Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 12, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through July 12, 2007 « Previous Next »

Athak
Saturday, June 30, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्त आहेत पायजामा परकर किस्से

कुणी वेंधळेपणा केला की म्हणुनच म्हणतात ' आदमी है की पायजामा ' :-)


Chyayla
Sunday, July 01, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आदमी है की पायजामा

अथक, हा पुरुष जातीवर अन्याय आहे, स्त्री-पुरुश भेदभाव आहे. तर...

"बाई आहेस की परकर" असे का म्हणु नये.


Chyayla
Sunday, July 01, 2007 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक दीवस राजु (माझा रुमी) आमच्या सगळ्यान्च्या मागे लागला की सगळे मुव्ही बघायला जाउ, याला सिनेमाच भयन्कर वेड. पण खरे तर त्यावेळेस माझा, लिओ आणी नवीन (त्याचाच मित्र) कोणाचाच मुड नव्हता म्हणुन नाही म्हटलो तो थोडा हिरमुसला आणी शान्त झाला.

दुसर्या दीवशी नवीनने सगळ्याना बोलावले आणी राजुला म्हटले की चला आज आपण मुव्हीला जाउनच येउ, आम्हाला आणी विषेशता: राजुला आश्चर्य वाटले हे आज याला काय सुचल म्हणुन.

"अरे यार ये कल पुरी रात सपनेमेही मुव्ही जायेन्गे मुव्ही जायेन्गे करके बकबक कर रहा था, साला पुरा नीन्द का वाट लगा दीया.. कमसे कम आज तो चैन से सोउन्गा.."


Sanghamitra
Friday, July 06, 2007 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका finance कंपनीत सगळ्यांना जागेवर चहा किंवा कॉफी मिळे. ठरलेल्या वेळी सकाळी दहा, दुपारी साडेतीन अशावेळी तर येतच असे पण फोन करून केंव्हाही मागवता येई. माझ्या एका बॉस ला कॉम्प्लान आवडायचे. म्हणून तिने कॉम्प्लान ची बरणी आणून ठेवली होती. एक ऑफिस बॉय रोज तिला ते बनवून आणून द्यायचा. एकदा तो रजेवर होता तरी बाकीच्या ऑफिस बॉईज ना महित होतेच. त्यातलाच एक नवीन उत्साही प्राणी कॉम्प्लान बनवून घेऊन आला सकाळी दहाला.
तिच्याच केबीन मधे आमची मीटींग चालू होती.
तो कॉम्प्लान घेऊन आला. आणि अगदी समारंभपूर्वक तिच्यासमोर ठेऊन म्हणाला
" मॅडम आपका सेरेलॅक "


Zakasrao
Friday, July 06, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" मॅडम आपका सेरेलॅक " >>>>
मिटींग मध्ये हास्यस्फ़ोट झाला नाही का?

मी परवाच केलेला वेंधळेपणा.
थोडा उठायला उशीर झाला मग काय गडबड सुरु.त्याच धांदलीत मी नवीन आणलेले शुज घेतले आणि डावा पाय पुढे घेवुन उजवा बुट पायात घालत होतो. तो खुप टाइट गेला मनातल्या मनात म्हणल की आयला त्या दुकानात ट्रायल घेतली त्यावेळी बरोबर होती आणि आताच असे का बर. नंतर लक्षात आल.


Manjud
Friday, July 06, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा लय भारी आहे हा किस्सा. मी जोरात हसले, ऑफिसमधे आहे हे विसरून गेले.

माझ्या पूर्वीच्या ऑफिसमध्ये canteen नव्हतं. elctric kettle वर आम्ही milk powder ची कॉफी करून घ्यायचो. तिथल्या मॅनेजरला २ चमचे milk powder + १ / ४ चमचा nescafe अशी preparation हवी असायची. एकदा meeting चालू असताना आमच्या peon ने त्याला ईतर guests बरोबर कॉफी नेउन दिली. त्याचा रंग तेव्हाच एकदम डेंजर दिसत होता. त्या मॅनेजरने कशीबशी तोंड वाकडं करून कॉफी प्यायली आणि नंतर बाहेर येऊन peon ला कॉफी कशी केली असं विचारलं साहेब, नेहेमीसारखीच, २ चमचे कॉफी पावडर आणि १ / ४ चमचा milk powder


Sayuri
Friday, July 06, 2007 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Manjud, मस्त किस्सा
त्या peonमुळे बाजीगरमधल्या जॉनी लिवरची आठवण झाली :-)

Aktta
Friday, July 06, 2007 - 10:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कौलेज मधे असतांनाचा कीस्सा.....
.
आमच्या कौलेज चा ड्रेस्स कोड होता.... कंठलगोठ ( tie ) पाहीजेच...

आमच सगळ ग्रुप collage सुटल कि इन आउट करायचा आनी tie काढायचा... नेहेमिच

एके दिवस मी नेहेमी प्रमाने Tie काढला र्शट आउट केला.... आनी काय माहीत कस पन मी माझ्या र्शटाचि बटन उघडाला लागलो मी सगळी बटन उघडली... ते पन भर रसत्यात कौलेज बाहेर... माझे मीत्र माझ्या कडे बघून हसायला लागले तेन्व्हा मला कळल की मी काय करतो आहे ते...

एकटा.....


Chaffa
Sunday, July 08, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज बरेच दिवसांनी आलो मायबोलीवर जरा माणसात आल्यासारखं वाटल.
हा ताजा ताजा किस्सा:
मोबाइल हरवणे हा माझा जुना छंद. अश्यावेळी दुसर्‍याच्या फ़ोनवरुन कॉल करुन तो शोधणे हा जोडछंद, आता आमच्याइथे कमिशनिंगचे काम जोरात चालु आहे तिथे असताना माझा मोबाइल पुन्हा गुलऽऽ मग एकाचा मोबाइल घेउन कॉल केला तर आवाज येत होता पण फ़ोन सापडेना! अखेरीस बरीच शोधाशोध केल्यावर शोध लागला नविनच जोडलेल्या एका पाइपलाईन मधुन आवाज येत होता आणी मग डोक्यात हजार वटचा दिवा लागला ति लाइन जोडण्या आधी मी तिथेच उभा राहून एक फ़ोन केला होता की!!!!!!!!!!!!!
आता मला डॉक्टर न झाल्याबद्दल खरच खुप आनंद होतोय.


Chyayla
Sunday, July 08, 2007 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़्या परत आल्याबद्दल मायबोलीकरांचे अभिनंदन, पण लग्न झाल्यापासुन एक फ़रक निश्चित पडला हा ईब्लीसपणा सोडुन जास्त वेंधळेपणा करायला लागलास की पाईप मधे मोबाईल सोडुन देण्याचा वेंधळेपणा अफ़लातुन.

Manjud
Monday, July 09, 2007 - 6:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाइन जोडण्या आधी मी तिथेच उभा राहून एक फ़ोन केला होता की!!!!!!!!!!!!!
आता मला डॉक्टर न झाल्याबद्दल खरच खुप आनंद होतोय.

चाफ्फा, ह. ह.पु.वा

हे वाचून माझ्या सिझेरियन ऑपरेशनची आठवण झाली. ऑपरेशन झाल्यावर ती असिस्टंट नर्स actually सगळे गॉजेस, कात्र्या, स्टेपलर्स (हा एक स्टिचिंगचा प्रकार असतो आणि तो खरंच स्टेपलरसारखा दिसतो) वगैरे मोजून ठेवत होती. मी तिला विचारले की सगळं व्यवस्थित आहे ना? माझ्या पोटात काही राहिलं नाही ना? तिने माझा इब्लिसपणा अतिशय गंभीरपणे घेऊन सगळ्या वस्तू दोनदा मोजून ठेवल्या.


Dineshvs
Monday, July 09, 2007 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजु हे सगळे मोजणे, शेवटचे स्टिचेस घालण्यापुर्वी करायचे अशी स्टॅंडर्ड प्रोसीजर आहे. नर्सबाईनी त्यावेळी ते मोजले नव्हते का ?

Farend
Monday, July 09, 2007 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chaffa फक्त मोबाइलच पाइप मधे राहिला होता ना? "बर्‍याच दिवसांनंतर मायबोलीवर" वाचून विचारतोय :-)

Manjud
Tuesday, July 10, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंजु हे सगळे मोजणे, शेवटचे स्टिचेस घालण्यापुर्वी करायचे अशी स्टॅंडर्ड प्रोसीजर आहे.

हो.... हो... स्टिचेस घालायच्या आधी तिने मोजले होते ना म्हणून तर मला इब्लीसपणा करायची लहर आली. मी मनात म्हटले सारखी मोजत्ये तर खरंच कही पोटात राहिलं आहे का विचारावं


Dineshvs
Tuesday, July 10, 2007 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या ओळखीच्या एका डॉक्टरबाईंची सोन्याची टिकली पोटात पडली होती. नर्सबाईंच्याच लक्षात आले. तेव्हापासुन डॉक्टरबाई टिकलीच लावत नाहीत.

Orchid
Wednesday, July 11, 2007 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी मैत्रीण खुप वेंधळी आहे. १ कदा गावी जाताना बसमधे बजुला आपली आइ आहे असे समजुन दुसर्याच बाइच्या मांडीत डोक ठेउन झोपली.
असच १दा तीच्या बाबांचा हात धरुन चालली होती. बर्याच वेळानी तिच्या लक्शात आल ती दुसर्या कुणाचाच हात धरुन चालली होती.
१दा कॉलेजमधे उलटा स्कर्ट घालुन आली होती.
१दा हॉस्पिटलपासुन घरापर्यंत एप्रन घालुन आली.


Zakki
Wednesday, July 11, 2007 - 9:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याला वेंधळेपणा, इब्लिसपणा, फॉ पा, काही म्हणा.

आमच्या ऑफिसची पिकनिक होती. १२ ते ३. म्हणजे १२ ला जाऊन तीनला वामकुक्षीला पुन: काम करायला ऑफिसात परत. माझ्या जवळच एक कमालीच्या बाहेर लठ्ठ बाइ बसते. गरीब आहे बिचारी. वयाने पण तशी लहान आहे, पण तिच्या लठ्ठपणामुणे कुणि तिच्याकडे बघत पण नाहीत. इतर तरुण मुले तरुण मुलींना म्हणत होते, माझ्या गाडीने जाऊ, पण हिला कुणिच विचारले नाही. मग तिनेच मला विचारले, तुझ्या गाडीतून येऊ का, नि मी म्हंटले:
"हो माझी कार खूप मोठ्ठी आहे, तू मावशील एव्हढी, आय मीन, तुला लागेल एव्हढी जागा आहे माझ्या कारमधे!"

ती म्हणाली, excuse me? नि म्हंटले काही नाही, काही नाही! नि नंतर मी एकदम चूप!



Ravisha
Thursday, July 12, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईशप्पथ orchid ह. ह.पु.वा...तुझ्या मैत्रिणीला वेंधळेपणाबद्दल प्रथम पारितोषिक आणि चाफ्याला विभागून :-)

Orchid
Thursday, July 12, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवीशा,
हो ग खरच!
१दा आमच्याकडे रहायला आली होती. सकाळी घरी जाताना माझाच पंजाबी
dress घालुन गेली.

Ksha
Thursday, July 12, 2007 - 6:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं ऑर्चिड,
त्याला वेंधळेपणा नाही म्हणत, इरसालपणा म्हणतात

दिवा घे गं :-)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators