Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पुरुष जन्मा ही तुझी कहाणी ...

Hitguj » My Experience » पुरुष जन्मा ही तुझी कहाणी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through February 04, 200820 02-04-08  9:09 am
Archive through February 05, 200820 02-05-08  6:37 pm
Archive through February 06, 200819 02-06-08  10:28 am
Archive through February 06, 200820 02-06-08  8:55 pm
Archive through February 07, 200820 02-07-08  12:13 pm
Archive through February 07, 200820 02-08-08  1:04 am
Archive through February 08, 200820 02-08-08  6:37 am
Archive through February 08, 200820 02-08-08  12:21 pm
Archive through February 10, 200820 02-10-08  2:56 pm
Archive through February 11, 200820 02-11-08  1:26 pm
Archive through February 13, 200820 02-13-08  3:03 pm
Archive through February 14, 200820 02-14-08  9:04 am
Archive through February 14, 200820 02-14-08  6:48 pm
Archive through February 15, 200820 02-15-08  11:31 pm
Archive through February 20, 200820 02-20-08  4:11 pm
Archive through February 22, 200820 02-22-08  12:47 pm
Archive through February 25, 200820 02-25-08  5:29 pm
Archive through February 27, 200820 02-27-08  3:48 pm
Archive through February 28, 200820 02-28-08  10:23 pm
Archive through February 29, 200820 02-29-08  11:12 am

Athak
Friday, February 29, 2008 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम , अग मुद्धाम ती गोष्ट लिहीली नाही , ती पण वाचत असते ना चुपके चुपके म्हणुन :-) नाहीतर 'किती ? ' लगेच फोन :-)

पुरुष जन्मा :-)


Nandini2911
Friday, February 29, 2008 - 11:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बीबी मी भरकटवलाय काय?
ज्यानी भरकटवण्याचा प्रयत्न केलाय त्याना मेल करा...
असो, तुमचे मेल मिळाले.

i wont take much time,
he just wanted to say some girls take undue disadvantage of their feminity.
thats it.and as a reference he gave example of that movie.i really dont know what was so shameful in it.he must have considered people reading are matured enough to understand crux of the story.
as far as giving respect to someone is concerned, in my opinion (coz I work in IT Industry)has nothing to do with way of addressing a person,
even if u call him by his firstname it hardly matters.
any way i dont want to strech the topic
regards
archana

*********************************

याला माझे उत्तर
मॅडम, आधी पूर्ण बीबी वाचा. आणि या प्रश्नाची उत्तरे द्या.
विषय कसा सुरू झाला?
कुणी सुरू केला?
विवादास्पद पोस्ट कुणी लिहिली? त्याला कुणी काय उत्तर दिले?
तावर काय उत्तर मिळाले?
प्रत्यक्ष नावाचा आणि व्यावसायिक कौशल्याचा उल्लेख कुणी केला? करायची गरज होती का?
तो सीन इतक्या व्यवस्थित समजवण्याची गरज होती का?
मुलाखतीच्या वाक्यामधले generalisation तुम्हाला खटकले नाही का?
"विश्वदर्शन" या शब्दाने तुम्हाला राग आला का? आला असेल तर का? आणि आला नाही तर का?

तुम्हाला कुणी या व्यक्तीला असेच संबोध असे सांगितले आहे का?
तुम्ही या बीबीवरच्या पहिल्या पोस्टमधे तीन वाक्यं तुम्हाला कसली नाटके जमणार नाही असे म्हटले आहे? त्याचे खास कारण?
तुम्हाला इथे कसली कंपूबाजी चालते असे वाटते? का?

मेलमधे तुम्ही लिहिले आहे की तुम्हाला विषय वाढवायचा नाही.. मग या वादामधे पडलात कशाला? त्याची काही खास वजह?? :-):-):-)



उत्तरे द्या... मग बोलु आपण





Sheshhnag
Friday, February 29, 2008 - 11:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय ही दशा!
किती मस्त हा बा. फ. चालला होता!!
सगळेजण इथे इतके लाईट्ली घेत असतानाच अचानक सगळे टाईट कसे झाले?
आपण इथे `जमतो' ते एकमेकाच्या उणी दुणी काढण्यासाठी का?
विसरून जा ते सर्व पोष्ट आणि पुन्हा पूर्वीसारखे पुरुषांच्या व्यथा मांडा आणि त्यात रमून जा.
सगळीच पुरुष मंडळी आपल्या व्यथा लाईटली घेतात हे वाचून खूप बरे वाटले.
कृपया या पोस्टचा कुणीही विपरित अर्थ घेऊ नये. तसा ध्वनित जरी होतो असे जर वाटले, तरी एड्मिन्नी हा पोस्ट पुसावा.
पण कृपया पुन्हा वाद नको, संवाद तात्काळ सुरू व्हावा.


Shraddhak
Friday, February 29, 2008 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि मी तर दिनेश यान्चे post मला का खटकले नाही ह्यासाठी post लिहिले होते>>>>>>
मग तेवढ्याच मुद्द्याला धरून लिहायचंत ना! आपल्या पोस्टची सुरुवात तपासून पहा. ' हा सगळा कंपूबाजीचा प्रकार आहे. ' हे विधान करायची काहीच गरज नव्हती. तसेच आपल्या पोस्टचा शेवटही त्याच धर्तीवर आहे.

as far as giving respect to someone is concerned, in my opinion (coz I work in IT Industry)has nothing to do with way of addressing a person,
even if u call him by his firstname it hardly matters.<<<<
बाकी हे काय ते काही कळले नाही.

Dineshvs
Friday, February 29, 2008 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल रात्री काहि गाणी लिहायची होती आणि एका झाडाबद्दल लिहायचे होते म्हणुन मला या बीबी वर डोकावता आले नाही.
आज बजेट ऐकण्याच्या गडबडीत दिवसभर इथे येता आले नाही. इथे बरिच चर्चा झालेली दिसतेय.

हे मुद्दे पुर्ण चर्चा न वाचता, आधीच लिहित आहे, नंतर सवडीने वाचुन प्रत्येक मुद्द्याला उत्तर देईनच.
१. हा बीबी केवळ लाईटली घेण्याच्या हेतुने उघडला होता ना ? मग माझेच मुद्दे गांभीर्याने का घेतले गेले ?

२. एका मैत्रीणीच्या पर्समधे मला स्वतःला काय सापडले हे मला माहित कि इथल्या सभासदाना ? पर्समधे कुठल्या वस्तु असाव्यात याची काहि मान्यताप्राप्त यादी आहे का ? दस्तुरखुद्द मैत्रीणीची प्रतिक्रिया होती, बरेच दिवस बघायला वेळ झाला नाही. दिसेल ती वस्तु पर्समधे कोंबते, आणि मग विसरुन जाते. इथल्या प्रतिक्रिया अकारण जास्त तिखट होत्या.


३. माझ्या सहकारी मुलीनी माझ्यावर कितपत विश्वास ठेवला हे मला माहित का आटीगर्ल शैलजा याना माहित ? मी गेली २२ वर्षे अधिकारी पदावर काम करत आहे. तेही किमान ४ देशात आणि किमान डझनभर कार्यालयात. सर्वच अगदी आखाती प्रदेशातही आमच्या ऑफ़िसमधे स्त्री सहकारी आणि मदतनीस होत्या. गर्वाने नव्हे पण अभिमानाने मी सांगेन कि माझ्या मदतनीसांपैकी एखादी जरी काहि कारणास्तव दुर्मुखलेली वा विचलित असेल तर माझ्या लगेच लक्षात येते. आणि स्वतःची सुखदुःखे त्या मला नेहमीच सांगतात. आणि मी देवमाणुस नकीच नाही.

४. मीमाझी नावाची सभासद, आधी परिणीता या नावाने माझ्या नावाने शंख करत होती, असा माझा कयास आहे. ( भाषेवरुन असा कयास मी केला ) मूळ परिणीता हि कोण आहे ते मला माहित आहे. आणि समजा मीमाझी या नावाने लिहिणारी सभासद हि वेगळी असली तरी, मला कठोर शब्दात समज देणे आवश्यक वाटले. वैयक्तिक आयुष्याची चर्चा करायला माझी कधीच ना नव्हती. मायबोलिकरांपासून काहिच लपवायची मला कधी गरज वाटली नाही. आणि म्हणुनच मी माझ्या रंगीबेरंगी पानावर जाहिर निवेदन दिले.


५. एका मान्यवर संस्थेत एकदा नव्हे अनेकवार आलेल्या अका अनुभवाचा मी इथे उल्लेख केला. ( दुर्दैवाने मला त्या संस्थेचा तपशील देता येत नाही, पण दिलेले संकेत पुरेसे होते ) माझ्यासाठी या खेळाला जश्यास तसे, उत्तर देणे अशक्य होते पण त्याचा यशस्वी मुकाबला, मी स्वतः आणि माझ्या सहकार्‍यानी, केला. याबाबतीत मी मनस्ताप सोसला तरिही मूल्यांशी तडजोड केली नाही. असा हिन पातळीवर जाऊन एखाद्या व्यावसायिक स्त्रीने प्रयत्न करणे आणि त्याला समोरच्या पुरुषाने झुकते माप देणे, मला आजहि घृणास्पद वाटते. आजच्या सुशिक्षित स्त्रीने असे मार्ग अवलंबु नयेत असे मला प्रामाणिकपणे वाटते, आणि माझ्या या मताला दुजोरा मिळेल, अशी माझी भाबडी आशा होती. ती फ़ोल ठरली याचे अतोनात दुःख होत आहे.

६. दिलेले संदर्भ आणखी उघड न करता आल्याने मी एका चित्रपटाचा उल्लेख केला. हा केवळ मलाच आवडलेला चित्रपट होता असे नव्हे तर त्यावर ऑस्करची मोहोर उमटली होती. ( दुर्दैवाने इतका अभिजात चित्रपट इथे कुणालाच माहित नाही. पण त्याची माहिती नेटवर उपलब्ध आहे. एखाद्या तद्दन फ़ालतु चित्रपाटातील संदर्भ द्यायला हवा होता का ?) हा काहि प्रौढांसाठी असणारा चित्रपट नव्हता. रुढ अर्थाने त्यात नयक नायिकेची जोडीच नसल्याने, त्यात कुठलीच लैंगिक दृष्ये नव्हती. अश्या चित्रपटातील एखाद्या सीनचा संदर्भ देणे गैर आहे ? इथे तर झिनत अमानच्या तोकड्या कपड्यांची चवीने चर्चा केली गेली. अनेक अचाट चित्रपटातल्या अचाट सीन्सची दिवसेंदिवस चर्चा केली जाते. पण एखाद्या आशयपुर्ण चित्रपटातील एका दृष्याचा संदर्भ देणे चूक ठरते.


७. या सीनचे मी समर्थन केले नव्हते. आता तसेच अनुभव जर मला प्रत्यक्ष आयुष्यात येत असतील, तर त्याचा उल्लेख आणि निषेध करायचा नाही ? माझ्या खात्यात काम करण्यासाठी मला काहि एक शैक्षणिक पात्रता आणि काहि व्यावसायिक अनुभवाची गरज असते. मुलीना माझ्या कंपनीत सुरक्षित वाटत असल्याने, अनेक मुली गेली अनेक वर्षे या कंपनीत नोकरी करत आहेत. त्याना हि नोकरी मिळवण्यासाठी वा आहे ती टिकवण्यासाठी कुठलेही वाईट कृत्य करायची गरज पडली नाही. त्यामुळे नव्याने दाखल होणारी व्यक्ति देखील याच विचारधारेची असावी असा आमच्या व्यवस्थापनेचा कटाक्ष असतो.

मी अजुनही इथल्या प्रतिक्रिया पुर्णपणे वाचलेल्या नाहीत. वाचल्यावर सविस्तर लिहितोच. इथे मुद्दा माझ्या मित्रमैत्रीणिंच्या माझ्यावरील प्रेमाचा, आणि मी त्यासाठी अपात्र असतानादेखील माझ्याबद्दल त्याना असलेल्या आदराचा चर्चेला आलेला दिसतोय.
मायबोलिकरांचे कर्ज तर मी यापुर्वीही अनेकवेळा जाहिररित्या मान्य केले आहे. मी त्यांचा नेहमीच उतराई राहिन. पण त्या बदल्यात त्यानी माझ्या चूकांचे समर्थन करावे, अशी अपेक्षा मी तरी कधी ठेवत नाही.
कदाचित इथे झालेल्या हल्ल्यामुळे ( वैचारिक म्हणु या ना ?) ते दुखावले गेले असतील, तर त्याची काहि गरज नाही. मी विचलित होणार नाही, तसेच माझ्या मैत्रीतही काहि फरक पडणार नाही.

सविस्तर वाचायला वेळ मिळाला आणि काहि मुद्दे राहिले असतील, तर अवश्य लिहिन.



Chinya1985
Friday, February 29, 2008 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ajjuka

<<दिनेश,
स्त्रीत्वाचा फायदा.... तसा पुरूषत्वाचाही फायदा दिला वा घेतला जातोच की. आपण माणसं आहोत संत नाही. या गोष्टी येणारच आहेत. त्याच सगळ्यावर हावी होणार नाहीत हे बघणं महत्वाचं. मी समर्थन करत नाहीये पण मला ते एका मर्यादेपर्यंत चूकीचंही वाटत नाहीये. शेवटी आहे त्या परिस्थितीमधे survive होणं ही मानवाची प्रकृती आहे आणि हे असे फायदे हा त्याचाच भाग आहे.

आता मला सांगा.. कॉलेजच्या वयात नुसतं एखाद्या मुलीनं हसून माझं एक काम करतोस असं विचारलं (ह्याला स्किल लागतं सगळ्यांनाच जमत नाही. कुणी शिकवायला तयार असेल तर फी देऊन क्लास लावायची तयारी!) तर तिचं एकंच काय १०० कामं हसत हसत करणारे आणि तेच मिरवणारे काय कमी असतात? हा स्त्रीत्वाचा फायदाच होईल ना? पण हा तर सगळा आपखुशीचा मामला असतो. दोन्ही बाजूंना मजा येत असते की. मग कशाला बोला?>>

Nandini2911

Monday, February 25, 2008 - 3:59 am:



दिनेशदा, तुमच्या या पोस्टचा मला अर्थ लागला नाही..
आपले काम करून घ्यायला लोक खोटे बोलतात. कित्येक पुरुष खोटे बोलतात. लाच देतात. स्त्रिया स्वत्:चे शरीर भांडवल म्हणून वापरतात... त्यामधे तुम्हाला नक्की काय खटकले??
की तुमची अपेक्षाअ प्रत्येक स्त्रीने डोक्यावरून पदर घेऊन रहाण्याची आहे??

Ramani

Tuesday, February 26, 2008 - 6:13 am:



मला वटते, पुरुषत्वाचा असा फायदा घेता येत नाही ही दिनेशदांची खरी व्यथा असावी. ~D

मला वाटते, जर तिने स्त्रीत्वाचा वापर करुन काम करुन घेतले, तर तीचे काम करुन देणारा पुरुष, तिच्या स्त्रीत्वाचा फायदा घेतच होता ना? जर पुरुषांनी असे पघळणे बन्द केले तर कश्याला कुणी स्त्रीत्वाचा फायदा घेउ शकणार आहे? बायका फायदा उठवतात असे म्हणायचे आणि स्वत्: मात्र "तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे" अशी वर्तणुक ठेवावी हे एक प्रकारे हास्यस्पद आहे. पुरुषांनी स्वत्:ला मोहापसुन परावृत्त केले तर कोणीही स्त्री कसा फायदा उठवु शकणार आहे?
जोवर हे होत नाही, तोवर समाजातल्या काही प्रवृत्ती असा फायदा घेणारच. आपल्या एसेटसचा फायदा उठवणे ही नैसर्गिक गोष्ट आहे.

Ajjuka

Tuesday, February 26, 2008 - 10:26 pm:



>>पेज थ्री हे अत्यंत घृणास्पद प्रकरण असले तरी ते विश्व मर्यादित आहे. ती जीवनपद्धति आयुष्याच्या सगळ्याच क्षेत्रात नको रे बाबा.<<
Is this a joke? You mean to say that it is only related to certain class/ certain profession/ certain layer of society?
It is present everywhere. Only that it is concealed or done subtly at many places
Nandini2911

Thursday, February 28, 2008 - 2:19 am:
मुळात अस्थानी मुद्दा काढून मी किती मूल्यवान हे सिद्ध का करताय तुम्ही?
घडतात अशा गोष्टी जगात. व्यक्ती तितक्या प्रकृती. पटलं तर घ्यायचं नाही तर सोडून द्यायचं... साधा सरळ हिशोब आहे.>>


आता या सर्व गोष्टी मुलींनी आधी लिहिल्या मग दिनेशना तो सीन नक्की काय होता हे स्पष्ट कराव लागल. कारण बहुतेक त्यांना अस वाटल की या मुलींना ते कुठल्या सीनबद्दल लिहित आहेत हे कळलेलच नाही कारण या पोस्ट वाचुन अस दिसत की 'तिरपा कटाक्ष चा स्त्रीयांनी वापर केला तर त्यात काय चुकलं(मुळात तिरपा कटाक्ष हा शब्दही आधी रमानी नामक स्त्रीनेच वापरला)??हे अतिशय नॉरमल आहे.' श्रध्दा तु जे लिहिल आहेस की सगळ्याच मुली अस करत नाहीत याचाच अर्थ असा होतो की अस करण तुझ्या दृष्टीने चुकिच आहे आणि ते चुकिच आहे हेच दाखवुन द्यायचा दिनेश प्रयत्न करत होते. शिवाय 'सगळ्या मुली' असा दिनेशनी केलेला शब्दप्रयोग माझ्यातरी वाचण्यात आला नाही. त्यांच्याकडे येणार्‍या मुली अस त्यांनी लिहिल होतं. असही शक्य आहे की त्यांच्याकडे गेलेल्या मुली अस करत असतील. दिनेशची पोस्ट वाचुन सर्वच मुली अस त्यांना म्हणायच होत अस मला तरी वाटल नाही. शिवाय तुम्ही सर्वांनी दिनेश यांच्या पोस्टला विरोध करण्यापुर्वी या वरिल पोस्टना विरोध का केला नाही???तो पर्सचा मुद्दाही इथे काढायची काहीच गरज नव्हती. उद्या मी पुरुषांना वाघ म्हटले आणि मुलींना शेळ्या,बकर्‍या म्हटले याचाही मोठा ' issue ' कराल. दिनेशनी पर्सची अथवा मी 'शेळ्या-बकर्‍यांच्या' पोस्ट लिहिल्या तेंव्हा या बा.फ़.वरचे वातावरण वेगळे होते. ते आता बदलले आहे तेंव्हा सध्या 'स्त्रीत्वाचा फ़ायदा'वरच लिहा.

Nandini2911
Friday, February 29, 2008 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला. (समीरला हाक मारलेली नाहिये.)
इतके लांबलचक पोस्ट लिहायला जितका वेळ लागला असता त्याच्या निम्म्या वेळात वरील चर्चा वाचून झाली असती.
मुद्दा नंबर एक, इतक्या लाईट चर्चेत हा विषय घालण्याची गरज होती??
य आधी पण समानता बीबीवर एक जुना विषय घेऊन चर्चा आपणच चालो केली होती, तिथे त्याची काही गरज होती?

बरं, मला न समजलेली अजून एक गोष्ट
मुद्दा नंबर पाच. तुमच्या पहिल्या पोस्टमधे तुम्ही आणि तुमच्या सहकार्‍यानी केलेल्या "यशस्वी" मुकाबल्याबद्दल" लिहिले नाही, तिथे फ़क्त "मला असा अनुभव आला" इतकेच लिहिलेत. का बरं? त्या स्त्रीने नक्की काय पोझ घेतली हे तुम्ही व्यवस्थित लिहिलंत. मग हा उल्लेख का राहिला??

असा हिन पातळीवर जाऊन एखाद्या व्यावसायिक स्त्रीने प्रयत्न करणे आणि त्याला समोरच्या पुरुषाने झुकते माप देणे, मला आजहि घृणास्पद वाटते.
>>>
त्या दोन व्यक्तीचे संबंध व्यावसायिकच होते का? त्यापलिकडे जाऊन त्याचे भावनिक आते असण्याची शक्यता आहे की नाही??

आजच्या सुशिक्षित स्त्रीने असे मार्ग अवलंबु नयेत असे मला प्रामाणिकपणे वाटते, आणि माझ्या या मताला दुजोरा मिळेल, अशी माझी भाबडी आशा होती. ती फ़ोल ठरली याचे अतोनात दुःख होत आहे.
>>>>>
तुमच्या या मताला दुजोर्‍याची गरज काय? तुमचे मत आहे, ते बरोअर किंवा चूक असू शकते. पण म्हणून दुजोर्‍याची गरज???

दिलेले संदर्भ आणखी उघड न करता आल्याने मी एका चित्रपटाचा उल्लेख केला
>>>>
तुम्ही पहिल्या पोस्टपासून त्या चित्रपटाचा उल्लेख करताय. बहुतेकानी तो चित्रपट पाहिलेलाही आहे. पण त्याची चर्चा इथे करावीशी कुणाला वाटले नाही तर तुम्ही मला वाटले कि हा सिनेमा सगळ्यानी बघितला असावा. असे लिहून सिनेमाची स्टोरी लिहिलीत.. काय गरज होती..

या सिनेमात काहि कागद्पत्रे मिळवण्यासाठी ती एका सरकारी ऑफ़िसात जाते. तिथला माणुस तिला आधी दाद देत नाही. मग ती जरा वाकुन " विश्वदर्शन " घडवते आणि मग तिचे काम विनासायास होते.
मला फ़क्त याच सीनचा संदर्भ द्यायचा होता. ( खरे तर त्यात तिचा काहिच स्वार्थ नसतो
>>>
त्यानंतर हे लिहिणे गरजेचे होतेच का?? सीनचा संदर्भ देऊन झाला. बाईने "पोज" दिली की ती काय असू शकते हे इथल्या जवळ जवळ प्रत्येकाला समजले. फ़क्त त्यानी ते लिहिले नाही. तर तुम्ही ते कुणाला समजले नाही अशा थाटात explain केलेत. माझ्या दिक्शनरीत हे घृणास्पद आहे.
इथपर्यंत ठीक आहे. पण त्यानंतर माझं डोकं सटकलं ते हे वाचून

नंदीनी आणि अज्जूका, या दोघी तर त्यांच्या क्षेत्रात काहितरी करुन दाखवलेल्या मुली. त्यांचे व्यावसायिक कसब, कौशल्य, त्याना सिद्ध करण्यास पुरेसे आहे, अशी मला खात्री आहे आणि तरिही त्याना हे गैर वाटले नाही, याचे मला वाईट वाटले.
>>>>
मला गैर वाटले नाही, बरोबर वाटले किंवा हे असेच केले पाहिजे याचा मी कुठेतरी उल्लेख केलाय? माझं नाव घेऊन हे लिहायची गरज होती? माझं काय व्यावसाय्क कौशल्य तुम्हाला माहीत आहे? मी कुठल्या क्षेत्रात काम करते? तिथे मी काय झेंडे गादले आहेत? याची तुम्हाला कल्पनातरी आहे का??


आजकाल मुलाखतीच्या संदर्भात मला हा अनुभव येतो. मी ज्या उमेदवारांच्या मुलाखती घेतो, त्यापैकी पात्रता आणि अनुभव या पातळ्यावर समान असल्या तरी मुली, आपले संभाषण चातुर्य दाखवण्यापेक्षा, तिरपा कटाक्ष वगैरेचे प्रयोग माझ्यावर करतात. हे लक्षात आले तरी पुरुष उमेदवार, काहिच करु न शकल्याने निराश होतात. अर्थात माझ्यावर या अस्त्रांचा परिणाम होत नाही. पण बाकि ठिकाणी होत असावा.
This is actually sick.
तुमचे हे वाक्य मला सिद्ध करायचे आहे. It is an open challenge. Because I consider this statement is derogatory for every woman. तुम्ही जर हे आव्हान स्वीकारणार असलात तर बोला.. पण प्लीज परत कुठल्यातरी चित्रपटाचे पाल्हाळ लावू नका.



Zakki
Friday, February 29, 2008 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, वा. काय पण मज्जा. अर्चना नि नंदिनि२९११ या दोन स्त्रियांचेच भांडण, नि तेहि पुरुषांच्या व्यथा या विषयावर! ही कुणा पुरुषाची व्यथा बरे?
मला तर यात विनोदच दिसतो. पण माझी विनोदबुद्धी जरा वक्रच!

निदान म्या पुरुषाला तरी याबद्दल काही व्यथा नाही. पुरुषांच्या व्यथा हा विनोदी विषय आहे असे मला वाटले होते. कारण आत्तापर्यंत मला अशी काऽहीहि व्यथा नव्हती, जी मला चव्हाट्यावर आणून त्यावर जाहीर चर्चा करावी एव्हढी गंभीर वाटली. अगदी ३५ वर्षांच्या नोकरीत, लग्नात सुद्धा.

पण मला वाटते महाराष्ट्रियांना इंग्रजी, हिंदी, मराठी कुठल्याहि भाषेत का होईना, वादविवाद घालायला आवडतो.

तो जर त्यांनी मराठीतूनच घातला तर मायबोलीचे सार्थक होईल.

कारण मराठी लिहायला, वाचायला मला आवडते, केवळ म्हणून मी मायबोलीवर येतो. तिथे मग मी एखादा शब्द, नागपुरी मराठीत लिहीला, किंवा समर्पक मराठी शब्द माहितच नसल्याने इंग्रजीत लिहीला की लोक अत्यानंदाने 'कसा पकडला चोर' म्हणून बोंबाबोंब करतात! पण मग त्याला सयुक्तिक असा मराठी शब्द का शोधून काढत नाही?

नि तेव्हढीच व्यथा इथे मांडली तर मराठीबद्दल काही होतय् हे बघून बरे वाटेल.


Shraddhak
Friday, February 29, 2008 - 2:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिलेले संदर्भ आणखी उघड न करता आल्याने मी एका चित्रपटाचा उल्लेख केला. हा केवळ मलाच आवडलेला चित्रपट होता असे नव्हे तर त्यावर ऑस्करची मोहोर उमटली होती. ( दुर्दैवाने इतका अभिजात चित्रपट इथे कुणालाच माहित नाही.<<<<<<<<<<
हा चित्रपट इथे कुणालाच माहीत नाही? वर हा निष्कर्ष? ' माहीत असेल पण लोकांना त्या सीनची इतकी तपशीलवार चर्चा नको असेल ' असा नाही का निष्कर्ष काढता आला?

इथे तर झिनत अमानच्या तोकड्या कपड्यांची चवीने चर्चा केली गेली. अनेक अचाट चित्रपटातल्या अचाट सीन्सची दिवसेंदिवस चर्चा केली जाते. पण एखाद्या आशयपुर्ण चित्रपटातील एका दृष्याचा संदर्भ देणे चूक ठरते.<<<<
संदर्भ द्या ना पण तो अस्थानी देऊ नका. जेवढ्यास तेवढा द्या. किती खोलात जाऊन वर्णन करायचे याचेही भान ठेवा. एखाद्या बीबीवर एखादा विषय ओढून ताणून काढून, बादरायण संबंध जोडून असले संदर्भ तपशीलवार का देता? पुरुषजन्मा... बीबी मुळात अतिशय हलक्याफ़ुलक्या मूडमध्ये चाललेला असताना स्त्रिया त्यांच्या स्त्रीत्वाचा गैरफ़ायदा कसा घेतात, हा मुद्दा येऊच कसा शकतो?

असो, बाकी मुद्दे नंदिनीने मांडले आहेतच.
माझा त्याला दुजोरा.


Itgirl
Friday, February 29, 2008 - 2:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

....माझ्या सहकारी मुलीनी माझ्यावर कितपत विश्वास ठेवला हे मला माहित का आटीगर्ल शैलजा याना माहित ? ....

माझ्यापेक्षा तुम्हांला नक्कीच जास्त माहीत असेल. पण कोणी विश्वास ठेवला की तो जपावा, त्याचे भांडवल करत, त्याविषयी चारचौघांत स्वत:च बोलत, स्वत:चा मोठेपणा वाढवून घेण्यासाठी त्याचा वापर करणे हे एखाद्या विश्वासू व्यक्तीचे लक्षण वाटत नाही!!


Sheshhnag
Friday, February 29, 2008 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, आता कुठे धुळवड संपून वातावरण थंड होत होते. तुम्ही विनाकारण परत पोस्ट टाकून वादळ उभे केलेत.
तुम्हाला जे काही अनुभव आले असतील, तसे बहुतांशी सर्व अधिकारी पुरुष मंडळीना येत असतील. येथील महिलावर्गापैकी काहींच्या सहकार्‍यानी कदाचित तशी नोकरीही मिळवली असेल. पण अशा प्रकारे मिळवलेली नोकरी फार दिवस टिकत नाही हेही सर्व मान्य करतील. पण या अनुभवांचा त्रोटक उल्लेख करून विषय संपवता येतो. तुमच्या कार्यालयातील प्रत्येक महिलेला तिची सुखदु:खं मांडायला तुमच्याशिवाय कुणीही नाही हेही परत परत समजावण्याचा का प्रयत्न करत आहात?
तुम्ही त्यातले आहात असं कुणीही म्हणत नाही. मग विनाकारण तुम्ही मी किती सोवळा आहे, त्यातला नाही हे सांगण्याचा अट्टहास का करता?
हा बीबी `पुरुषांच्या व्यथा' या विषयावर आहे. तेव्हा आता त्या विषयावरच लिहिलात तर बरे होईल.

पण `मी त्यातला नाही' हीच तुमची पुरुष जन्माची व्यथा असेल, तर तुमचे पोस्ट या बीबीवरील सर्वात मनोरंजक पोस्ट मानायला हरकत नाही.

take it lightly


Dineshvs
Friday, February 29, 2008 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कधी सगळ्या मुलींबद्दल बोललो ? माझ्याकडे मुलाखतीला आलेल्या मुलींपैकी काहि मुलींबद्दलच लिहिले होते ना.

नंदिनी, आपण एकदा भेटलो आहोत. पुर्वीचे पोस्ट देखील मी वाचले होते. लहान वयात खरेच खुप काहि मिळवले आहेत, असे माझे मत आहे.
तरिही दिलेले आव्हान मी स्वीकारतोय. माझ्या ऑफ़िसमधे केव्हाहि येऊन माझ्या स्त्री सहकार्‍यांचे माझ्याबद्दल मत, अगदी माझ्या गैरहजेरितही ऐकुन जा.
पत्ता वगैरे हवा असेल तर एसेमेस करतो.

मी ज्या संस्थेचा आधी उल्लेख केलाय, त्याचा संदर्भ अजुनहि तुम्हाला कळलेला नाही. ती संस्था म्हणजे कॉलेज नव्हे, कि एखादे थिएटर नव्हे. कदाचित या संस्थेशी आपला संबंध आला नसावा.

बाकि मायबोलिकरांच्या वैचारिक सरासरी वयाबद्दल मला जाणुन घ्यायला आवडेल. रणवीरच्या पडलेल्या कि पाडलेल्या टॉवेलची चर्चा, इथे यापेक्षा चवीने झाली होती. तो गे असल्याची अफ़वा खरी का खोटी, याची पण चर्चा झालीच होती ना.
अश्लील गाण्यांची अंताक्षरी तर ओसंडुन वहात होती. पण एखाद्या विषयावरची चर्चा मात्र तथाकथित सोवळेपणानीच करायची, असे का बरे ?

एखाद्याच्या लिखाणावरुन एखाद्याला मानसिक रित्या विकृत समजणे, याबद्दल मला काहिच म्हणायचे नाही. कारण मत देण्याचा अधिकार मला मान्य आहे.

पण म्हणुन मी स्वतःला तसे समजावे, असा आग्रह नसावा.
शेषनाग, इतके आरोप होत असताना, मी गप्प बसावे, अशी अपेक्षा करणे चूक आहे. माझा तो स्वभाव नाही.

Admin तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे.


Swaatee_ambole
Friday, February 29, 2008 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> पण एखाद्या विषयावरची चर्चा मात्र तथाकथित सोवळेपणानीच करायची, असे का बरे ?

दिनेश, मुद्दा तो नाहीये. मुद्दा निष्कारण असंबद्ध संदर्भ देण्याचा आहे. अश्वमेधातल्या alleged विधींचा समानतेशी जसा काडीचाही संबंध नव्हता, तसाच आणि तितकाच या बीबीवर त्या सिनेमाचा संदर्भ अस्थानी आणि अनावश्यक होता. आणि त्यावर त्यातल्या ' खटकलेल्या' प्रसंगाचं साद्यंत वर्णन हे तर अनावश्यकच नव्हे तर संतापजनक होतं.

Dineshvs
Friday, February 29, 2008 - 2:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, तो मुद्दा जर अस्थानी होता तर नेमस्तकानी उडवावा असे मीच लिहिले होते.
त्यावरची चर्चा बाकिच्या सभासदानी देखील केली होती. मी केवळ सूचन केले होते, बाकिच्यानी संदर्भ दिले होते.

त्या सीनचाहि उल्लेख मी माझ्या दृष्टिने सभ्य शब्दातच केला होता.

आणि तो विधी अलीज्ड नाही, कधीही नव्हता. आणि त्याची मला अत्यंत लाज वाटते, असे मीच आधी लिहिले होते.

माझा संताप येण्यापेक्षा त्या सत्याचा संताप येणे जास्त संयुक्तिक होते. माझा आवाज बंद करुन सत्य तर लपत नाही ना ?


Sheshhnag
Friday, February 29, 2008 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्षमस्व! खरे म्हणजे `या' चर्चेत मला मुळीच भाग घ्यायचा नव्हता. आणि इतर असंख्य मायबोलीकरांप्रमाणे हा बीबी मूळ विषयाकडे वळावा म्हणून या अगोदर दोन पोस्ट टाकल्या होत्या. पण गाडं भलतीकडेच वळते म्हणून...

दिनेश...

माझ्या ऑफ़िसमधे केव्हाहि येऊन माझ्या स्त्री सहकार्‍यांचे माझ्याबद्दल मत, अगदी माझ्या गैरहजेरितही ऐकुन जा. ..............
..........

हा हा हा. कुठल्याही महिला सहकार्‍याला आपला अधिकारी आपल्याकडे `त्या' नजरेने पाहू नये असं वाटत असतं. तसा जर तो पाहात नसेल तर तो चर्चेचा विषय होतो. तुम्ही ज्या पद्धतीने हे विधान केले आहे, त्यानुसार तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रातील यच्चयावत पुरुष अधिकारी तुमच्यासारखे नाहीत, त्यामुळे तुमच्या इथे काम करणार्‍या महिला सहकार्‍याना तुमच्या हाताखाली अधिक सुरक्षित वाटतं.
मस्त विनोद. अजूनही हसू येते.

----
मी ज्या संस्थेचा आधी उल्लेख केलाय, त्याचा संदर्भ अजुनहि तुम्हाला कळलेला नाही.............
.......

ती संस्था आदरणीय असा उल्लेख तुम्हीच केलात. त्या संस्थेतील काही खल वृत्ती जे काही करतात त्याच्याच कडे तुमचे लक्ष कसे गेले? तिथे कुणी चांगले भेटले नाहीत का? कारण तुम्ही सज्जन असल्यामुळे या गोष्टी तुमच्या नजरेत येताच कामा नये.

------------
बाकि मायबोलिकरांच्या वैचारिक सरासरी वयाबद्दल मला जाणुन घ्यायला आवडेल..........
....

अरे व्वा! काय परिमाण लावणार आहात हे जाणून घ्यायला?
----------
रणवीरच्या पडलेल्या कि पाडलेल्या टॉवेलची चर्चा, इथे यापेक्षा चवीने झाली होती.......
....

झाली होती, आणि यापुढेही होत राहतील, पण त्याचे संदर्भ खूप वेगळे होते. मुळात तो बीबीच फिल्मी गॉसिपचा आहे, हा नाही.
--------
अश्लील गाण्यांची अंताक्षरी तर ओसंडुन वहात होती. पण एखाद्या विषयावरची चर्चा मात्र तथाकथित सोवळेपणानीच करायची,............
.........
हो. सोवळेपणानेच करायची. अगदी तसलंच उदाहरण द्यायचं तर घरात किंवा पिकनिकला गेल्यावर आपण लुंगीवर किंवा बर्म्युडावर फिरतो, म्हणून ऑफिसमध्ये तसे जात नाही. नाहीतर आपला तथाकथित सोवळेपणा, शिष्टाचार उघड्यावर पडतो!
======
बाकी `पुरुष व्यथा' सदराखाली तुमच्या या पोस्ट वाचून ह. ह. पु. वा. झाली.
अशा पण असू शकतात पुरुषांच्या व्यथा!


Zakki
Friday, February 29, 2008 - 3:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, पुरुष म्हणून होत असलेल्या व्यथांचे कारण ९० टक्क्याहून जास्त प्रमाणत, 'स्त्रिया' हेच असते. नि इथे तर कित्येक स्त्रिया तुटून पडल्या आहेत, कारण बहुधा त्यांना इथले लिहीलेले वाचून राग आला असेल.

एक तर काय बोलले, लिहीले, केले तर स्त्रियांना राग येणार नाही हे पुरुष जातीला दहा जन्मात कळणार नाही. उगीच आपले स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवायचा!!

नि दिनेश, असले विषय बायकांसमोर बोलायचे नसतात! ते फक्त पुरुषांच्या बैठकीत. तिथे आणखी काय बोलतात लोक, ते ऐकले तर रागाने स्फोट होइल स्त्रियांचा. तर तसे नका करू. स्त्रियांना जगण्याचा हक्क आहे, नि तो त्यांना स्वत:ला रक्षण करणे जमत नसेल, तर ते पुरुषांचे कर्तव्य आहे. हे लक्षात घेतले तर वादविवाद होणार नाहीत.


Tanyabedekar
Friday, February 29, 2008 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीकाका, तुम्ही वयाने मोठे.. इथे आधीच वाइट पेटले आहे.. चर्चा अतिशय वेगळ्या मार्गावर चालु आहे.. का उगा काड्या टाकताय? कळकळीची विनंती करतोय..

Zakki
Friday, February 29, 2008 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, मग ही चर्चा आता बंद करा!!

कारण यातून काही निष्पन्न निघणार नाही! नुसताच वयाने मोठा नव्हे, तर या बाबतीतले माझे व इतरांचे अनुभव आहेत, म्हणून मुद्दाम सांगतो आहे. ऐकून काही उपयोग झाला तर बघा.

खरे तर मायबोलीवर चर्चा व्हावी ती, हिंदी किंवा इंग्रजी शब्दांना नि शब्दप्रयोगांना मराठीत समर्पक प्रतिशब्द कसे करता येतील, त्या शब्दांचा वापर नेहेमीच्या बोलण्यात कसा लोकप्रिय करावा या विषयावर चर्चा झाली तर मला बरे वाटेल!


Admin
Friday, February 29, 2008 - 4:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वातावरण खूपच तापलेय. मी नाईलाजाने हा विषय बंद करतोय.

Admin
Friday, February 29, 2008 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठलाही BB बंद केला की कुणाला तरी बोलायचं राहून जातं आणि त्याला किंवा तीला आपली बाजू पूर्ण मांडता आली नाही असं वाटत रहातं. त्या व्यक्तिला बोलायची संधी दिली कि पुन्हा आणखी कुणाला तरी बोलायचं रहातं आणि मग हे संपत नाही. एरवी असेच चालले तर हरकत नाही पण सध्याचे वातावरण पाहता हे योग्य होणार नाही.
ज्याना अजून लिहायचे होत पण लिहिता आले नाही त्याना सांगावसं वाटतं की अगदी तुमचा अचूक मुद्दा मांडला गेला नसेल पण बराच जवळ जाणारा मुद्दा कुणाकडून तरी मांडला गेलाय. दोन्ही बाजूचे मुद्दे मांडणारे बरेच संदेश आहेत. तेंव्हा हे इथेच थांबलेले योग्य होईल.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators