Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
जुने दिवस

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » जुने दिवस « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through December 04, 200720 12-04-07  6:42 am
Archive through December 05, 200720 12-05-07  1:56 pm
Archive through December 10, 200720 12-10-07  7:49 am
Archive through December 11, 200720 12-11-07  11:27 pm
Archive through December 19, 200720 12-19-07  10:43 am
Archive through December 24, 200720 12-24-07  10:50 am
Archive through December 28, 200720 12-28-07  6:10 pm
Archive through January 04, 200820 01-05-08  12:56 am
Archive through January 08, 200820 01-08-08  5:51 am
Archive through January 16, 200820 01-16-08  10:49 am

Anaghavn
Wednesday, January 16, 2008 - 11:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा अगदी खरं आहे गं.
तुझ ते "लोक भेटली नाही तरी फ्रस्ट्रेट व्हायचो नाही" हे वाक्य एक्दमच पटल गं. आजकाल हे frustretion फारच लवकर आणि छोट्या छोट्या कारणांवरुन येतय असं जाणवल. तस पाहील तर आजकाल मी frustration बर्यापैकी manage करु शकते. पण तरीही वाटतच की आगदि काही वर्षांपुर्वी पर्यंत असलेला frustrate न होण्याचा स्वभाव कुठे गेला? की पाहुन पाहुन शिकलो ते नकळत?


Dakshina
Wednesday, January 16, 2008 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा, आणि त्यावेळी मोकळा वेळ पण बराच मिळायचा. पूण्यात शिफ़्ट झाल्यापासून तो निवांतपणा कधी अनुभवलाच नाही गं पुर्वी आम्ही ज्या घरात रहायचो त्यात कितीतरी गैरसोयी होत्या. (त्या काही आता इथे लिहीत नाही) पण त्यातूनही आम्ही आमची कामं स्वतःचं स्वतः करत होतो. अगदी धूणं सुद्धा. ते ही चार जिने उतरून खाली किंवा पाणी नसेल तर थेट आडावर. आणि आता, बाई कपडे धूवायला आली की कटकट वाटते, का तर हवं असतं तेव्हा बाथरूम अडवून बसते म्हणून. याउलाट अत्ता मिळणार्‍या सुखसोयी तेव्हा असत्या तर.. कदाचित चित्रं वेगळं असतं. जुन्या दिवसात आम्ही इतकं सगळं करूनही फ़ावला वेळ मिळायचां त्यावेळी आम्ही गाणी म्हणायचो. आता गाण्याचा क्लास लावला तर तो ही वेळेवारी अटेंड करणं होत नाही. गळा चांगला असून खराब होतोय ती गोष्टंच वेगळी.

अशा एक ना किती गोष्टी लिहू. आठवलं की परत पळत तिकडेच जावंसं वाटतं. खरंच.......

* ते अंगणात बसून ट्रान्झिस्टरवर एकत्रं आपली आवड ऐकणं.
* उन्हाळ्याच्या सुट्टीत मुला - मुलींनी एकत्र केलेलं जेवण, जवळच्या बागेतल्या सहली.
* लाईट गेल्यावर गायलेली गाणी, बाहुला - बाहुलीची लावलेली लग्नं.
* तयार केलेला मांजा, शेंगांचे बॉल....
* घरातल्यांना सापडू नयेत म्हणून लपवून ठेवलेल्या गोट्या, सिगरेटची पाकीटं....

सगळं सगळं खूप मिस करते...


Apurv
Wednesday, January 16, 2008 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा पुन्हा तिच चूक करत आहात, जे आता आहे ते enjoy करायला शिका, भूतकाळाची आठवन काढून वर्तमान काळ चुकवू नका. जे होते ते चांगले आणि आता आहे ते ही चांगले, काळ बदलतो, आपणही बदलायचे, भूतकाळाला धरून राहीलात तर वर्तमान हातातून निसटतो.
पुन्हा म्हातारपणी असच असते. प्रत्येक वय, काळ नविन गोष्टी घेउन येतो, त्या accept करून enjoy करायला शिकले पाहीजे.
~CBDG


Athak
Wednesday, January 16, 2008 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अपुर्व , एकदम सही
जुन्या गोष्टीतुन शिकुन पुढचा मार्ग सुखकर कसा करता येइल हे बघावे . काळानुसार बदलत राहणे हेच योग्य , generation gap आहेच पण ती कशी कमी करता येईल ते बघावे . आमच्यावेळी हे अस होत ते तस होत हे आपल्या अनुभवाच्या गाठी म्हणुन सोबत आहेतच अन नविन पिढीला त्याचे काय घेणे देणे.
जुने पाठीशी बांधलेले भविष्यात पुढचे पाउल टाकायला मार्ग दाखवणारे . आपल्या जवळ क्षण आहे तो आता या क्षणी जगण्याचा .
प्रेझेंट म्हणजे वर्तमानकाळ अन प्रेझेंट म्हणजेच बक्षिस वा या विंग्लिश भाषेला पण सलाम :-)


Arch
Wednesday, January 16, 2008 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२ आठवड्यापूर्वी एक पुस्तक वाचल आणि त्यातल्या पटलेल्या गोष्टी

Complain, worry, fear, anger, blame, guilt, dwelling in past, and thinking about what we do not have control on हे सगळ wastage of time आहे. प्रत्येक गोष्ट थोड्या फ़ार प्रमाणात होतेच पण त्याला किती महत्व द्यायच ते तर आपल्या हातात आहे न.


Nandini2911
Thursday, January 17, 2008 - 3:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दक्षिणा, बर्‍याचदा तू असं म्हणतेस.. मी हे मिस करते मी ते मिस करते. पण या सर्व गोष्टी अजूनही तुझ्या आयुष्याचा भाग बनू शकतात. आजही लाईट गेल्यावर तू जोरात गाणी म्हणू शकतेस. आजू बाजूची चार पोरं जमवून बाहुला बाहुलीचं लग्न लावू शकतेस.

मी असं करत होते म्हणून वाईट वाटून घेण्यापेक्षा मी असं अजुन करतेय हे जास्त चांगलं ना...
आहे तो दिवस एंजॉय केला की गेलेला दिवस कसा होता ते आठवतच नाही. आपल्यातलं बालपण आपणच टकवून ठेवायचं असतं.
मी आजही पावसाच्या साचलेल्या पाण्यात फ़ाटकन पाय मारून ते पाणी उडवते. आजही मी बर्फ़ाचा गोळा खाते. आजही मला घरी असताना दोन वेण्या घालायला आवडतं. बिल्डिंगमधल्या मुलांबरोबर मी लपाछपी खेळते.
चित्रविचित्र आवाजात गाणी म्हणून आईला वैताग द्यायला आवडतं. एक घास काओचा एक घास चिऊहा करत जेवत असते. अधून मधून केव्हातरी मित्र मैत्रीणीना फोन करून "आज तू स्वप्नात आली होतीस आणि रडत होतीस, काही प्रॉब्लेम आहे का?" असं विचारते.


बालपण, जुने दिवस हरवत नसतात. आपण त्याना घालवून देत असतो.



Dakshina
Thursday, January 17, 2008 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्ही सगळे जे सांगताय ते अगदी मनापासून पटतंय. नंदिनी तुझा विश्वास नाही बसणार, एकदा तर मी ऑफ़िसला दोन पोनिटेल घालून आलेले, सर्वांनी मला कॉम्प्लिमेंटस दिल्या होत्या..

आणि खरं सांगायचं तर, जुने दिवस मी मिस करते, त्यांची किंमत मला कळतेय, म्हणून मी आजही आगदी आनंदात जगतेय, भरपूर enjoy करते. पण तुम्ही सांगा यांच्या आठवणी Treasure कशा कराव्यात?


Ajjuka
Thursday, January 17, 2008 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठलंही एक गाणं घ्यायचं आणि ते अत्यंत दळ्या आवाजात दिवसभर उगाळत बसायचं.. लहानपणचा लाडका उद्योग.
आताही दमलेलो असताना तर सही मजा येते हे करायला.
सुदैवानं स्वतःचच ऑफिस असल्याने फारसा प्रोटोकॉल पाळावा लागत नाही त्यामुळे वेडेपणाने वागणे हा लाडका उद्योग अजूनही करता येतो.


Tonaga
Thursday, January 17, 2008 - 2:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रौढत्वी निज शैशवास जपणे,

हा बाणा कविचा असे

असे एक जुने पद्य आहे.
म्हणजे हेच की आपली संवेदनाशीलता कोवळीक टिकवून ठेवणे. यात कवी म्हटले असले तरी कविहृदयाचा अशा अर्थाने घ्यावे त्यासाठी कविता पाडाव्यातच असे नाही
असो...


Aashu29
Thursday, January 17, 2008 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका,दळ्या आवाजात म्हणजे कशा?

Tonaga
Thursday, January 17, 2008 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दळ्या म्हनजे बहुधा दळताना जात्यावर हेलकावे मारीत गातात तसे असावे बहुधा..

किंवा जिवावर आल्यासारखे विव्हळल्यसारखे, असे काहितरी.
अज्जुका म्याडमच सांगतील कसे ते..


Tiu
Thursday, January 17, 2008 - 6:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किंवा दळभद्री आवाजात असेल...

Farend
Thursday, January 17, 2008 - 10:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दळ्या आवाजात

बर्‍याच दिवसांनी शब्द ऐकला. अज्जुका तुझ्या वेळचे माहीत नाही, पण मी शाळेत असताना हे एक जनरल पर्पज विशेषण होते कोणालाही (हिणवून) बोलण्यासाठी. म्हणजे 'ते एक दळं आहे' हे एखाद्या मुलाबद्दल म्हणणे. 'जा दळ...' वगैरे म्हणजे फूट इथून किंवा काय काहीतरी फालतूथापा मारतोयस गप्प बस.

गारंबीचा बापू का अशाच कोणत्यातरी चित्रपटात ती एक म्हातारी कोणालातरी 'तू दळ गं' असे म्हणते, तो चित्रपट जेव्हा आम्ही दूरदर्शन वर पाहिला तेव्हा हसून लोळलो होतो :-)


Bhagya
Friday, January 18, 2008 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दळ्या आवाजात...

ह ह पु वा!


Dineshvs
Friday, January 18, 2008 - 3:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुलंच्या एका कथेत आहे ना, थकले रे नंदलाला, हि रेकॉर्ड अडकली कि दलाला, दलाला, दलाला अशी ऐकु येते.

Nandini2911
Friday, January 18, 2008 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रत्नागिरी रेडिओ स्टेशनला एकदा आम्ही सरव करत असताना ती एल पी अडकली तर गाए वाजत होते
मै ना भू लूंगी...
लूंगी.. लूंगी.. लूंगी...


Runi
Friday, January 18, 2008 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दलाला, दलाला, दलाला
लूंगी.. लूंगी.. लूंगी... >>>>> आई ग

Zakki
Friday, January 18, 2008 - 10:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेहेमीप्रमाणे एका विषयातून दुसराच विषय निघू पहातो आहे. म्हणून गाडे पुन: 'जुन्या दिवसांकडे' वळवतो.

दुसर्‍या एका ठिकाणी शेजार्‍यांचा त्रास यावर काही लिहीले आहे. त्याबद्दल माझ्या आठवणी.

मला कधीच शेजार्‍यांचा त्रास झाला नाही. (बरोबर. तुमच्या शेजारी कोण रहाणार? असे काही शहरातले लोक म्हणतील. )
पण नागपूरला आमच्या घरामागच्या गच्चीत बसले की जवळच्या रिगल सिनेमातल्या संवादांचे नि गाण्यांचे अक्षर नि अक्षर ऐकू यायचे. 'खानदान की इज्जत', 'पिताजी, आपकी दौलत की फुटि कौडी भी मुझे नही चाहिये. मुझे मेरे राजू का प्यार मिला है!' ' माँ, मै ये हरगीज नही होने दूंगा' वगैरे. बहुतेक सिनेमा कुठलाहि असो, हे संवाद त्यात असायचेच.

पण मुख्य म्हणजे गाणी. ती सुरु झाली घरात कुठेहि ऐकू यायची. सगळा अभ्यास तेंव्हाच चालू असायचा. आजहि 'मै आशिक हूं बहारोंका' गाणे ऐकले की मला Sin 2x = 2sinxcosx वगैरे आठवायला लागते.



Dineshvs
Saturday, January 19, 2008 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे रेकॉर्ड अडकण्याचे दिवसही जुनेच. आताच्या सीड्या अडकल्या कि काहि अचाट आवाज ऐकु येतात.
दूज का चाँद नावाच्या एका सिनेमात, मन्ना डेच्या आवाजात, फ़ूल गेंदवा ना मारो, हे गाणे अश्या रेकॉर्ड अडकण्याचा उपयोग करुन गायले आहे.
त्यात जतकरे, जतकरे, जतकरे ( लगत करेजवा मे चोट )
दवा, दवा, दवा ( फ़ूलगेंदवा ना मारो ) असे शब्द आले आहेत. संगीत रोशनचे आहे. पडद्यावर आगा, भा. भू आणि एक नागोबा आहेत.

पुर्वी गाण्याचा साडेतीन मिनिटाचे बंधन असे. मोठे गाणे असले कि ते दोन भागात रेकॉर्ड केलेले असायचे. आणि रेडिओवर ते गाणे लावताना निवेदक मधे, अब सुनिये इस गानेका दूसरा भाग, असे म्हणत, रेकॉर्ड उलटुन लावत असे.
बरसात कि रात मधली कव्वाली, अशी दोन भागात होती.
मराठीत, पिंजरा मधले, देरे कान्हा चोळी लुगडी, झुंज मधले, दत्तदर्शनला जायाचे, हि गाणी पण अशीच होती.
आता असे जुने रेकॉर्डिंग सीडीवर उपलब्ध आहे. याचे पॅकिंगही तसेच आहे. छान वाटते या सीडीज ऐकायला.

माझ्या आठवणीत तरी मोठे पितळी कर्णे नाहीत. बॅरिष्टर नाटकात तो वापरला होता. त्यात मावशी म्हणजे विजया मेहता, बालगंधर्वांची पदं ऐकत असत. या सगळ्याचाच त्या नाटकात फार महत्व होते.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators