Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 31, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through August 31, 2007 « Previous Next »

Sonal_sach
Wednesday, August 29, 2007 - 9:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मायबोलीवर पहिल्यांदाच लिहीत आहे तरी चुक्-भूल द्यावी घ्यावी. मी आज सकाळी सकाळी ऑफिस मध्ये केलेला ताजा किस्सा. ग़्लास भरुन पाणी सांडले. (सगळ्या कारपेटचा सत्यानाश!) डेस्क वरच्या पेपरांचे तर काय झाले ते विचारुच नका. नंतर कारपेट सुकवण्याकरता टेबलफन खाली घ्यायला गेले आणि त्याच्या खालचा स्टंड पाडला. तो उचलताना वायरबरोबर सगळे पेपर खाली पाडले.
या सगळ्या गोंधळात पाण्याबरोबर आणलेला चहा टेबलवर आहे हे विसरुन तो माझ्या क्रिम कलरच्या ट्राॅवझर वर सांडुन दिला. अजुन फक्त सकाळचे १० वाजत आहेत. आता संध्याकाळपर्यंत असे रंगीबेरंगी बसणे नको वाटत होते, मग विचार केला जाउदे मायबोली वर टाकयला चांगला किस्सा आहे.


ज़रा मला एखादि युक्ती सांगा लवकर घरी जाण्याची कुणी तरी


Hkumar
Wednesday, August 29, 2007 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परदेशात आल्यावर सुरवातीचा किस्सा. बेसीनला दोन नळ आहेत. गिझर बंद असल्याने दोन्हीना गारच पाणी होते. डाव्या नळाने भांडी धुतल्यावर मी खूप वेळ उजवीकडचा काॅकच फ़िरवून पाणी बंद करू पहात होतो. काॅक पिळून हात दुखून आला. १५ मिनिटानी डोक्यात प्रकाश पडला

Saee
Wednesday, August 29, 2007 - 11:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१५ मिन्टं कॉक पिळला?

Sandu
Wednesday, August 29, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा हा हा काय झाले असेल त्या बिच्यार्‍याचे :-)

Farend
Wednesday, August 29, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sonal_sach यातील एखादी तरी गोष्ट बॉस टेबलजवळ असताना झाली असती तर वेगळी युक्ती शोधावी लागली नसती :-)

तू Naked Gun: From the files of police squad हा चित्रपट पाहा. त्यात तो Leslie Nielsen व्हिलन च्या घरी जातो तेव्हा त्याला एक संशयास्पद चिठ्ठी सापडते, ती अंधार असल्याने लायटर पेटवून वाचताना ती त्याच आगीने पेटते. ती विझवताना जी chain reaction होते ती पाहा. त्यामानाने तू बरीच वाचलीस असे वाटेल :-)


Yogesh_damle
Wednesday, August 29, 2007 - 9:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यशवंत, किस्सा वाचून जाम हसू आलं! :-)

(आता एक इब्लिसपणा- दंतकथांमध्ये म्हटलंय की त्या घोरपडीचं नाव यशवंती होतं! देवाशप्पथ! :-) )


Yogesh_damle
Wednesday, August 29, 2007 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काॅलेजात देवनागरी टायपिंग नुकतीच शिकल्याने समाजसेवा (भाव खाणं) करायला एक अजून कारण मिळालं होतं...

सोसायटीतल्या एका ताईच्या बाळाचं बारसं होतं, आणि ती माझ्याकडे आमंत्रणपत्रिका छापून घ्यायला आली होती. मीही अगदी उत्साहाने पहिलीवहिली मराठी पत्रिका लिहिली, आणि कृतकृत्य चेहर्‍याने तिला प्रिंट-आउट्स दिल्या. त्या सोसायटीत वाटल्याच्या ४-५ तासांनी ती तरातरा चालत आली एक पत्रिका घेऊन आणि माझा चेहरा पाहण्यासारखा झाला...

'आपला आहेर हाच आमचा आशीर्वाद'

हे मी चक्क लिहिलं होतं, आणि हे आमंत्रण चक्क सोसायटीभर गेलं होतं! :-(


Tiu
Thursday, August 30, 2007 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश...सही किस्सा आहे

पण एक भा. प्र. : वाटण्याआधी त्या ताईने पत्रिका वाचली नाही का?


Mi_anu
Thursday, August 30, 2007 - 3:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतक्या सर्व वेंधळेपणाच्या संपत्तीत माझे चार वेंधळे चव्वल.
१. काल लिंबाचे लोणचे बाटलीतून वाढून घ्यायला गेले. लोणच्याच्या बाटलीत कायम चमचा ठेवू नये, लोणचे लवकर खराब होते असे ज्येष्ठमंडळींचे मत. त्यामुळे एका हाताने बरणी उघडून थेट ताटावर ती हलवून लोणच्याच्या दोन फोडी पाडून घेण्याचा बेत होता. पण धापकन ६ फोडी खाली आल्या आणी बरणी हालवायची दिशा चुकल्याने ताटाऐवजी सरळ खाली गेल्या. वाटेत माझ्या गाऊनचा खिसा मिळाला आणी सर्व फोडी थेट खिशात! लोणच्याची अशी साठेबाजी आजतागायत कोणी केली आहे का?
२. रोज लिफ्टने दुसर्‍या मजल्यावर जाऊन हपिसाच्या दारासमोर कार्ड हलवते. आमचे मशिन कार्ड स्वाइप नाही, नुसते कार्ड मशिनसमोर हालवले की ऑप्टीकली डिटेक्ट होते. आज सकाळी लिफ्टच्या खाली बोलावायच्या बटनासमोर बराच वेळ कार्ड हलवत बसले होते आणी लिफ्ट अजून खाली का येत नाही विचार करत होते..
३. आमच्या घरी मी एकटीच चहा पिते आणी बाकी सर्व नेसकफे. तर रविवारी सकाळी असेच चार कप कॉफी साखर घालून ठेवले होते आणी एक रिकामा. भांड्यात चहा उकळला आणी मी तंद्रीत नेसकफे घातलेल्या कपातच चहा ओतला. परत चहा करायचा कंटाळा आल्याने ते 'नेसबॉन्ड' द्रव्य कसेबसे घशाखाली रिचवले.
४. त्या दिवशी केस विंचरताना अचानक कणिक फ्रिजमधून काढून ठेवायची आहे आठवलं आणी कंगवा फ्रिजमध्ये ठेवून कणिक बाहेर काढली आणी मग घाईत कंगवा शोधत बसले होते.
५. कपडे भिजवताना वाकल्याने गाऊनच्या खिशातला मोबाईल साबणाच्या पाण्यात कधीकधी डुबकी मारतो.


Sunidhee
Thursday, August 30, 2007 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश.. अफलातून किस्सा आहे. खदाखदा हसले. :-)

Kashi
Thursday, August 30, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी_अनु तु तर माझी बहीण शोभतेस ग.... ह्या गोश्टी माझ्याकडुन पण झाल्या आहेत....:-) :-)

Nandini2911
Thursday, August 30, 2007 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ए, पटकन सांग फ़्रायडेला वार कुठला होता?"

अर्थात मी माझ्या कलीगला.


Chinnu
Thursday, August 30, 2007 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनु, नंदु, यश महान आहात तुम्ही सर्व! जाम हसले मी :-)

Tiu
Thursday, August 30, 2007 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी...

असाच किस्सा माझ्याबाबतीतही घडला होता...म्हणजे माझ्या मित्राने विचारलं की Monday ला कुठला वार होता रे?
आणि त्यावर मी ' Monday ला ना, एक मिनिट हा. आज Thursday आहे ना? म्हणजे काल Wednesday परवा Tuesday आणि त्याआधी Monday ' असा काहितरी विचार करत होतो!


Farend
Friday, August 31, 2007 - 12:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका मित्राचा दुसर्‍या ग्रूप मधला मित्र, त्याच्या कडे नेहमी चालत यायचा. एक दिवस त्याने नवीन स्कूटर घेतली ती दाखवायला घेउन आला व घरापलीकडे पार्क केली. बराच वेळ बसून परत जाताना नेहमी सारखा चालत घरी गेला.

जरा वेळाने या मित्राच्या लक्षात आले. तो त्याच्या घरी गेला तर हा आरामात बसलेला होता (म्हणजे अजूनही लक्षात आले नव्हते). त्याला काहीतरी क्लू द्यावा म्हणून याने स्वत्:च्या गाडीची किल्ली बोटांत धरून फिरवली, तेव्हा त्याने विचारले "अरे गाडीची किल्ली विसरलो का?" :-)


Princess
Friday, August 31, 2007 - 3:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मि_अनु :-) तु ते नेसबॉंड पिलेस ना... तसेच मे कॉम्प्लबॉंड प्यायलेय एक दोनदा. बाळाचे दुदु एका कपात कॉम्प्लान घालुन बनवले आणि घाईघाईत त्यातच माझा चहा ओतला. मग काय मी पण तेच द्रव्य ओतले घशात. नेसबॉंड जरा बरे लागत असेल ना पण :-) कॉम्प्लबॉंड तर ई ई ई

Ana_meera
Friday, August 31, 2007 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी!! अगदी!!! मलाही २-३ वेळा bournvita वर ओतलेला चहा प्यावा लागलाय!!!


Aashu29
Friday, August 31, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तर कित्येकदा cordless उचलते फ़ोनची रिंग वाजली की!! मग रिंग अजुनहि का नाहि थांबत म्हणुन चीड पण येते

Aashu29
Friday, August 31, 2007 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बघा लिहिण्यात पण वेन्धळेपणा झाला!! रिमोट उचलते फ़ोनची रिंग वाजली की!!

Ana_meera
Friday, August 31, 2007 - 11:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लहानपणी पुढचं दार वाजले की मागचे उघडायला आणि मागचे वाजले की पुढ्चं उघडायला न चुकता धावायची!!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators