Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 19, 2007

Hitguj » My Experience » बहु(जनांकडून)श्रुत » kitchen किस्से » Archive through March 19, 2007 « Previous Next »

Aashu29
Friday, June 23, 2006 - 3:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mi shira kela hota ,
ahaaha aadhi tup garam zale ekikade dudh garam karat thevle aani rava..... tupa evji dudhat ghatla , tupkat shiryachaa chaan gola tayar zala, konich naahi khalla.

Manutai
Thursday, July 20, 2006 - 12:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा मला आईने सकाळी साबुदाण्याची खिचडी करायची होती म्हणून साबुदाणा भिजवायला सान्गितला तर मी धुऊन अक्शरश्: पाणी ओतून ठेवले. सकाळी ती फार ओरडली. आणि त्याच्या पापड्या घालाव्या लागल्या.

Patilsmita
Tuesday, November 21, 2006 - 11:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मन्ड्ळी,
वरील सर्व किस्से वाचुन मजा वाटली. माझा पण एक किस्सा सान्गु इच्छीते(अवघड जात मराठी लिहायला) घाम फ़ुटला.
असो, तर मी एकदा नारली भात करायला घेतला.
मी सगळी क्रुती पुस्तकामधुन वाचली आणि श्री गणेशा केला. तान्दूळ धुन भाजुन घेतले आणि त्यात गुळ टाकला. फ़क्त त्या आधी भात पुर्न शिजवावा लागतो हे लक्श्यातच आले नाही. ऑऊटपूट जे झाले त्याल नविन नाव आम्ही "ख़ोबरे घातलेल्या तान्दळाच्या वड्या" असे दिले.

तसा मी खुप अधी पासुन स्वंयपाक करते तरी अशी चुक केली की अजूनही माझा नारळीभात म्हटला की लोक दुर पळतात.


Prasadp77
Wednesday, November 22, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

When Swati (my wife) moved to Sweden after our marriage, she started venturing into foodstuff that I never ventured before like rava. It is called as Manna Gryan in Swedish but I didn't know because I never tried to make Shira or Upama (I used to go to other marathi families to eat that)
As soon as we figured out availability of Rava, we decided to make Shira. Swati's almost first venture with Shira, thanks to recipe websites, she successfully (?) followed the steps to final product. I was the guineapig now. As soon as I had first bite (ghas) I realised that there is hardly any tup in it. I complained but I got an answer, but there is enough prem in it.

Now, whenever she decides to make shira, I have a standing request, please add more of tup than prem.

Disha013
Wednesday, December 06, 2006 - 1:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पहिल्यांदाच मुगाचा शिरा करायला घेतला. रेसिपी शोधली नेट वर.(तेव्हा मला मायबोली माहीत न्हवते) मुग कोणते घ्यावेत,तिथे गड्बडले आणि हिरवे अख्खे मुग वापरुन रेसिपि follow केली. शिरा पाहुन नवर्याला शंका आली. मी आधी ख्खालेला आहे शिरा, असा नसतोच, परत्परत त्याने सांगितले. मी नेटवर शोधलिये रेसिपी असे परत्परत सांगितले.जेवताना bowl खाली ठेवला. माझ्या मुलाला शिरा फ़ार अवडतो. आनंदाने त्याने घास घेतला, थुंकला आणि जोरात ओरडला.. "शी! घाण ए ते" ! ह. ह. वा.ला. होती! आणि मग शिर्याची टेस्ट घेवुन पण!

Rmjadhav75
Saturday, December 23, 2006 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा, यालाच म्हनतात मुग गिळुन गप्प बसने.

Rmjadhav75
Saturday, December 23, 2006 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई एकदा गावी गेली होती, मला भुक लागली म्हणुन मी पोहे करायला घेतले. पोह्यात पाणी घालुन अर्धा तास ठेवले, मग बाकीची प्रोसेस केली. तर त्या पोह्याचे पिठले झाले. मग मी ते पोळी बरोबर खाल्ले.

Zakki
Saturday, December 23, 2006 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, मग ही रेसिपी वर त्या रेसिपींच्या BB वर लिहा. असे म्हणतात की Accidents in kitchen are mother of new recipe's .

(खरे म्हणजे मीच फक्त असे म्हणतो!)



Jhuluuk
Tuesday, February 27, 2007 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच आणलेले खुप गोड अंजीर घरात होते. अगदि उत्साहाने त्याचा फ्रेश अंजीर मिल्क शेक बनवावा असे वाटले. रेसिपी कुठेही वाचलेली नव्हती. मनानेच करावे म्हणले.
गर काढुन घेउन मिक्सर मधुन फिरवला. मग थोडेसे दुध add केले. व्यवस्थित झालेय बघुन अजुन थोडे दुध add केले. रंग आणि चव दोन्ही छान वाटले.
मग फ़्रिजमध्ये गार करायला ठेवुन टाकले.
जेव्हा सगळ्यांना सर्व्ह केले तर चक्क शेक कडु लागला.. असे का झाले अजुन कळले नाही :-(
बहुतेक त्यातल्या बिया क्रश होउन कडु लागले.... चांगली अंजीरे वाया :-(


Sunidhee
Tuesday, February 27, 2007 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा हा किस्सा खाण्याच्या रीतीभातींशी संबंधीत आहे. म्हणजे तसा स्वयंपाक घरातलाच म्हणता येईल.
८वी-९वीत असताना संघाचे एक प्रचारक जे खुप शांत होते ते घरी जेवायला यायचे होते. पण आईला कुठेतरी त्याचवेळी बाहेर जावे लागले. म्हणुन तिने मला तात्यांना जेवायला वाढायला सांगितले. तेव्हा आमच्या घरी अजुन पाहुण्यांनी आपल्या हातानी वाढून घेण्याची बुफे पद्धत नव्हती. म्हणुन आईने मला तात्यांना आग्रह करुन वाढ असे सांगितले.
त्या आधी मी कधी हे काम केले नव्हते म्हणुन उत्साहाने तात्यांना प्रत्येक गोष्ट वाढली. अगदी त्यांच्या ताटाकडे लक्ष ठेऊनच उभी राहिले आणि त्यांच्या पानातली एखादी गोष्ट संपली कि लगेच विचारुन वाढु लागले आणि वर "अजुन घ्या की" पण म्हणायला विसरले नाही. (बिचारे माझ्या आग्रहाला कंटाळले पण असतील). ....... ......
शेवटी भाताची वेळ आली. त्यांना भात वाढला, "अजुन घ्या की" म्हटले. आमटी भाजी वगैरे सर्व वाढले आणि "अजुन घ्या की" म्हणायला चुकले नाही. तशी मी फार मोठी नव्हते म्हणुन ते काही बोलले नसावेत.. मग त्यांनी भातावर मीठ मागितले. ते वाढले....... त्यानी "बास" असे म्हटले तरी पण चिकाटीने मी म्हणाले "अजुन घ्या की"... बिचार्‍या तात्यांनी तेव्हा मात्र खरोखरच हतबल होउन मला "अगं sss काय हे " म्हणत मान हलवली... तेव्हा मला वाटले की इतका छान आग्रह केला तरी तात्यानी अस का म्हटले.. पण हळुहळु अजुन अक्कल आल्यावर कळले की मीठ उगाचच कोणी जास्त का घेईल? आता ते आठवले की हसु येते..




Suvikask
Wednesday, February 28, 2007 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झुळुक, माझेही अन्जीर शेक, असेच वाया गेले.
मला वाटते, शेक बहुतेक सुके अन्जीर दुधात भिजवून मग मिक्सर मधुन काढुन करत असावे.
जाणकारांनी शंका दुर करावी.


Maku
Wednesday, February 28, 2007 - 12:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sunidhee एकदमच ह ह पु वा .


Robeenhood
Wednesday, February 28, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुवि सुक्या अंजीरात नसतात का बिया? मुळात अन्जीरात बिया असतात का? जे दिसते ते वनस्पती शास्त्राच्या दृष्टीने फुले असतात....

Limbutimbu
Wednesday, February 28, 2007 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> तरी तात्यानी अस का म्हटले..
यावरुन एक लक्षात यावे की बिचार्या सन्घ स्वयन्सेवकान्ना कसल्या कसल्या सन्कटान्ना तोन्ड द्याव लागत असेल.....! DDD

Savyasachi
Wednesday, February 28, 2007 - 9:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी, अजुन घ्या की, म्हणजे किस्से हो :-)

Sunidhee
Thursday, March 15, 2007 - 7:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर अजुन घ्या हो सव्यसाची...

ह्याला वेंधळेपणा पण म्हणता येईल पण ह्यात 'तेल' आहे आणि 'तेल' स्वयन्पाकघरात असते म्हणुन इथेच लिहिते.
एकदा आईने काम सांगितले ' जा गं वाण्याकडुन पाऊण किलो खोबरेल तेल घेउन ये ' .
तेव्हा आमच्याकडे सुटेच तेल आणत, बाटल्या आणत नसत (तेलाच्या). आणि एका फिरकीच्या झाकणाच्या तांब्यात तेल आणत असु.
तर आमचं ११-१२ वर्षाचे ध्यान लगेच एका हातात पैसे आणि दुसया हातात तो तांब्या झुलवत वाण्याकडे गेलं.
वाण्याला सांगितले ' पाऊण किलो खोबरेल तेल द्या हो ' .

वाणी आपला पाऊण किलो तेल मोजुन घेऊन तांब्यात घालु लागला.. घालता घालता तांब्या पुर्ण भरला.. मग वाणी म्हणाला ''तेल मावत नाहिये''.
मी जरा विचार केला आणि त्याला म्हणाले, '' वरपर्यन्त जितके मावेल तितके तेल घाला आणि उरलेलं राहु द्या, घालु नका''. त्यानी तसेच केले. म्हणजे तेल ही गेल आणि पैसे ही. मी पुर्ण पाऊण किलोचे पैसे दिले होते ना!!

मग प्रश्न आला तो काठोकाठ तेलानी भरलेला तांब्या घरी कसा न्यावा? मग कसंबसं ते फिरकीचे झाकण लावले. आता तो तांब्या झुलवत तर नेण्याचा प्रश्नच नव्हता. मग दोन्ही हातामधे धरुन अगदी हळुऽऽहळुऽऽऽऽऽ. , जपूऽऽऽऽऽन निघाले, एक पण थेंब सांडू न देता. एक डोळा रस्त्यावर आणि एक डोळा तेलावर अश्या रितीने आमची वरात तिप्पट वेळानी घरी पोचली. एक विचार मनात आला , ''बाबा तर नेहमी कसे पटकन गाडीवर जाऊन ह्यात तेल आणतात, त्यान कसे जमत असेल न सांडता ते पण गाडीवरुन आणायला?''

मग घरी जाऊन तेल नीट जागेवर ठेवलं आणि आईला सांगितले ''हळुच झाकण काढ, तेल सांडेल, खुप भरलाय तांब्या''
आईने विचारले, ''अगं इतके तेल का आणलेस?''
मी बोलले "अगं तरी तु सांगितल्याप्रमाणे पाऊण किलो पेक्षा कमीच आहे, सर्व मावले नाही''.

आईने शांतपणे कपाळावर हात मारला आणि म्हणाली, ''अगं मी तुला पाव किलो आणायला सांगितले होते''.






Milindaa
Friday, March 16, 2007 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

.. .. .. ..

Suyog
Friday, March 16, 2007 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही नविनच लन्डनला आलो होतो. नवरा कधीतरी चहा करायचा. एकदा मी बटर चे तुप केले आणी नवर्याने ते गरमच गाळले प्ल्यास्टिक च्या गाळनिने. सगलि जाळी वितळुन गेली, वर म्हन्तो चहा नाहि का गरम गाळत?

Suvikask
Saturday, March 17, 2007 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बरोबर आहे नवर्‍याची शंका.. चहाने जर गाळ्णी वितळत नाही तर तुपाने का वितळावी?
माझेहि एकदा असेच झाले होते.. सेम लॉजिक वापरले होते..


Sandu
Monday, March 19, 2007 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुपाचा उष्मांक चहाच्या तुलनेत १० पटीने जास्त असतो.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators