Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 14, 2007

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » नाटक कसे वाटले » Archive through October 14, 2007 « Previous Next »

Dineshvs
Thursday, December 21, 2006 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशोक हांडेनी अनेक दर्जेदार कार्यक्रम केले आहेत.
खुप पुर्वी शाहीर साबळे आणि चारुशीला नेहि दुरदर्शनवर अशीच देखणी मालिका केली होती होती, तिचे नाव महाराष्ट्र कि लोकधारा.
आणि त्याहिपुर्वी, शाहिर बालकराम वरळीकर असा कार्यक्रम करत असत, मी तो ३० वर्षांपुर्वी बघितला आहे.


Deepstambh
Thursday, December 21, 2006 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश बरोबर.. शाहिर बालकराम वरळीकर यांचे माहित नाही कारण त्यावेळी आमुचा जन्म होवुन थोडीच वर्षे झाली होती. पण महाराष्ट्र की लोकधारा याच धर्तीवर होता.. फक्त महाराष्ट्र की लोकधारा हा दूरदर्शन टाईप तर मराठी बाणा हा हल्लीच्या अल्फा/ई टिव्ही टाईप म्हणता येईल. त्यात लाईव्ह कार्यक्रम बघण्याची लज्जत काही औरच. ते म्हणजे शेकडो लोक मिळुन क्रिकेट/फुटबॉल वर्ल्ड कप फायनल लाईव्ह बघण्यासारखे असते. :-)

आताच तुमच्या घशीरामच्या पोस्टस वाचल्या. तुम्ही म्हणजे चालता फिरता ज्ञानाचा खजीना आहात.. :-)


Dineshvs
Friday, December 22, 2006 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपस्तंभ, ती शेवटची ओळ मी सिरियसली घेत नाही बरं.
पण मला वाटते आपण मराठी माणसे समुहनृत्याच्या आननंदाला पारखे झालो आहोत. पुर्वीहि हि प्रथा, म्हणजे स्त्री पुरुषानी एकत्र वा वेगवेगळे नृत्य करायची पद्धतच आपल्याकडे कधी नव्हती. लेझिम, दिंडी असे काहि प्रकार होते, पण त्यातहि सर्वसामान्य लोकांचा सहभाग नसायचाच.
याबाबतीत गरबा आणि भांगडा नाचणार्‍या लोकांचा मला हेवा वाटतो. अगदी एकच ठेका, पण त्या सगळ्यांच्या रक्तातच भिनलेला असतो. अगदी सहजपणे कुणीहि त्यात सहभागी होते.
असे कार्यक्रम बघुन, आपल्याकडेहि समुहनृत्याची किती समृद्ध परंपरा आहे, ते जाणवते.


Deepanjali
Saturday, December 23, 2006 - 7:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Wow सहीच वाटत आहे मराठी बाणाची झलक .
अशोक हांडे च्या programs चे presentation नेहेमीच उच्च असते .
असे shows येत नाहीत का US ला:-(
बाकी मला पण असेच वाटते कि आपल्या कडे वाद्य वृंद , लोकसंगीताचा खजिना भले इतरांपेक्षा कित्येक पटींनी जास्त असेल पण वर metion केलेले dance forms, e.g. वासुदेव , कडक लक्ष्मि , भिल्ल - धनगर नृय्त्य , लावणी , कातकरी नृत्य हे ठराविक समाजा पुरते किंवा ठराविक कलाकारां पुरते मर्यादित आहेत .
आणि दुसरीकडे पंजाब मधले भंगडा - गिध्दा - डंकारा - लुड्डी - धमाल - जागो - झुमर - किकली हे dance forms सामन्य जनते मधील स्त्री पुरुषांसाठी आहेत म्हणून ते dances पिढ्यां पिढ्या तितकेच किंवा जास्त लोकप्रिय होत आहेत !
आपल्याकडे सर्व सामान्य लोकांनी लेझिम - मंगळागौर हे प्रकार वापरले पण हे ही dance forms सहज कुठल्याही समारंभा मधे दिसत नाहीत .
भांगडा - गरबा हे सर्रास कुठल्याही celebrations ला दिसतात .
अर्थात या dances मधेही किती तरी अवघड steps आहेत पण सामान्य लोकांना झेपतील अशा सोप्या steps पण आहेत .
महारष्ट्रा बाहेर लोकांना आपली लावणी माहित असते पण actual फ़डा वरची - बैठकिची लवणी perform करणार्‍यांना समाजात कितपत प्रतिष्ठा आहे ?
जिथे लावणी पहायला लोक जातात तिथे बायका जातात का ?
तसे गरबा किंवा भांगडा प्रकरांचे मात्र नाही .
नवीन पिढी ला appeal होतील अशी disco bhangra, disco dandiya अशी versions ही आली आणि प्रचंड लोकप्रिय झाले / आहेत .
शिवाय UK based भंगडा groups नी bhngra hip hop, remix वगैरे versions काढून ते इतर western countires मधेही popular केले आहेत .
म्हणून जग भर सगळी कडे हे dance forms जास्त लोकप्रिय आहेत / माहित आहेत असे मला तरी वाटते .
अर्थात अशोक हंडे सारखे लोक मराठी dnce forms लोकां पर्यंत पोचवत आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे !
नाही तर शहरां मधे तर दारावर वासुदेव वागैरे traditions आज काल hardly पहायला मिळतात .. मला तर लहानपणी वासुदेव यायचा ते आठवतय पण त्या नंतर कधी च पाहिले नाही !


भांगडा पण काय तर फक्त ढोल
<<<<ढोल तर must आहे पण त्या बरोबर एकतारा , तुंबी , चिमटा ही पण traditional वाद्यं आहेत .

Mbhure
Tuesday, January 30, 2007 - 6:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल VCD वर नटसम्राट बघितले. ज्यांनी मुळ नाटक (लागू किंवा भट सादर केलेले) बघितले नसेल तर त्यांच्यासाठी हा VCD संच म्हणजे दुधाची तहान... म्हणत येईल. ह्यातील डॉ. लागूंचा नटसम्राट खरोखरीच थकलेला आहे. " ती " गाजलेली स्वगते त्यामुळे तेव्हढी ईफेक्टीव वाटत नाहित. तरीही लागूंनी ती (वयाचा विचार करता) चांगली म्हटली आहेत. फक्त ही स्वगते SPOT LIGHT मध्ये नसुन, वेगळ्या फ्रेममध्ये घेतली आहेत त्यात Continuity तुटते. ज्योती सुभाषने " सरकार " सादर केली आहे. ज्यांनी शांता जोग यांचे काम पाहिले आहे त्यांना ही सरकार फारच फिकी वाटेल.

शेवटच्या प्रसंगात फुटपाथ दाखवताना निळे फडके टाकुन तो दाखवला आहे. असे का केले आहे कोणजाणे.

जे पहिल्यांदा बघणार आहेत त्यांनी डोळे उघडे ठेऊन बघावे आणि ज्यांनी पुर्वी पाहिले आहे त्याणी डोळे उघडे ठेवावे आणि मनानी भुतकाळात जावे.

थोड्याफार त्रुटी असल्या तरी शेवटी " नटसम्राट " ते नटसम्राट.


Prashantkhapane
Thursday, February 22, 2007 - 1:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mi hi kahi Natake pahili.

1. Sahi re Sahi: Khup duwasanchi ichcha hoti. Natakat arthaat Bharat Jadhav la author backed role ahe...ani tin tin bharat stage var sadar karnyaachi kasarat atishay chan hataLli ahe. Ekun dhamaal natak, saha kutumb pahave ase.
2. ManoMilan: Ashok saraf chya navat ajun kiti shakti ahe he hya nataka mule kalale. Kolhapuraat 2 tasaat sarv ticket sampli. Pan mala tyaacha peksha jawaai che (kulkarni) kaam kelelya kalakarache kaam khup avdle. Mage stage var AS la pahnyaa sathi tufaan gardi hoti ani mi hya kalakarala bhetaayla gelo. Utkrustha kalakar ani vyakti.
3. Arthat VCD var Natasmrat ani RananGan. Hya var udya parwa lihin.

Adi787
Tuesday, February 27, 2007 - 6:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल "रंग्या रंगीला रे" बघितले... छान आहे नाटक. संजय नार्वेकर एकदम झक्कास आहे.

Shrini
Monday, May 21, 2007 - 4:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल 'सोहम कोहम च्या गोष्टी' पहायचा योग आला. साधारण महिन्या दीड महिन्या पूर्वीच याचे परीक्षण वाचल्याने, आणि यातल्या व्य्क्तीरेखा, पु. ल., सुनिताबाई, जी. ए. आणि माधव आचवल, यांच्यावर बेतलेल्या असल्याने हे कधीतरी पहायचा निश्चय केला होता, तो काल फळाला आला.

हे नाटक मला काहिसे ० ते १८० अंशांमध्ये चढून उतरत जाणार्‍या 'साईन वेव्ह' सारखे वाटले. सुरुवातीपासून नाटक चढत गेले आणि मध्यंतराला कळसाला पोचले, पण मग त्याची उतरण सुरु झाली आणि शेवट थोडासा निराश करणारा वाटला.

उपरोल्लेखित व्यक्तींचे साहित्य ज्यांनी वाचले असेल त्यांना या नाटकात फारसे नवे काही आढळणार नाही, तरीही या सर्व व्यक्ती आपापसात कशा बोलत असतील, कसे हिरीरीने वाद घालत असतील, आणि तरीही मैत्री जपत असतील हे पाहणे म्हणजे एक आनंददायक अनुभव आहे. यांचे साहित्य जितके अधिक वाचले गेले असेल तितकाच हा पुनःप्रत्ययाचा आनंद अधिक!

लेखक दता दंडगे यांनी अतिशय अभ्यास करून आणि वरील सर्व व्यक्तींना समजून घेऊन हे नाटक घडवले आहे. याबद्दल त्यांचे खास अभिनंदन! तितकेच श्रेय दिग्दर्शक अनंत कान्हो यांचे!

नाटकातील पात्रांमध्ये, श्री. के. (पु. ल.) झालेले अजित चाफळकर लाजवाब. हुषार आणि उमद्या मनाचा स्वप्रसन्न माणूस त्यांनी झकास साकारला आहे. सवित (सुनिताबाई) करणार्‍या मंजिरी परांजपेही सुंदर. कुवत असूनही कायम पडद्या आड राहिलेल्या, आणि इतर आपल्या मूल्यांप्रमाणे वागत नाहीत म्हणून तडफडणार्‍या बुद्धिमान स्त्री चा अभिनय सुरेख.
दिवाकर (जी. ए.) झालेले दिलीप कोल्हटकर यांचेही काम सुरेख. अति बुद्धीमान, ज्याला 'अंतिम सत्य' कळले असावे असा, तरीही तिरसट, इतरंच्या भावनांची पर्वा न करणारा आणि थोडासा विक्षिप्त सहित्यिक त्यांनी उत्तम उभा केला आहे.
मात्र माधव आचवल साकारणार्‍या मोहन माडगूळकर यांनी निराशा केली. इतर पात्रांचा अभिनय नैसर्गिक, सहजसुंदर वाटला, पण मो. मा. मात्र एक 'बेअरींग' घेऊन वावरत आहेत हे कायम जाणवत राहीले.

मिळत असेल तर जरूर बघावे असे हे नाटक आहे!



Cool
Tuesday, May 22, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या रविवारी बर्‍याच दिवसांनी मोकळा वेळ कसा घालवावा असा प्रश्न पडला होता त्यामुळे आता मिळेल ते नाटक बघावे असे ठरवुन बालगंधर्व ला गेलो आणि 'एक डाव भटाचा' हे नाटक बघितले. या नाटकाला म.टा. सन्मान पुरस्कार मिळाल्याचे ऐकले होते, तेंव्हा साहजिकच उत्सुकता होती. नाटक चांगले होते,पण तरिही अपेक्षेपेक्षा जरा कमीच. काही विनोद खळखळून हसवणारे होते, संवादातुन कोट्या आणि प्रासंगिक विनोद यांचा उत्तर वापर केला होता. पण तरिही द्वैअर्थी संवादाची लयलुट असल्याने नाटक मनातुन उतरत गेले. एकुणच अशा संवादा शिवाय विनोद निर्मिती होउच शकत नाही असा लेखकाचा गैरसमज दिसला. काही काही जागा मात्र हमखास हसवुन गेल्या. सर्वच कलाकारांचा अभिनय आवडला, विशेषतः 'बबन' नावाची व्यक्तिरेखा साकारणार्‍या तरुणात मस्त रंग भरला. दुसरिकडे तांत्रिक बाबतील काही चुका टाळता येउ शकल्या असत्या. दोन प्रवेशाच्या मध्ये विंगेतला मोठा दिवा सुरूच ठेवल्यामुळे रंगमंचावर केल्या जाणार्‍या गोष्टी प्रेक्षकांना दिसत होत्या. एकुणच नाटक 'ठीक' या सदरातील होते, पण पुरस्कार वैगरे मिळवण्यासारखे तर नक्किच नाही वाटले. सहकुटूंब वैगरे बघण्यासारखे नाही पण टाइमपास म्हणुन एकट्यानेमित्रांसोबत बघण्यासाठी बरे आहे. (अर्थात मी एकटाच गेलो होतो).

Gs1
Tuesday, May 22, 2007 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे किती कमाल. मला कसा दिसला नाहीस. मी उसगावातून आलेल्या एका मित्राला एखादे नाटक बघायचे होते म्हणून नेमके म.टा. सन्मान हेच वाचून या नाटकाला गेलो. किती फालतू नाटक ! आणि लोक त्या आचरटपणाला हसत काय होते ते कळलेच नाही. ड दर्जाचे विनोद आणि त्यात सर्व कलाकार काय कर्कश्श ओरडत होते आणि किती ते अंगविक्षेप. असह्य झाल्याने मध्यंतराच्या आधीच उठुन आलो आणि मग त्याच्या शिव्या खाल्ल्या.
एक डाव भटाचा. कोणी पैसे दिले तरी बघू नका हे नाटक.


Robeenhood
Tuesday, May 22, 2007 - 3:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठी नाटकातील पात्रे , बहुतेक सर्वच पात्रे कर्कश्श्पणे का ओरडत असतात हे मला कधीच कळले नाही...आता एवढ्या सेन्सिटीव्ह साऊन्ड सिस्टीम आल्यात तरी यांची राष्ट्राला उद्देशून भाषणे का चालू असतात काही समजत नाही... हा रोग पूर्वी मराठी सिनेमाला होता आता तिथे बरे चालले आहे!

Ajjuka
Thursday, June 14, 2007 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोकहो.. कृपया हे वाचा
/hitguj/messages/34/1456.html?1181757647#POST958359

Ajjuka
Friday, June 15, 2007 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही तिथे पोचलो. फलक आणि घोषणा होत्याच. निषेधाचे काळे झेंडे फडकवले गेले. दामू केंकरे, अरूण काकडे, सुलभा देशपांडे, विजय तेंडुलकर, प्रेमा साखरदांडे, आशा दंडवते, जब्बार पटेल, वामन केंद्रे, विनय आपटे, शफाअत खान, चेतन दातार, राजन भिसे, विजय केंकरे असे अनेक रंगकर्मी तिथे होतेच. जयंत पवार, कमलाकर नाडकर्णी, अशोक राणे, पुष्पा भावे इत्यादी पत्रकार पण होते. नाट्यपरीषदेने पहिल्या पासूनच समांतर/प्रायोगिक आणि बालरंगभूमीकडे तिरप्या नजरेनेच पाह्यले आहे. आणि आता वेळ आली आहे समांतर रंगभूमीचे अस्तित्व पटवून देण्याची असं पुष्पा भावे म्हणाल्या. मुळात २० वर्षापूर्वी ही जागा समांतर व बाल रंगभूमी ला देण्यात आली होती. ती नंतर नाट्यपरीषदेने घेतली आणि समांतर/बाल रंगभूमी साठी एक वेगळा विभाग करायचे ठरले. आणि मग नाट्यसंकुल उभे राह्यले. आता समांतर साठीची जी जागा होती ती मातोश्री बिल्डर्स ला भाडेतत्वावर मॊलसाठी देण्यात आली आहे. ह्याचा विरोध अखेरपर्यंत केला पाहिजे हे सुलभा देशपांडे व इतर अनेकांनी सांगितले. हे सगळं चालू असताना जोरदार पावसाची सर आली तरीही कुणावर काहीही फरक पडला नाही. मोहन जोशीं छद्मी पणे हसत आले आणि त्यांनी निर्लज्जपणे तेच उत्तर दिलं आणि पळून गेले. हिंदी व इंग्रजी नाट्यजगतातले अलेक पदमसी, नादिरा बब्बर, फिरोझ खान (बॊलिवूड वाला नव्हे) दिनेश ठाकूर असे अनेक ज्येष्ठ रंगकर्मी आले होते. मराठी रंगभूमी विशेषतः मराठी प्रायोगिक रंगभूमी ही भारतीय रंगभूमी चं पहिलं पान आहे. आन-बान-शान आहे. तिच्यासाठी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. एक हाक घाला आम्ही येऊ. असं सर्वांनी सांगितलं.

पुढची मिटींग आविष्कार मधे आहे २३ तारखेला.

Mandard
Friday, June 15, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही बातमी आज सकाळ मधे वाचली. मोहन जोशींसारख्या मोठ्या कलाकाराकडुन अशा भाषेची अपेक्षा नव्हती. आंदोलनात ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकार पण होते. त्यांच्यासमोर दादागीरीची भाषा वापरणे योग्य नाही. अर्थात मोठा कलाकार चांगला माणुस असेलच असे नाही.

Zakasrao
Friday, June 15, 2007 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज पेपर मधे बातमी वाचली कि मोहन जोशी पळुन गेले. हे नेमकी काय भानगड आहे? समांतर आणि व्यावसाइय्क ह्यानी न भांडता एकत्र राहिल तर चांगलच आहे ना!

Ajjuka
Friday, June 15, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात ती जागा समांतर व बालरंगभूमीसाठी दिली होती. मंजूर झाली होती. ती काढून नाट्यपरीषदेला देण्यात आली. तेव्हा समांतरच्या लोकांना बरोबर घेऊन एक रफ आराखडा निर्माण करण्यात आला ज्यात समांतर नाटकांसाठी तालमीची जागा, प्रयोगाची जागा, वर्कशॉपची जागा इत्यादी गोष्टी होत्या. त्यावर विश्वास ठेवून समांतरवाल्यांनी आपला हक्क नाट्यपरीषदेला देऊन टाकला. नाट्यसंकुल उभे राह्यले. आता जोशी म्हणतात कर्ज आहे त्यामुळे समांतर साठी जी जागा त्या आराखड्याप्रमाणे ठरवली होती ती जागा भाडेतत्वावर मातोश्री बिल्डर्स ना मॉल साठी देण्यात आली. समांतर व बालरंगभूमीच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. वर मखलाशी अशी की तुम्हाला जाग देऊन तुम्ही काय दिवे लावणार आहात? समांतर रंगभूमीचे आस्तित्व, योगदान आणि गरज नाकारण्याचा खेळ नाट्यपरीषदेने चालवलाय. हे किती दिवस आणि का सहन करायचं? आम्ही उत्कृष्ट दर्जा असलेली नाटकं देतो. पण नाट्यगृहांची भाडी परवडत नाहीत त्यामुळे आम्हाला माहिमच्या शाळेत किंवा तत्सम गैरसोयीच्या जागीच आपले प्रयोग करावे लागतात. तालमीची जागा हे तर सगळ्यात मोठ्ठे संकट आमच्यापुढे असते. त्या अभावी कुणाच्या तरी घरात तालमी करव्या लागतात अनेक गोष्टींवर त्यामुळे बंधने येतात. तरीही दर्जा असतोच. हे का आणि किती दिवस?
वाद हा आहे. व्यावसायिक वरचे कलाकार, तंत्रज्ञ घडवणारी समांतर रंगभूमी ही प्रयोगशाळा आहे. पण उत्तम धंदा करेलच याची खात्री नाही म्हणून नाट्यपरीषदेला तिचे अस्तित्व मान्य नाही.(व्यावसायिकवर येणरी सर्व नाटके उत्तम धंदा करतात हे त्यांनी मांडलेले एक चुकीचे गृहितक)
हे कधीतरी थांबले पाहिजे की नाही?


Bee
Friday, June 15, 2007 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, इथे समांतर म्हणजे काय.. मला नीट कळले नाही..

Dineshvs
Friday, June 15, 2007 - 2:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, तुझ्याकडुनच हि माहिती मिळेल. हे मोहन जोशी कधीही समांतर चळवळीत नव्हते का ? ते थेट व्यावसायिक रंगभुमीवरच आले का ? त्याशिवाय असले वर्तन शक्य नाही.

Shravan
Saturday, September 22, 2007 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


सखाराम बाईंडर

नाटककार- विजय तेंडुलकर
दिग्दर्शन- संदेश कुलकर्णी
प्र. भुमिका:-
सखाराम- सयाजी शिंदे.
लक्ष्मी- सोनाली कुलकर्णी.
चंपा- चिन्मई सुमीत.

सखाराम बाईंडर– बघून संपवलं मात्र त्यामधल्या व्यक्तिरेखा तशाच फेर धरून मनात नाचत राहिल्या. रुढार्थाने नायक नायीका, खलनायक अशा ठळकपणे विभागल्या न जाणार्‍या पात्रांमधून माणसाच्या जगण्यामधलं, व्यक्तिमत्वामधलं द्वंद्व अतिशय गडदपणे, ठशीव स्वरुपात नाटकातून अंगावर येतं.

सखाराम- नाटकामधलं मध्यवर्ती पात्र. ‘आपण कुणाचं देणं लागत नाही. आपण जे करतो ते छाती ठोकपणे सांगण्याची तयारी ठेवतो. आपण जेव्हापर्यंत कुणाचं वाईट करत नाही तोपर्यंत देवाच्या बापाची पण आपल्याला हात लावण्याची हिम्मत नाही’ असं तत्वज्ञान घेऊन जगणार्‍या सखारामचं व्यक्तिमत्व भयंकर पारदर्शी वाटलं मला विवाह संस्था या माणसाला मान्य नाही. नवर्‍याने सोडल्यावर निराधार झालेल्या स्त्रीयांना करारानुसार घरी ठेऊन घेताना हा त्या नवर्‍यांबाबतचा आणी तरीही त्याच नवर्‍यांना देव मानणार्‍या बायकांबाबतचा त्याचा रोषही प्रकट करतो. आशी परस्पर पुरक नसलेली विवाह संस्था अमान्य करणारा हा सखाराम मात्र विवाहामधून येणार्‍या जबाबदार्‍या, बंधने स्विकारू इच्छीत नाही असे वाटत रहाते. स्वत:च्या विकृती, स्वभावाच्या खोचक कांगोर्‍यांची कल्पना असल्याने अशा जबाबदार्‍या टाळणारा सखाराम खरा कि विवाह संस्थेच्या फोलपणा काही उदाहरणांवरून देऊन ती व्यवस्था नाकारणारा सखाराम खरा हा प्रश्न सलत राहतो.
ठेवलेल्या बायकांना बेदम मारणारा सखाराम, ठरलेल्या करारानुसार बाईला सोडतानाही व्यवहार चोख ठेवणारा सखाराम्; रात्री अपरात्री लक्ष्मीला वेदना देऊन हसायला लावणारा विकृत सखाराम, लक्ष्मीच्या सच्छील वृत्तीपुढे पराभव स्विकारून स्वत:मध्ये बदल करु इच्छीणारा सखाराम्; लक्ष्मीनंतर आलेल्या चंपाच्या सौंदर्यामुळे वेडा झालेला सखाराम, मात्र लक्ष्मी च्या पुन्हा घरात येण्याने त्याच चंपापुढे पावणेआठ’ ठरलेला सखाराम.. . अशी त्याची परस्पर विरोधी व्यक्तिमत्वे पुन्हा पुन्हा आपल्यावर येऊन आदळतात.सखारामचा सगळा त्रास सहन करूनही त्याला मनाने आपला मानलेल्या अ तशाच वृत्तीने त्याच्या बरोबर राहणार्‍या लक्ष्मीपुढे हा मुजोर सखाराम कुठेतरी हतबल होतो आणी एकंदरीतच शारिरीक गरजांपेक्षा पुढच्या माणसाच्या भावनीक गरजांबद्दल ही आपल्याला विचार करायला भाग पाडतो.

लक्ष्मी– ही सखारामने करारानुसार ठेवलेली सहावी स्त्री. ही खरेच कशी आहे? परिस्थितीपुढे हतबल होऊन सखारामचे अत्याचार सहन करुन त्याच्या बरोबर राहणारी आगतीक कि परिस्थितीनुसार स्वत:चे विश्व यश्वस्वीरित्या बदलवून त्यात समाधानाने राहणारी समर्थ स्त्री? सखारामने व एकमेव आधार असलेल्या पुतण्याने घराबाहेर काढल्यावर पुन्हा सखारामकडे जाणारी लाचार कि आत्महत्येचा पर्याय स्पष्ट पणे नाकारणारी आत्मभान असणारी स्त्री? हिच्या देवावरच्या श्रध्देने तिच्यामध्ये बरेच सामर्थ्य निर्माण केले आहे असे मला वाटते. या श्रध्देच्या जोरावरच ती सखारामबरोबरचे राहणे तडजोड म्हणून नाही तर मनापासून स्विकारू शकली असली पाहिजे. सखारामचा विरोध असतानाही केवळ चंपाने दिलेल्या फटीतून घरात थारा मिळालेली लक्ष्मी पुन्हा जाण्याची वेळ येते तेव्हा चंपाच्या बदफैली विषयी सखारामला सांगते. हि स्त्री सुलभ द्वेष भावना की सखारामविषयीची तिची काळजी? असे अनेक प्रश्नांचे कांगोरे मला लक्ष्मी विषयी विचार करताना रुतत राहतात.

चंपा– लक्ष्मी नंतर सखारामच्या घरात आलेली स्त्री. लक्ष्मीच्या एकदम विरोधी व्यक्तिमत्व! बेहद्द सुंदर! मात्र ऊमलत्या वयात नवर्‍याच्या विकृतीने चोळामेळा होऊन गेलेली! अत्यंत विकृत अनुभवांमुळे स्त्री पुरुष संबंधांना विटलेली चंपा केवळ दारुच्या नशेतच सखाराम बरोबर रत होऊ शकते. मात्र जगाला चावून खाणारा सखाराम लक्ष्मीसमोर हतबल होतो याची जाणीव चंपाला होते. तशी ती त्याला सुनावतेही! अशी स्त्रि पुरुष संबंधांना विटलेली चंपा दाऊद कडे कशी आकृष्ट होते हा प्रश्न मात्र पडतो. (हा भाग नाटकात पुरेसा स्पष्ट होत नाही. केवळ ऊल्लेखाने येतो). कि त्याच्यात तिला तिच्या भावनांना हिंदोळ्यावर घेऊन उंचावर नेणारा पुरुष भेटतो?

नाटकात इतर दोन पात्रेही डोकावतात. सखारामचा मित्र दाऊद आणी चंपाचा भ्रमिष्ट झालेला नवरा, शिंदे!

एकंदरीतच स्त्री पुरुष संबंधावर, त्या अनुषंगाने विवाह संस्थेवर हे नाटक भाष्य करतं. माणसाच्या आदिम प्रवृत्ती आणी सामाजीक व्यवस्था स्विकारलेला माणूस यांच्यामधला कलह हे नाटक यशस्वीरित्या मांडतं.




Hkumar
Sunday, October 14, 2007 - 11:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'तुझ्याविना' पाहिले. गिरिश ओक, विरेंद्र प्रधान व स्मिता सरवदे यांची कामे चांगली आहेत. नवरा बायकोची भांडणे व त्यापायी त्यांच्या लहान मुलाची होणारी मानसिक फ़रफ़ट चांगली दाखवली आहे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators