Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
KarmBhumi

Hitguj » My Experience » कोणाशी तरी बोलायचंय » KarmBhumi « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through January 14, 200820 01-14-08  6:27 am
Archive through January 22, 200820 01-22-08  12:56 pm
Archive through February 07, 200820 02-07-08  6:23 am
Archive through March 04, 200820 03-04-08  6:14 am
Archive through March 20, 200820 03-20-08  1:54 pm
Archive through March 25, 200820 03-25-08  8:25 pm
Archive through March 27, 200820 03-27-08  6:29 pm
Archive through March 28, 200820 03-28-08  8:11 pm

Manuswini
Friday, March 28, 2008 - 8:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हेच लिहिणार होते, की हे US/UK/aSIA मध्ये सहसा लागू होत नाही.

माझा professor हा Phd होता(असून) तो ६० वर्षाचा होता(त्यानेच सांगीतले) पण univ शिकवात असे, त्याला आम्ही rick च म्हणू. हे सर्व सगळ्या prof च्या बाबतीत होते.

आणि हे US मध्ये नाही तर माझ्या अनुभवाप्रमाणे UK,Asian(Japan,China ) देशात सुद्धा तसेच 'बहुधा' using your first name only. चालते. त्यात त्यांना वावगे वाटत नाही.

आणि इथे सुद्धा univ मध्ये music n drama class मध्ये माझी christina मैत्रीण होती त्यांना बर्‍यापैकी नावजलेले directors वगैरे कधी कधी lecture घेत(इती ती), ती पण first name नेच हाक मारायची.

बहुधा देशाप्रमाणे अपेक्षा किंवा culture ह्यात फरक असावा. आपल्या संस्कृतीत हे बसत नाही म्हणून खटकते वाटते.

उलटे इथे madam म्हणणे जरा विचित्र अर्थाने घेतले जाते असे मी बघितले.(बर्‍यापैकी कुत्सीत अश्या).

असो, इथे कुठल्याही क्षेत्राशी संबधीत व्यक्तीचा अपमान करायचा विचार नाही. ज्याची त्याची विचार करण्याची / अपेक्षांची पद्ध्त वेगळी असते / असु शकते. चुक वा बरोबर दाखवण्याचा मुद्दा नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे.




Sandu
Friday, March 28, 2008 - 11:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चित्रपटक्षेत्रातल्या व्यक्तींनी उगाच भलत्या अपेक्षा ठेवू नये. नाच म्हट्ले की नाचावे, हसव म्हटले की हसवावे. तुम्हि काय आमची किंमत करणार.. आमच्या मनाला पटलं नाही तर आम्ही भिकेला लावू एकेकेकाला.

Ajjuka
Saturday, March 29, 2008 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सशल, मनु,
इंग्रजीमधे आदरार्थी बहुवचन नाही हे मलाही माहितीये. त्याबद्दल मी म्हणत नाहीये. आणि सर वा मॅडम म्हणण्याबद्दलही म्हणत नाहीये.
पण वरीष्ठ वा असला तरी नावाने एकेरी बोललं जात नाही जोवर ती व्यक्ती स्वतः सांगत नाही अगदी US मधेही. मी तर theatre department मधे होते, opera company मधेही काम केलंय. इतर क्षेत्रांपेक्षा इथे सगळं जास्त अनौपचरिक असतं. पण तरीही Mr/ Ms/ Dr असं काहीतरी संबोंधन असतंच ना. जोवर ते स्वतः सांगत नाहीत तुम्ही directly एकेरी बोलत नाही. पहिल्याच भेटीत call mee so n so किंवा I go by this this name असं लोक सांगतात. पण तसं नसेल तर तुम्ही सरळ एकेरी संबोधणे हे तिथेही चुकीचे मानले जाते.


Maitreyee
Saturday, March 29, 2008 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, माझा अनुभव अगदी उलट आहे.इथे US मधे मी ईस्ट, वेस्ट कोस्ट, मिड वेस्ट लाही राहिले आहे. काम IT company मधेच आहे, त्याच क्षेत्रातल्या लोकांशी संबंध येतो फ़क्त, पण कलिग्ज किंवा क्लायंट कडचा माणूस असला तरी ओळख सुद्धा फ़क्त पहिल्या नावाने करून देतात, बहुतेक वेळा last name माहित पण नसतं, फ़ार तर ईमेल आयडी मधे असलं तर समजतं. नाहीतर तो माणूस तुमचा म्यानेजर जरी असला तरी जॉन, टॉम (जे असेल ते पहिले नाव) असेच संबोधतो आम्ही. कुणीच Mr, Ms इ. म्हणत नाही इथे.

Tonaga
Saturday, March 29, 2008 - 3:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहीतर तो माणूस तुमचा म्यानेजर जरी असला तरी जॉन, टॉम (जे असेल ते पहिले नाव) असेच संबोधतो आम्ही. कुणीच Mr, Ms इ. म्हणत नाही>>>>>
मग आता आपण तिकडचेच अंधानुकरण करीत आहोत ना. ह्या विश्वाचे monoculture करण्याचा चंग बांधलाय अमेरिकनानी. म्हणजे त्यांची बाजार पेठ विस्तृत होत जाते.
'तिकडचे' सर्व मॉडर्न असते अन 'इकडचे 'बुरसटलेले'

त्यामुळे सहा महिने तिकडे राहून आला की त्याला मराठी शब्द आठवायला 'एफर्टही' घ्यावे लागतात अन पुन्हा 'कश sss शच' वाटतं :-)





Uday123
Saturday, March 29, 2008 - 3:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यामुळे सहा महिने तिकडे राहून आला की त्याला मराठी शब्द आठवायला 'एफर्टही' घ्यावे लागतात अन पुन्हा 'कश स्स्स शच' वाटतं
--- व्यक्ती-व्यक्ती वर अवलंबून आहे. काही लोकांना त्यांचा जन्म चुकुन भारतात झाला आहे अस वाटतं. माझा पुण्यातील एक मित्र ज्याने २५+ वर्ष पुण्यात काढली, तो ३ महिन्यांसाठी अमेरिकेला जाऊन आला. आल्यावर बर्‍याच दिवसांनी आमच्याकडे सदिच्छा भेटी दरम्यान
'where is the rest room, please?' आम्हाला आधी आराम करायची खोली बद्दल विचरतोय असं वाटलं.

आज ईथे काही कुटुंबे जे ४०+ वर्ष भारता बाहेर आहेत, पण मराठी (वाक्प्रचार ई. सोबत) अगदी अस्खलित.


Ameyadeshpande
Saturday, March 29, 2008 - 4:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठली भाषा वापरावी हा ज्याचा त्याचा प्रश्न पण एका भाषेत दुसर्‍या भाषेतली वाक्य मुद्दाम घुसडणं ह्याला धेडगुजरेपणा म्हणतात असं माझं अल्पमत आहे
मी अमेरिकेतून पहिल्यांदा जेव्हा भारतात गेलो तेव्हा मला काही जणांनी विचारलं की अरे तू मधे मधे इंग्रजी कसा काय बोलत नाहीस! अगदी पुण्या मुंबईतही मराठी बोलताना मधे मधे इंग्रजी वाक्य फ़ेकण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून चालू झालिये :-)


Manuswini
Saturday, March 29, 2008 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरच्या विषयावरून,पहील्या नाववरून नोकरी ठीकाणी हाक मारावी न मारावी हे पण व्यक्तीप्रमाणे बदलते.

US ला conference होती म्हणून देशाहून तिकडचा VP आला होता जो India ला represent करत होता. (नाव देणे उचीत वाटत नाहीये).
त्याला report करणारा आणखी एक नवीनच देशात join झालेला scientist होता. त्याची ही पहीलीच US भेट(अगदी पहील्यांदा विमानात ही बसला ते ह्यामुळेच(त्याला कमी लेखत नाहीये)).

पहीली meeting सुरु झाली, सगळ्यांनी देशी VP ला first name नेच हाक मारली.

tea break मध्ये हा नवीन scientist आला माझ्याजवळ नी म्हणाला काय जादू आहे, हा VP इतका उर्मटपणे देशात वागतो नी आपल्या post चा अगदी वापर करून त्याच्या हाताखाली काम करणारे म्हणजे 'नोकर' अशी तिथे वागणूक देतो, इथे एकदम त्याला पहील्या 'नावनेच' हाक मारलेली तो चालवून घेतोय.
मी म्हटले का रे बाबा, त्यात काय एवढे आश्चर्य?? तर म्हणे एक नवीन मुलगा जो US हून relocate झाला देशात नी तिथे join झाला नी ह्याच VP ला meeting मध्ये त्याने first name ने उल्लेख केला तर ह्याने बरीच कानऊघडणी केली.

तात्पर्य : जैसा देश वैसा भेस. कधी कधी काहींचा इगोही बर्‍यापैकी दुखवतो म्हणून पण आवडत नाही असेही कारण असते. पण गाव बघून वागणे चांगले...

त.टी : तीच रोजची, कोणाला hurt करण्यचा हेतु नाहीये. दुसरे म्हणजे हे मी medical and research industry बद्दल लिहिलेय. IT मध्ये friends आहेत त्यांचा सेम अनुभव आहेत.


Zakki
Saturday, March 29, 2008 - 11:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी पुण्या मुंबईतही मराठी बोलताना मधे मधे इंग्रजी वाक्य फ़ेकण्याची पद्धत गेल्या काही वर्षांपासून चालू झालिये

भारतात सर्वच भाषांत हिंदी व इंग्रजी येणे अपरिहार्य आहे. निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र येऊन व्यवहार करणार म्हणजे असे होणारच. म्हणून व्यवहारात फक्त मराठी बोलून चालत नाही. मग हळू हळू रोजच्या बोलण्यात पण ते येऊ लागते. त्यालाच भाषा 'उत्क्रांत' झाली, भाषेचे 'वैभव' वाढले असे म्हणायचे.

आता तशी आपली मराठी आधीच समृद्ध होती, पण लोकांना ती आवडेनाशी झाली. ते आपणहूनच हिंदी व इंग्रजीचा जास्त वापर करू लागले. त्या शब्दांना मराठी अर्थपूर्ण शब्द तयार करून ते वापरात प्रचलित करण्या ऐवजी सर्रास वर्तमानपत्रे, पुस्तके व कदाचित् मराठी साहित्य संमेलनात देखील इंग्रजी व हिंदी शब्द वापरू लागले.

महाराष्ट्रियांना एकंदरीतच 'विशाल दृष्टिकोण' असल्याने त्यांना इतरांचेच भावते! स्वत:चे सगळे कमीपणाचे, संकुचित विचारांचे वाटते.

म्हणून तर मायबोलीचे महत्व आहे. मराठी जपा, मराठीचा आनंद घ्या. इथे तरी हिंदी, इंग्रजी नको, कारण ते इकडे तिकडे खूप मिळते, इथे फक्त मराठीच असू दे, असे माझे मत आहे.


Tonaga
Sunday, March 30, 2008 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jhakkeejee your opinoin is supported 100 % ha ha ha....पुण्यात राहिल्याचा परिणाम पाहिलात ना? :-)

Raviupadhye
Sunday, March 30, 2008 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संबोधावे कसे यावर माझा अनुभव्/ माझे मत असे आहे.
निदान भारतात तरी मला माझ्याहून वयाने ज्ञानाने अथवा हुद्द्याने वर असलेल्या व्यक्तीना अहो जी इ ने सन्बोधित करणे सोयीचे व प्रशस्त वाटते. चेअरमन एम,डी शी पहिल्या नावाने बोलायचा प्रयत्न केला पण जमले नाही.
नात्यात मात्र ही भावना वेगळी असते.उ. मामा मामीस पन्च्याहत्तरीत असून ही अरे अग म्हणतो.माझ्या मुली मला अरे म्हणतात व आवडते ही.


Tonaga
Sunday, March 30, 2008 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या विशिष्ठ(ष्ट नव्हे)शहरात तोन्डावर बोलन्याचे व पाठीमागे उल्लेख करण्याचे वेगवेगळे प्रोटोकॉल्स असतात म्हणे! खरं आहे का?

उदा. (तोंडावर मोड).. वा वा अलभ्य लाभ! आपले दर्शन झाले धन्य झालो.आपली नूतन कादम्बरी तर उत्कृष्ठच. रेकॉर्ड मोडत्येय हं!

अपरोक्ष मोड..
या शिंच्याने काय बाड खरडले त्याला तरी कळल्येय काय? उगीच साक्षर आहे म्हणून उचलली लेखणी लावली कागदाला झालं!
माझ्या कवितासंग्रहाचं परिक्षण लिहोन घेऊन छापून आणायचय ना त्याच्याकडून... केसरीत संबंध आहेत ना त्याचे. आमचा मेव्हणा कॉम्पोझिटर असता केसरीत तर कशाला याचे थोबाड बघायची वेळ आली असती? असो.. मोरया मोरया...


Arc
Monday, March 31, 2008 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही हिन्दी बोलणारे लोक office मधे जेव्हा "आप आप " करतात तेव्हा फ़ार गळेपडुपणा वाटतो.
आणि मग मराठि लोक जे आधी व्यवस्थित तु म्हणत असतात आणि नन्तर अचानक त्या लोकान्ची लागण ज़ाल्याने त्यान्ची गाडी तुम्हीवर येते तेव्हा तर अगदीच कसेतरी वाटते.
माज़ी एक boss (who is not even 30) तर म्हणते जर तीला कोणी madam किन्वा तुम्ही म्हनटले की मनातल्या मनात "काकु"म्हणताय असे वाटते.
अर्थात हा अनुभव IT company मधला आहे.
सरकारी कचेरीत साहेब नाही म्हणतलात तर काम नाही होणार


Alpana
Monday, March 31, 2008 - 6:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण हिंदीमध्ये तुम सगळ्यांना वापरता येत नाही... माझ्या बॉसला ( आमच्या डिविजनची एम डी आणी वय ५० च्या पुढे) सगळेजण नावाने रुमझुम म्हणुन हाक मारतात.. पण हिंदी बोलताना मात्र रुमझुम आप बिझी तो नही हो? अश्या पद्धतीनेच संबोधतो. अगदी माझा माझ्यापेक्शा वयाने लहान किन्वा हुद्द्याने लहान सहकारी असला तरी मला त्याला किंवा तिला तुम म्हणायला कसे तरी वाटते. अपवाद अगदी जवळचे मित्र व मैत्रिणी...... काहीजण मराठीत म्हणतात तसे हिंदीतपण तु म्हणतात, ते मात्र अपमानास्पद वाटते... माझी आई इथे आली असताना माझ्या कामवाल्या बाईला सवयीप्रमाणे तु म्हणायची... ती अर्थात आईपेक्शा खुप लहान आहे पण तरिही मला ते कसेतरी वाटायचे

Arc
Monday, March 31, 2008 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त. टी: वरील विधान generalised नव्हते. माज़्या personal experience वरुन केलेले विधान आहे ते.

Raviupadhye
Monday, March 31, 2008 - 7:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिन्दीत तु किंवा तुम ही सम्बोधने अत्यन्त अनौपचारिक नात्यात अथवा जवळच्या मित्राला बोलवताना वापरली जातात.खूप घनिष्ठता असल्यावाचून तु तुम वापरले जात नाही.उदा. ऑफ़िस मधील खूप जवळचा मित्र.याव्यतिरिक्त सर्व व्यक्तिंना आपच संबोधले जाते.

Zakki
Monday, March 31, 2008 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहो, पुण्या मुंबईमधे कुणी यू. पी., बिहारी लोक चर्चा करत असतील का, की मराठीत तुम्ही कुणाला म्हणावे, आपण म्हणजे नक्की काय? 'हम' की 'आप'?

मला नाही वाटत. मराठी लोकांना मात्र हिंदीबद्दल तसे प्रश्न पडतात. अगदी पुण्या मुंबईत सुद्धा!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators