Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मोहब्बते

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » मोहब्बते « Previous Next »

Farend
Tuesday, January 22, 2008 - 3:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसा हा सुपरहिट चित्रपट आहे आणि काही गोष्टी बघण्यासारख्या होत्या त्यामुळे 'वैताग मीटर' इतर 'जिस्म' वगैरे सारखा वर चढत नाही, पण तरीही काही शॉट्स महान आहेत.

यात मुख्य हशा पिकतो ते तीन उपनायक आणि तीन उपनायिका दाखवताना. 'उप' सुद्धा म्हणणे कठीण आहे कारण अमिताभ, शाह रूख, ऐश्वर्या असे करत करत यांच्या पर्यंत येता येता किती "उप" लावायला लागतील सांगता येत नाही. बहुधा Rebel without a cause आणि Grease नंतर हिंदी चित्रपटांतीलही तरूण स्टार्स चा (विशेषत: लॉन्च करणारा रोल असेल तर) जीन ची पॅंट आणि लेदर जॅकेट हा गणवेष झाला आहे, तो येथे ही दिसतो. एन्ट्र्या साधारण सारख्याच, प्रत्येक जण एका गाडीतून स्टेशन वर उतरतो, पण उदय चोप्रा हा दिग्दर्शकाचा खास आदमी असल्याने त्याचे काहीतरी वेगळेपण दाखवायचे म्हणून तो मालगाडीच्या डब्यातून येतो असे दाखवले आहे. एरव्ही पूर्ण प्रवासी डबे असलेल्या गाडीला सुद्धा उत्तर रेल्वे खास उदय चोप्रा येणार म्हणून इंजिनापासून तिसर्‍या चौथ्या डब्या ऐवजी एक वॅगन लावते येथे.

प्रत्येकाच्या आणि प्रत्येकीच्या एन्ट्रीला मात्र कॅमेर्‍याकडून त्याच्या किंवा तिच्या मागच्या दिशेला जोरदार वारा नेहमी वाहत असतो. एकदा तर ती प्रीती आणि जिम्मी शेरगिल पहिल्यांदा भेटतात तेव्हा दोघे समोरा समोर असले तरी दोघांच्या 'पुढून मागे' वारा वाहत असतो. तसेच सारखी ती मेपलची वाटणारी पाने इकडून तिकडे उडत असतात. दिग्दर्शकाला बहुधा "light, camera, fan, leaf blower, action" म्हणावे लागत असेल प्रत्येक वेळी :-) एकवेळ अनेक टेस्ट खेळलेल्या कप्तानांना आपल्या स्विंग बोलर ला बोलिंग देताना वार्‍याची दिशा कळणार नाही पण या हीरॉइन्स कधी वार्‍याची दिशा चुकणार नाहीत एन्ट्री घेत असताना.

या तिघांना मुली सापडणे, त्या आवडणे, त्यांचे प्रेम जमणे, मोडणे, परत जमणे हे सगळे एकाच वेळेला क्रमा क्रमाने होते. तीन जोडपी दाखवायची असल्याने प्रत्येक गोष्ट एकाच्या बाबतीत दिसली की आता इतरांचीही दिसणार हे आपल्याला कळून चुकते आणि आदित्य चोप्राही न कंटाळता असे प्रत्येक शॉट दाखवत राहतो. एकाला एक मुलगी दिसली की लगेच दुसर्‍याला आणि लगेच तिसर्‍याला आप आपल्या त्या नाट्यमय पद्धतीने सापडणार. एका ला प्रेमात अडचण आली की लगेच गावभर प्रेमभंगाचा सीझन. पहिल्यांदा जेव्हा 'मोडणे सिक्वेन्स' होतो त्यानंतर त्यांना शाह रूख उपदेश पाजतो की त्याने कसे नाउमेद व्हायचे नाही. बरोबर आहे, अशा स्थितीत त्यांना शाह रूख पेक्षा दुसरा आणखी गुरू कोण मिळणार? कारण त्याला प्रेमात मुलीचे दुसर्‍यावर प्रेम आहे (कभी हॉ कभी ना? किंवा डर), दुसर्‍याशी साखरपुडा चालू आहे (दिलवाले किंवा कुछ कुछ मधे काजोल), किंवा दुसर्‍याशी लग्न झाले आहे (अन्जाम मधे माधुरी) अशा क्षुल्लक बाबींनी मुलींचा नाद सोडून देण्याची सवय नाही :-)

त्या प्रीतीची ती स्टेशन जवळ दिवा घेऊन जाण्याची ती भानगड नीट कळाली नाही. हिंदी चित्रपटात कोणताही मिलिटरीतील माणूस सर्व काही यथासांग करून मग लष्करात गेलाय आणि व्यवस्थित परत आलाय असे बघितले आहे का? (तसेश 'खान चाचा' नाव असलेला माणूस किंवा 'जेनी ब्रिगॅंझा' नाव असलेली गोव्याची वाटणारी 'लेडी' स्वभावाने वाईट असलेले?) येथे त्या प्रीतीचा नवरा लग्नाच्या दिवशीच सीमेवर जातो. दुसर्‍या दिवशी जाणे एक वेळ मिलिटरीला चालेल पण हिंदी चित्रपटात त्याच्या बायकोला पुन्हा नाचता, गाता आणि कोणाशी तरी पुन्हा प्रेम वगैरे करू द्यायचे असेल तर चालणार नाही. तो तेथे गायब झाल्याने तो मेला असेच सगळे समजत असतात पण (त्याचे वडील) अमरिश पूरी अजूनही मानायला तयार नसतो. त्याने एवढे हिंदी पिक्चर पाहिलेले व स्वत: अनुभवलेले असल्याने साहजिकच त्याला माहीत असते की 'गायब' झालेला हीरो नंतर कधीतरी उपटतोच. जर त्याला पुरला ('डॉन'), जाळला ('कस्मे वादे') किंवा त्याचा हार घातलेला पुतळा दाखवला ('दिल एक मंदिर'. चित्रपटात हीरोंचे पुतळे नेहमी अर्धपुतळे असतात. पूर्णाकृती दाखवले तर पुतळा कोणता आणि तो हीरो कोणता असा प्रश्न बर्‍याच अभिनेत्यांच्या बाबतीत प्रेक्षकांना पडेल :-) ) तरच तो मेला हे सिद्ध होते. मग एका प्रसंगात सर्व जण काही कारणाने नाचत असतात. किंवा काही कारण नसेलही, चोप्राच्या पिक्चर मधे नाचायला काय कारण लागते का? पण ही बया जाऊ शकत नाही. मग अमरिश पुरीला उपरती होते आणि तो येऊन तिचे कुंकू पुसतो. मग ही जाते त्यांच्यात. हा सीन जरा नीट दाखवला असता तर युद्धातून परत न आलेल्या नवर्‍याची दोन वर्षे वाट पाहून शेवटी सगळे म्हणतात त्याप्रमाणे तो आता येणार नाही हे मान्य करून त्याचा इफेक्ट ओसरल्यावर जो आता आवडू लागला आहे त्याच्याबरोबर एन्जॉय करणारी व्यक्तिरेखा दिसली असती. पण सगळे पटकन दाखवण्याच्या नादात तो शॉट असा होतो की अमरीश पुरी येऊन तिचे कुंकू पुसतो आणि लगेच ही एकदम खुषीत नाचायला आणि गायला निघून जाते!

एकूण अमिताभ सुपर (तेवढे संस्कृत प्रचूर हिंदी सोडले तर. ते सलीम जावेद व कादर खान च्या जमान्यातील त्याचे आम आदमीवाले पण दणकेबाज हिंदी कोठे गेले?), शाह रूख सुद्धा मस्त, हे तीन उपहीरो बघणेबल आणि ऐश्वर्याला फक्त प्रेमळ मुलगी दिसण्याचेच काम असल्याने ओके पण बाकी तिघी वाईट बोअर करतात. ती किम का कोण आहे तिचे हिंदी तर ऐकवत नाही. बरेचसे कथानक त्या न्यू यॉर्क च्या ग्रॅंड सेंट्रल सारख्या हॉल मधे घडते, सगळे पंजाबी डान्स ही. मात्र ती गाणी 'दिलवाले...' वगैरेंच्या कोरस पीस मधून वगळलेले तुकडे गाणी म्हणून वापरलेत अशी वाटतात. 'हमको हमी से चुरा लो...' हे गाणे बर्‍यापैकी लिहिले आहे आणि 'दिलवाले...' सारखा लता चा आवाज येथे लागला नसला (जरा थकलेला आवाज वाटतो) तरी श्रवणीय आहे. त्यातील काही ओळी बघता हे लताने गायला पाहिजे पण पडद्यावर हे शब्द pull off करू शकेल अशीच अभिनेत्री पाहिजे. त्या मडमांची ती लायकी वाटत नाही, त्यामुळेच निदान ऐश्वर्यावर हे गाणे चित्रीत झालेय हे बघितल्यावर म्हंटले ठीक आहे.

नफ़रत को मोहब्बत मे कंव्हर्ट करनेवाले सीन्स तर मजेदार आहेत. एखाद्या व्यक्तीची प्रत्यक्षात काहीही चूक दिसत नसताना केवळ तो हीरो नाही म्हणून त्याची फजिती करणे ही एक आदित्य चोप्राची खासियत दिसते (दिलवाले मधला तो मंगेतर आणि येथे त्या किम शर्माचा तो बॉयफ्रेंड). येथे एका पूलसाइड पार्टीमधे किम शर्माला तो 'दीपक' उचलून पाण्यात टाकतो आणि इतका वेळ हाय फाय असलेल्या किम ला फक्त पाण्यात पडल्यावर एकदम आपली संस्क्रुती वगैरेचा साक्षात्कार होतो. मग हीरो ने (भुतासारखा चेहरा करून पाण्यात) येऊन आपले जॅकेट काढून तिला घालणे वगैरे सोपस्कार होतात.

आमच्या कॉलेज मधे दोन नग होते त्यांचे एका परिक्षेत एक सोडून सर्व विषय 'राहिले' होते. त्या एका विषयात त्यांच्यापैकी एकाला १०० पैकी ५७ व दुसर्‍याला ५६ मार्क होते. तर ५७ वाल्याने दुसर्‍याकडे बघून तुच्छतेने 'हूं' असे केले :-) त्याची आठवण मला हा पुढचा, आता उदय चोप्रा चा नफ़रत टू मोहब्बत शॉट बघून झाली. ती शमिता शेट्टी उदय चोप्रावर रागावते कारण म्हणे तो एक तोकडे कपडे घालून नाचणार्‍या मुलीकडे बघत बसतो. वास्तविक ती नाचणारी मुलगी आणि शमिता यांच्या कपड्यात काय तो २-४ धाग्यांएवढाच फरक असतो. मग तो तिला म्हणणार की तुम उसके जैसी नही हो सकती, ती चॅलेंज स्वीकारणार (१ सेमी कपडा कापायला किती वेळ लागतो), मग उदय नुसता बसलेला असताना एकदम तो दोन्ही दिशांना वाहणारा वारा, उडणारी पाने वगैरे आणि मग ती एक शाल गुंडाळून येते. मग ती शाल काढल्यावर कळते की ती 'उसके जैसी' झालेली असते. मला तर आधीची शमिता आणि ही यात काहीच फरक दिसला नाही.


Maitreyee
Tuesday, January 22, 2008 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुफ़ान रे फ़ारेन्डा, लय हसलेय!

Karadkar
Tuesday, January 22, 2008 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्यो शिणुमा पायला अन म्या समदं हिन्दी शिणुमे पायचे सोडुन दिले!

लय भारी लिवलय हो!


Mahaguru
Tuesday, January 22, 2008 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदम भन्नाट! मस्त लिहिलय.
पुढच्या प्रत्येक चित्रपटाचे समिक्षण लिहिताना वैताग मिटर च्या रिडींग पासुनच चालु कर.


Slarti
Tuesday, January 22, 2008 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारेंडा, धमाल लिहीलयस ... ... ...

Psg
Tuesday, January 22, 2008 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खीखी.. शेवटचा शमिताचा पॅरा.. अनुमोदन! सही लिहिला आहेस
बाकी, इतकी जत्रा असूनही चित्रपट अगदी फ़ालतू आहे..
शाहरूख नेहेमीप्रमाणे माना हलवत, डोळे बळंच आभाळाकडे लावत बोलतो, अमिताभ बळंच अति-स्ट्रिक्ट दाखवलाय.

ऍश आत्महत्या करते तो सीन तर कळस आहे.. बापाची किती काळजी तिला.. त्याला दूध, औषधं देऊन एखदी दुकानात सामान आणायला जाईल तशी ती आत्महत्या करायला जाते.. मूर्ख! इतकं प्रेम होतं तर बोलायचं ना आमने-सामने वडीलांशी! तिला 'मार्गदर्शन' करणारे भेटले नाही कोणी वाट्टं


Kashi
Tuesday, January 22, 2008 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-) :-) :-) kay hasale aahe....office madhle sagle hila bahudha ved laglay asha najre ne baghtat

Zakasrao
Tuesday, January 22, 2008 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


तुफ़ान लिहिल आहेस रे :-)



Badbadi
Tuesday, January 22, 2008 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच फ़रेंड!!! KANK बद्दल लिही ना कधी :-)

Monakshi
Tuesday, January 22, 2008 - 11:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे हे सहीच लिहिलं आहे फारेंड

शाह रूख सुद्धा मस्त

नशीब माझं. नाहीतर आजकाल बघावं तो सगळेच गरीब बिचार्‍या माझ्या शाहरुखला नाही नाही ते बोलतात. :-(


Manjud
Tuesday, January 22, 2008 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फारेंडा, ह ह पु वा अगदि....

Amruta
Tuesday, January 22, 2008 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त लिहिलयस रे. खरच अजब होता तो मुव्ही. आणि त्या किमचा पूल मधला शॉट बघुन मलाहि कळल नव्हता की बाबा काय फ़रक एवढा झाला की हिला अत्यंत लाज वाटावी.

Chinnu
Wednesday, January 23, 2008 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-):-):-):-) अमोल, ती किम लयी डोक्यात गेली होती! तो शमितावाला para. वाचून जाम हसले.
सहज दुकानात जाउन यावी तशी आत्महत्या..
पुनम खी खी खी :-)


Dakshina
Wednesday, January 23, 2008 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वास्तविक ती नाचणारी मुलगी आणि शमिता यांच्या कपड्यात काय
तो २-४ धाग्यांएवढाच फरक असतो. >>>
हे वाक्य सगळ्यात जबरदस्त.... हसून हसून पडले...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators