Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 02, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through November 02, 2007 « Previous Next »

Ultima
Monday, October 22, 2007 - 12:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्या, चाफ़्फ़्या धन्य आहात तुम्ही .. ..

Aditih
Monday, October 22, 2007 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समीर ... खुप भन्नाट बकरा बनवलाय हं तुम्ही .......हीहीहीहीहीही

Panna
Monday, October 22, 2007 - 2:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ्फा
दसर्‍याच्या दिवशी पण चाफ्फीला बकरा बनवता म्हणजे धन्य धन्य आहात!!

समीर, झकास
जशास तसे!!!

Chaffa
Monday, October 22, 2007 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरं एक सांग तो कस्टमर सर्व्हे वाचल्यावर कसे वाटले ते सांग...
नंदिनी तो सर्वे वाचल्यावरच माझा संशय जास्त दाट झाला. त्यात चक्क इब्लिसपणा असा उल्लेख आहे. आणि हा शब्द फ़क्त इथेच सापडतो.
झकास, बकरा ऑफ़ दसरा! लै भारी


Gsumit
Monday, October 22, 2007 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुगल टॉकचे बिल...

आमचा प्रोजेक्ट सपोर्टचा आहे. म्हणजे क्लायंट मायबाप सर्व्हिस रिक्वेस्ट पाठवतात अन आम्हाला सॉल्व्ह करावी लागते. ह्या रिक्वेस्ट्स असाइन करायच काम माझा एक मित्र करायचा... नेहमी एकदम फुशारकी मारायचा त्याच्या कामाची...

एकदा मी त्याची मस्त फ़िरकी घेतली, एक
script लिहिली, जी कुणाच्या पण नावाने इ-मेल पाठवायची, अन त्यालाच रिक्वेस्ट असाइन केल्याचा इ-मेल पाठवला... (त्याच्याच इ-मेल वरुन format copy करुन) आणी त्याच्या डेस्कपाशी गेलो २-३ मित्रांना घेउन... एकदम टेन्शन मधे होता... आता काय करु म्हणुन... मग आम्ही सगळ्यान्नी त्याच्याबरोबर तो issue discuss () केला, अन त्याला सांगितल तु सिनीयरला विचारुन क्लायंटला इ-मेल कर... बेटा निघालाना सिनीयरकडे... आणी इकडे आम्हाला हसु आवरेना... मग त्याच्या लक्शात आले पोपट झाल्याचे, नंतर खुप दिवस आम्ही SR असाइन करु का म्हणुन चिडवायचो त्याला...

Chinya1985
Monday, October 22, 2007 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा आणि च्यायला लै भारी!!!!!

Zakasrao
Tuesday, October 23, 2007 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे सम्या पुढचा भाग येवु दे रे. तो कस्टमर सर्वे टाक इथे. तो वाचुन मी खुर्चीतुन खाली पडता पडता वाचलो.
आणि ह्या इब्लिसपणात ज्याने तुला खुप मदत केली त्याच नाव पण ताक रे.
गूगल चा मॅनेजर


Chyayla
Tuesday, October 23, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, आर.. आर.. जरा दमान घ्याव कि..

तर मंडळी आता सादर करीत आहोत "दसरा का बकरा" भाग-२, सादरकर्ते "इल्ल्यापंती मंडळ" मायबोलिकर.

चाफ़्फ़ा, तु दुसर्यांशी ईब्लिसपणा करण्याच्या नादात, तुझ्याशी कोणी करत तर नाही ना, हा धडा घे.. मला ठाउक आहे की माझ्यावरही ही पाळी येइल, मी तयार आहे, यातच तर खरी मज्जा आहे.

आणि ती जी दुसरी मेल आहे त्या मधे मुद्दाम ईब्लिस शब्द वापरला कारण पोपट पुर्ण झाला होता. मला एक वेळ भीती वाटली की हा खरच मनी ऑर्डर करुन टाकायचा कारण तो मला म्हणाला की एवढीच तर रक्कम आहे, त्याच काय एवढ पहायच.

असो दुसर्या भागात, चाफ़्याच्या बिलाच्या चौकशीला रिप्लाय देण्यात आला की बिलात गडबड झाली खरी, झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिर आहोत व त्या बदल्यात आम्ही तुमचे बिल माफ़ करत आहोत. फक्त...

फक्त तुम्हाला आमची ग्राहक सेवा कशी वाटली त्याबद्दल अभिप्राय द्यावा सोबत फ़ॉर्म जोडलाच आहे. आता तुम्हीच बघा आणि समजा काय झाले असेल ते खास करुन एकदम शेवटचा प्रश्न...
application/pdf
Google Customer Survey.pdf (14.8 k)


आभारप्रदर्शन

सगळ्यात शेवटच्या कार्यक्रमात सगळ्यात पहिले मी मुख्य नायक चाफ़्याचे आभार मानेल ज्यान्नी आम्हाला हा ईब्लिसपणा करण्याची संधी दिली. व त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशे त्यान्नी मित्रासाठी सहन करुन काही राग न मानता दिलखुलासपणे घेतले. आज यांच्या संसर्गामुळे पन्ना, जीसुमित व ईतर नवीन मायबोलिकरही ईब्लिसपणाचे मजेशिर किस्से द्यायला पुढे आलेत.

त्यानंतर आयटीगर्ल, स्वाती, आदिती,पन्ना, G सुमित, अल्टिमा, चिन्या व समस्त मायबोलिकर ज्यानी या दसरा का बकरा या कार्यक्रमाला मनापासुन खास करुन पोटापासुन दाद दिली.

आणि अर्थातच ईल्यापंती मंडळाचे सदस्य ज्यानी यात महत्वाची भुमिका केली त्यात सर्वप्रथम गूगल चे Account Manager श्री सुयोग शहा हे नविनच मायबोलिकर आहेत, त्यानीच हा पत्रप्रपंच केला व या कार्यक्रमात मुख्य भुमिका वठवली..

सर्वांची लाडके श्री झकासराव पाटिल यांनीच ऑर्कुटवर जाउन आगित तेल ओतुन हातभार लावला, नंदिनी ज्या पण यात शामिल होत्या त्यान्नी चाफ़्याला फोन करुन बिल, बिलाचा रिप्लाय मिळाला की नाही याची खातर जमा केली. शिवाय हे तिघेही या बकरा प्रोजेक्टचे साक्षिदार आहेत.



Manjud
Tuesday, October 23, 2007 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्य दसरा का बकरा टीम....

Gsumit
Tuesday, October 23, 2007 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१ नंबर... ऑफिसमधल्या प्रोजेक्टसाठीपण एवढी प्लानिंग होत नसेल कधी....

आपला प्रोजेक्ट 'बकरा' आवडला, नवीन अपडेट्स येउंद्यात


Chaffa
Tuesday, October 23, 2007 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडेसे स्पष्टिकरण,
मी मुळात या अंतर्जालाच्या दुनियेत प्रवेश केला म्हणजे हे चॅटिंग वगैरे, आणखी ते ऑरकुट या सगळ्या गोष्टी मला नविन होत्या संगणक वापरत होतो पण ऑफ़िसच्या कामासाठी. एक दिवशी ही मायबोली सापडली इथे मित्र मैत्रीणी बनल्या मग हळुहळु याहूचा मेसेंजर वापरायला लागलो मग ऑरकुटचा पत्ता लागला तो झकास मुळे पण बाकी बहुतांश गोष्टी मी च्यायला अर्थात सम्या याच्या दोस्तीनंतर शिकलो( आणि अजुनही चाचपडतच शिकतोय!) अर्थातच सम्या म्हणेल ते तसेच असणारच हिच भावना,! त्यामुळे हे असे होणे काही अनपेक्षीत नव्हते. पण या इब्लिस कंपुचा एक मेंबर होणे काही कमी महत्वाची बाब नाही.
आता एक एक अतिरिक्त माहीती १) झकास आणि माझे बिल या विषयावर बोलणे झाले नसावे जर माझी स्मरणशक्ती दगा देत नसेल तर!
२) नंदीनी साक्षी, तिने केलेल्या फ़ोनवर तिने या बिलाचा उल्लेख केला नाही.
३) आणि मला खरचं माहीत नाही राव गुगल चे बिल येते की नाही
सर्वात मोठा आनंद मला बकरा बनवण्यासाठी किती बहद्दर लोकांना एकत्र यावे लागले!
असो मी आधिच म्हंटल्या प्रमाणे बकरा तर झालो. पण शानसे! अरे यार बकर्‍याची शिकार करायची होती तर इतकी मोठी तयारी करायची गरज नव्हती एकट्या च्यायलाने सांगीतले असते तरी मी स्वःत बिल कसे भरायचे हे गुगलला विचारलेच असते हे नक्की.
आता महत्वाचे: हे सगळे मी रागाने किंवा वैतागुन लिहीत नाहीये.
अरे बकरा झालो म्हणुन काय झाले आज किती जणांच्या चेहर्‍यावर हसु फ़ुलले! सो लगे रहो!


Prajaktad
Tuesday, October 23, 2007 - 6:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' दसरा का बकरा ' टिम जबरीच आहे कि!!..

Kedarjoshi
Tuesday, October 23, 2007 - 6:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ्फा सगळ्याचे स्पश्टीकरन का देतोयस बाबा. पण तिन की चार महारथीनां एकत्र यावे लागले ये भी क्या कम है. पण जबरीच एपीसोड.

Aashu29
Tuesday, October 23, 2007 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असं सर्व काहि अनपेक्षितच होतं, पण मजा आली वाचुन!! क्लिपसारखं काहितरी पण काढलं असतन तर काय धमाल आलि असति!!

Chyayla
Wednesday, October 24, 2007 - 6:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण तिन की चार महारथीनां एकत्र यावे लागले ये भी क्या कम है

चाफ़्या ऐक.. तुझा मान ठेवावा म्हणुन तिन चार जणाना एकत्र आणले. मला ठाउक आहे माझ्या एकट्याच्या सांगण्यावरुनही तु जसे म्हणेल तसे केले असते. पण काय मित्रांच्या सोबतीने अशी मस्ती केली कि जास्त मजा येते.

नन्दिनीला ईतकी घाई झाली होती के ती म्हणाली मी फोन करुन काही माहिती मिळते का ते पहाते, पण तु काही पत्ता लागु दिला नसेल पण हुशार नंदिनीने अंदाज बांधला. असो दुसरी गोष्ट झकासचा मेसेज अजुनही तुझ्या ऑर्कुटवर आहे.. कदाचित तु तो वाचलाच नसावा.


क्लिपसारखं काहितरी पण काढलं असतन तर काय धमाल आलि असति!!

आशु, खरच तो कस्टमर सर्वेचा शेवटचा प्रश्न वाचताना चाफ़्याची क्लिप घेता आली असती तर धमाल झाली असती.

असो चाफ़्या तुझ्यामुळेच परत एकदा सगळ्यांच्या चेहर्यावर हसु फ़ुलले हे मात्र खर.. आणि तुला जर थोडासाही (चिमणीच्या नाकाच्या नकट्याएवढा)माझा राग असेल तर मी सच्च्या दिलाने माफ़ी मागतोय.

असो आता हे सगळ विसरु या आणि नविन..
नको नको ईतक्यात नको, सध्या सगळे मिळुन गणपती बाप्पाची प्रार्थना करु या.

"प्रारंभी विनती करु गणपती विद्या दया सागरा, इरसालत्व हरोनी शुद्धमती दे आराध्य मोरेश्वरा"



Chaffa
Wednesday, October 24, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्या ऐक.. तुझा मान ठेवावा म्हणुन तिन चार जणाना एकत्र आणले. मला ठाउक आहे माझ्या एकट्याच्या सांगण्यावरुनही तु जसे म्हणेल तसे केले असते.

आगदी बरोबर!

असो दुसरी गोष्ट झकासचा मेसेज अजुनही तुझ्या ऑर्कुटवर आहे.. कदाचित तु तो वाचलास नसावा.

मुळिच नाही!

असो आता हे सगळ विसरु या आणि नविन..
नको नको ईतक्यात नको,

अरे इज्जत घालवतो का इरसाल कंपुची (माझ्या सकट) हे असे सगळे च्यायलायचेच रे या खेरिज इथे जिवंतपणा येईल का????
आणि शेवटचे,

आणि तुला जर थोडासाही (चिमणीच्या नाकाच्या नकट्याएवढा)माझा राग असेल तर मी सच्च्या दिलाने माफ़ी मागतोय.
च्यायला हे मात्र तु अती करतोयस! तुझ्या इब्लिसपणाचा मला राग आला तर तुला gtalk वरुन (मला आता महिताय ) झापला नसता का? दोस्ती विसरला का रे? माफ़ि मागतोस ती!




Ravindrakadam
Wednesday, October 24, 2007 - 11:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय टिमवर्क आहे. एकदम झकास...

Gsumit
Wednesday, October 24, 2007 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भरपुर आभारप्रदर्शन अन माफ्या झाल्या, चला आता पुढचा बकरा(री) शोधुया... (मी सोडुन... )

Anaghavn
Friday, November 02, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा इब्लिसपणा मी आणि माझी मैत्रिण 2 री त असताना करायचो.
आम्ही तिघी जणी एका बेंचवर बसायचो.पण मी आणि अंजना म्हणून होती ती खुप फ़ास्ट फ़्रेंड्स होतो. आम्ही दोघी जणी मिळून त्या तिसरीला (सिमा तिचं नाव)खुप छळायचो.ती खुप शांत होती. कधी आम्ही उगाचच अगम्य भषेत बोलल्यासारखं करायचो. तर कधी खाणाखुणांनी!!!.ती खरच खुप गरीब होति स्वभावने. पण आम्ही आमच्याच मस्तीत असायचो.
मलाही जेव्हा असा अनुभव आला--इतरांकडून्--- तेव्हा खरंच तिची आठवण झाली.
अनघा


Durandar
Friday, November 02, 2007 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्फ़ा बोलेना चाफ़्फ़ा चालेना चाफ़्फ़ा काहि केल्या कुठेहि सापडेना! गेला चाफ़्फ़ा कुनिकडे? जोरदार बकरा झाल्यावर नाहिसा?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators