Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 08, 2007

Hitguj » My Experience » रांगोळी » Archive through November 08, 2007 « Previous Next »

Sakhi_d
Thursday, November 01, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाण्या खालची रांगोळी कशी काढावी??

Ashwini_k
Thursday, November 01, 2007 - 6:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका थाळ्यात मेण वितळवून घे. ते. घट्ट झाल्यावर त्यावरच रांगोळी काढ (रंगांचा थर जास्त जाड नको नाहीतर रंग पाण्यावर तरंगतात). मग तो थाळा आचेवर उंच धरून हळू हळू मेण वितळेल इतकीच उष्णता दे. त्या वितळलेल्या मेणात रांगोळी फ़िक्स होते. हे सर्व थंड झाले की थाळ्याच्या कडेने पाणी सोड.

अजून काही बारकावे असतील तर माझ्या एका expert मैत्रिणीला विचारून पोस्ट करते.


Monakshi
Thursday, November 01, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाण्याखालची रांगोळी?????? आयला, ऐ.ते. न. अश्विनी एखादा फोटो असेल तर टाक ना. श्या मला जमिनीवरची पण काढता येत नाही :-(

Ashwini_k
Thursday, November 01, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोना, मी काढलेली पाण्याखालची रांगोळी अपेक्षेपेक्षा बंडल आली (पाण्यामुळे ती उठून दिसत नाही) त्यामुळे फ़ोटो काढायची हिम्मत झाली नाही. पण पाण्याखालच्या रांगोळीचा उत्तम फ़ोटो मिळतात तो पोस्ट करेन.

आणि पाण्या खालचीच काय, वरचीही रांगोळी असते. आमच्या ऑफ़िसच्या कॅंटीनमध्ये एका दसर्‍याला एका आर्टिस्टने काढली होती. साईबाबा काढले होते. पाण्यावर कोळश्याची पूड पसरून त्यावर चित्र रांगोळीने काढतात. पण ही रांगोळी कडेकोट बंदोबस्तात ठेवावी लागते. (कुणाचा धक्का नको, पंखाच काय झुळूकही नको नाहीतर थोड्यावेळाने साईबाबांचे शिवाजीमहाराज दिसू लागतील ). ही मात्र फ़ार सुरेख दिसते.


Dineshvs
Thursday, November 01, 2007 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाण्याखालच्या रांगोळीसाठी व्हॅसलीनही वापरता येते. यात रंग थोडे गडद वापरायचे आणि रंगाचा थर थोडा पातळ ठेवायचा. रांगोळी घालुन झाली कि थाळा पुर्ण उलटा करुन थोडासा टॅप करायचा. त्याने अतिरिक्त रंग खाली पडतो. बाकिचे रंग चिकटुन बसलेले असतात. त्यावर अगदी हळुहळु पाणी घालायचे.
समजा वर काहि तरंगलेच तर हळुच साबण फ़िरवायचा, त्याने पाणी नितळ होते.
पाण्यावरच्या रांगोळीसाठी, आधी कोळश्याची भरड पूड पसरवायची. मग त्यावर चाळणीने कोळश्याची बारिक पूड पसरवायची. हा थर पुरेसा जाड असावा, मग त्यावर चमकदार रंगाची रांगोळी घालायची.
पाण्यावरच्या रांगोळीसाठी फ़ुलांची रांगोळी योग्य ठरते. पाण्यामुळे फुलेपाने टवटवीत राहतात.


Zakasrao
Thursday, November 01, 2007 - 8:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला जमिनीवरची पण काढता येत नाही>>>>>>
तुला हवेतच काढता येते फ़क्त. हो ना?
असो,
पाण्यावरची रांगोळी हा प्रकार वाचलाय, ऐकलाय, पेपरात फ़ोटो पाहिलेत.
पण पाण्याखालची रांगोळी हा नवीनच प्रकार दिसतोय.
interesting अश्विनि तुम्ही डिटेल माहिती द्याच. :-)


Tiu
Thursday, November 01, 2007 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोहता येत असेल तर पाण्याखालची रांगोळी काढणं काही अवघड नाही...:-)

Rimzim
Thursday, November 01, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tiu...LOL

पाण्या खालची रांगोळी बरेच वेळा पहायला मिळते, पण पाण्या खालची रांगोळी मात्र फक्त फोटो मधे पाहिली आहे.

फोटो टाका रे कोणी तरी


Manjud
Friday, November 02, 2007 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्या मला जमिनीवरची पण काढता येत नाही


अगं मोना, मग स्टिकर चिकटव. नाहीतर साचे आण रांगोळीचे विकत, १०० रुपयाला ४ मिळतात. दिवाळीचे ४ दिवस ४ रांगोळ्या..... आणि त्यावर मी देत्ये ते दिवे पण लाव. हे हे... नवरा एकदम खुष, आर्टिस्ट बायको मिळाली म्हणून....

मोना, मी काढलेली पाण्याखालची रांगोळी अपेक्षेपेक्षा बंडल आली (पाण्यामुळे ती उठून दिसत नाही)

अश्विनी, अगं बसून बघायची मग छान दिसली असती.....

फारच पीजे चाललेत ना माझे...


Manjud
Friday, November 02, 2007 - 6:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, व्हॅसलिनची आयडीया मस्तय!! मि बघ्ते प्रयत्न करून, बरी जमली तर फोटो टाकेन इकडे....

Rajya
Friday, November 02, 2007 - 6:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

टिउ

फोटो असतील तर टाकाच :-)


Princess
Friday, November 02, 2007 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पण काढली होती पाण्याखालची रांगोळी सासरच्या मंडळीना impress करायला. (साखरपुड्याच्या दिवशी.) आता फोटो नाहीयेत. खुप सुरेख जमलेली. पण नंतर कधीच काढली नाही.

मेणाचा थाळा तयार करणे हेच फ़क्त जिकीरीचे काम. एकदा ते जमले की मग पुढचे काम सोपे. आश्विनीने सांगितल्याप्रमाणे थाळा तयार करावा. मेण घट्ट झाल्यावर त्यावर रांगोळी काढायची. रेघा जाड हव्यात. रंगही भडक. एकुण काय तर नाजुक रांगोळी नको. नंतर थाळा गॅसवर धरायचा. मेण वितळुन रांगोळी थोडी आत शिरतेय असे वाटतानाच गॅस बंद करावा. आता पुन्हा मेण घट्ट होऊ द्यावे. नंतर थाळ्याच्या कडेने अगदी अलगद पाणी ओतावे. रांगोळी पुर्ण झाल्यावर तुम्ही जे पहाल त्यात मेहनत सफल झाल्याचे चित्र दिसेल. आणि जर तुमचा माझ्यासारखा कोणाला impress करण्याचा प्रयत्न असेल तर तो १००% यशस्वी होणार :-)


Princess
Friday, November 02, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन एक... जर मोठ्या परातीत काढणे जमणार नसेल तर ४ किंवा ५ ताटात पाण्याखालची रांगोळी काढावी. जी तुम्ही दिवाळीला हॉलमध्ये ठेवु शकतात आणि त्यावर floating दिवे (तरंगते दिवे) लावु शकतात. हे माझी आई बरेच वर्षे करायची.

Ashwini_k
Friday, November 02, 2007 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजू, अग झोपून पण छान दिसते का बघितली पण अजूनच बंडल दिसली. . पसरल्या पसरल्या सारखे काहितरी झाले त्या रांगोळीचे. मजा म्हणजे माझी ती expert मैत्रीण सेवा म्हणून ठाणे मेंटल हॉस्पिटलला पेशंट्सना (बायका फ़क्त) पाण्याखालची, वरची, जमिनीवरची रांगोळी शिकवते (पेशंट्सना मन रमवता येते, कला असेल तर त्याची ओळख होते) व त्या बायका आता चांगली रांगोळी काढू लागल्या आहेत असे ती म्हणाली. तिच्याकडेच चांगल्या पाण्याखालच्या रांगोळीचा फ़ोटो (कुणीही काढलेल्या) मिळाला तर बघते.

Princess
Friday, November 02, 2007 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आश्विनी, अग पसरल्यासारखे दिसतेय म्हणतेस... मग तु थाळा जास्त वेळ गॅसवर धरलास. मेण वितळायला सुरुवात होताना रांगोळी किंचित खाली जाताना दिसल्याबरोबर गॅस बंद करायचा. परत एकदा करुन बघ. जास्त मोठी चुक नाहीये.

Ashwini_k
Friday, November 02, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बघते परत try करून. पण जमिनीवरच्या रांगोळ्या कशा लगेच सुधारता येतात, तसे याचे नाही ना :-(

Sakhi_d
Saturday, November 03, 2007 - 3:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अनेक वर्ष पाण्याखालची रांगोळी काढते. पण मी मेण न वापरता तुप वापरते. मी आधी थाळ्यावर पेन्सिलने डिझाईन काढुन घेते. मग त्यावर तुप गरम करुन लावते आणि एक एक रंग भरते. दिनेशनी सांगितल्याप्रमाणे रंग टाकुन झाल्यावर थोडेसे tap करायचे म्हणजे जास्तीचा रंग पडुन जातो. मग सगळी रांगोळी काढुन झाली कि तो थाळा मी थोडावेळ फ़्रिझला ठेवते. नंतर हलक्या हाताने थंड पाणीच ओतते म्हणजे बराच वेळ रांगोळी रहाते. अशी रांगोळी २ - ३ दिवस अगदि छान रहाते.


Prajaktad
Saturday, November 03, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंतर हलक्या हाताने थंड पाणीच ओतते म्हणजे बराच वेळ रांगोळी रहाते>>>पाण्याखालची रांगोळी काढतानाचा सगळ्यात मह्त्वाचा मुद्दा..

पांरपारिक रांगोळी जमत नसेल तर रांगोळी अनेक प्रकारे काढता येते.धान्य,फ़ुल,भुसा अशी अनेक माध्यम वापरुन सजवता येते
खडे मिठाला रंग लावुन ही रांगोळी काढता येते..
बारिक भुसा रंगवुन तर मोठी रांगोळी चांगली काढता येते..यात बारिक डिझाईन मात्र चांगल्या दिसत नाही..फ़ुलांचे गालिचे सुंदर तर दिसतातच शिवाय एक वेगळिच प्रसन्नताही येते.


Maanus
Wednesday, November 07, 2007 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही रांगोळी बघा.

फुलांच्या पाकळ्यांपासुन काढली आहे.

http://www.flickr.com/photos/debu_4/1738662664/

Jayavi
Thursday, November 08, 2007 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

WOW !!! अरे माणुस, एकदम जबरी आलीये तुझी रांगोळी :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators