Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 27, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through June 27, 2007 « Previous Next »

Rutu_hirwaa
Monday, June 25, 2007 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही दिवसान्पूर्वीची गोष्ट

मला एक मुलगा पहायला येणार होता.माझ्या मावशीकडे कार्यक्रम ठेवलेला..
तो मुलगा त्याची आई त्याच्या २ बहिणी असे सगळे साग्रसन्गीत मावशीकडे दाखल झाले..

इकडचे तिकडचे बोलणे झाले..

मग खान्-पान
मावशीने पोह्यान्च्या चिवड्याच्या बश्या आणल्या..त्यानंतर

मावशी: घ्या ना
मुलाची आई नी मुलाची बहीण्: नाही नको आज आमचा उपास आहे
मावशी:अहो पण आज बुधवार आहे
मुलाची आई नी मुलाची बहीण्: अहो एकादशी चा उपास आहे
मावशी: अहो पण एकादशी तर कालच होती ना ?(योगायोगाने खरच होतं तिचा म्हणणं!)

इतका मोठा बम्पर आल्याने मुलाच्या आईला आणि बहिणीला सावरून पण घेता येईना

तेवढ्यात मावशी पुढे म्हणाली
अग बाई खरंच काल च होती ना एकादशी थाम्बा नाही तर असे म्हणून माझी ग्रेट मावशी आत जाऊन केलेन्डर वर पाहून कन्फर्म करून आली..

इकडे तो मुलगा त्याची आई नी बहीण यान्चा चेहरा बघण्यासारखा..


Milindaa
Monday, June 25, 2007 - 10:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यात इब्लीसपणा काय आहे?

Rutu_hirwaa
Monday, June 25, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो मिलिन्दा
माझ्या मावशीच्या अभावित इब्लीसपणामुळे त्या दोघीन्चा पचका झाला ना..

आणि नसेल यात इब्लिसपणा तर खुशाल तुम्ही हे पोस्ट डिलीट करा :-)


Sanghamitra
Monday, June 25, 2007 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुतू मला पण नाही कळले काय (सरळसोट किंवा अभावित) इब्लिसापणा आहे यात?
>> याच काळात, याच प्रकारच्या इब्लिसपणामध्ये वाघ आडनावाच्या लोकांना फोन करून
दक्षिणा, याच काळात हे इतक्या खात्रीने कसे काय लिहीलेस?
कुलकर्ण्यांच्या कुत्र्याचा किस्सा आवडला. सिंहाला ट्राय करायला सांगते. :-)


Indradhanushya
Monday, June 25, 2007 - 12:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका मित्राने केलेला इब्लिसपणा...

एक Landline No. फ़िरवला...
"आम्ही MTNL मधुन बोलत आहोत... तुमच्या फ़ोनची घंटी वाजते का?
समोरुन... "हो"
"अहो तुमचा फ़ोन घंटी नाही तर काय शिटी वाजवणार!!!" मित्र.

कुलकर्ण्यांच्या कुत्र्याचा किस्सा आवडला


Lopamudraa
Monday, June 25, 2007 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भलतेच किस्से आहेत ईब्लिसपणाचे जाम हसले..
आमच्या बाबतीत नकळत झालेला ईब्लिसपणाचा हा किस्सा
माझ्या नवर्‍याच्या खडुस south indian boss कडे आम्ही पहिल्यांदाच गेलो. मुद्दाम सन्क्रातीला तिळ गुळ द्यायला गेलो होतो. हा मराठी सण आहे तिळ गुळ दिल्यावर गोड बोलतात हे त्याला " समजावुन " सांगितले. तो संक्रातीला मराठी new year समजत होता.
माझ्याशी ओळख झाल्यावर तो नवर्‍याला म्हणाला Is she panjaabi?. आणि थोड्या वेळाने गप्पा मारता मारता परत विचारले is she pa.njaabi
नवर्‍याने परत मी पन्जाबी नाही, NO.. NO.. NO अस त्रिवार नाही सांगितले पण त्याच्या चेहर्‍यावरुन त्याचा विश्वास बसल्याचे दिसत नव्हते.
तेव्हढ्यात त्याची बायको आली,तीला बघितल्यावर माझा मुलगा एकदम म्हणाला Is she shrilankan? पुढे (आमचं नशिब चांगल म्हणुन) मराठीत म्हणाला मग ती इतकी काळी कशी काय?
पण माझ्या लेकाच्या Is she shrilankan चा अर्थ त्याला कळला असावा पुढे त्याने परत मी पन्जाबी की मराठी विचारले नाही.


Ksha
Monday, June 25, 2007 - 8:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी पुण्यात असताना नेहमीची खोड ...
एकेरी मार्गातून कोणी चुकीच्या दिशेने जात असेल तर मी मुद्दामहून गाडीवरून जाताना गंभीरपणे ओरडायचो ... "अरे पुढे कोपर्‍यावर पोलिस थांबलाय!"

जाणारा एकतर भेदरून मागे तरी वळायचा नाहीतर अगदी गेलाच तर मनातल्या मनात घाबरत घाबरतच पुढे जायचा.
तेव्हढंच त्याला "सुखेनैव" चूक करून न दिल्याचं सुख :-)


Zakasrao
Tuesday, June 26, 2007 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो तुमचा फ़ोन घंटी नाही तर काय शिटी वाजवणार!!!" >>>
Is she shrilankan>>>

Gs1
Tuesday, June 26, 2007 - 7:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


माझ्या एका मित्राचा किस्सा आहे...

एका मित्राच्या लग्नाच्या चार पाच दिवस आधी त्याचा मोबाईल फोन खणाणला. अनोळखी नंबर.

'हॅलो, xxx xxx आहेत का ?'
'बोलतोय'

'मी केसरीमधुन बोलतोय. तुम्ही कुलू मनालीचे बुकिंग केले होते ना ?'
'हो..'

'साहेब, ती ट्रिप फुल झाली आहे, त्यामुळे तुम्हाला नेता येणार नाही.'

'अहो काही काय बोलताय, अस कस चालेल ?' मित्र एकदम सरकलाच.

'पण साहेब, खरच फुल्ल झाली आहे, तुम्हाला त्याबदल्यात दुसरं कुठलं लोकेशन चालेल का ?'

'नाही नाही, अजिबात चालणार नाही, मी तिकडे तुमच्या ऑफिसला येतो उद्या' मित्राचा आवाज आता चिडून टिपेला पोहोचला होता. आधीच लग्नाची धावपळ त्यात हे टेन्शन.

'पण अहो, कुलू मनालीऐवजी तुम्हाला खूप छान पॅकेज आणि एक्दम बेष्ट लोकेशन देतोय, ऐकुन तर घ्या साहेब.'

'बर कुठे आहे बोला ? ' किंचित शांत होत मित्र म्हणाला.

'यवतमाळ ! ' समोरच्याने शांतपणे सांगितले.

'काऽऽऽऽऽऽऽय ?' मित्राच्या डोळ्यासमोर तारे चमकले हे त्याच्या आवाजावरुनच लक्षात येत होते.

'हो साहेब, यवतमाळचं एकदम फस्टक्लास पॅकेज आहे, चालेल ना ? ' एकदम उत्साहात समोरचा.

'मुळीच नाही, मी उद्या तुमच्या ऑफिसला येतो. मग बोलू.' मित्र म्हणाला. संताप आणि आश्चर्याने त्याच्या तोंडातून पुढे शब्दच फुटेना.

'ठीक आहे साहेब.' केसरीवाला म्हणाला.

नंतर शंका येउन चौकशी केली तर तो केसरीवाला नव्हताच असे मित्राच्या लक्षात आले.


Zakasrao
Tuesday, June 26, 2007 - 7:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS
अखेर किस्सा लिहिलाच बर झाल.



Indradhanushya
Tuesday, June 26, 2007 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>नंतर शंका येउन चौकशी केली तर तो केसरीवाला नव्हताच असे मित्राच्या लक्षात आले.
काहीही झालं तरी शेवटी मायबोलीकरच तो...
GS सही रे...



Nalini
Tuesday, June 26, 2007 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS        

Robeenhood
Tuesday, June 26, 2007 - 2:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात मला तर ते केसरीतून बोलतोय म्हटल्यावर केसरी वृत्तपत्रातून बोलतोय असे वाटले होते त्यामुळे केसरीचा अन कुलू मनालीचा संबंधच काय असा प्रश्न पडला होता म्हन्जे माझी वेगळीच करमणूक झाली...:-)

Chyayla
Tuesday, June 26, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'हो साहेब, यवतमाळचं एकदम फस्टक्लास पॅकेज आहे, चालेल ना ?
यवतमाळ... खो खो खो... GS1 खुप दीवसानी ईतका भारी किस्सा ऐकायला मिळाला, कदाचित तो केसरीतुन फ़ोन करणारा मित्र तुम्हीच तर नव्हतात?

Dineshvs
Tuesday, June 26, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS वीणाताईनी वाचलं तर, खैर नाही रे.

Disha013
Tuesday, June 26, 2007 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

GS सही!
न्ज्न्ज ज्ब ज्ज ज्न्ज ज्न्ज्न


Storvi
Wednesday, June 27, 2007 - 1:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हुडसाहेब माझीही अशीच करमणुक झाली :-O

Giriraj
Wednesday, June 27, 2007 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग कोण होता तो xxxxx इसम?

Giriraj
Wednesday, June 27, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरे तो भी टांग उप्पर...

एका मायबोलीकराचा बदला घेण्यासाठी फ़ोन केला..
'नमस्कार,श्री. xxx बोलताय का?'
'हो,बोलतोय'
'मी ABN Amro बॅंकेतून बोलतोय. आपले नाव भाग्यावान विजेत्यांमध्ये आलेय आणि आपल्याला personal loan मिळणार आहे. यामुळे आपल्याला ******** फ़ायदे मिळतिल.....'
'अहो पण मला personal loan नको आहे.'
'ठिके.. मग आम्ही आपल्याला ICICI चे क्रेडिट कार्ड देऊ.'
वैतागून,'पण मला तेही नकोय'
'बर्र.. आम्ही आपल्याला HSBC चे क्रेडित कार्ड देऊ आणि यामध्ये ******** फ़ायदे आहेत'
आता पलिकडच्याचा धीर सुटत चालला होता आणि मी अजून एकदोन कार्ड माथी मारायच्या विचारात होतो.
पण शेवटी मलाच सस्पेन्स न साहवून मी कोण बोलतोय हे सांगितले.
तर महाराज म्हणतात ,'मला कळलेच होते तू असणार म्हणून.'



Sanghamitra
Wednesday, June 27, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


गोविंद, यवतमाळचे पॅकेज
गिरी हा श्री xxx नावाचा मायबोलीकर या पर्सनल लोन वाल्यांचे इतके बोलणे ऐकून घेतो? नाव आणि नंबर सांग. देऊन टाकते मला कॉल आला की.
बाय द वे, मग आवडले का तिला यवतमाळचे निसर्गसौंदर्य?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators