Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
खुशी

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » खुशी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 12, 200720 12-12-07  9:01 pm

Zakki
Wednesday, December 12, 2007 - 9:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्रेच्च्या!! सिनेमे हे खरे नसतात हे माहित नाही का तुम्हाला? त्यात 'करमणुकीसाठी' असे काही काही दाखवतात. नाहीतर साध्या आयुष्यात अनेक वर्षात जे घडते ते तीन तासात कसे दाखवायचे?

Shraddhak
Thursday, December 13, 2007 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोक्स, भांडणाचे कारण तेच आहे. तो तिची ( दिसत असलेली) कंबर बघतो. त्यात डायलॉग पण असेच आहेत.

' तुमने मेरी कमर देखी या नही? ' ती चिडून.
( काहीतरी बोलायचे म्हणून तो...)
' तुम मुझसे प्यार करती हो या नही? '

मग त्याने तिची ' कमर ' बघितली असूनही त्याच्या त्या ' असत्यवचनाचा ' तिला राग येतो. आणि ते दोघे एकमेकांशी बोलेनासे होतात. मग तिची मैत्रीण आणि त्याचा मित्र असे एक उपजोडपे असते. तिच्या मैत्रिणीचा बाप गुंड असतो. मग हे त्यांना लग्न करायला मदत करतात. त्यातून ते पुन्हा एकमेकांच्या जवळ येतात. मग हिरॉईनला काहीतरी लागतं आणि ती हॉस्पिटलमध्ये असते. मग त्याने तिच्यासाठी धावपळ करणे ओघाने आलेच आणि मग भांडण मिटते.
यातच एक फ़रदीनचा, दारू पिऊन तिच्या नि त्याच्या, गॅदरिंगच्या नाचाच्यावेळच्या, एन्लार्ज केलेल्या फोटोतल्या तिच्या कमरेकडे पाहून काहीतरी अचाट डायलॉग मारायचाही सीन आहे.
' इतनीसी कमर देखी तो क्या हो गया? ' वगैरे वगैरे.

सुरुवातीला एका सीनमध्ये हिरॉईनच्या घरची एक म्हैस गॉगल आणि टोपी घालून आणि शिंगाला बॅग अडकवून येते आणि तिचा बाप ' मेरी लाली ( पक्षी: हिरॉईन, त्याची चित्रपटातली मुलगी) आ गई ' करत वाट फुटेल तिकडे पळत सुटतो, हाही एक अचाट सीन आहे.


Deepanjali
Thursday, December 13, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र ,
हो हो आठवला तो म्हशीचा scene
आणि ते करीनाचं डोळे मोठ्ठे करून " तुम मेरी कमर को क्यूं देख रहा था " पण


Zakasrao
Thursday, December 13, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे हे
मी अजुन पाहिलाच नाहिये खुशी. पण इमॅजीन करुनच हसतोय.
बाकी हाय रे हाय रे ची कन्सेप्ट मला बरी वाटली. :-)


Jhuluuk
Thursday, December 13, 2007 - 8:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशक्य पिक्चर होता खुशी!
वाह! श्रद्धा मस्त लिहिलेस... आठवुन आठवुन हसु आले :-)


Chinya1985
Thursday, December 13, 2007 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतनीसी कमर देखी तो क्या हो गया? '

सही है!!!!!

Amruta
Thursday, December 13, 2007 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण पहिला नाहिये खुशी. पण आता ह्या सिन साठी पहावा लागणार. :-)

Tanyabedekar
Thursday, December 13, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मायबाप प्रेक्षकांना नाहीतर करीनाची सुबक, डौलदार कंबर कशी दाखवणार? सिच्युएशन क्रिएट करायला लागतात. तुम्ही दिग्दर्षक, लेखक ह्यांच्या अश्या अत्यंत आउट ऑफ बॉक्स सृजनशीलतेचे कौतुक न करता त्यांना हिणवताय!! अरेरे!!!

Tanyabedekar
Thursday, December 13, 2007 - 8:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"अर्रेच्च्या!! सिनेमे हे खरे नसतात हे माहित नाही का तुम्हाला? त्यात 'करमणुकीसाठी' असे काही काही दाखवतात. नाहीतर साध्या आयुष्यात अनेक वर्षात जे घडते ते तीन तासात कसे दाखवायचे?"

अहो झक्की काका, साध्या आयुष्यात पण कायच्याकै घडते. कशावरुनही भांडणे होतात. पग काही महिन्यांनी कुठला तरी मित्र फोन करुन सांगतो, "अबे उसकी शादी तय हो गयी" किंवा "अबे उसकी शादी हो गयी." वर पावशेर म्हणुन पुढचे वाक्य पण ऐकुन घ्यायला लागते - "मुझे लगा तेरेको शायद मालुम नही होगा. इसलिये बता रहा हुं."


Vijaykulkarni
Friday, December 14, 2007 - 12:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आता खुशी हा चित्रपट निदान करीना च्या कम्बरेसाठी तरी पहावा लागणार.


Maanus
Friday, December 14, 2007 - 3:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे... हा सिन बघा
लिंबापासुन दिवा

मी हा चित्रपट पाहीला नाही, पण कंबरेवरुन लक्षात आले. भुमिका चावलाचा तमिळ आणि तेलगु मधे सेम नावावरुन मुव्ही आली होती. त्यात पण तो कंबरेचा सिन होता.


आता यादें चित्रपटाचा रिव्ह्यु कोण लिहीणार आहे?
करिना तिच्या दोन बहीनी, ऐ नी रे ऐ नी रे क्या है ये पहेली.

Ankyno1
Friday, December 14, 2007 - 7:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नको................

पूर्वजन्मीच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून मी खुशी पाहिला....

पण पापं इतकीही नसावीत
कारण यादे पूर्ण पहाण्यापासून मला सवलत मिळाली आणि अत्ताचे पोस्ट लिहायला मी जिवंत राहू शकलो
जॅकी ला ३-३ घोड्या मुली असतील हे आपण समजू शकतो...
पण
ह्रितिक ची आई सुप्रिया कर्णिक..... नाही हो पटत
(तसं सुरवातीला ह्रितिक च्या आया वयानी लहानच असायच्या....
मिशन कश्मीर मधे- सोनाली कुलकर्णी,
आप मुझे अच्छे लगने लगे मधे- निशिगंधा वाड)


Shraddhak
Friday, December 14, 2007 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्रितिक ची आई सुप्रिया कर्णिक<<<<
का बरं? ती शोभते आई म्हणून. :-P नाहीतर ती त्याची सावत्र आई असते आणि त्यामुळे हृतिकचे तिच्याशी फ़ार पटत नाही आणि तो जॅकी - रतीलाच आई बाबा मानतो. पुढे सुप्रियाने त्याला करीनाशी लग्न करण्यात मदत केल्याने त्याच्या मनात तिच्याविषयी आदर निर्माण होतो, असे काहीसे उपकथानक असावे. पण तीन मुलींच्या लग्नामध्ये वेळ गेल्याने ते सिनेमातून काढून टाकले असावे.

आप मुझे अच्छे लगने लगे मध्ये निशिगंधा वाड अमिषा पटेलची वहिनी दाखवलीये, हृतिकची आई नाही.


Ankyno1
Friday, December 14, 2007 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो बरोबर....

वाड काकू 'तुमको ना भूल पाएन्गे' नमक चित्रपटात शरथ सक्सेना च्या अर्धान्गिनी होत्या.... आणि अरबाज़ खान च्या मातोश्री.... (थोडा काळ त्यान्ना सलमान ची माता होण्याचे भाग्य ही लाभले... पण ते मानलेले नाते असल्याने तेवढे महत्व देण्याची गरज नाही....)


Zakki
Friday, December 14, 2007 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला कसं हो हे सगळे आठवते? अगदी सीन, काम करणार्‍यांची नावे, मागे कुठल्या सिनेमात कुणाचे काम केले होते, हे सगळे! मला तर सिनेमा चालू असताना सुद्धा, एखादा माणूस पाच मिनिटे पडद्यासमोर नसला नि पुन: दिसला तर विचारावे लागते, की 'हा कोण' नि तो इथे कशाला आला? सिनेमाचे नाव काय होते, गोष्ट काय होती, ह्या गोष्टी सिनेमा पाहून झाल्यावर एका तासानंतर आठवत पण नाहीत, मग कामे करणार्‍यांची नावे दूरच!

धन्य आहे तुमची!


Chinya1985
Friday, December 14, 2007 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे करीनाच्या कमरेची चांगलीच पब्लिसिटी झालिय. ही रिलिझच्या वेळी केली असती तर पिक्चर हिट झाला असता

Sunidhee
Friday, December 14, 2007 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतर्क्य सीन्स मला पण नंतर आठवत आहीत.. लोकांच्या स्मरणशक्तीची दाद द्यायला हवी.
चिन्या सिनेमा तरीही हिट नसता झाला कारण करीनाची कं** इतकी प्रेक्षणीय नाही.. ती काय उर्मिला आहे का?


Mukund
Thursday, December 27, 2007 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रद्धा.. आत्ताच वाचले हे.. LOL
तुझी अशा मुव्हींबद्दल लिहीण्याची ढब एकदम मस्त आहे.. तुने मेरी कमर क्यों देखी... LOL

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators