Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 29, 2008

Hitguj » My Experience » समानता » Archive through January 29, 2008 « Previous Next »

Deepanjali
Tuesday, January 29, 2008 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धोंडोपंत ,
मी जे माझ्या भावा बद्दल आणि इतरां बद्दल लिहिलय ते भारतातल्याच joint families मधले culture लिहिलय .
अशा पण families असतात . :-)


Ajjuka
Tuesday, January 29, 2008 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए डिजे मी माझ्या पहिल्याच पोस्टमधे बोललेय की गं. बिचार्‍या पुरूषांना रोजच्या कपड्यात प्रयोग करण्याचे स्वातंत्र्यच नाहीये की समाजात.
खरंतर हे पुरूष लोक ना.. यांना एकुणातच प्रयोग करण्याचं स्वातंत्र्य नाहीये. त्यामुळे बसलेत आपल्याच ageold image मधे अडकून. लोक काय म्हणतील ला फार घाबरतात हे पुरूष लोक.


Manjud
Tuesday, January 29, 2008 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका अनुमोदन, फक्त एक addition ,

लोक काय म्हणतील ला conveniently घाबरतात हे पुरूष लोक.


Ajjuka
Tuesday, January 29, 2008 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>किती पुरुष लग्नानंतर आपले नाव आणि आडनाव बदलतात??? आणि जेव्हा मी हे नाव बदलणार नाही.. बापाचंच आडनाव लावेन म्हणून सांगते तेव्ही मी आगाऊ का ठरते?<< ओये!! go ahead I say!
यावर एक मोठ्ठी धुमश्चक्री झालीये पूर्वी. V&C मधे शोधून बघ.
आणि हो मुलीचं नाव हा जिचा तिचा प्रश्न आहे हे मानणारे पण खूप मुलगे आहेत. सापडतील. समय से पहिले और भाग्य से ज्यादा कुछ नही मिलता.. भाग्य से ज्यादा सोडून दे. समय से पहिले मिळत नाही लक्षात ठेव.


Dhondopant
Tuesday, January 29, 2008 - 11:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manjud असे काही नाही...

दीपांजली... म्याड म मग लई ब्येस जाहाल म्हनायच.

पर.. सुनाना तरास हुतो.. मंग सासुच्या का पाया पडाव?...

याबाबतीत काय म्हणते तुमचे "taaratmya?"


Slarti
Tuesday, January 29, 2008 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सीता ही आदर्श बाळगावी म्हणताना सीतेची स्वतःची अशी ओळख नक्की काय हे विचारले पाहिजे. रामाची बायको ? 'रामा'यणाचा एक भाग ? हलक्या कानाच्या नवर्‍याने नाही ते आळ घेतले म्हणून स्वतःची चूक नसताना अग्निदिव्यातून जाणारी ? की आणखी काही ?
मुद्दाम नकारात्मक गोष्टी मांडतोय असे नाही तर सांगायचा मुद्दा एवढाच की सीता असो, दुर्गा असो, जोन ऑफ आर्क असो.... आदर्श घेतानादेखिल कालाचा संदर्भ लक्षात घेणे हे तारतम्य आवश्यक आहेच. तो संदर्भ लावण्यात फरक पडू शकतो.


Ajjuka
Tuesday, January 29, 2008 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्टी,
कितीवेळ इगो सुखावशील स्वतःचा? :-) मी तेच म्हणालेय ना आधीच्या पोस्टमधे! :P


Slarti
Tuesday, January 29, 2008 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, माझ्या लक्षात आले ते... पण पुरूषी इगो !!

Arun
Tuesday, January 29, 2008 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चर्चा जोरात चालू आहे. मला फारसं काही लिहिता येत नाही, पण राहावत नाही म्हणून थोडाफार प्रयत्न करतो. या बीबीशी संबंधित नसल्यास कृपया हे पोस्ट इथून उडवून द्यावे.

आजच्या जमान्यात बाईने घरी बसून घर सांभाळणं हे एक सोप्प काम नाहिये. जेंव्हा जेंव्हा एखादी बाई खंबीरपणे घर चालवते, तेंव्हा तेंव्हा त्या बाईच्या नवर्‍याला त्याचा पुरेपुर फायदाच होत असतो. अशावेळेस त्या बाईला "तू काय घरीच असतेस. आराम करतेस" असं हिणवू नये. नवरा ऑफीसला गेल्यावर घरी मुलांना सांभाळणं, आल्या गेलेल्यांचं व्यवस्थित आदरातिथ्य करणं आणि त्यातूनच चार घटका स्वत:साठी राखून ठेवणं ही एक तारेवरची कसरत आहे.
विश्वास बसत नसेल तर एक दिवस घरी राहून घर सांभाळून बघा.

याचा अर्थ असा पण नाही, की घर सांभाळण्याचं काम हे आजच्या जमान्यात फक्त घरातील बाईनेच केलं पाहिजे. पुरुषांची पण तितकीच मदत झाली पाहिजे. घरातली कामं ही कोणा एकाची जबाबदारी नसून ती घरातल्या सगळ्यांची आहे, याची जाणीव हवी. नाही का?

इथे मला दोन उदाहरणं द्यावीशी वाटतात, समानतेबाबत.

१. माझ्या मैत्रिणीचे आई आणि वडिल दोन्ही नोकरी करत असत. त्यांच्याकडे एक नियम होता. संध्याकाळी तिघांपैकी जो कोणी घरी पहिला येईल, त्याने स्वत:बरोबर बाकीच्या दोघांसाठी पण चहा करून ठेवायचा. म्हणजे नंतर येणार्‍याला घरी आल्या आल्या चहाचा कप समोर. बरेचदा माझ्या मैत्रिणीचे बाबाच घरी लवकर येत, अणि त्यामुळे त्यांनाच चहा करावा लागत असे ...... :-)

२. आमच्या चाळीत राहणार्‍या एक बाई Reserve Bank of India मध्ये कामाला होत्या. २ मुलांच्या शाळा आणि त्यांचे अभ्यास बुडू नयेत म्हणून त्या बाईंच्या नवर्‍याने स्वत:ची नोकरी सोडून मुलांचा सांभाळ केला आणि त्या बाईंनी आपली नोकरी continue केली. आता निवृत्त होउन दोघेही पुण्यात सुखाने नांदतायत. दोन्ही मुलं IIT मधून graduate होतुन अमेरिकेत स्थाईक झाली आहेत.

याच प्रकारची समानता आपल्याला अभिप्रेत आहे ना?


Manjud
Tuesday, January 29, 2008 - 12:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरूणच्या उदा. क्र. २ च्या संदर्भात

अरूण, विजय घासकडवीचे आई - वडील, बरोबर ना?

हा विजय घासकडवी १९९० च्या SSC merit list चा टॉपर होता आणि एक वेगळी आणि यशस्वी कुटुंबव्यवस्था म्हणून ह्या नवरा बायकोची दूरदर्शनवर झालेली मुलाखत अतिशय गाजली होती.


Ajjuka
Tuesday, January 29, 2008 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्थातच अरूण.
मी माझ्या घरात हे लहानपणापासून बघितलंय. आई कॉलेजमधे शिकवू लागली. आणि मग घरातल्या जबाबदार्‍या वाटल्या गेल्या. मी ६ - ७ वीमधे गेल्यापासून माझ्यावर पण काही जबाबदार्‍या होत्या. पानं घेणे किंवा जेवणानंतर ओटा साफ करणे अश्या फुटकळ पण गरजेच्या. (मी नाठाळ असल्याने कायम त्या पार पाडल्याच असे काही म्हणता येणार नाही. )
आई जसजशी आजारी पडत गेली तश्या बाबांच्या जाबाबदार्‍या वाढल्या. मी तेव्हा भारतात नव्हते. मग बाबा रिटायर झाले ६ वर्षांपूर्वी. आईचा आजार वाढत होता. त्याची व्यवधानं, तिचं कॉलेज, तिचं लिखाण हे सगळं गेले ६ वर्ष त्यांनी सांभाळलंय. आणि आता एकटे पडल्यावरही घरातलं सगळं तेच करतात. स्वैपाकासकट.

त्यामुळे घराची जबाबदारी ही कुण्या एकट्याची असते हे मी मानूच शकत नाही. जर घर या संकल्पनेचा उपभोग सगळे घेत असतील तर ती व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी सगळ्यांची आणि कष्टही सगळ्यांचेच असायला हवेत. its that simple!


Dhondopant
Tuesday, January 29, 2008 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

slarti .... तुम्ही कुणाबद्दल बोलत आहात हलक्या कानाचा नवरा म्हणुन?

ज्याने स्वताच्या चारीत्र्याने समाजाला कसे वागावे हे दाखवुन दीले आणि ज्याची आज्ञा मानताना सीतेला जिथे भुषण वाटले त्या प्रभु रामचंद्रांविषयी?

ज्यानी समाज घडविला, ज्यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला प्रत्येक आई मुलाला सांगते त्या सीतापती रामाविषयी?

ज्याने धर्माचरण केले त्या रामाविषयी हे लिहुच कसे शकता तुम्ही?

रामाच्या देवळात जेव्हा नमस्काराला कोणताही पुरुष जातो तेव्हा तो नक्कीच थोडा का होईना आंतर्मुख होतो स्वताच्या चारीत्र्याविषयी.

राम हा मर्यादापुरुषोत्तम होता. दशावतारातील संगती काय आहे याचा कधी विचार आपण केला आहे का?...


Dhondopant
Tuesday, January 29, 2008 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

slarti .... तुम्ही कुणाबद्दल बोलत आहात हलक्या कानाचा नवरा म्हणुन?

ज्याने स्वताच्या चारीत्र्याने समाजाला कसे वागावे हे दाखवुन दीले आणि ज्याची आज्ञा मानताना सीतेला जिथे भुषण वाटले त्या प्रभु रामचंद्रांविषयी?

ज्यानी समाज घडविला, ज्यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवायला प्रत्येक आई मुलाला सांगते त्या सीतापती रामाविषयी?

ज्याने धर्माचरण केले त्या रामाविषयी हे लिहुच कसे शकता तुम्ही?

रामाच्या देवळात जेव्हा नमस्काराला कोणताही पुरुष जातो तेव्हा तो नक्कीच थोडा का होईना आंतर्मुख होतो स्वताच्या चारीत्र्याविषयी.

राम हा मर्यादापुरुषोत्तम होता. दशावतारातील संगती काय आहे याचा कधी विचार आपण केला आहे का?...


Ajjuka
Tuesday, January 29, 2008 - 12:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह! आत्ता मला कळले सीतेचा आदर्श म्हणजे काय ते...
नवर्‍याची आज्ञा पाळण्यात भूषण मानणे...
उडत गेला मग हा आदर्श... स्वतःचं डोकं वापरू नका. दुसर्‍याच्या म्हणण्याला मान तुकवा असं आदर्श होत असेल तर खड्ड्यात गेलं आदर्शपण!


Ankyno1
Tuesday, January 29, 2008 - 12:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रमामधे गुण होते हे मान्य
पण दोष नव्हते हे अमान्य....

अग्निदिव्य केल्यावरही तो स्वतच्या बायकोच्या बाजूनी ठामपणे उभा राहू शकला नाही
मुळात सीता ही त्याची पत्नी होती... तिच्यावर विश्वास नसल्यामुळेच तिला अग्निदिव्य करायला लावले...

याचाच अर्थ राम हा जनतेसाठी कितिही चांगला असला तरीही आदर्श कुटुंबवत्सल गृहस्थ नव्हता

माझ्या मते गृहस्थाश्रमासाठी रामाला आदर्श मानणं अयोग्य आहे... करण गृहस्थाश्रम त्यानी पूर्णपणे अनुभवलाच नाही....

आणि इथे आपण गृहस्थाश्रमातल्या समानतेची चर्चा करत असल्यामुळे रामाचं उदाहरण इथेतरी अयोग्य आहे


Slarti
Tuesday, January 29, 2008 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंत, सीतेकडे (व रामाकडे) अशा दृष्टीनेही बघता येते हे सांगायचे होते म्हणून तसा उल्लेख केला एवढेच. १०० वर्षांपूर्वी हा विचार कोणी केला नसता, पण आता आपण करतो... म्हणजे आदर्शाला कालाचा संदर्भ आहेच हा मुद्दा... सीता असो वा आणखी कोणी. तेव्हा 'सीता ही आजच्या स्त्रीचा आदर्श असावी' यासारख्या सरसकट विधानाची दुसरी बाजू मांडावी म्हणून ते उदाहरण दिले एवढेच. हे आदर्श आपण आपल्या मुलांपुढे ठेवणार आहोत, तेव्हा त्याच्या सर्व बाजू आधी आपल्याला माहिती पाहिजेत, नव्हे काय ?
अँकी, उत्तम मुद्दा.


Nandini2911
Tuesday, January 29, 2008 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मावस आजी देवळात कीर्तनाला गेली होती तेव्हा त्या कथेकर्‍याना तिने सांगितलं.. रामाने एकदाही परस्त्रीचा विचार मनात आणला नाही याला पुरावा काय आहे? त्याने ना कधी अग्निपरीक्षा दिली ना कधी धरणीमधे गेला.... असला नवरा माझा असता तर आधी त्याला मी घराबाहेर काढला असता.. मला घेओन यायच्या ऐवजी इथे युद्ध करत बसलायस.. :-) :-) :-)

माझ्या आजीने पुढे त्याच कीर्तनवाल्याबरोबर लग्न केले.. :-) :-) :-) :-)




Zakasrao
Tuesday, January 29, 2008 - 1:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चर्चा छान चालली आहे. :-)
बर्‍याच जणानी (येथे जणी देखिल आहेत :-)) छान मुद्दे मांडले आहेत.
मी चर्चेचा आस्वाद घेतोय (फ़क्त विषय भरकटु देवु नये ही विनंती)
एक किस्सा माझ्या शाळेत घडलेला.
आमच्या वेळी (खरतर अस म्हणावच एवढं माझ वय नाही पण आता पुण्यात आहे तर बोलुन घेतोच )
म्हणजे मी दहावीत असताना १९९६ साली आमचा समाजसेवेचा कॅम्प जायचा होता. तो जाणार होता कणेरी मठ येथे (कोल्हापुरातुन १२-१५ किमी)
तर झाल अस की आम्हाला नेण्याची व्यवस्था शाळेने केली होती. आणि आमच्या गरीब समाजसेवेला कोणतही अनुदान वै नसल्याने आणि शारिरिक क्षमता नसल्याने NCC अणि पैसे वाया घालवाण्यसाठी नसल्याने RSP जीओन न करु शकलेले बहुतांश निम्न मध्यमवर्गीय आई बापाची पोरं असलेने कोणी पैसे नव्हते देणारे.
त्यामुळे फ़क्त एकच KMT होती आणि मुल मुली आणि शिक्षक मिळुन जवळपास ७० जण.
मग अस ठरल की मुलीनी बसायच शिक्षिकेनी बसायच. ज्याना मिळेल त्या मास्तरानी बसायच आणि मुलानी उभ रहायच :-)
झाल समाज सेवेचा कॅम्प आटोपला. परतीच्या आधी थोडी अनुभावावर आधारीत भाषण बाजी होती. आमचा GS राहुल नामक एक इब्लिस कार्ट होत.
त्याने अनुभवाविषयी बोलता बोलताच विषय समानता वर नेला आणि अशी मागणी केली की येताना मुल उभी राहिली आहेत जाताना मुलाना बसण्यासाठी प्राधान्यक्रम द्यावा :-)
त्यावर आमचे सर लोकं आणि मास्तरीण बाई नाही नाही अस करत होत्या पण आम्च्या वर्गातल्या मुली ह्याला तयार झाल्या. (अर्थात ह्याला कारण फ़क्त मुलामुलींमधली खुन्नस असावी :-))
पण त्या घटनेमुळे त्यांना समानता वर एक धडा देखिल मिळाला. आज माहित नाहीत त्यातील किती मुली ह्याबाबतीत अवेअर असतील पण समजा त्या ३०-३५ मधल्या एक दोन जरी असल्या तरी खुप झाल. :-)


Dineshvs
Tuesday, January 29, 2008 - 1:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाचं काय तर गोंधळ्याची आंबाबाय, असे करत इथे रामायण हा संदर्भ आणु नका, सीतेवर बरिच चर्चा झालीय इथे पुर्वी.

आजच्या संदर्भातच बोलु.

स्त्रीयानी, स्त्री म्हणुन कुठलेच वेगळे हक्क मागु नये हे उत्तम. कर्तृत्वात तर त्या कुठेच कमी पडत नाहीत, मग अश्या कुबड्याही फ़ेकुन द्याव्यात.

एक उदाहरण देतो, स्त्रीयानी बसमधल्या राखीव जागा नाकाराव्यात. अपंग, वृद्ध यांच्यासाठी राखीव जागा योग्य आहेत, पण स्त्रीयांसाठी नकोत.
माझा स्वतःचा अनेकवेळचा असा अनुभव असा आहे कि त्या सीटवर बसलेली तरुण मुलगी, तिच्यापेक्षा वृद्ध व्यक्तीला क्वचितच जागा देते.
काय म्हणणे आहे, यावर.


Tanyabedekar
Tuesday, January 29, 2008 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्यावर काहीच बोलणे नाहीये दिनेशदा. त्या मुलीने वृद्धाला जागा देणे योग्य आहे प्रथमदर्षनी. परंतु मुळात भारतात स्त्रीयांसाठी लोकल मध्ये अथवा बस मध्ये वेगळ्या जागा का असतात ह्याचा विचार होणे गरजेचे आहे. लोकलच्या गर्दीत जर जनरल डब्यात स्त्रीया चढल्या तर आपल्या इथले "पुरुष" कसा चान्स** मारुन घेतील ही तुम्हाला माहित आहेच. आणि स्त्री-पुरुष समानता जर प्रत्येकाने अंगी बाळगली तर खरेच स्त्रीयांसाठी वेगळे डबे अथवा सीट्स ठेवाव्या लागणार नाहीत.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators