Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 11, 2007

Hitguj » My Experience » Mule ( aani tyanchya sobat ) wadhtanna » Archive through July 11, 2007 « Previous Next »

Shriwani
Wednesday, March 28, 2007 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

समस्त पालकांस नमस्कार
माझा 'महिम्न' सवाई पार करुन दुड्दुडायला लागलाय.

आपला काही किस्सा किंवा सल्ला?

कळा(वा)वे ही विनंती

श्रीवाणी


Shriwani
Friday, March 30, 2007 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या अंगाच्या मळापासून बनवलेल्या पुतळयाला राखण कराय्ला ठेवण्याच्या रुपकातून
आईचा मुलाला घडवन्याचा एक पैलू सांगितला आहे.
असे आणखी काही?


Mansmi18
Sunday, April 01, 2007 - 3:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीवाणि

सल्ला वगैरे नाही पण अनुभव सान्गतो.

माझी मुलगी वीस महिन्याचि आहे. आम्हि घरि आरति करतो किन्वा भजन म्हणतो ते पाहुन ती पण आम्ही न सान्गता देवाला नमस्कार करते. टाळ हातात घेउन वाजवायचा प्रयत्न करते. टीवी वर किन्वा चित्रपटात भजन किन्वा आरती सुरु झालि कि ती टाळ्या वजवायला सुरु करते. तसेच मझा घरात कधी आवाज चढला तर ती माझ्यापेक्षा जोरात ओरडते.

मला वाटते लहान मुले ही टीप्कगदा प्रमाणे अनुभव टीपत असतात म्हणुन आपल्याला आपलि मुलाब्वर जे सन्स्कार व्हावे असे वाटत असते तसे आपण त्यन्च्यासमोर वागावे हा एक सोपा उपाय आहे.


Shriwani
Tuesday, April 10, 2007 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

tumcha anubhav vachun far bare watle. koni jaticha bhetlajanu!

arti kinva bhajan kinva tya sadrushya geet kinva suraavat durun jari aiku ali tari ha patthya talya nahi tar hati 2 kontyahi sarkhya wastu milalyas( taal vajavtat tya talaat) vajvayla survat karto,

he kuthlya extent paryant rujle aani murle ahe te sobatchya phototna kalel. tyala pahate dole ughadly-aughdlya kichan platformwar basavle. rikamya matchbox milalya aani suru

Kanak27
Friday, July 06, 2007 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याकडे मुल १ वर्षाचे होण्याच्या आत त्याचे टक्कल करतात
ते करालाच हवे का
माझी मुलगि ८ महिन्याचि आहे तिचि पण टक्कल कराय्चि आहे पण मला भिति वाटते


Any suggestions , plz tell me .
Waiting for reply !

Deepa

Orchid
Friday, July 06, 2007 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी आमच्य मुलाच टक्कल केल नव्हत. न्हाव्याला बोलावुन नेहमीसारखच कटिन्ग केल होत.

Psg
Friday, July 06, 2007 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'टक्कल'!!
'जावळ' म्हणतात त्याला.. आणि तो एक रीतसर विधी असतो!


Manjud
Friday, July 06, 2007 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी माझ्या मुलीचं जावळ केलं नव्हतं. तिचे केस खुप छान रेशमी आहेत तिच्या बाबासारखे.... जावळ केल्यावर texture बदलण्याचे chances जास्तं असतात म्हणून मी तिचं जावळ केलं नाही.
जावळची भिती वाटण्याचं कारणच नाही ह्या न्हाव्यांचे हात इतके सराईतपणे फिरतात की आपल्याला किंवा बाळाला कळेपर्यंत जावळ झालेले असते.


Robeenhood
Friday, July 06, 2007 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण अशी टकली मुले खूपच छान दिसतात. त्यांचे ते एक रूप पाहण्याकरता तरी जावळ काढावे...

माझ्या दोन्ही मुलाना (मुलगा आणि मुलगी)आम्ही कधीही काजळ घातले नाही:-)
आणि टाळूही भरलेली नाही...:-)
गेल्या अठरा वर्षात;)


Savani
Friday, July 06, 2007 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जावळ मुलींचं पण काढतात का? मी पहिल्यांदाच ऐकतीये.

Robeenhood
Friday, July 06, 2007 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या मुलाना आम्ही खेळायला एक जाड दोर घरात टांगलेला होता.मुले दिवसभर त्यावर चढण्यात व्यस्त असत. आणि एक प्लस्टीकचा छोटा झोका बांधला होता. एक ३ ते ४ फूट उन्चीची घसर्गुन्डी करून घेतली होती. त्यावर त्याना कोनत्याही इलेक्ट्रॉनीक खेळण्याची गरज भासली नाही. या खेळामुळे त्यांचे अनेक मित्र येऊन हुन्दडत असत. कम्पनीची गरज भागली. याचा socialization ला फार उपयोग होतो. महागड्या खेळण्यांचे आकर्षण एखादा दिवसच टिकते मग ते कोपर्‍यात पडते.वर सांगितलेले खेळ सदाबहार आहेत आणि मुलाना खूप आवडतात. आणि muscle training ही होते. बघा प्रयोग करून. माझा मुलगा १५ व्या वर्षीच ६ फूट उंच झालाय!एक फूट बॉलही घरात ठेवा...
नुसताच ठेवून द्या आणि पहा गम्मत. आणि हो घरातल्या काचसामानाची काळजी करू नका. मुलांच्या बालपणापेक्षा काही ही जगात मोठे नाही हे लक्षात ठेवा...


Mansmi18
Friday, July 06, 2007 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलीचे आम्ही "जावळ" केले नाही.(म्हणजे तीने करु दिले नाही:-)
मग केस बारीक केले. असे केल्याने केस दाट होतात असे ऐकले आहे.


Tukaram
Saturday, July 07, 2007 - 6:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मुलाला नवीन हिन्दि गाणी फ़ार आवाडतात डॉन वगैरे मराठी कविता पण म्हणतो पण कमीच
........ नाचायला फार आवडते... मला पण व्यायाम होतो.
:-)

Tukaram
Saturday, July 07, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जावळ मुलाचे करतात मुलीचे नाही...... आमच्यात तरी....

Manjud
Saturday, July 07, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुलगा वा मुलगी आमच्यात जावळ दोघांचेही करतात. आणि तो एक रीतसर विधी असतो. आत्याने जावळ करायचे आणि मामाने उष्टावण करायची अशी पद्धत आहे आमच्यात.

Arch
Saturday, July 07, 2007 - 6:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जावळ केल तर आत्याला केसांच्या वजनाच सोनं द्याव लागत. त्यामुळे किती केस कापायचे ते तुम्हीच ठरवा.

Manjud
Monday, July 09, 2007 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

येस आर्च सही बोला, आमच्यातली दिसते आहेस तू..... जावळ केल तर आत्याला केसांच्या वजनाच सोनं द्याव लागत. आणि मामाने उष्टावणीची भाच्याला / भाचीला सोन्याची अंगठी द्यायची असते.

Kanak27
Tuesday, July 10, 2007 - 11:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अवनिचे केस खुप विरल आहेत म्हणुन जावळ करावे अस वाटत.
पण तिचे केस छान रेशमि आहेत. ते परत तसेच येतिलच असे नाहि न आणि तिच लुक हि चेन्ज होइल.


Thanks to you all , मला कळल तरि कि जावळ करन Compulsory नसत ते.

Mansmi18
Wednesday, July 11, 2007 - 2:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जावळ केल तर आत्याला केसांच्या वजनाच सोनं द्याव लागत
-------------------------------------------------
बायकोला सांगितले पाहिजे तिच्या भावाला हे post forward करायला:-)


Prajaktad
Wednesday, July 11, 2007 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जावळ केल तर आत्याला केसांच्या वजनाच सोनं द्याव लागत
-------------------------------------------------
बायकोला सांगितले पाहिजे तिच्या भावाला हे post forward करायला >>>>>
आत्याला अंगठी बाळाच्या आई-बाबांनी द्यायची असते..मामाने नाही बर!मामाने उश्टावणाला चांदिच्या फुल्या असलेला पाट(पुर्वी देत) आणी चांदिचे ताट्-वाटी द्यायचे...
जावळ मामाच्या मांडीवर बाळाला बसवुन करतात... आत्याने खोबर्‍याच्या वाटित झेलायचे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators