Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
देवदास

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » देवदास « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through June 11, 200720 06-12-07  1:35 am
Archive through June 13, 200720 06-13-07  10:22 am

Bee
Wednesday, June 13, 2007 - 10:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूपच छान रे रॉबीनहूड. मी शक्ती कितीतरी वेळा बघितला आहे. तू ज्या वाक्याबद्दल दृष्याबद्दल वर लिहिलेस तेही डोळ्यासमोर उभे आहेत. पण आता नव्या डोळ्यांनी तेच दृष्य मी परत बघेन. ही हालचाल मी पुर्वी नोटीस केली नव्हती.

मला दिलिप कुमार प्रौढ अभिनयातच अधिक आवडले आहे.


Asami
Wednesday, June 13, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर दिलिपकुमार आणि अमिताभ यानी असुरक्षिततेच्या भावनेतून प्रयोग न केल्याने,त्यांच्या क्षमतांचा पुरेपूर वापर केला नाही ही शोकांतिकाच आहे... >> चोक्कस बोललात भाऊ. त्यातही दुसर्यावर हा ठपका अधिक आहे. Waste of sheer talent.

Monakshi
Wednesday, June 13, 2007 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय तर तो करकचुन ब्रेक मारलेल्या गाडीसारखं हसतो, लहान मुलासारखं बोबडं काय बोलतो, देव जाणे!!

तीच तर खरी गंमत आहे, त्यालाच तसं हसता येतं, बाकी कोणालाही येणार नाही. त्याच्यासारख़ं क्SS क्SS क्SS किरण म्हणून बघा पाहू. ते त्यालाच जमतं आणि त्यालाच जास्ती सूट होतं


Sandy_102
Wednesday, June 13, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mi navin cinema cheenicum baghitala kuip chan hai amithab ani tabbu sathi jarur baghach kup kup chan hai
mast relax vatat picture bagun

Bee
Thursday, June 14, 2007 - 1:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण ही लोक चित्रपटात इतकी मन्ग होती शिवाय त्यात कमाई फ़ार मग त्यांना वेळ कशाला मिळणार रंगभुमीवर यायला. पण नशरुद्दीन शहानी केले आहे रंगभुमीवर काम.

आणि त्यावेळी मराठी रंगभुमी जशी विकसित होती तशी हिंदी रंगभुमी नव्हती. मला तर वाटतं अख्ख्या भारतात मराठी रंगभुमी ऐवढी सशक्त रंगभुमी इतर कुठल्याच भाषेला प्राप्त झाली नसेल. असेल तर ती कदाचित बंगाली भाषेला.

आता बघा ना सिंगापोरमधे दरवर्षी स्थानिक कलाकार नाटक बसवितात. इतर मंडळात हे असलं काहीच नसतं.


Deepanjali
Thursday, June 14, 2007 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि त्यावेळी मराठी रंगभुमी जशी विकसित होती तशी हिंदी रंगभुमी नव्हती. मला तर वाटतं अख्ख्या भारतात मराठी रंगभुमी ऐवढी सशक्त रंगभुमी इतर कुठल्याच भाषेला प्राप्त झाली नसेल. असेल तर ती कदाचित बंगाली भाषेला.

<<<<<बी ,
गुजराथी रंगभूमी पण मराठी इतकीच मोठी ( कि जास्त ?) आणि प्रतिष्ठित आहे , भरपूर audience पण आहे .
गुजराथी stage artists पण चांगले असतात , परेश रावळ पण करायचा नाटकां मधे काम .
मराठी मधली काही गाजलेली नाटकं गुजराथी नाटकां वरूनच घेतली आहेत .. e.g. आई रीटायर होतेय , All the best
अजुन पण असतील तर माहित नाही , शिवाय गुजराथी नाटकांवरून हिंदी movies च्या scripts पण बनवल्या आहेत , अमिताभचा " आंखे ' पण गुजराथी नाटका वरून घेतला होता,.


Ajjuka
Friday, June 15, 2007 - 10:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डिजे,
संपूर्ण चुकीची माहिती.
आई रिटायर होतेय हे मूळ नाटक मराठीच त्याचे गुजरातीत नंतर भाषांतर केले. भक्तीताईच करायच्या तेही.
All the best हि मूळ एकांकिका होती देवेंद्र पेम ची. ज्याचे २ अंकी नाटक केले. आणि मग ते नंतर गुजराथी, हिंदी व इंग्रजी मधे भाषांतरीत करण्यात आले.
गुजराथी रंगभूमीचा व्यवसाय मोठा आहे परंतू परीपक्वता, वैचारीक पातळी यांमधे ते शेकडो योजने मागे आहेत.
हिंदीत नुकताच येऊन गेलेला गोलमाल नावाचा सिनेमा सुद्धा हर्ष शिवशरण याच्या 'उनपाऊस' या मराठी एकांकिकेवर होता.
आधुनिक भारतीय रंगभूमीचा विचार केला तर मराठी व बंगाली रंगभूमी एवढी सशक्त व प्रवाही रंगभूमी फारशी नाही. हा मणिपूरी रंगभूमीवर रतन थिय्याम ने उभी केलेली कोरस रेपर्टरी सोडल्यास.


Ajjuka
Friday, June 15, 2007 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून एक. अनेक मराठी नट सध्या गुजराथी रंगभूमीवर काम करतात. उदाहरणार्थ सुमित राघवन, जितेंद्र जोशी, स्वप्निल जोशी इत्यादी. ते सगळेही हेच सांगतात की तिथे पैसा मिळतो. उत्तम मिळतो पण नाटक म्हणून तिथे जे काही असतं ते आपली बुद्धी बंद करूनच करावं लागतं. अर्थात सध्या सिरियल्स करणारे नट आणि तंत्रज्ञही काही वेगळं सांगत नाहीत.

Dineshvs
Friday, June 15, 2007 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका, कोकणी नाटकेही तितकीच लाऊड असतात. आफ़्रिकेतही हाच प्रकार असायचा.
माईक वैगरे नव्हते त्या काळातली सवय म्हणावी, तर बालगंधर्वांच्या काळात कुठे होते माईक ?


Robeenhood
Friday, June 15, 2007 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बालगंधर्वांच्या काळात माईक नव्ह्ते? कदाचित तसे माईक असल्याचा पुरावा सापडला नसावा अथवा माइक असल्याचे सिद्ध झाले नसावे!

Deepanjali
Friday, June 15, 2007 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका ,
तुझी महिती नक्कीच बरोबर असेल , thanks.
मी लिहिले ते देशी local news papers मधे चुकीचे आलेले वाचून .. तेंव्हा मला पण आश्चर्य वाटले सगळी नाटके गुज्जु नाटकां वरून घेतली आहेत हे वाचून ... वाटलं फ़ारच समृध्द दिसतेय त्यांची रंगभूमी !
पण अता बरे वाटले original मराठीच आहेत हे ऐकून !
:-)

Yogesh_damle
Sunday, March 02, 2008 - 3:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमित, जितेंद्र (आणि बहुतेक स्वप्निल सुद्धा) अमराठी आहेत, आणि म्हणून मला त्यांचं अमर्याद कौतुक आणि आदर आहे.

अमिताभ च्या 'आंखे'च्या मूल गुजराती नाटकाचं नाव 'आंधळो पटो' असं वाचल्याचं आठवतं.


Ajjuka
Monday, March 03, 2008 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुमितची आइ माझ्यामते मराठी आहे. नक्की माहित नाही.
जितू हा नावाला मारवाडी. त्याला राजस्थानी भाषा येतच नसावी असा माझा दाट संशय आहे. मराठी शाळेत शिकलेला मुलगा आहे. साधारण माझ्याबरोबरचे जे पुण्यातले गुज्जू मारवाडी आहेत जे पिढ्यानपिढ्या पुण्यातच आहेत त्या सगळ्यांना उत्तम मराठी येतं. त्यातले अर्ध्याहून अधिक मराठी शाळेतच शिकलेले आहेत.
स्वप्निल मराठीच आहे.


Zakki
Monday, March 03, 2008 - 11:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यातले अर्ध्याहून अधिक मराठी शाळेतच शिकलेले आहेत.

म्हणजे अनेऽऽक वर्षांपूर्वी की काय?

आजकाल मराठी शाळेत जाण्याची फॅशन नाहीये म्हणे. कदाचित् आमच्याकडे न्यू जर्सीत येऊन शिकले असतील. शिवाय आम्ही आठवणीने त्या विद्यार्थ्यांचे नाटकहि बसवतो. ते पाहून त्या बालकांना वाटते, छ्या:, यापेक्षा आपण लहान मुलेसुद्धा चांगले नाटक बसवू शकू. त्यातून काही लोकांना त्या क्षेत्रात जायची आवड उत्पन्न होत असावी!





Ajjuka
Monday, March 03, 2008 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>म्हणजे अनेऽऽक वर्षांपूर्वी की काय?<<

हो.

Yogesh_damle
Tuesday, March 04, 2008 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंद्रमुखीच्या रेशमी झिपर्‍यांच्या फटक्याने आरशाच्या ठिकर्‍या होतात, मात्र ती मिलिंद गुणाजीच्या श्रीमुखात भडकावते तेव्हां त्याची मान चक्क धडावर टिकून राहते- ही ' feather touch थप्पड़अ' का? :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators