Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 21, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through June 21, 2007 « Previous Next »

Disha013
Friday, June 08, 2007 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी,:-)
नाही,आम्ही काका,काकु,मामा,मामी,आत्या यांना 'ए' बोलवतो.
पण बाबा आणि आजोबांना अरे तुरे करत नाही पण अहो 'अहो' न बोलवता 'ओ बाबा' ,'ओ आजोबा' अशी हाक मारतो.


Sakhi_d
Saturday, June 09, 2007 - 5:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरतर मी नव-याला अरेच म्हणते पण आत अहो म्हणत जाईन... म्हंटलेच पाहिजे हो कि नाहि...

आपण फ़क्त नव्-यालाच थोडे ना अहो म्हणतो? सासु,सासरे,दीर, नणंद सगळे सामील त्यात!
सही...


Zakasrao
Saturday, June 09, 2007 - 6:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला हि थेरी अशी आहे काय? मग माझी बायको मला अरे च म्हणुन हाक मारते मग बरोबर आहे तिच.

Yogesh_damle
Sunday, June 10, 2007 - 11:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी पंजाबीत 'हो', 'बरं', 'व्हय' ह्या सगळ्यांच्या अर्थी "आहो" म्हणतातच ना!! :-)

अल्पनाच्या 'खासम' ला मायबोलीचं मानद सभासदत्व द्यायला हवं!!

हा वेंधळेपणा कम इब्लिसपणा... माझा एक मित्र त्याच्या क्लायंटच्या प्राॅडक्टच्या जाहिरातीसाठी कुठल्या चॅनलचे, कुठल्या वेळचे ब्रेक्स योग्य ह्याचा रीसर्च करत होता. पंजाबात ह्या प्राॅडक्टचं मार्केटिंग होणार होतं म्हणून हा etc , ज़ी पंजाबी आणि लष्कारा चॅनल्स चा फेरफटका मारत होता. त्याला दिसलं, सरदारांच्या प्रदेशात एका कार्यक्रमाचं नाव होतं... 'सोचो!' :-)

योग्य त्या बंधु-भगिनींनी मोठठा दिवा घ्यावा! :-)

ता. क :- 'अहो आश्चर्यम्' चा उगम कुठे झाला असावा ह्याचं उत्तरही मिळाल्यासारखं वाटतंय! :-) डबल दिवा प्लीज़!!!


Yashwant
Monday, June 11, 2007 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझ्या डॉक्टर मित्राचा गोन्धळ. त्याला तम्बाखू खायची सवय आहे. पण घरी कळू नये म्हनून हा औषध द्यायच्या कागदी पूडीत तम्बाखू ठेवून अधून मधून खायचा. एकदा चुकुन ती पुडी त्याने पेशन्ट्ला दिली आणि औषधान्ची पुडी टेबल वरच राहीली. पाच मिनीटान्नी तो भर बाजारात त्या पेशन्ट्ला शोधत पळत होता.

Nandini2911
Monday, June 11, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझ्या आईचा वेंधळेपणा. मोबाईलवर नुकतंच तिला मेसेज टाईप करायला शिकवलं होतं. तरी काहीतरी अगम्य टाईप करत होती. काल माझ्या मोबाईलवरुन मेसेज टाईप केला "घरी लवकर ये" आणि माझ्या भावाला पाठवायच्या ऐवजी माझ्या मावशीच्या मिस्टराना पाठवून दिला :-)

आई मुंबईत, मावशी राहते लातुरमधे. त्या बिचार्या मामाना काय मेसेज आहे तेच समजेना. त्याच्या मुलाने अभिषेकने तो मेसेज वाचला. काय लिहिलय तेही समजलं.. त्याने रीप्लाय केला "निघालोय. चालत येतोय म्हणुन वेळ लागेल" आई विचारात. अभिषेक इकडे कसा काय येत आहे. :-)


Nalini
Monday, June 11, 2007 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या भावाला पाठवायच्या ऐवजी माझ्या मावशीच्या मिस्टराना पाठवून दिला. >>
त्या बिचार्या मामाना काय मेसेज आहे तेच समजेना.>>

मावशीच्या नवर्‍याला काका म्हणतात ना? की हा पण वेंधळेपणा?:-)

Nandini2911
Monday, June 11, 2007 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तरी माझ्या मावशीच्या मिस्टराना मामा म्हणते. आणि मीच काय माझ्या आईचं अख्खं खानदान दोन्ही जावयाना मामाच म्हणतात. आजोबापासून ते पणतू पर्यन्त. :-)

Pratyuma
Monday, June 11, 2007 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग मावशीच्या मिस्टराना "मामा" म्हणतेस मग ते तुझ्या मावशीचे भाऊ झाले कि ग!!! दिवा घे आणि यापुढे त्याना काका म्हण.

Storvi
Tuesday, June 12, 2007 - 12:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही काय जबर्दस्ती आहे!! कर्नाटकात आपण जसे काका सर्रास वापरतो आणी मामा फ़क्त आईच्या भावाला वापरतो तसे त्याच्य बरोब्बर उलटे आहे, म्हणजे माझ्या ससरी सर्रास मामा वपर्तात आणि फ़क्त वडीलांच्या भावाला काका म्हणतात.. :-)

Nandini2911
Tuesday, June 12, 2007 - 5:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्तोर्वी, एकदम बरोबर. मी कर्नाटकी आहे त्यामुळे आमच्याकडे सर्रास मामा च वापरतात. काकाला आम्ही 'दोड्डाप्पा" म्हणतो.

Athak
Tuesday, June 12, 2007 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' मामा ' बनवणे चा अर्थ आज कळला :-)

Ajjuka
Tuesday, June 12, 2007 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पे.... अगं ए ट^*&^ कुठे आहेस कुठे? की आरोहीने दिवसा तारे दाखवायला सुरुवात केलीये? किती दिवसांनी तुझी पोस्ट दिसतेय!!

Yogesh_damle
Tuesday, June 12, 2007 - 11:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वकिलांच्या संघटनेला 'बार' म्हणतात. (म्हणून 'बार काउंसिल' सारखे शब्द) मी एका शहराच्या कोर्टाच्या डिरेक्टरीत 'लेडीज बार असोसिएशन' वाचून इतका दचकलो ना!!! :-)

Storvi
Tuesday, June 12, 2007 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>काकाला आम्ही 'दोड्डाप्पा" म्हणतो>>घ्या ह्यातुन अम्हाला कळते कि भावा भावांत तुझे बाबा सर्वात धाकटे असावेत :-O

नी: लय म्हण्जी लय बीझी... jaraa haa WE संपला की बोलू सवडीने...

Alpana
Monday, June 18, 2007 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्रेच्या गेला पुर्ण आठवडा कुणी वेन्धळेपणा केलाच नाही?....

Rutu_hirwaa
Tuesday, June 19, 2007 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मैत्रिणीचा घडलेला हा किस्सा

मी आणि ती तिच्यासाठी इन्जीनिअरिन्गची पुस्तके घ्यायला अप्पा बळवंत चौकात गेलो होतो.

तिथे

विक्रेता: हे बघा ताई तुम्ही ही वापरलेली पुस्तके घेतलीत तर तुम्हाला आम्ही आत्ता ३५% सूट देऊ आणि शिवाय परत तुम्ही ती आम्हाला विकु शकता..
सुप्रिया: पण तेव्हा तुम्ही ती कशी घेणार मग
विक्रेता: रिटर्न करताना ६५% सूट

सुप्रिया (माझ्याकडे वळून कुजबुजल्याच्या स्वरात) "अय्या म्हणजे आपल्याला फ़ुकट च पडली की ग पुस्तकं !!"

माझा चेहेरा पहाण्यासारखा!!



Alpana
Thursday, June 21, 2007 - 6:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझ्या मोठ्या जावेचा किस्सा... तिने चक्क ट्रेन मध्ये लेकिला (वय ६) दात घासण्यासाठी ओडोमास ची ट्युब दिली पेस्ट समजुन...तिने बिचारिने दात घासलेपण..आणी मला येवुन म्हणाली चाची पेस्ट कडवी थी... तोपर्यन्त तिच्या आईला लक्शात आले स्वताचे दात घासताना

Sanghamitra
Thursday, June 21, 2007 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाऊ पण? म्हणजे एकूण तू योग्य घरात गेली आहेस तर.कुणीच कुणाला बोलायला नको.
दिवा घे.



Alpana
Thursday, June 21, 2007 - 9:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग, पण नवरा नाही न वेन्धळा...गेल्या आठवड्यात लग्नानन्तर पहिल्यान्दा ६ महिन्यानी आम्ही दोघे माझ्या माहेरी गेलो तर तिथे हा सगळ्यना माझे किस्से तिखट मीठ लवुन सान्गत होता...बरेचशे तर नविन तयार केलेले...म्हणजे आमच्या शेजार्‍यान्चे गेट अगदी आमच्या सारखे आहे तर १-२ वेळा अल्पना त्यान्ची बेल वजवत उभी होती वैगरे...आणी मुख्य म्हणजे बर्‍याच जणाना ते खरे वाटले...

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators