Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 19, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » First Time » पहिलं चुंबन » Archive through October 19, 2007 « Previous Next »

Ajjuka
Saturday, October 06, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिला किस हा अगदी न लिहिण्यासारखा बावळट प्रकार असतो. नक्की काय करायचं कळत नसतं. आपण काय केलं म्हणजे बावळट वाटणार नाही या विचारात आपण अजूनच बावळट होतो. जे काय चाललंय आपलं आणि समोरच्याचं ते नक्की बरोबर चाललंय ना असंही सारखं डोक्यात येत असतं... (जसं काही चुंबनाचं manual च असतं आणी त्याप्रमाणे केलं नाही तर फाशीच बसणार असते...)
सर्वसाधारणतः पहिला किस हा अधिकृत नसतो.. ही ही ही...
चोरून मारून.. कोणाला न कळता.. कोणी बघत नाहीये ना.. घरी कळलं तर... तेवढ्यात इथे कोणी आलं तर.. अश्या हज्जारो tensions मधे एकदाचा पहिला किस उरकला जातो....
आणि आपण स्वतःला डॉन समजू लागतो.. इतर मित्रमैत्रिणिंपेक्षा आपल्याकडे एक अनुभव जास्त आहे असं समजत आपण मान ताठ करून फिरत असतो. मित्रमैत्रिणी आपल्याआधीच डॉन होते आणि आपल्याला काही जमलेलं नाही पण तरी काही बिघडलं नाही कारण पहिल्यांदा शक्यतो कोणालाच जमत नाही.. असं सगळं ज्ञान होईपर्यंत आपण रूळलेलो असतो..



Hkumar
Saturday, October 06, 2007 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहिले चुंबन घेणार्यांना एक अनुभवी सल्ला
आपल्या डोळ्यावर चष्मा असल्यास तो आधी काढून ठेवावा! अन्यथा चष्म्याची काडी वाकू शकते.


Manjud
Saturday, October 06, 2007 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, चोरून ठिक आहे पण मारून कसं शक्य आहे?????

Hkumar अहो पहिल्या चुंबनापुढे चष्म्याची काडी काहिच नाही हो!!

काल मी माझ्या मुलीला पहिला धपाटा घातला. इतक्या दिवसांची सुरसुरी काल शमवली. ताटलीत खायला दिलेला दहीभात तिच्या टेडिच्या अंगावर टाकत 'शुभमंगल सावधान' करणं चालू होतं बाईसाहेबांचं!!!


Supriyaj
Saturday, October 06, 2007 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नी.... पहिल्या किस चा एवढा superb आणि अचूक वर्णन अजून नाही वाचलं कुठे :-)
'डाॅन समजतो'... खत्री आहे comment !!!


Maanus
Saturday, October 06, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नीरजा

Rockford movie ची आठवण झाली, त्यात ते कार्ट first kiss नंतर hostel ला परत आल्यावर कसा भाव खात असतो :-)

कुमार :-), खुप विचार केला पण कळाल नाही चष्म्याची कांडी कसकाय वाकू शकते

आर्च बाह्या काढुन टाक, म्हणजे घालतील ते कदाचीत :-)

अमृता, अजुनही वेळ गेलेली नाहीय, कुठेतरी hiking जाल तेव्हा परत एकदा try मारायचा :-)

माझा पहीला घरी दाढी करण्याचा प्रसंग.
पहीले काही दिवस सलुन मधे जायचो.

एक दिवस घरी कोणी नाही हे बघुन संधी साधली, मावस बहीण होती, पण ती तीच्या अभ्यासात. खाली दुकानात जावून ब्लेड वैगेरे आणले, एका रुम मधे गेलो, सगळे पडदे वैगेरे लावून मग दाढी केली.

तेव्हापासुन मला दाढी ईतरांसमोर करायला आवडत नाही :-) दाढी करताना कोणी समोर असल की मला uncofortable feeling येते :-)


rockford चे गाणे इथे बघायला मिळेल,
you tube link , चिकार first time movement ची आठवण येईल :-)

Hkumar
Sunday, October 07, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणूस, पहिल्या चुंबनाबरोबर आलिंगनही असतच की हो! आता कळले काडी कशी वाकली ते?
मला जरा smiley कसा टाइप करायचा सांगता का? आता टाकला आहे असे समजा!


Deepanjali
Monday, October 08, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बनाबरोबर आलिंगनही असतच की
<<<<हे रोमॅंटिक शब्द मराठीत कसे वाटतात ना ऐकायला !!

Upas
Monday, October 08, 2007 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या आठवणीतला पहिला कीस म्हणजे ज्याला आपण पापी म्हणतो तो.. अगदी अगदी लहानपणी.. :-)

Manuswini
Monday, October 08, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, जे काही लिहायचे ते व्यव्स्थीत लिहायचे असे अर्धवट का ते

आमच्या (इथील वाचकांच्या) कल्पनाशक्तीला त्रास का तो........


Zakki
Monday, October 08, 2007 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास तू बटाट्याचा कीस म्हणतो आहेस की रताळ्याचा? तुला बहुतेक किस म्हणायचे आहे.

छ्या:! काय हे आजकालच्या लोकांचे व्याकरण? नुसते व्या व्या केले की व्याकरण येत नाही काही!



Vijaykulkarni
Monday, October 08, 2007 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


एवढा कीस नका रे पाडू किस चा




Upas
Monday, October 08, 2007 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, अहो तर काय तर काय.. खाली डोकं वर पाय.. बहुधा तुमच्याकडेच बघून पाडगावकरांनी हे लिहून ठेवलं असावं..

भाषेच्या ज्ञानाने तर तुम्ही महामंडीत असता,
व्याकरणाचे बारकावे,याचे तुम्ही पंडित असता,
ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता,
ओठ म्हणजे सर्वनाम,त्याचा तुम्ही विचार करता,
तर काय तर काय?......खाली डोकं,वर पाय ..!! :-)

Yogita_dear
Tuesday, October 09, 2007 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला म्हणजे अश्या प्रकारे गाडी परत किस / कीस वर आली म्हणायची..(ज्याला जो किस / कीस हवा असेल तो स्वत्:च्या सोईनुसार घ्यावा...) लिहा रे कोणीतरी first kiss बद्दल आणि बंद करा सगळ्यांची तोंड...

Zakki
Tuesday, October 09, 2007 - 1:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, धन्यवाद. आता कुणा 'ती' ने ओठ जवळ आणले तर लक्षात ठेवीन!


Hkumar
Tuesday, October 09, 2007 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, kiss ची एक मजेदार व्याख्या आठवली:
Kiss is the contraction of the mouth due to expansion of the heart
...... आणि पहिल्या चुंबनाच्या वेळेस तर heart expand होतेच ना!


Amruta
Tuesday, October 09, 2007 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!! काय व्याख्या आहे. जाम आवडली. :-)
उपाश्या, कविता पण मस्तच. पण अजुन कस कुणीच किसा बद्दल काही लिहिल नाही? मी कधिची वाट पहात्ये ;)


Rajya
Wednesday, October 17, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यावेळी माझं वय होतं १९ आणि तिचं १८ :-)
मी हीला भेटायला सातार्‍याला गेलो होतो. तिला कॉलेजवरुन उचलला आणि गेलो रजताद्री हॉटेलात. काही बाही खाल्ल्यनंतर म्हटलं आता काय करुयात, तर ही म्हणाली इकडे जाऊ तिकडे जाऊ वगैरे वगैरे, मी म्हटलं उगाच कोणी पहायला नको.
मग मीच तिला म्हटलं चल पिक्चरला जाऊ, थोडा वेळ हो नाही करत तयार झाली. :-)

मग विचारलं कुठल्या पिक्चरला जायचं? तर ती म्हणाली इथेच जयविजय टॉकीज आहे, तिथे बघु कोणता असेल ते. मग टॉकीजवर गेलो तर "कभी हा कभी ना" लागलेला. आम्ही दोघांनीही हा पिक्चर बघितला नव्हता, मग तिकिटं काढली तर नं. होते ४१ आणि ४२. आत गेलो तर ४१ आणि ४२ हे नं सर्वात मागच्या रांगेतले अगदी शेवटचे :-) मनातल्या मनात तिकिट देणार्‍याला धन्यवाद दिला :-)

पिक्चर सुरु झाला, आमचं निम्मं लक्ष पिक्चरकडे निम्मं... ...:-)
तर त्या पिक्चर मध्ये एक सीन आहे, सुचित्रा आणि दीपक तिजोरीच्या (हाच आहे का हो?) किस चा

हो हो, हा माझ्या पहील्या किस चा च अनुभव सांगतोय.. ..:-)


तो सीन झाल्यावर एकदम माझी ट्युब पेटली, आपण ही किस केला तर (सुचित्राला नव्हे) :-)

मग मात्र सगळं अंग थरथरायला लागलं, आयुष्यात अजुन पर्यंत कुणालाच किस केलं नव्हतं.
विचार करत होतो कसं करावं, तिला आवडेल का? कोणी बघेल का? वगैरे.. ..
मग हळुच तिच्या खांद्यावर हात टाकला, थोडा वेळ अस्सच गेल्यावर हळुच तिच्या गालावरुन हात फिरवला, तिने हळुच माझ्याकडे पाहीले व हसली :-)
मग मला थोडा धीर आला, हळुच तिचा चेहरा माझ्याकडे वळवला आणि माझे ओठ तिच्या ओठावर टेकवले :-) पण काय सांगु लोकहो नेम चुकलाच की, माझा ओठ तिच्या अर्ध्या ओठावर आणि अर्ध्या गालावर असा टेकलेला :-) पण जो काही अनुभव होता तो अफलातुन होता :-) त्या किसची चव मला अजुनही आठवते :-)
आणि आजपर्यंत भरपुर किस घेतले दिले पण तो अर्धे ओठ आणि अर्ध्या गालाचा किस घेणे अजुनही मला आवडते, माझा तो आवडता किस चा प्रकार आहे. अजुनही लाडात आलो की बायकोला असाच किस करतो :-) तुम्हीही ट्राय करुन बघा, छान वाटतं

तर असा हा माझ्या पहील्या किसचा अनुभव :-) त्यात लाजायचं काय? मंडळी चला आता तुमचे अनुभव सांगा :-)






Zakasrao
Wednesday, October 17, 2007 - 8:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या लाजायच काही नसत पण घाबरायच तरी असतच रे.
आता हे सगळ बायकोने वाचल की झालच.......
मग तुझी फ़र्स्ट टाइम बायकोने घराबाहेर काढल्याचा अनुभव येइल
तो फ़र्स्ट टाईम बायकोचा वाढदिवस विसरण्याचा अनुभव येवु दे रे. सगळ्या नवरे "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" ह्या म्हणीप्रमाणे वागतील :-)


Rajya
Wednesday, October 17, 2007 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग तुझी फ़र्स्ट टाइम बायकोने घराबाहेर काढल्याचा अनुभव येइल

झक्या

अरे बरी आठवण केली रे, जरुर लिहीन वाढदिवस विसरण्याचा अनुभव, पण नंतर. पहील्यांदा वरच्या अनुभवाच्या प्रतिक्रिया बघतो आणि मग लिहीतो :-)


Swa_26
Wednesday, October 17, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या.. सही लिहिलंत...
एकदम बोल्ड ऍन्ड ब्युटिफुल!! :-)


Suhasya
Wednesday, October 17, 2007 - 12:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच.:-):-) bold & beautiful
आता पुढचा अनुभव लीही वाट पहात आहेत सगळे.

Dakshina
Wednesday, October 17, 2007 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या, जिचा किस घेतलास तीच बायको आहे?

की 'ती' 'किसवाली'वेगळी होती? आम्हाला आपली उगिचच उत्सुकता...
पण काहीही म्हण खरंच तुझा अनुभव Bold & Beautiful आहे.


Sonal_sach
Wednesday, October 17, 2007 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापारे!!!! सातार्‍यात पब्लिक एरिआमध्ये किस करायची हिम्मत...
ग्रेट आहात. तिथे तर मुलांशी रस्त्यावर बोलताना पण शंभरदा विचार करावा लागतो.





Disha013
Wednesday, October 17, 2007 - 4:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साता-याला भेटायला गेलतास म्हणजे ती बायकोच(म्हणजे तेव्हाची प्रेयसी नि आताची बायको) असण्याचीच शक्यता जास्त! बरोबर ना?
गॉसिपिंग सुरु
बाकी,राज्या,प्रामाणिकपणे सगळं लिहीलय छान!
अजुन येवु दे!


Amruta
Thursday, October 18, 2007 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग बायकोच असणार नाहीतर एवढ खुल्ल लिहायची हिंमत करणार नाही तो. आणि पोस्ट मधे 'हिला भेटायला' अस लिहिलय बघ :-)
बाकी मजेदार लिहिलय बर


Chyayla
Thursday, October 18, 2007 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या, तु या BB वर प्रेम-प्रसंग टाकुन हिरोच झाला की रे.

बाकी,राज्या,प्रामाणिकपणे सगळं लिहीलय छान!
अजुन येवु दे!

चावटपणा पुरे हं दिशा, अजुन म्हणजे काय म्हणायच काय तुला? हिरोच लगीन झाल की सुखांत झाला म्हणतात सिनेमाचा.


Rajya
Thursday, October 18, 2007 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद स्वाती, झकास, च्यायला, दक्षिणा, अमृता, सुहास्य, सोनल :-)

एक खुलासा करतो, ही किसवाली (हीचं नाव रश्मी) माझी बायको नाही, त्यावेळी ठवरलं होतं या किसवाली बरोबरंच लग्न करायचं :-) पण तिचा बाप मध्ये आला असो तो एक वेगळाच विषय आहे, जमलं तर लिहीन पण "माझं पहीलं प्रेम" असं काहीतरी :-)


Rajya
Thursday, October 18, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला

अजुन येवु दे!
आता पुढचा अनुभव लीही वाट पहात आहेत सगळे.

दिशा, स्मिता, आता अजुन काय? :-)

Chchotu
Thursday, October 18, 2007 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या,
शब्दान्कन मस्तच.
आधि माहित असुनही वाचताना रोमान्च आणि इतर उभेच राहिले.


Chchotu
Thursday, October 18, 2007 - 5:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला सुद्धा पहिलं प्रेम लिहायचं होतं.
पण " मी माझं पहिलं प्रेम तीन्-चार मुलींवर करायचा प्रयत्न केला पण......" असं लिहावं लागेल म्हनुन रद्द केलं.


Dakshina
Thursday, October 18, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपला हिरो लईच धाडशी आहे.. नाव लिहून पण रिकामा....
अरे राज़्या ही पोस्ट तुझ्या बायकोने वाचली तर तुझं काही खरं नाही...

छोटू...


Swa_26
Thursday, October 18, 2007 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझं पहिलं प्रेम तीन्-चार मुलींवर करायचा प्रयत्न केला पण
पहिल प्रेम एकदम तीन चार मुलींवर कस काय पण??? ए.भा.प्र. :-)

Rajeshdeshmukh
Thursday, October 18, 2007 - 6:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या! लेका लईच भारी Narration केलस रे!
हमममम!
आता मी माझ्या पहिल्या अनुभवाची (किस च्या) अजून आतूरतेने वाट बघतोय!
बाकी तू सगळ खरं खरं आणि बिनधास्तच लिहीणार, ह्यात काही शंकाच नाही. ( हा माझा अनुभव आहे) :-)

Rajeshdeshmukh
Thursday, October 18, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छोटू, इथे पण आगमन झाले का?
सही सही!
आता खरी मजा येणार!

Chchotu
Thursday, October 18, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रश्न "पहिलं प्रेम फ़क्त तीन्-चार मुलींवरच?" असा योग्य वाटतो की नाही?
अर्थात माझं पहीलं प्रेम वगैरे काही न होता पहीलं तांदुळच पडलं.


Rajeshdeshmukh
Thursday, October 18, 2007 - 6:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असू दे, असू दे!
शेवटी काय तर " जो होता है, भले के लिये होता है" म्हणायचं आणि गप्प बसायचं
:-(

Manjud
Thursday, October 18, 2007 - 10:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या,

जिला पहिल किस केलास ती बायको झाली नाही म्हणतोस तर बायकोला पहिला किस केलास तो अनुभव लिही की.......


Rajya
Thursday, October 18, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बायकोला पहिला किस केलास तो अनुभव लिही

आयला हे भारी आहे की, एकदा चालु केलं की मग हे लिही ते लिही चालु करता तुम्ही लोक :-)
मंजु तु लिही की तुझा अनुभव :-)


Ajjuka
Thursday, October 18, 2007 - 11:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए आवरा रे... काहीपण विचारतात लोक!! खाजगीत विचारायचे प्रश्न इथे विचारायला लाज कशी वाटत नाही म्हणते मी... असं कुणीतरी म्हणालेलं ऐकू आलं म्हणून टाकलं हं इथे.. मला असं काही म्हणायचं नाहीये... :-)
राज्या... तू तुझं सांगायचं काम चालू ठेव बरंका..


Rajya
Thursday, October 18, 2007 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या... तू तुझं सांगायचं काम चालू ठेव बरंका..

ए अज्जुके, सांगीतलं की आता, आणि काय काय सांगु :-) की तुझंच वाक्य (कुणाकडुन तरी ऐकलेलं) तुलाच टाकु परत :-)

Chyayla
Thursday, October 18, 2007 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक खुलासा करतो, ही किसवाली (हीचं नाव रश्मी) माझी बायको नाही, त्यावेळी ठवरलं होतं या किसवाली बरोबरंच लग्न करायचं पण तिचा बाप मध्ये आला

"कहानी मे ट्वीस्ट.. " राज्या अरे तुझा खरोखरच चित्रपट झाला की काय?

Rajya
Friday, October 19, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या अरे तुझा खरोखरच चित्रपट झाला की काय

होय रे च्यायला, आणि विशेष म्हणजे ही रश्मी कुठे आहे हे मलाही कळलेलं नाही अजुन, १९९८ ला तिचं लग्न झालं ही तिच्याविषयीची मला कळलेली शेवटची बातमी, ते ही तिच्या लग्नानंतर मला एक महीन्यानी कळलं

Ana_meera
Friday, October 19, 2007 - 5:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मा.बो. वर येत असेल, हे वाचले असेल तरी ओळख देण्याइतकी बोल्ड आहे का हो तुमची रश्मी(जी आता तुमची नाही)? (सॉरी हा जखमेवर मीठ चोळल्याबद्द्ल.. पण सत्य आहे ते.. उरात एक जखम असेल तिच्या... हम्म... चालायचंच...

Rajya
Friday, October 19, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा, इथे येत असेल तर मला माहीत नाही, आणि जखम वगैरे माही नाही गं :-) आता तसलं काही राहीलं नाही :-) माझ्याकडुन तरी :-)

Manjud
Friday, October 19, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या, तुझ्यासारखी लेखनप्रतिभा नाहि रे माझ्याकडे इतकं मधूर वर्णन करायला.... हि हि हि.... डोंबल तुझं.. मी काय लिहिणार माझा अनुभव?

बाहेर पडल्यावर सार्वजनिक ठिकाणी नवरा माझा हात पण धरत नाही ना मला त्याचा धरायला देत तो थिएटरमध्ये किस काय करेल मला..........


Ana_meera
Friday, October 19, 2007 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी अगदी मंजू... same here परक्या बाई शी वागाव तसा माझा पण नवरा वागतो सार्वजनिक ठिकाणी..:-( हातात हात जे गुफुंन जातात ते कपल्स किती गोड दिस्तात? :-) मनोमिलन पण झालय असे वाटत नाही? :-)

Zakasrao
Friday, October 19, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणाच काय आणि कोणाच काय.
हा BB आता माझा नवरा अस करतो आणि तस करतो ह्याकडे जाइल आता. :-)


Giriraj
Friday, October 19, 2007 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्या,तुझा नवरा? काय बोलतोस??

Dakshina
Friday, October 19, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनघा, अगं फ़क्त रश्मीच्याच काय..? पण राज्याच्या उरात पण जखम असेलंच की...
उगाच इथे उफाळून आली का..

पहीलं प्रेम कोनी कंदी इसरत न्हाई...


Rajya
Friday, October 19, 2007 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पहीलं प्रेम कोनी कंदी इसरत न्हाई...

आयला!!! दक्षिणा, नविन विषय दिलास की :-) माझं पहीलं प्रेम :-)

लिहु का? नकोच, एका किसचा एव्हढा कीस पाडलात, मग अख्खं प्रेम प्रकरण टाकलं तर काय होईल? :-)


Lalitas
Friday, October 19, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नेकी और पूछ पूछ? लिहूनच बघ की काय होईल ते!

Itgirl
Friday, October 19, 2007 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राज्या, पण नाव नको लिहूस रे मुलीच :-) उगाचच कोणाला तुझ्यामुळे त्रास झाला समज, तर तुला ते आवडेल का?

Rajya
Friday, October 19, 2007 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण नाव नको लिहूस रे मुलीच

घाबरु नकोस आयटे, किस च्या किश्श्यातलं नाव खोटं आहे :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators