Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 05, 2007

Hitguj » My Experience » घरची बाग » Archive through June 05, 2007 « Previous Next »

Rachana_barve
Thursday, August 17, 2006 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी हौसेने टोमॅटोचे झाड आणले. हिरवे टोमॅटो लागले की चटणी करता येईल म्हणून. पण टोमॅटोच आले नाहीत :-( काय चुकल असेल?

Chandya
Thursday, August 17, 2006 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

RB , आमच्या कडे प्लम टोमॅटो चे झाड कुंडीत आहे. potting mix वापरली. रोज पाणी, सुर्यप्रकाश आणि अधुनमधुन liquid food . खुप टोमॅटो आलेत. पुढचे १-२ महिने पर्यंत ते झाड टिकेल असा अंदाज आहे.

मी बिया वापरल्या होत्या.


Dineshvs
Friday, August 18, 2006 - 1:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रचना, अगदी रस्त्याच्या कडेला उगवलेल्या टोमॅटोच्या झाडाला पण टोमॅटो लागतात. बहुतेक पुरेसे ऊन मिळाले नसावे.
फुले आली होती का ?


Rachana_barve
Friday, August 18, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही हो दिनेश फ़ुल पण नाही आली. नुसतच झाड वाढतय. ऊन जरा जास्तच होत. त्याचा परिणाम का? :-( मी पण कुंडीतच लावल आहे झाड. मोठ्या कुंडीत transfer करू का? आणि आता येतील का टोॅमटो? की संपला आता सीझन?

Storvi
Friday, August 18, 2006 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी कडिपत्त्याचं रोप आणलं शेवटी. बरं आता हे direct जमीनीत लावु का एखाद्या कुंडीत लावु...

Karadkar
Friday, August 18, 2006 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा $ ३५ wow!!! :P
कुंडीमधे लाव. खुप थंडी पडली कि घरात आणुन ठेवता येईल


Fulpakhru
Friday, August 18, 2006 - 11:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

priya तू कुठुन आणलास मोगरा
तू
bay areaत असतेस कि अजुन कुठे?
मी कधीपासुन मोगरा शोधते आहे पण मला कुठेच नाही मिळाल पण मी असेच एकीच्या घरात पहिले आहे :-(


Dineshvs
Saturday, August 19, 2006 - 8:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग रचना, ते झाड आता फळे देणार नाही. घरी खायला आणलेल्या लाल टोमेटोच्या बिया लावल्या तरी त्या उगवतात. झाडाला काठीचा आधार द्यावा लागतो, नाहीतर ते लोळते.
रोज सकाळी त्या झाडांच्या पानावरुन हात फिरवुन. का रे बाबा रुसलास ? किती वाट बघायला लावतोस ? असे मुकपणाने विचारले तर झाड नक्कीच प्रतिसाद देते. मी अगदी खरे लिहितोय. मी अनेकवेळा हा प्रयोग केला आहे.


Shonoo
Saturday, August 19, 2006 - 8:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

storvi
मला वाटते की कडिपत्ता एखाद्या मोठ्या कुंडीतच लावलेला बरा. तळाशी मोठी खडी टाक आणि वर Potting soil घाल. Container Mix साधारणपणे मौसमीहंगामी झाडांकरता ठीक आहे. वर्षानुवर्षे टिकणार्‍या झाडांकरता Potting soil बरी.


Ashbaby
Wednesday, August 23, 2006 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, माहितीबद्द्ल धन्यवाद, उपाय करुन बघते,
साधना.


Durga_moghe
Wednesday, January 17, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुम्हाला बाग बगीचा चि आवड असेल तर मी एक लिन्क देऊ इच्चिते
सकाळ पेपर तर्फ़े नवे दैनिक सुरु झले आहे केवल शेतिसाठी त्यात दर रविवरि गार्डन बद्दम माहिति अस्ते.....
बाग बगीचा नावाने
येथे पहा
www.agrowon.com

Neerma
Wednesday, May 30, 2007 - 11:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मन्ड्ळी, मी इथे नवीन आहे; सम्भाळून घ्या. माझी जमीनीत लावलेली गुलाबाची झाडे चान्गली ८-१० फ़ूट वाढलेली आहेत. त्यावर आलेली फुले कापायची कि तशीच सुकल्यावर कापायची? झाडाच्या द्रुष्टीने काय चान्गले आहे? कोणी सान्गू शकेल काय?

Dineshvs
Thursday, May 31, 2007 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलाबाच्या झाडावर येणारी फुले नियंत्रित करावी लागतात. एवढ्या मोठ्या झाडावर एकावेळी आठ दहा फुले येऊ द्यावीत. पण आकाराने लहान असणार्‍या कळ्या वाढु देऊ नयेत.
गुलाब, कळी अवस्थेत खुडला तरी घरात चांगला राहतो. कापल्या कापल्या देठ पाण्यात बुडवावा लागतो.
पण पुर्ण उमलल्यावर झाडावर ठेवण्यात अर्थ नसतो.
तसे ठेवले तर गुलाबाला फळही धरते.


Sheshhnag
Friday, June 01, 2007 - 4:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते गुलाबाचे फळ रुजवले तर गुलाब उगवतो का?

Ravisha
Monday, June 04, 2007 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकेत "मेथी,मिरची आणि तुळस" यांची जोपासना कशी करायची? तिन्हींसाठी बिया मिळू शकतात का?

Sakhi_d
Tuesday, June 05, 2007 - 8:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलाबाला फ़ळही येते?? ए. ते. न.
कसे असते हे फ़ळ? जर फ़ोटो असेल तर टाका ना आणि अजुन काही माहिती असेल तर तिही द्या...


Dineshvs
Tuesday, June 05, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी स्वतः हि फ़ळे बघितली आहेत. गुलाबाच्या फुलाच्या खाली जो फ़ुगीर भाग असतो त्याचेच फळ होते. गुलाबी रंगाचे असते. आत पेरुच्या बियांसारख्या बिया असतात, चवीला तश्याच लागतात.
बिया रुजतात का ते माहीत नाही. पण मोठ्या असल्याने रुजत असाव्यात. मी हे फळ खाऊन बघितले, पण खाण्याजोगा गर नव्हता. या फ़ळाबद्दल आणखी माहिती माझ्याकडच्या एका पुस्तकात आहे. मग लिहीन.


Nalini
Tuesday, June 05, 2007 - 10:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, गुलाबाला फळ असते. गुलाबाच्या फळांचे jam बनवतात. ते चवीला खुप छान लागते, आंबट गोड लागते. हे फळ पिकले की ते हलकेच पिळायचे, त्यातुन त्याचा गर बाहेर येतो. हे फळ खाताना घ्यायची काळजी म्हेणजे ह्याच्या बिया तोंडात घ्यायच्या नाहीत. त्याने खाज येत असावी.
जसे की गुलाबाच्या पाकळ्यांमधून कॅल्शियम मिळते तसेच ह्या फळांतून क जीवनसत्व मिळते. आमच्या प्रोफेसरची बायको, डॅन्यूब नदीच्या काठावरून हि फळे गोळा करून आणते आणि त्याचा जाम बनवून ठेवते. तिच्याच सोबत मी हि फळे आणि जाम खाण्याचा मनसोक्त आनंद लुटला.



Sakhi_d
Tuesday, June 05, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, नंदिनी धन्स.... छान माहिती मिळालि. पण ही फ़ळ सगल्याच गुलाबांच्या झाडाला येतात का?

Nandini2911
Tuesday, June 05, 2007 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला का म्हणून धन्स?? मी तर हे फ़ळ पाहिले सुद्धा नाही.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators