Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 25, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » My Crushes » Archive through October 25, 2007 « Previous Next »

Nandini2911
Saturday, October 20, 2007 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा पहिला क्रश.. सलमान खान..
साधारण चौथीत असताना (चु भु दे घे.) त्याचा मैने प्यार किया पिक्चर पाहिल्यानंतर आवडता हीरो या लाईनमधे तो येऊन बसला.. तो आजतागायत तिथे टिकून आहे. त्यानंतर कित्येक वर्षे माझ्या क्रशलिस्ट्मधे कुणाची एंट्री झाली नाही. मला सलमान आवडत असल्यामुळे बर्‍याचदा घरवाले त्याची टिंगल करायचे. मला रडवायचा हमखास मार्ग म्हणून अर्थात....

नववीमधे असताना "प्यार किया तो डरना क्या" हा पिक्चर आला.. आणी आवडत्या हीरोने लगेच घोडेवाल्याचे प्रमोशन घेतले. (संदर्भ.. प्रिन्सेस आणि नाव आणि प्रतिमा हा बीबी.)

दहावीत असताना सलमान भाऊ ऐश्वर्‍या भाभीच्या प्रेमात पडल्याचं समजलं.. आमच्या मनात देवदासचा रेमेक तेव्हाच चालू झाला. त्यानंतर अकरावीमधे असताना हा पिक्चर आला आणि... आणि..
अख्खा पिक्चर मी ब्रिजवरून नंदिनी आय लव्ह यु म्हणत ओरडत येणार्या सलमानसाठी ३२ वेळा पाहिला. (त्यानंतर कितीवेळा पाहिला ते मोजले नाहीये.) घरी व्हीसीडी आहे...


मात्र याचदरम्यान ह्रितिक रोशन नावाचा अजून एक घोडेवाला आला. पण आता रीअल लाईफ़मधे पण एक हीरो आलेला होता.. त्यामुळे हे सर्वजण जरा बॅकस्टेजला गेले. :-)

SNDT ला प्रवेश घेतल्यावर पहिल्याच आठवड्यामधे धक्का बसला. सलमानचे वडील सलीम खान आम्हाला शिकवायाला होते. या माणसाबरोबर बसून शोले पाहिलाय... :-) तेव्हा एक दोनदा सलमानला कॉलेजात आणण्याचे प्रयत्न केले पण ते काही तितके यशस्वी ठरले नाहीत.
पुढे जर्नालिस्ट झाल्यावर मुलाखतीची आयती संधी चालून आली. लहानपणापासून जर मी सलमानला भेटले तर... यावर बराचसा कल्पनाविलास केला होता. :-)
प्रत्यक्ष भेट मात्र खूप वेगळी झाली. बांद्र्याच्या मेहबूब स्टुडिओमधे "सलामेइश्क" चे शूटिंग चालू होते. नुकतीच सलमानचे फोनप्रकरण गाजलेले होते. आणि प्रत्येक जर्नालिस्टने "सलमान कसा वाईट वागवतो" याची उदाहरणे दिली होती. सलमान आणि मीडीयचे नाते तसेही फ़ार चांगले कधीच नव्हते. मी त्याच्या बॉयकडे माझे कार्ड दिले appointment होतीच. मॅनेजरने मला आत वॅनमधे बसायला सांगितले. कुणीतरी ज्युसचे दोन ग्लास आणून ठेवले. सहकार्यानी सलमानने काही दिले तरी पिऊ नकोस हा सल्ला तीन तीनदा दिला होता. (कारण बर्‍याचदा सलमान पत्रकाराना कारल्याचा ज्युस पाजतो :-))

जवळ जवळ पाच मिनिटानी तो आला. निळी जीन्स आणि पांढरा टीशर्ट. पायात शूज. डोळ्यावर सोनेरी काड्याचा चष्मा. माझ्या हातातली वही पडते की काय असं मला वाटायला लागलं... आपलं हृदय इतक्या धड धड वाजू शकतं हे मला पहिल्यादाच समजलं.
"नंदिनी?" त्याने विचारलं. ही नंदिनी कोण हा प्रश्न (आईशप्पथ) मनात येऊन गेला.. तो हसला.
ज्युस नही लिया आपने त्याने मला विचारले.
तो बहुतेक माझ्याशी बोलत होता. :-)
त्याने ग्लास उचलून माझ्या हातात दिला. नशीबाने तेव्हा मी बरीचशी जागी झाले. आणि वहीमधे लिहिण्यासाठी पेन सरसावलं. (बाय द वे, तो काकडीचा ज्युस होता.)

मी काही विचारणार एवढ्यात त्याने विचारले. " You are a journalist? " मी हो म्हणूउन मान हलवली.
"कौनसी standard मे पढते हो?" त्याने विचारलं..
"सर.. मैने कॉलेज खतम किया है."
"तुम्हे देखके लगता है के मुझसे मिलने के लिये तुमने झूठ बोला होगा. जर्नालिस्ट तो किसी भिई ऍंगलसे नही हो.." तो मिश्किलपणे हसत म्हणाला.
"सर, ये मेरे ऑफ़िसका नंबर है कभीभी फोन करके पूछ लिजिये..." मी पण हसत उत्तर दिलं.
"ओके. पूछो जल्दीसे.. शॉट रेडी हो जायेगा." त्याने हातातल्या घड्याळाकडे बघत सांगितलं.
मी धडाधड प्रश्न विचारले. त्याने फ़टाफ़ट उत्तरे दिली. निघताना मी त्याला सांगितलं.."सलीम सर कैसे है?" माझ्या या प्रश्नाने गप्पा परत सुरू झाल्या. मी कशी त्याना ओळखते ते कसे शिकवतात सलमान इतका वेळ प्रोफ़ेशनल होता पण आता मात्र एकदम मजेत बोलत होता.
कतरीनाचा मधे एकदा फोन येऊन गेला. :-(
जवळ जवळ तासाभराने असिस्टंट बोलवायला आला. जाता जाता मी सलमानला थॅंक्स म्हटलं आणि शेकहॅंड केले.

अशा रितीने माझा मी माझ्या पहिल्या क्रशला भेटले.
पुन्हा केव्हातरी मी आणि ह्रितिकने केलेल्या धमाल interview विषयी सांगेन...


Akhi
Saturday, October 20, 2007 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

next post kadhi denar?

Kmayuresh2002
Saturday, October 20, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी,छान छान.. सल्लुमियाला भेटुन कृतकृत्य झाल्यासारखे वाटले ना तुला अगदी?:-)

Zakasrao
Saturday, October 20, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"कौनसी standard मे पढते हो?" त्याने विचारलं..
>>>>>>>>
नंदिनी,छान छान.. सल्लुमियाला भेटुन कृतकृत्य झाल्यासारखे वाटले ना तुला अगदी>>>>...
डोंबलाच कृत कृत्य.
त्याने विचारल की कितवीत शिकतेस. :-)
असो. नन्दु लगे रहो. अजुन येवु दे :-)
पुढची लिस्ट बी देवुन ठेव इथे.


Nandini2911
Saturday, October 20, 2007 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभाळाला हात लावून आल्यासारखं मात्र वाटलं. आणि अजूनही सलमान मला तितकाच आवडतो. त्यामुळे २ नोव्हेंबरला मी काय करतेय हा प्रश्न विचारू नका..
माझे दोन दोन घोडेवाले एकाच पिक्चरमधे... सावरिया रे ओ सावरिया... ले गया दिल तू ओ सावरिया.


Aktta
Saturday, October 20, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२ नोव्हेंबरला काय करतेय?????
... ... ...

Chaffa
Saturday, October 20, 2007 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



हे सगळे ठिक आहे पण हा मधेच घुसलेला घोडेवाला कोण??????????? एक भाबडा ( भोचक ???????) सवाल.


Chinya1985
Saturday, October 20, 2007 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२ नोव्हेंबरला काय असत???

असो सल्लुची बॉडी भारी असल्याने पुर्वी मलाही तो आवडायचा पण नंतर त्याने केलेल्या अनेक दिडशहाणपणाच्या गोष्टींमुळे (म्हणजे प्रिय ऐश्वर्याला त्रास दिल्याने) ,तो डोक्यात जाऊ लागला.


Manuswini
Monday, October 22, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरेच दिवसाने इथे आले, सध्या काही interesting persona भेटत नसल्याने आमचे इथे योगदान होवू शकत नाही हा खेद (फक्त आम्हालाच) आहे .
प्रवासात पण काय बोर भेटतात. :-). सध्या तरी माझा नवीन बॉस वर व crush आहे. पण जरा जरा मला तो राजस्थानी गावठी वाटायला लागला आहे दोन महिन्यातच :-).कोणीतरी काही तरी interesting लीहा बरे. एखादी rela life ची Crush .............
celebrity crush बोरींग वाटते मला तरी.



Nandini2911
Monday, October 22, 2007 - 7:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओके, मनुस्विनी.. माझ्या रीअल लाईफ़ क्रशबद्दल लवकरच लिहीन.. टाईम भेटला की...

चाफ़्या कोण रे घोडेवाला. :-)
चिन्या.. सलमान ऍश लव्हस्टोरी खरी माहीत आहे का???
तिने त्याला किती त्रास दिलाय ते विचार ना मला. :-) तेव्हापासून I hate her.

विवेक च्या आयुSःयातून ऍश गेल्यानंतर सलमानने त्याला मेसेज पाठवला.
"तेरे लाईफ़से पनवती चली गयी.."
(खरोखर नंतर विवेकचे पिक्चर हिट गेले. आधी तो पण डब्यात जात होता. :-) )


Monakshi
Monday, October 22, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>तिने त्याला किती त्रास दिलाय ते विचार ना मला.

नंदू, तुझ्याशी सहमत. मला खरी ष्टोरी माहित नाही पण मला असं वाटयंय की ह्यात जास्ती करुन चूक तीचीच होती. म्हणून अभिऐश च्या लग्नाचं मला फार दु:ख झालं. :-(

Panna
Monday, October 22, 2007 - 2:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिने त्याला किती त्रास दिलाय ते विचार ना मला.

नंदिनी, आता विषय काढलासच आहेस तर सांगुन टाक बरं त्यांची ष्टोरी!!

Prajaktad
Monday, October 22, 2007 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो आणी रुत्विक बरोबरच्या धम्माल interview ची ही स्टोरी लिही बर..

Chinya1985
Monday, October 22, 2007 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या.. सलमान ऍश लव्हस्टोरी खरी माहीत आहे का???
तिने त्याला किती त्रास दिलाय ते विचार ना मला. तेव्हापासून I hate her
खरी स्टोरी माहित नसावी.तु लिहि ती.

(खरोखर नंतर विवेकचे पिक्चर हिट गेले. आधी तो पण डब्यात जात होता.
विवेक डब्यातच होता की नेहमी!!!!कम्पनी सोडला तर कुठला हीट दिलाय त्याने स्वत्:च्या जोरावर???

Prajaktad
Monday, October 22, 2007 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कम्पनी सोडला तर कुठला हीट दिलाय त्याने स्वत्:च्या जोरावर??? >>>

साथिया!
(वि.सु.- मी विवेक ची पंखा( fan ) नाही!)


Chinya1985
Wednesday, October 24, 2007 - 5:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साथिया हीट होता???असेल तरी काही ग्रेट बनत नाही तो त्याने.

Deepanjali
Wednesday, October 24, 2007 - 6:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmm खरी स्टोरी काही असो , सल्लुचे एकंदरीत प्रताप पहाता ऍश ला physical abuse केले असेल यावर विश्वास बसतो , आणि suppose खरच तिने त्याला कितीही त्रास दिला जरी असेल तरी physical abuse हा गुन्हाच आहे .
Anyways, सल्लु सारख्या माणसाला ऍश आणि कत्रिना सारख्या beauties कशा मिळतात काय माहित .. कसला आहे तो ! :-( ( एके काळी माझ्याही crush list मधे होता )
ऍश च्या अत्ता पर्यंत च्या सगळ्या choices ची किव येते , सल्लु काय , विवेक आणि हा Junior B पण .. सगळेच बकवास आहेत .
सब्बीर भाटीया सारखी माणसं सोडून कुठे गेली ही:-)


Nandini2911
Thursday, October 25, 2007 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डीजे, राजीव मूलचंदानीला विसरलीस? फ़ास लावून गेला तो पोरगा हिच्यापायी..
physical abuse झाले असं ऍश म्हणते दुसरं कुणी म्हणतं का?
अकदा ऍशच्या आईने अका मुलाखतीत सलमान माझ्या मुलीच्या पाठी तिच्या पैशासाठी आहे असं भयानक विधान केलं होतं. (सलमान करोडोमधे मानधन घेणारा पहिला बॉलीवूड स्टार आहे आणि तेव्हा ऍशचा फ़क्त हम दिल दे चुके सनम हिट गेला होता.)
चलते चलते च्या सेटवर ऍश सलमानचं भांडण झालं तर शाहरूखने ऍशला पिक्चरमधून काढून टाकलं. सलमानशी मैत्री तोडली नाही. :-)
चिन्या, साथिया मस्ती कंपनी डरना मन है. युवा ओंकारा काल शूट आऊट ) हे सर्व तुफ़ान हिट नसले तरी पैसा वसूल नक्केच आहेत. मस्तीतर २००४ चा सर्वात जास्त गल्ला कमाऊ पिक्चर होता. असो. क्रश लिहा. गॉसिप नको :-)


Shamal
Thursday, October 25, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow nandini tujhi 1st crush chi story tar khupach interesting aahe maja aali

Savyasachi
Thursday, October 25, 2007 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>सलमानशी मैत्री तोडली नाही.

donhI khaanach kI :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators