Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 11, 2007

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » लहान मुलांच्या उचापती आणि खूप काही » Archive through December 11, 2007 « Previous Next »

Zakki
Friday, September 07, 2007 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहोऽ, ती गोष्ट चुलती, काका, काकी (की काकू) यांच्याबद्दल नाहीये हो. नुसते 'कुणितरी' म्हंटले असते तरी चालले असते!!


Maanus
Friday, September 07, 2007 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आशु च्या किस्यावरुन आठवले.

मला एकदा खडु पाहीजे होता म्हणुन जवळच्या दुकानात पाच रुपायची नोट घेवुन गेलो. खडु होता १० पैशाला, दुकानदार म्हणाला सुट्टे आन मग खडु देतो.

मी घरी सुट्टे पैसे शोधले पन काही सापडले नाही, आई शेजारच्यांच्या घरी बसलेली. तिकडे गेलो म्हणालो मला १० पैसे सुट्टे सापडत नाहीत खडु आणायला तुझ्याकडे आहेत का. आई नाही म्हणाली. मग मी बिनधास्त शेजारच्या काकुंकडे १० पैसे मागीतले, त्यावर मला तिथेच इतका मार मिळाला विचारु नका. परत कधी कुणाकडे पैसे मागायची हिम्मत नाही झाली अजुन.


Supermom
Friday, September 07, 2007 - 8:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहान मुलं कोणाहीसमोर आपली फ़जिती करतात हे अगदी खरं आहे. विशेषत खाण्याच्या पदार्थांच्या बाबतीत.
माझी मैत्रीण समोरच्याच घरी राहते. तिची मुलगी वय वर्ष पांच नि माझी मुलगी वय वर्षं सहा अगदी पक्क्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे बरेचदा दोघी एकमेकींकडे जेवतात.
एकदा माझी मुलगी तिच्याकडे जेवत असतानाच मी तिथे गेले. तर आमची सुकन्या मोठ्यानं सांगत होती की ही भाजी माझी आई कध्धीच करत नाही. अन पुढे मला ऐकू आलं, i have never even tasted this in my life. भाजी कोणती, तर भेंडीची.

माझे वडील मागच्या वर्षी गेले. त्यावर माझ्या मुलाने विचारले की 'where is grandapa now? त्यावर ते देवाकडे गेलेत असे त्याला समजावले. यावर त्याचा प्रश्न,
'पण का गेलेत?'
'ते म्हातारे झाले होते ना, म्हणून.'
'मग आजी पण तर म्हातारी आहे. ती कधी जाणार?'


Suyog
Friday, September 07, 2007 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माज़ा भाचा त्यान विचारल तुमची आइ वर आकाशात कशि गेलि विमानात बसुन का

Manjud
Saturday, September 08, 2007 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका दिराला वडील नाहीत. त्याचा मुलगा माणसांचा फार लोभी आहे. सगळ्यांच्या घरी आजोबा आणि आपल्या घरी नाहीत ह्यावरून बरेच्दा रडारड चालू असते. तर असेच एकदा साहेब आजीला frustrate होऊन म्हणाले, " आजी आपण तुझं लग्न करूया म्हणजे आपल्या घरी आजोबा येतील. "

Aashu29
Saturday, September 08, 2007 - 9:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, मला चुलत बहिण म्हणायचे होते!!

Jagu
Monday, September 10, 2007 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलीला पुढच्या महिन्यात २ वर्षे पुर्ण होतील. तिचे काका तिच्या आत्याला नेहमी उपडे झोपुन पाठीवर पाय द्यायला सांगतात. ते बघुन ती पण परवा उपडी झोपली आणि तिच्या आत्याला सांगु लागली आत्या माझ्या पाठीवर उभी रहा.

Sush
Tuesday, September 11, 2007 - 9:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लहान मुलान्ची भाषा आणि शब्द पण बरेचदा विनोदि असतात.
काल माझी भाची तिच्या आईला म्हणजे मझ्या ताईला म्हणत होती, ममा sss मला आपट.
आम्हाला कळेचना ति काय म्हणतिये.
मग ताईने सन्गितल्यावर साक्शात्कार झाला. कि तिला थोपट म्हणायचे होते.


Radek
Tuesday, September 11, 2007 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा मुलगा, वय २. एकदा, मी आणि बायको TV वर Hot Shots part 1 बघत होतो. मुलगा खेळत होता. (म्हणजे तस आम्हाला वाटत होत कि ह्याचं TV कडे लक्ष नाही).

Ofcourse त्यात एक प्रणय scene आहे, ज्यात नायक नायिकेच्या पोटवर omlette, pizza etc. .

अचानक आमचे चीरंजीव, "आई, ढेरी वरती pizza नाही होत ना?"

नंतर किती तरी दिवस तो ते आठ्वुन आठ्वुन विचारायचा, आणि माझी आणि बायकोची ताराबंळ! :-)


Anilbhai
Tuesday, September 11, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याला संत ज्ञानेश्वर दाखवुन आण रे. :-)

Bsk
Tuesday, September 11, 2007 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमॉ, ही फ़जिती मी केली आहे आई-बाबांची!! उन्हाळ्याच्या सुट्टीमधे शेजारी गेल्यावर त्यांना सांगायचे, आमच्याकडे हापूस आंबे कधीच आणत नाहीत.. (आणि आमच्याकडे कायम हापुसची पेटी आधी यायची घरात!!)

Manuswini
Tuesday, September 11, 2007 - 7:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे तर मी लहानपणी असेच काही करायची, मग खुपदा firing झाल्यावर सवय गेली.

मी शेजारी खेळत असायची, त्या Aunty काहीतरी खायला वगैरे कधी कधी द्यायच्या. मग आई जेव्हा आणायला यायची तेव्हा आईने अगदी पावूल टाकल्या टाकल्या माझी टकळी सुरू(घाबरून की आईला आवडणार नाही खल्ले हे कळल्यावर), आई, मला माहीतीय कोणाकडे काही खावू नये असे तु सांगीतलेस पण ह्या काकुंनीच खुप आग्रह केला म्हणून मी खाल्ले, विचार त्यांना. :-).
आईचा गोरामोरा चेहरा पाहून, त्या काकु ज्या गोड स्वभावाच्या होत्या,हसून म्हणाल्या मी पण हीला(माझी मैत्रिण,त्यांची मुलगी) तेच सांगते मनुची आई काही हरकत नाही.
घरी येवून, कमी बोलत जा लोकांसमोर. तसे आईला आम्हा मुलांना मारायची सवय न्हवती म्हणून वेळ लागला ही कमी बोलायची सवय जायला :-)


Uchapatee
Wednesday, September 12, 2007 - 12:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तसा उचापतीच. (म्हणूनच आयडी अगदी सार्थ घेतला आहे). माझे वय साधारणतः साडेतीन-चार वर्ष होते तेंव्हाची गोष्ट. आमच्या शेजारी माझ्याच वयाचा मुलगा होता. तो व मी एकत्र खेळायचो. तेंव्हा दाढीकरण्या साठी आत्तासारखे डिस्पोझेबल रेझर आलेले नव्हते. सेफ्टी रेझर मध्ये ब्लेड्स चा वापर व्हायचा. (हल्ली ती ब्लेड्स फक्त सलून मधे दिसतात). एक दोन वापरानंतर धार कमी झालेली ब्लेड्स मग वेगवेगळ्या उपयोगात यायची. (शिस-पेन्सिलला टोक काढणे, कागद् कापणे इ.इ).
एकदा असेच आम्ही खेळत असतांना मला वापरलेली ब्लेड पडलेली दिसली. बहूधा एखादा "दादा" किंवा "ताई" विसरली असावी. मी ती ब्लेड त्या मुलाला दाखवून त्याला म्हटले "ये, मी तुझी दाढी करतो". तो पठ्ठ्या पण तयार झाला.
मग मी त्याच्या दोन्ही गालांवर पार कानापासून ते हनुवटी पर्यंत ते ब्लेड गालाशी काट्कोंनात धरून फिरवले आणी "झाली दाढी" असे सांगीतले. "कशी झाली बघू" असे म्हणत तो, व त्याच्या मागे मी असे जवळच टांगलेल्य़ा आरश्याकडे धावलो. तो पर्यंत आम्हाला काही कल्पना आली नाही. (पाते जर धारदार असेल तर कापले जातांना फारसे दुखत नाही – कधी कधी कापलेय असे समजत सुद्धा नाही. तसेच रक्तही थोड्या वेळाने येउ लागते.)
तो आरश्यासमोर उभा राहीला तो पर्यंत रक्त यायला सुरूवात झाली होती. जेव्हा त्याला दोन्ही गालावर लाल रेघा दिसल्या, त्याने आपले हात दोन्ही गालावर चोळले. त्य़ा बरोबर रक्त गालांवर पसरून त्याचे गाल "आरक्त" झाले आणी त्याला गालावर रक्त येत असल्याचे कळले. मग त्याने एकदम घाबरून आई म्हणुन बोंब ठोकली. आमच्या दोघांच्या आया धावतच बाहेर आल्या. (बाहेर कुठेही/काहीही दंगा झाला की आमची आई "आपल्या मुलाने काही तरी भानगड केली असणार" या खात्रीने बाहेर यायची आणी तीचा फार कमी वेळा अपेक्षाभंग झालाय.) मी भेदरलो होतो व हातातील ब्लेड (ते तोपर्य़ंत हातातच ठेवले होते) नाचवत "मी त्याला नाही मारले, फक्त त्याची दाढी केली" असे सांगत होतो. मी पण तसा लहान असल्याने त्याच्या आईने माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला व मुलाला औषधोपचारा साठी घरात घेउन गेली. त्या नंतर मझ्या आईने माझे दोन्ही गाल रक्त न काढताच आरक्त केले हे सांगायलाच हवे काय?
तो मुलगा बिचारा नंतर जवळ जवळ महिनाभर दाढीच्या खुणा गालावर बाळगुन होता.


Swapna_nadkarni
Friday, September 14, 2007 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलीला पुढच्या महिन्यात २ वर्ष पुर्ण होतील..तिने yosemite ला एका restaurant मध्ये केलेला किस्सा...

आम्ही एका
restaurant मध्ये डिनर करत होतो.. माझ्या लेकीला बाहेर पळायच होत. तिथे अजुन एक family (अमेरिकन) जेवत होती, माझ्या लेकीला बाहेर जायचा होत.. दरवाज्याच्या कडे जाउन उघडायचा प्रयत्न झाला.. मी बाजुला होते मला उघाडायला सांगुन झाल.. मी तिला म्हटल दरवाजा नाही उघडता येत मला... तर माझी लेक मला सांगते "Don't worry Mamma"
नंतर बाजुच्या टेबल वर बसलेल्या बाई कडे गेली आणि तिला सांगते "Auntie please open the door"

ती बाई मझ्याकडे डोळे मोठे करुन बघायला लागली.... आम्हाला काय करावे २ min समजतच नव्हते... नंतर त्या बाई ला झलेला सर्वा किस्सा सांगितल्यावर ती बाई म्हणाली " बर आहे तुझी मुलगी social आहे ते, या जगात तिचा कुठे काही अडकनार नाही" Touch wood

हीच मुलगी आमचा neighbour घरी आला तर "mamma i am scared " म्हणुन मला बिलगली


Dineshvs
Saturday, September 15, 2007 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एकदा घरी सल्फ़ुरिक आम्ल तयार करायचा प्रयत्न केला होता. पुर्वी चेंबुरच्या आर सी एफ़ च्या कारखान्यात, गंधकाने भरलेले बरेच ट्रक्स जायचे. त्यातल्या सल्फरचे पिवळे खडे रस्त्यावर पडलेले असत. शाळेतुन येता जाता ते गोळा करत असे मी.
ते पेटवले की निळ्या ज्योतिने जळत असत. या ज्वलनातुन सल्फर डाय ऑक्साईड तयार होत असे, त्याचा चांगलाच ठसका लागत असे. मग शाळेतल्या धड्यातुन असे कळले कि हा वायु फुलांच्या रंगाचे विरंजन करतो. शाळेत हा प्रयोग यशस्वी झाला नव्हता. मग घरी प्रयोग सुरु झाले. गुलाबी सदाफुलीची फुले पाण्यात भिजवुन या ज्योतिजवळ धरली कि पांढरी होतात.
यामागची कारणमीमांसा शाळेत कळली होती. सल्फर डाय ऑक्साईड व पाणी यांच्या संयोगाने सल्फ्युरस आम्ल तयार होते, ते अस्थिर असल्याने फ़ुलांच्या रंगातील ऑक्सीजन शोषते.
यावर माझे तर्कट असे कि, म्हणजे त्या फ़ुलावरच्या पाण्याच्या थेंबांचे सल्फुरिक आम्ल तयार होते.
खुप प्रयत्न केला, अनेक दुपारी या उद्योगात घालवल्या, पण चमचाभरही आम्ल तयार करता आले नाही.


Manuswini
Monday, September 17, 2007 - 6:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश तुम्ही चेंबूरला राहायाचे का हो?

Dineshvs
Monday, September 17, 2007 - 2:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, १९७४ पासुन चेंबुरलाच आहे.

Manuswini
Monday, September 17, 2007 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अय्या, आताच तुमच्या profile मध्ये वाचले शिव सृष्टी म्हणून.
मग तुम्हाला ती सारस्वत कॉलनी माहीती आहे का आचार्य कॉलेजच्या बाजुची? तिथे आमचे तेव्हा काही family friends राहयचे. ती कॉलनी ही बहुधा manglorean कोकण्यांची होती. :-)
mods,sorry विषयांतर झाले..............


Sunidhee
Tuesday, October 23, 2007 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्च्या सर्व लहान मुलांनी शहाणे होण्याचे व्रत घेतले आहे वाटते!! :-)
परवा मुलीला रात्री दिवे-बिवे बंद करून झोपवताना विचार केला, चला काहीतरी नवीन सांगु तिला. वय सव्वा तीन. (पार्श्वभूमी- मी शाकाहारी आहे. नवरा खातो पण आम्ही घरी बनवत नाही. मुलगी डेकेअर मधे कोंबडी खाते कधीमधी).
तर मी तिला, "हा म्हण, देवा शक्ती दे".. तिने ते म्हटले.
"देवा बुध्धी दे".. तिने ते पण म्हटले.
मग मी सांगितले 'चल झोप आता'.
५ सेकंद शांतता होती, मग हळूच आवाज आला "देवा चिकन दे" !!!


Dakshina
Tuesday, December 11, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, माझ्या मैत्रिणिच्या अडीच वर्षाच्या मुलीने पण सरळ तिच्या अजोबांना विचारले होते की तुम्ही ढगात कधी जाणार म्हणून. मैत्रिण जाम कानकोंडी झाली. अजोबानी तर थयथयाट केला, आणि स्वतःच्या मुलाबरोबर सुनेचाही उद्धार केला...

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators