Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Maargdarshan karaa...

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » Maargdarshan karaa... « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 14, 200820 01-14-08  1:05 pm
Archive through January 15, 200820 01-15-08  9:34 am
Archive through January 18, 200820 01-18-08  7:23 pm
Archive through April 29, 200820 04-29-08  10:22 am

Bhagya
Sunday, June 22, 2008 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रश्न पुर्वी इथे विचारला गेल्याचं आठवत नाहीये...

मित्रमैत्रिणिंनो, माझी वय ८ व १० वर्ष असणारी मुले साधारण कुठली त्यांची कामे स्वत: करु शकतील?
ती ९ते ३ शाळेत जातात, आठवड्यातून दोन वेळा पोहणे, चेस, वाचणे, चित्रे काढणे आणि शक्यतोवर भारतातून आणलेल्या त्यांच्या level ची अभ्यासाची पुस्तके त्या त्या वर्षी पूर्ण करणे ह्या गोष्टी करतात.
पण आजकाल प्रत्येक ग़ोष्टीत टंगळ मंगळ करणे, दोनवेळा हाका मारल्या तरी लक्ष न देणे आणि आपल्या खोलीची स्वच्छता करायला कंटाळा करणे, कधी I don't care.... असे अगदी वैतागल्याप्रमाणे गाणे असे सुरु झालेय.
नेमका ह्याच वेळेला Office आणि घरी माझा कामाने अगदी पिट्टा पडलाय आणी PhD चा थेसिस लिहायला घेतलाय.
without being hard on the kids , कुठली आपली कामे या वयात ती करतात? rather कुठली कामे त्यांना सांगणे योग्य आहे?
आणि असे कंटाळल्याप्रमाणे वागणे हे common आहे का?


Sneha1
Sunday, June 22, 2008 - 6:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती कपड्यांच्या घड्या करू शकतील,जेवणाच्या वेळी टेबल लावू शकतील. तुला मेल केली आहे ती पहा...

Manuswini
Monday, June 23, 2008 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ट्रीक करु शकतेस भाग्या, ही माझी आई वापरायची आमच्यावर, बघ पटले तर.

रूम साफ़ करणे हा एक कसा गेम असु शकतो ते दाखवणे, म्हणजे
oh lets see how neat we can put bedsheets, oh how fast we can do three of us(you n 2 kids).
how neatly we can fold clothes etc etc.
त्यांच्या आवडीच्यी डीशेस बनवू असे Declare करायचे आपण आधीच आणि मग अशी काही वरची कामे कसे पटकन आवरले तर मस्त cookies बनवू वगैरे वगैरे.
kitchen मध्ये त्यांना थोडी थोडी मदत करायला लावणे अश्या वेळी.
घराच्या बाहेरच trash असेल तर फेकायला लावणे.


अश्याने बर्‍यापैकी healthy competition सुद्धा होते आपसात मुलांमध्ये.


Raviupadhye
Monday, June 23, 2008 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एक बयाच मोठ्या संस्थानाचा मुख्य अधिकारी म्हणून नव्याने साधारण दीड महिन्यापूर्वी भार संभाळला. आम्ही प्रेसेस वापरून कारचे पत्र्याचे पार्ट बनवतो.तीन दिवसापूर्वी काही तांत्रीक कारणामुळे तसेच कदाचित निष्काळजी मुळे एका कर्मचार्‍यास आपल्या उजव्या हाताच्या पन्ज्यास अपघातात गमावून बसावे लागले. नैतीक जबाबदारी माझी असल्याने माझे मन सारखे खात आहे.तसेच पूर्ण विश्लेषण केल्यावर आढळले की आणखी सखोल अभ्यास केला असता तर हा अपघात टाळता आला असता.परंतु हे इतकेच खरे की ही कार्य पद्धत गेली १५ वर्षे चालू होती. माझ्या दीड महिन्याच्या कालावधीत हे मी खरोखर्-प्रामणिकपणे सांगतो-शोधून काढणे अशक्य होते-हे एक मन म्हणते-दुसरे मन ते मानत नाही.
मी गेले कित्येक दिवस झोपलो नाही.
मानसिक व आर्थिक रित्या त्या सहकार्‍यास आयुष्यात पुन्: प्रस्थापित करण्याचा मी प्रण घेतला आहे. पण तरीही समाधान होत नाही.


Dineshvs
Tuesday, June 24, 2008 - 7:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवि, तूम्ही खुपच संवेदनशील आहात. तूम्ही तूमच्यातर्फ़े पुर्ण प्रयत्न केलेत, तरीही तो अपघात झालाच. अचानक होतो त्यालाच तर अपघात म्हणतात. कितीही काळजी घेतली तरी असे अपघात होतातच. ते टाळण्याच्या प्रयत्न आपण सगळेच करत असतो, पण ते पुर्णपणे टाळता येणे शक्यच नाही.
अपघाताची वारंवारता म्हणजेच प्रॉबॅबलिटी कमी करता येते, पण ज्याच्या बाबतीत तो घडतो, त्याच्या बाबतीत ती १०० टक्केच ठरते.
तूम्ही त्या मित्राला यापुढेही मदत करणार आहातच. खरे तर त्याला सावरणे हे तूमच्यासाठी खूप समाधानाचे ठरणार आहे.
विमान प्रवासात नेहमी सूचना देतात. की जर प्राणवायुची कमतरता भासलीच तर सर्वप्रथम स्वतःसाठी प्राणवायू घ्या आणि मगच इतराना मदत करा.
वरकरणी हा स्वार्थीपणा वाटला तरी तो तसा नाही.
ज्यावेळी तूम्ही स्वतः मानसिक रित्या सावराल त्याचवेळी मित्राला सावरु शकाल.
हि मदत करताना, अपराधी भावनेने करण्यापेक्षा निस्वार्थी भावनेने करा. पापाचे परिमार्जन बगैरे विचार मनात आणू नका, त्या भावनेने मदत केली तर तो स्वार्थीपणाच ठरेल.
चूका सगळ्यांच्याच हातून होतात. पण त्या सूधारणे आपल्या हातात असते.
इथे तर अकारण तूम्ही झाल्या गोष्टीची पुर्ण जबाबदारी घेता आहात.
तो विचार टाळा.
हा विचार स्वतःशी करु नका आणि इतरांसमोरही वाच्यता करु नका.

या बाबतीत म्हणजे हा विचार मनातून काढून टाकण्यासाठी, गरज भासलीच तर वैद्यकिय मदत घ्या. पण ती भासू नये, अशी अपेक्षा करतो.


Sayonara
Tuesday, June 24, 2008 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्य, माझी मुलगी ८ वर्षाची आहे. आणि तुझ्यापेक्षा फार वेगळी सिचुएशन आमच्याकडे नाहीय. निदान तुझी मुलं अभ्यासतरी वेळच्यावेळी पूर्ण करतात. माझी लेक तेसुद्धा करत नाही. त्यामुळे मी तिला ह्या समरपासून रोज टेबल पुसणं, स्वतची रुम रोज साफ करणं ही कामं नेमून दिली आहेत. गेले तीन चार दिवस तरी बरे गेले आहेत बघुया, पुढे काय होतंय ते.

Uday123
Tuesday, June 24, 2008 - 10:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवी साहेब तुमची मानसिक परिस्थिती समजु शकतो. अपघाताची घटणा वाईटच घडली.

तुम्हाला स्वत:ला अपघात घडण्यापुर्वी पुर्व-कल्पना होती कां या १५ वर्ष जुन्या कार्यपद्धती मधे असणार्‍या त्रुटी बाबत? ह्या त्रुटींची पुर्णत: माहीती होती आणि तुम्ही जाणुन-बुजुन दुर्लक्ष केले असे झाले कां? उत्तर नकारात्मक असेल तर तुमचा घडलेल्या घटनेस स्वत:ला दोष देणे म्हणाजे (स्वत्:वर) अन्न्याय करणारे आहे. तसे नका करु.

तुम्ही मदतीचा हात देत आहात ही चांगलीच गोष्ट आहे. शुभेच्छा!


Dineshvs
Wednesday, June 25, 2008 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्य,
नकार देणे हि या वयात शिकलेली नविन गोष्ट असते. त्याचा प्रयोग सध्या चालू आहे.
त्याना नीट समजाऊन, म्हणजे मला इतके काम आहे, मला पुर्वीसारखे सगळे करणे जमणार नाही. तूम्ही काय मदत करु शकाल, असे थेटच विचारून बघ.
आपल्याला कुणीतरी एवढे महत्व देतेय. आपले मत विचारतेय, हि भावना नविन ठरेल


Shonoo
Wednesday, June 25, 2008 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथल्या शाळांमधून असं सुचवतात की पालकांनी मुलांबरोबर चर्चा करुन दहा ते पंधरा नियमांची यादी करून ती फ़्रिज वर, मुलांच्या अभ्यासाच्या जागी, त्यांच्या बेडरूम मधे त्यांना सहज दिसेल अशा जागी लावावी. रोज ज्या नियमाचं उल्लंघन होइल त्या समोर एक लाल फुली अन जे नियम पाळले जातील त्या समोर एक सोनेरी तार्‍याचा स्टिकर ( किंवा तत्सम काही तरी ) लावत जावे.
नियम ठरवण्यामधे मुलांचा सहभाग असला की ते पाळणं थोडं सोपं जातं. शिवाय त्या तक्त्यावर त्यांना रोजची प्रगती ( or the absence of it दिसत राहिली की ते नियम परत परत मनावर ठसतात. या नियमांमधे कुठल्या उल्लांघनाला काय शिक्षा मिळेल हे लिहून ठेवावं. ( टि व्ही नाही पहायला मिळणार, पोहायचे क्लास बंद होतील इत्यादी ).

आपापले सामान सुमान आवरून ठेवणे, डिश वॉशर रिकामा करणे, कपड्यांच्या घड्या घालून जागच्या जागी ठेवणे, जेवणाचे टेबल सेट करणे इत्यादी कामं वाटून नेमून द्यावीत. नियम पाळल्याबद्दल सुद्धा काहीतरी incentive कबुल करायला हवं. मला कुठे चांगले लेख सापडले तर लिंक टाकीन.



Raviupadhye
Wednesday, June 25, 2008 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश व उदय जी तुमच्या प्रतिसादाबद्दल व वाटणार्‍या कंसर्न बद्दल आभारी आहे.मनावरील बोजा काहीसा हलका झाला. expert psychological help ची मुळीच गरज भासत नाही आहे.मी सावरतो आहे.पुन्:श्च धन्यवाद

Amitad
Friday, June 27, 2008 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कळत नाहिये काय कराव.. कोणाशी बोलाव.. पण प्रयत्न करते.
मला माहित्ये की पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणाला मला काही ठोस असं सांगता येणार नाही. पण इथे सर्व सांगण शक्यही नाही.. प्रायव्हेट पत्राने सांगता येइल.. तरी एवढच विचारते की..

तुम्हाला एखाद्या गोष्टीचा पश्चात्ताप होतो का.. म्हणजे जरुरी नाही की चूक फक़्त आपलीच असेल. जेवढी आपली तेवढीच दुसर्याचीही असेल पण तरी संधी गमावण्याच दु:ख्ख ज्याच त्यालाच होतं आणि मी वर्षानुवर्ष प्रश्नांची उत्तर शोधत राहाते पण प्रश्न अनुत्तरीतच राहतात आनि मग एक जीवघेणा प्रवास.उद्विग्न अवस्था. आणि आपण सामान्य माणसं. हा माणुस ह्या वेळी असा का वागला हे दिसत तेवढच माहीत असत.. आणि एक भयंकर शोध चालू होतो आपल्यापरीने ती उत्तरं शोधण्याचा.. आपण काही डिटेक्टीव नाही ठेवू शकत. नाही का.

कस कराव मनाला शांत? हो आणि आता उत्तर मिळुनही काही उपयोग नाहिये.. हे ही माहित्ये.. पण तरी उत्तरं मिळाली तर नकीच मन हलकं होइल शांत होइल.. पण जस वर म्हटल तस.. उत्तरं तर मिळत नाहीत आणि दुर्लक्ष करता येत नाहीये तडफड होतेय मनाची.

खूप विचार करुन बोलत्ये इथे. एथे वाचलेत मी चांगले सल्ले.. पण प्लीज वैद्यकीय मदत वगैरे सल्ला न देणे.. कारण मला स्वत:लाच सावरायला शिकायचे आहे.





Amitad
Friday, June 27, 2008 - 6:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रविदा, तमच्या मनाची उद्विग्नता समजते. तुम्हाला काही सांगण्याइतकी माझी पात्रता नाही..

पण इतकच सांगते की जे झालं त्यात तुमचा काहीच दोष नव्हता.. जे व्हायचं होत ते झालं..

तुम्ही अधिकारपदावर असल्याने
guilt feel येण स्वाभाविक आहे.. नव्हे ते माणुसकीचेच आहे पण असा विचार करा की आता ह्यापुढे अस काही होउ नये म्हणुन मी सर्व खबरदारी घेइन माझ्याकडून.. आणि माझी खात्री आहे की ती तुम्ही न सांगताही घ्याल..

तुम्ही म्हणता ना.. की या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे.. म असे निराश होऊ नका.. त्या माणसाला तुम्ही परत उभं करणारात ना.. मग कसून त्या मागे लागा.. आणि देवाला सांगा की मला त्यात साहाय्य कर.


Uday123
Saturday, June 28, 2008 - 12:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Amitad - भुत काळापासुन शिका आणि भविष्यकाळात जगा (सांगणे सोपे आहे, पण अमलात आणणे अशक्य नाही). तुमच्या जागी मी असतो आणि मला स्वत: ला सल्ला हवा असता (हे करताना स्वत:ची ओळख पण जपणे हा उद्देश असेल) तर मी संपुर्ण कहाणि लिहीली असती, फ़क्त सुरवात "माझ्या एका जवळच्या मैत्रीणि चा हा किस्सा..." अशी केली असती.

Chinya1985
Sunday, June 29, 2008 - 10:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमिता,मी उदयच्या एकदम विरुध्द सांगु इच्छितो.मी म्हणेल 'वर्तमानात जगा'. अर्थातच मला ते नेहमीच जमतं अस नाही पण मी प्रयत्न करतो. उदय सांगतात त्याप्रमाणे मी भविष्यात जगतो. भविष्यात जगण्याने टेन्शन्स,ऍंक्झायटी,भिती या गोष्टी आपला असा ताबा घेतात की त्यातुन सुटणे फ़ारच अवघड होते.
तुम्हाला एक पुस्तक सुचवतो जे जरुर वाचा. उपाध्ये तुम्हिही जरुर वाचा- Power Of Now लेखक आहे Ekhart Tolle . खुप काही शिकायला मिळेल या पुस्तकातुन


Raviupadhye
Sunday, June 29, 2008 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या एकार्ट चे पॉअवर ओफ़ नावू मी वाचले आहे.माझा उद्वेग थोडे दिवस टिकला. आत मी पूर्ण जोमाने त्या माझ्या सहकार्याच्या rehabilitation मागे लागलो आहे.मी ही here and now चा proponent आहे

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators