Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 30, 2008

Hitguj » My Experience » समानता » Archive through January 30, 2008 « Previous Next »

Dhondopant
Wednesday, January 30, 2008 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालाय तस्मै नम: ||

Arch
Wednesday, January 30, 2008 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हल्लिच्या धक्के देण्याच्या काळात माझामते सगळ्या मुलिंनी martial arts शिकणे जरुरीचे आहे. त्याने confidence तर येतोच आणि pressure points पण कळतात आणि प्रतिकार कसा वापरायचा तेपण शिकवल जात. एकदा का त्याचा प्रसाद मिळाला तर तो पुरुष परत वाटेला जाणार नाही किंवा जायच्या आधी शंभरदा विचार करेल. हे स्वानुभवावरून लिहित आहे.

Ajjuka
Wednesday, January 30, 2008 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,
मुद्दे इकडून तिकडे फिरवताय तुम्ही
पुरूषांना पण असा अनुभव येतो तर त्यांनीही प्रतिकार केला पाहिजे. कोणीच आडकाठी केलेली नाही पण पुरूषांना पण त्रास होतो हे काही राखीव जागा (बस व लोकलमधे) नसण्याचे कारण होऊ शकत नाही.

दुसरा प्रश्न आपल्या संस्कृतीत नाही ते अमान्य करण्याबाबत. मग स्त्रीचे दुय्यम स्थान आपल्या तथाकथित संस्कृतीतच आहे सांगितलेले मग ते तसेच असायला हवे का? वरतीच पतीची आज्ञा शिरोधार्य मानण्याचे मूर्ख आख्यान लावले गेले होतेच ना काही संस्कृतीरक्षकांकडून!
आपली संस्कृती काही आभाळातून नाही पडली. आपल्याही संस्कृतीत स्त्रीला उपभोग्य वस्तू म्हणून पाह्यले गेलेच आहे. तेव्हा संस्कृतीचा मुद्दा न आणाल तर बरं. आणि हो जर एक मुलगा आणि एक मुलगी यांना आनंद वाटत असेल तर त्यांनी दक्षिण अमेरीकन नृत्ये करायला काही हरकत नाहीये. माणसाची आदीम भावना आहे ती with consent कुणी सुखावून घेत असेल तर तुम्हाआम्हाला त्यात बोलायची काहीच गरज नाही. असो..

|राखीव जागा महत्वाच्या कि आत्मसन्मान ? आडनाव महत्वाचे कि नाव निवडण्याचा अधिकार ? |
काहीही.. राखीव जागा (बस व लोकलमधील!) आणि आत्मसन्मान या परस्परविरोधी गोष्टी कधीपासून झाल्या? नकोश्या स्पर्शांना आणि त्यातून होणार्‍या मनस्तापाला नकार देणे हे आत्मसन्मान विरोधी कधीपासून झाले?
वरच्या दुसर्‍या प्रश्नाचे उत्तर बरेचसे पुर्‍ऊष आडनाव आणि बर्‍याचश्या मुली निवडण्याचा अधिकार असे देतील. तुम्ही कुठलं ग्राह्य धरताय?
आणि प्लीज इथे कुणी कुणाला बावळट म्हणलेलं नाहीये. नाही ती खुसपटं नकोत. आणि तुम्ही दिलेल्या उदाहरणांच्या बरोबरीने ऍडव्होकेट शारदा साठे या केतकर झाल्या नाहीत किंवा अभिनेत्री शिल्पा नवलकर ही देशपांडे झाली नाही तरी त्यांच्या व्यक्तित्व, कर्तुत्व, टॅलेंट यातल्या कशालाच कमीपणा येत नाही हीही खरंच आहे.


Mrinmayee
Wednesday, January 30, 2008 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीतेच्या अग्नीपरिक्षेचा उल्लेख झालाय म्हणून अमृता प्रीतमची एक मला अत्यंत आवडणारी कवीता इथे देतेय. अर्थात हिंदीत आहे. तेव्हा माफ करा. (कुणाला मराठीत भाषांतर करावसं वाटलं तर करून इथे टाका.)

राम! मैने आजतक तुम्हे माफ नही किया हैं
तुम्हारी अंतरात्माने कभी स्विकार नही किया
कि सीता अपवित्र हैं!
तुमने अपनी मर्यादाके खातीर
अपनी आत्मा को अनसुना कर दिया,
तुमने सीता की अग्निपरीक्षा ली.
तुमसे एक प्रश्न पुच्छू मेरे राम?
तुमने स्वयं क्यो नही दी अग्निपरीक्षा?
तुम भी तो उतने दिनो तक अकेले रहे थे
राजभवन में सीताके बिना......
जानते हो तुमने चलाई हुयी इस
परंपराकी आग में
आजभी कितनी औरतोंको
अग्निपरिक्षा देनी पड रही हैं.....

सीता! मैं तुमको भी माफ नही कर सकती.
तुमने क्यो नही राम की अग्निपरीक्षा ली
अपनी अग्निपरीक्षा क्यो दी?
अपने प्रती हो रहे अन्याय के विरोध में
तुमने एक शब्द भी नही कहा.
जानती हो इसका परिणाम क्या हुआ?
अन्याय का प्रतिवाद सुनने, कहने और समझनेका
स्वभाव ही पुरुष जाती का न रहा!
तुम्हे कैसे माफ कर दूँ?

पर आज भी कोई यदी मुझसे पुछे
कि सीता और सावित्री में से एक्-
मैं क्या बनना चाहूँगी
तो मेरा उत्तर होगा, मैं सीता बनना चाहूँगी
क्योकी सीता ने धरती को फूट जाने का
आदेश दे कर अपनी अस्तित्व बोध के खातीर
उसे अपने में समा लिया!
और सीता ने धरती में समाकर
अनबोले ही राम को शेष जीवन का
वनवास दे दिया!


Marhatmoli
Wednesday, January 30, 2008 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बस किंवा लोकल मधिल राखिव जागांच्या संदर्भात मला अस वाटत कि त्यांच "राखिव जागा" हे designation काधुन टाकाव. पुर्वि प्रत्येक सार्वजनिक ठिकाणि म्हणजे चित्रपट किंवा नाट्यगृह, लग्नसमारंभ किंवा सार्वजनिक सभा इत्यादि मध्ये स्त्री पुरुषांना बसायला वेगवेगळे विभाग असत तस काहि करायला हरकत नाहि. ladies special train and bus हे त्याच आधुनिक काळातल उदाहरण. पण "महिला, अपंग आणि बालकांकरिता राखिव" हे वाक्यातलि तुलना बघता तो आत्मसन्माचाच प्रश्न आहे अस माझ मत आहे.

Tiu
Wednesday, January 30, 2008 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलम प्रभु ची करुणा देव झाली, आणि बकुल पंडीत ची अलकनंदा वाडेकर झाली म्हणुन त्यांच्या कलेत काहिच फरक पडला नाही.
>>>
That's not the point! Given a choice, do you think they would have changed their names?
नाव बदलल्याने त्यांच्या कलेत, कर्तृत्वात काही फरक पडला नसेल पण शेवटी नाव निवडण्याचा अधिकार तर गमावलाच ना?
समानता आपल्या सोईप्रमाणे हवी की प्रत्येक गोष्टीत हवी हे आधी ठरवणं गरजेचं आहे.

शनी शिंगणापुर या पवित्र(?) देवस्थानात स्त्रियांना मंदिराच्या गाभ्यात प्रवेश करायला बंदी आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
वरची analogy वापरुन असं म्हणायचं का की श्रद्धा असेल तर स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला काय आणि नाही काय, काही फरक पडत नाही!
म्हणजे देवधर्म आला की समानतेच्या व्याख्या पुन्हा आपल्या सोयीप्रमाणे बदलायच्या...


Mrinmayee
Wednesday, January 30, 2008 - 5:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रश्मी, बसच्या गर्दीत गचाळ माणसांचे हात नको तीथे लागल्यावर (आपलं वय जेमतेम १४-१५ वर्षांचं ); अश्या प्रसंगानंतर घरी येऊन आईच्या कुशीत शिरून ढसाढसा रडताना, निव्वळ आपल्याला अपंग आणि बालकांच्या रांगेत बसवल्याचं अजीबात वाईट वाटंत नाही. तेव्हा मात्र , "वाक्य कसंही फ्रेज करा पण किळसवाण्या माणसाचा शेजार बसमधेच काय कुठेही नको. मला वेगळी जागा हवी! " हाच विचार मनात येतो.

Tanyabedekar
Wednesday, January 30, 2008 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडे विषयांतर करतो आहे. पण ह्या विषयाच्या अनुशंगानेच आहे.

स्त्री आणि पुरुष हे त्यांच्या नैसर्गिक भिन्नता सोडल्यास (ह्यामध्ये मानसिक तसेच शारिरीक भिन्नता दोन्हीही मोडतात. मानसिक म्हणजे मेनोपॉज मध्ये होणारा त्रास, शारिरीक मध्ये मासिक पाळी. इथे पुरुष कणखर, स्त्री मनाने दुबळी ह्या प्रकारची भिन्नता अपेक्षित नाहिये) इतर सर्व बाबतीत अ-समान काही आहे हा मुद्दाच मुळी होवू शकत नाही. हे ढोंग आहे. स्त्री आणि पुरुष हे दोघेही मनुष्य ह्या अर्थाने बघा. काय फरक आहे. समानता नसण्यास काय अडचण आहे.

मुळात एखादा जेव्हा स्त्रीस (किंवा पुरुषास) तिच्या लिंगावरुन कर्तुत्व, संधी, सामाजिक स्थान इ.इ. बाबीत कमी लेखतो तेव्हा तो त्याचा मानसिक विकार असतो. हा मानसिक विकार काहींमध्ये सौम्य तर काहींमध्ये तीव्र असतो (इतर अनेक आजारांप्रमाणे) आणि असा मनुष्य केवळ स्त्रीसच नाही तर अनेक बाबीत भेदभाव करत असतो. अनेकदा स्त्रीस कमी लेखणारी माणसे हे गरीब लोकांना कमी लेखतात, इतर अथवा उतरंडीवरील खाली असलेल्या जातीतील लोकांना कमी लेखतात इ.इ. इथे माझे म्हणणे असे नाहिये की प्रत्येकाला बाबा त्याच्या पेक्षा खूप गरीब असा एक मित्र असायलाच हवा, प्रत्येकाने जातीच्या बाहेरच लग्न करावे. परंतु एखाद्या माणसाला ह्या गोष्टींवरुन कमी लेखु नये.

समानता हा एक विचारसरणीचा भाग आहे. आता ह्याची इथे चर्चा करुन कुणाला काय साध्य होणार आहे असाही एक प्रश्ण विचारला गेला होता. तर इथे भेट देणारी अनेक माणसे ह्या विकारातुन अजुनही पुर्णपणे मुक्त झालेली नाहित (कदाचित मी पण त्यापैकी एक असेन), त्यांच्यापैकी एखादा देखील सुधारला तरी उत्तमच आहे. त्यांचा आपापल्या कामाच्या क्षेत्रात अनेकांशी संबंध येतो, काहीजण कदाचित पॉलिसी मेकिंग मध्ये थेट अथवा दुरून संबंधित असतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे भेट देणारे कित्येक जण पालक आहेत किंवा उद्या पालक होतील. अश्या समाज घडवू शकणार्‍या कित्येक लोकांमुळे अनेक चांगल्या गोष्टी होवू शकतात.

उदा. आज माझ्यामध्ये जी थोडीशी ही मुल्ये आहेत त्यामध्ये माझे आई-वडील, आजी-आजोबा व इतर अनेक परिचित लोकांचा हातभार आहे. सर्वात जास्त प्रभाव मात्र पालक आणी शाळेतील शिक्षकच करू शकतात. एकच छोटेसे उदाहरण देतो आणि ही लंबीचवडी पोस्ट संपवतो.
मला नोकरी लागल्या नंतर जेव्हा मी प्रथम घरी गेलो तेव्हा माझ्या आई-वडीलांना काही देण्याच्या आधी माझ्या आईने मला आमच्याकडे अनेक वर्षे घरकाम करणार्‍या दोघींना पैसे देण्यास सांगितले. त्या एका छोट्याश्या घटनेने माझ्या आईने मला अनेक पातळींवरील समानता (वर उल्लेख केल्याप्रमाणे) आणि त्याबद्दल नुसती बडबड न करता आचरण करण्यास उद्युक्त केले.

इथे भेट देणार्‍या प्रत्येकाने कळत-नकळत जरी अश्या अनेक गोष्टी केल्या तर काही वर्षातच आपल्याला ह्या विषयाची इथे चर्चा करायला लागणार नाही.





Manuswini
Wednesday, January 30, 2008 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर तान्या, चर्चा नुसती करून काय फायदा? ते पण अगदी मिनीटा मिनीटाला पाने भरून
मलाही हाच प्रश्ण पडला की नक्की फायदा कोणाला? वगैरे वगैरे. पुन्हा तीच पोस्ट इथे लिहित नाही.
( referering to my last psot on this BB )



Prajaktad
Wednesday, January 30, 2008 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मने! टण्याचे वरचे पोश्ट पुर्ण वाच पाहु...३र्‍या paragraph मधे चर्चेने (किमान) काय साध्य होईल ते लिहलेय त्याने..

Manuswini
Wednesday, January 30, 2008 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग ते कळले मला पण मी तेच म्हणत होते की कोणाला फायदा होणार हा प्रश्ण मला'ही' पडला होता. पण टण्याने शेवटी लिहिलेच ते.



Chinnu
Wednesday, January 30, 2008 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च मार्शल आर्ट्स च्या बाबतीत अनुमोदन. मृण कविता खुप छान आहे. पोस्टल्याबद्दल धन्सं.

Prajaktad
Wednesday, January 30, 2008 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चर्चा चांगली चालु आहे... राखिव जागांना (बस,ट्रेन मधिल) १०० अनुमोदन...मला तर वाटत भारतातिल कुठल्याही वयोगटातिल स्त्री याला अगदी होकार देईल....
सहेतुक स्पर्श काय बस आणी ट्रेन मधेच नसतात,अगदी सिनेमा थेटरात सुद्धा पुढच्या सिट्ला मुद्दाम पाय लावणे, आपण सांगितल तर त्यातले नाही हे दाखवणे.. चालु असत.
एक किस्सा याचाच..
मी आणी मैत्रिणींचा ग्रुप मूव्ही बघायला गेलेलो.. तर मागच्या सिट वरुन एका तरुणाचे सारखा पायाचा अगंठा खुपसण चालु होत..वळुन बघितल्यावर आपण सिनेमा बघण्यात अगदी मग्न आहोत,अस दाखवण चालू होत..एकदा सांगितल्यावर सॉरी च नाटक करुन परत चालुच.ऽसली तिडिक गेली.
हळुच पर्स मधुन सेप्टि पिन काढली..सरळ वळुन अगंठ्यातच खुपसली.. असला किंचाळला.. बाजुचे लोकही बघायला लागले. आणखी तमाशा नको असेल म्हणुन गेला निघुन..
असे अनेक अनुभव प्रत्येकिचे असतिल, भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असणार्‍या देशात स्त्रियांसाठी या सुविधा अगदी किमान गरजा आहेत.






Marhatmoli
Thursday, January 31, 2008 - 1:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृ तु जे म्हणतेयस त्याचा अनुभव मी हि घेतला आहे ग आणि त्यानंतर येणारि हताशाहि अनुभवलिय. पण तरिहि मला अस वाटत कि सार्वजनिक ठिकाणि आपल्यासाठि जागा असाव्यात त्या आपला हक्क मान्य आहे म्हणुन आपल्याला अपंग समजुन भीक म्हणुन नाहि.

दुसरा मुद्दा राखिव जागांचा. कोणितरि वर म्हणाल कि राखिव जागा नकोत कारण त्यातुन राबडिदेवि सारख्या कठपुतळ्या निर्माण होतिल. पण कोणाचा तरि मुलगा अथवा भाउ म्हणुन सत्तेच्या उमेवादवारिसाठि योग्य ठरलेले राहुल गांधि, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे सारखे पुरुष सध्या राजकारणात आहेतच कि. शिवाय ग्रामिण पातळिवर जिथे जिथे महिलांसाठि जागा राखिव ठेवण्याचा प्रयोग केला गेला आहे तिथे याचे अतिशय सकारात्मक परिणाम दिसुन आलेत. १००% नाहि म्हणणार मी कारण चांगल्या आणि वाईट अशि विभागणि स्त्रीयांमध्ये हि आहेच. पण आतापर्यन्त कधि घराबाहेर न पडलेल्या, फ़ारश्या न शिकलेल्या स्त्रीय देखिल सरपंच पदाचि जबाबदारि उत्तम पणे पार पाडताना दिसुन आल्या आहेत. सामान्यपणे अस आढळुन आल आहे कि स्त्रीया स्त्रीयांचे प्रश्ण नीट समजावुन घेवु शकतात. मग हा प्रयोग देशपातळिवर करुन बघायला काय हरकत आहे? सामन्यपणे सर्वजण आर्थिक निकषांवर आरक्षण (शिक्षण आणि नोकरिमध्ये) तत्वत: मान्य करतात मग ज्या महिलांना राजकारणात इतकि वर्श पिछाडिवर ठेवल गेल त्यांच्यासाठि काहि वर्ष ५०% जागा आरक्षित कराव्यात ह्या विचाराला आक्षेप का असावा?


Sanish
Thursday, January 31, 2008 - 2:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका ह्यांना आलेला आणि असे अनुभव वाईट आहेतच. पण हा एक थोडा वेगळा अनुभव. जागा-बेस्ट डबल डेकर, अंधेरी-कुर्ला रोड. वेळ संध्याकाळी ६.३०. नेहमीसारखी गर्दीनी पार कललेली बस. मी बसच्या दारात लोंबकळत आणि बस कंडक्टर आतल्या डाव्या बाजुच्या सीट्सकडे पाठ करून घामेघूम होऊन तिकीट देतो आहे. त्याचा कोपरा मागे लेडीज सीट वर बसलेल्या मुलीला चुकून लागला हे मी पाहिलं आणि त्यानंतर त्या मुलीनी अख्खी बस डोक्यावर घेतली. आधीच वैतागलेला कंडक्टर पोलीसातही यायला तयार झाला. मुंबईसारख्या शहरात चांगल्या वृत्तीच्या लोकांना विनाकारण असाही त्रास होतो. अर्थात, ह्याचं मूळ कारण वरच्या पोस्ट्स मधे आहे हेही तितकेच खरे.

Farend
Thursday, January 31, 2008 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"...त्यातुन राबडिदेवि सारख्या कठपुतळ्या निर्माण होतिल. "

ते मलाही पटले नाही. सुरुवातीला कदाचित तसे होईल पण वर्षानुवर्षे राजकारणात, भ्रष्टाचारात मुरलेल्या लोकांपेक्षा अचानक संधी मिळून नव्याने सत्ता हातात आलेल्या या बायकांची काम करण्याची पद्धत वेगळी असेल, कदाचित प्रत्येक गोष्टीचा, घटनेचा फक्त आपल्या राजकीय फायद्यासाठी कसा उपयोग करून घ्यायचा हा विचार न करता तेथे काही प्रश्न असतील तर ते सोडवता कसे येतील असा विचार त्या करतील (नव्याने राजकारणात आलेले लोक असे वागतील एखादेवेळेस). कदाचित त्यातील काही टक्के खंबीर स्त्रिया हातात सत्ता आल्यावर जबाबदारीची व संधीची जाणीव होऊन त्याप्रमाणे वागतील, थोडीतरी शक्यता आहे.

'घराबाहेर' चित्रपटात साधारण असेच घडलेले दाखवले आहे. मला वाटते असे होणे शक्य आहे.


Bee
Thursday, January 31, 2008 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमृता प्रितमची ही कविता विचारप्रवृत्त करणारी वाटली. मृताई धन्यवाद.

Dineshvs
Thursday, January 31, 2008 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राखीव जागा आणि समानता, हे परस्परविरोधी नाही का वाटत ? जर अंगात धमक असेल तर राखीव जागा हव्यात कशाला ? मेधा पाटकरची जागा राखीव होती का ? तिला कुणी सांगितले होते असे आयुष्य उधळुन द्यायला ? मी परत लिहितो कि राखीव जागा आहेत म्हणुन मला पोटदुखी नाही पण त्यामुळे स्त्रीयाना कायम संरक्षणाची जरुर असते हा मनु महाराजांचा विचारच पुढे रेटल्यासारखे वाटते, मला. स्त्री शारिरिक रित्या पुरुषांपेक्षा कमजोर असते हा निव्वळ गैरसमज आहे. पुरुषाला असह्य वाटणार्‍या डोकेदुखीपेक्षा प्रसववेदना या अनेकपटीने मोठ्या असतात आणि अनेक स्त्रीया त्या सहज सहन करतात.

आता ज्याना आवडेल त्यानी उत्तान आणि कामुक नृत्ये करायला, बघायला हरकत नाही, हो ना ? मग त्याचा अजाणत्या वयात होणारा मानसिक प्रभाव कसा थोपवायचा ?

मी दोन बदललेली नावे लिहिली म्हणुन दोन न बदललेली नावी लिहिली गेली. मुद्दा कामगिरीचा होता, नावाचा नव्हता. मी दिलेल्या दोघींवर नाव बदलण्याची सक्ति झाल्याचे ऐकिवात नाही. आणि निलम प्रभु देखील लग्नानंतरचेच नाव होते. नावाच्या बाबतीत एक स्वतंत्र विचार केवळ विजया जोगळेकर धुमाळे ने केला होता, पुढे दोन नावे लावण्याचे अनुकरण केले गेले.

वरती एका देवळातील नियमांचा उल्लेख आहे. यात तीन मुद्दे आहेत.
१. एखाद्या खाजगी वास्तुमधे कुणाला आणि काय नियमानी प्रवेश द्यायचा हे स्वातंत्र्य विश्वस्ताना आहे.
२. तुम्ही काय पेहराव घालायचा हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे.
३. जर त्या वास्तुमधील प्रवेशाने तुम्हाला मिळणारा अध्यात्मिक अनुभव तुमच्या पेहरावाच्या स्वातंत्र्याच्या त्यागापेक्षा मोठा असेल, आणि त्या नियमांपुढे तुम्ही झुकला असाल, तर त्या नियमाबद्दल तक्रार करण्याच्या तुम्हाला काहिही अधिकार नाही.

जर तसे नसेल तर तिथे प्रवेश करणे टाळा किंवा जर ती वास्तु सार्वजनिक असेल तर तिथे सत्याग्रह करा. मी अश्या ठिकाणी जाणे नेहमीच टाळतो.

आता परत एक धाडसी मुद्दा मांडतोय.
बलात्कारीत स्त्रीवर पुरुष केवळ एकदाच बलात्कार करतो, पण पुढे प्रत्येक क्षणी आजुबाजुचा समाज, नातेवाईक तिला टोचुन खातात. तुच तशी सैल वागली असशील, म्हणुन तसे झाले असेल, असे तिला सुनावले जाते.
बलात्काराने कुणी अपवित्र होत नाही. तो केवळ अपघात म्हणुन विसरुन जावे. निर्भयपणे न्याय मागावा व मिळवावा, हे त्या मुलीला का कुणी सांगत नाही ?
दळवीनी सुचवलेले पर्याय, केवळ नाटकातच राहिले.

दामिनी सिनेमात, एरवी शुर वागलेली नायिका, वकिलाच्या प्रश्नाना का घाबरते ? त्याला काहिही विचारायचा अधिकार आहे, तिने मुळुमुळु रडण्यापेक्षा ठामपणे उत्तरे देणे महत्वाचे होते.
अश्या स्त्रीला जीवन नकोसे करण्यात स्त्री पुरुष दोघेही आघाडीवर असतात. पण खरी असमानता इथे आहे कारण पुरुषाच्या बाबतीत असे होणार नाही.

खरे तर समानता हि आयुष्य जगण्याच्या हक्कापासुनच सुरु होते. अजुनही स्त्री भ्रुणहत्येच्या मुद्द्याचा कुणी उल्लेख केला नाही.





Akhi
Thursday, January 31, 2008 - 4:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर तान्या. स्त्री आणि पुरुष ह्यान्च्या मधे आहेच. प्रश्न फ़क़्त विचारांचा आहे आनि समानता हा मुद्दा परत व्यक्ती वरती अवलम्बुन असतो. तेव्हा प्रत्येक वक्तिच्या विचारान्चा आदर होण महत्वाच. आणी भावी पीढी घडवताना विचारान्चा आदर करणे हे शिकवयाला हवे.

Ajjuka
Thursday, January 31, 2008 - 4:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,
बाईने एकत्र डब्यात बसून दर मिनिटाला होणारी विटंबना सहन करावी किंवा पदोपदी मारामार्‍या करत बसावं. कारण तेवढंच आत्मसन्मानाचं आहे. असलं काहीतरी म्हणणं दिसतंय तुमचं.
थोडं practically बघता येईल का याकडे?
प्रत्येकाचा वेळ आज मिनिटांच्या गणितावर आधारलेला असतो. जर दर मिनिटाला घडण्यार्‍या गोष्टीला सतत प्रतिकार करत राह्यलं तर प्रत्येक वेळेला कमीतकमी १० मिनिटे. पोलिसात गेलात अजून वेळ. मग पुढची घटना परत तेवढाच वेळ. हे नोकरी करणार्‍या बाईला रोज परवडण्यासारखे आहे का? नोकरी करणार्‍याच काय घराबाहेर पडणार्‍या कुठल्याही बाईला परवडण्यासारखे आहे का?
आणि सतत हे करत राह्यलाचा मानसिक व शारिरीक थकवा? त्याचे काय? आणि हे का? कारण ८०% आईबापांनी लहानपणी या बाप्यांवर संस्कार केले नाहीत. पुरूष आहेस म्हणजे तुला कुणीही बाई available असेल अशी समजूत करून दिली म्हणून. वा म्हणजे चूक कुणाची आणि भोगतंय कोण? का तर म्हणे आत्मसन्मान!
आत्मसन्मानासाठी बस किंवा लोकल मधे राखीव जागा असता कामा नयेत हे म्हणणे म्हणजे परिस्थितीची जाणीव नसणे किंवा करून घ्यायची इच्छा नसणे असे आहे.
प्रत्येक पुरूषाला लाज वाटली पाहिजे अश्या जागा ठेवाव्या लागतात याची. ते दूरच. मानसिकता बदलली पाहीजे हे दूरच वर लेडिज डब्यातून जाणे ह्यात आत्मसन्मान नाही त्यामुळे जनरल डब्यातून जा आणि रोजच्या मनस्तापाला बळी पडा. ही मखलाशी आहे.

|मी दोन बदललेली नावे लिहिली म्हणुन दोन न बदललेली नावी लिहिली गेली. मुद्दा कामगिरीचा होता, नावाचा नव्हता. मी दिलेल्या दोघींवर नाव बदलण्याची सक्ति झाल्याचे ऐकिवात नाही. आणि निलम प्रभु देखील लग्नानंतरचेच नाव होते. नावाच्या बाबतीत एक स्वतंत्र विचार केवळ विजया जोगळेकर धुमाळे ने केला होता, पुढे दोन नावे लावण्याचे अनुकरण केले गेले. |

हो अशी दोन नावे लिहिली कारण तुमच्या बोलण्यातला सूर आडनाव बदलले हे कसे योग्य केले आणि आडनाव न बदलणार्‍यांची मानसिकता आडनाव बदलणार्‍यांना बावळट म्हणण्याची असते हा होता.
हो मुद्दा कामगिरीचाच आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जसं नाव बदलून कर्तुत्व कमी होत नाही तसंच नाव न बदलताही कर्तुत्व कमी होत नाही. हे का तुम्हाला पटवून घेता येत नाहीये.
तुम्ही ही उदाहरणे का देताय हे कळत नाही. कारण इथे कुणीच नाव बदलता कामा नये असे म्हणलेले नाही. पण एखादीला नको असेल बदलायला अगदी दोन्ही आडनावे सुद्धा नको असतील तर तिला ते स्वातंत्र्य असले पाहिजेच हे म्हणलं जातंय. आणि तसं केलेल्या बाईबद्दल हेटाळणीचा सूर असता कामा नये हा मुद्दा आहे.

talking abt कामुक आणि उत्तेजक... भारतीय वस्त्रप्रावरणे (कंचुकी, निवी, उत्तरीय अश्या स्वरूपातले), खजुराहोचीच नव्हे तर अनेक जुनी शिल्पे व अजंठासारखी भित्तीचित्रे, भरतनाट्यममधील नाट्यशास्त्राला अनुसरून असलेल्या काही हालचाली, तमाशा किंवा बर्‍याचश्या लोककलाप्रकारांच्यातला eroticism हे सगळं आणि अजून बरंच काही आपलं आहे आणि त्याचाही चुकीचा परिणाम होऊ शकतो अजाणत्या वयात. इथे सुद्धा गरज आहे ती त्यातले सौंदर्य बघायला शिकवण्याची. तीच गोष्ट latin dances ची. एकदा करून बघा, त्यासाठी जी चपळता, coordination, trust या गोष्टी लागतात त्यालाही महत्व आहेच. असो. पण तो मुद्दा इथे relevent च नाहीये एव्हा इत्यलम!

बाकी देऊळ हे जरी खाजगी मालमत्तेत गणले जात असले तरी तिथे जातीवरून कुणाला मज्जव करता येत नाही आता मग स्त्री-पुरूष यावरून पण असता कामा नये. अंगभर कपडे हे ठीक आहे पण साडी हा अंगभर कपडा आणि पंजाबी ड्रेस हा नाही ह्याला काही अर्थ नाही.

बाकी बलात्काराबद्दलच्या तुमच्या मुद्द्यमधे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच दिले आहे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators