोर्टात खेचले असते.

आता तुमची मुलगी किती मोठी आहे, तिचे कसे करणार याच्याशी या माणसाचा काऽहीहि संबंध नाही! उद्या तुम्हीहून म्हणायला लागला असतात की अहो माझी मुलगी लहान आहे म्हणून मला कामावर यायला उशीर होतो, कामावरून लवकर जावे लागते, मधे घरी फोन करावे लागतात, वगैरे तरी त्याने फक्त एव्हढेच ठरवायचे या सर्वाचा कामावर परिणाम होतो का? तो मान्य आहे का? नसल्यास सरळ सांगावे की बुवा तुमचे असे हे इथे जमणार नाही तेंव्हा वारंवार उशीरा येण्याबद्दल, लवकर घरी जाण्याबद्दल, नि एकंदरीत याचा कामावर वाईट परिणाम होत असल्याने, तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे!! (हिंमत असेल त्याला तर! इतके सोपे नसते, निदान इथे तरी!)

जरी तुम्हाला मदत करण्याचा उद्देश असेल तरी त्याची मदत तुम्ही कशाला मागाल? तुम्हाला इतर अनेक लोक असतील, ज्यांच्याबरोबर या विषयी बोलता येईल, किंवा ते खरोखरी मदत करतील.

भारतात सुद्धा त्याला कोर्टात खेचा!

मी तर ऐकले होते, की लग्न झालेल्या मुलींना म्हणतात अजून दोन वर्षे मूल होणार नाही असे लिहून द्या!! तिथल्या तिथे कानफटीत पडली असती इथे!

चक्रमपणा फार आहे भारतात! मला बॅंकेत खाते उघडताना, 'तुम्ही डॉलरमधे पैसे मागणार नाही असे लिहून द्या' म्हणे! मी म्हंटले मी असले काही लिहून देत नाही, याचा खाते उघडण्याशी काही संबंध नाही. कायदेशीरपणे जर तुम्हाला डॉलर देता येत नसतील, नि मी खरेच मागितले, तर सरळ सांगा की कायद्याप्रमाणे देता येणार नाहीत, प्रश्न मिटला. उग्गीच साध्या गोष्टी कठिण करायच्या नि येता जाता पैसे मागायचे!


Dhondopant
Wednesday, February 06, 2008 - 10:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की तुमच्याशी सहमत आहोत. भारतात कसे आहे की personal influence हा खुप महत्वाचा मानला जातो आणि अमके अमके साहेब म्हणजे त्यांच्या खाली काम करणार्‍यांचे सर्व काही असतात... म्हणजे साहेबाने म्हटले की ते सर्व बरोबर... गुलामगिरीची सवय आणखी काय? आणि साहेबाला तुमच्या खाजगी आयुष्यात interfer करायला काहीही वाटत नाही...

Arc
Thursday, February 07, 2008 - 4:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आगदी खरे बोललात धोन्डोपन्त, IT company मधे सुध्दा perticular project manager च्या हाताखाली काम करत असाल जो project मधे प्रभावी आहे आणि त्याच्याबरोबर सलोख्याचे सम्बध असतील तरच फ़ायदे असतात नाहीतर कितीही काम करा कोणीच विचारत नाही

Gajanandesai
Thursday, February 07, 2008 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

IT company मधे सुध्दा perticular project manager च्या हाताखाली काम करत असाल जो project मधे प्रभावी आहे आणि त्याच्याबरोबर सलोख्याचे सम्बध असतील तरच फ़ायदे असतात नाहीतर कितीही काम करा कोणीच विचारत नाही <<<

हे आजूबाजूला घडताना बघून खरंच वाईट वाटतं. पण 'कितीही काम करणारे' या विरुद्ध खडा जाब विचारत नाहीत, याची त्यापेक्षा जास्त चीड येते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators