Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
माहेरची साडी

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » माहेरची साडी « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through May 21, 200720 05-21-07  5:31 pm
Archive through May 23, 200720 05-23-07  8:15 am

Sanghamitra
Wednesday, May 23, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अज्जुका हेच म्हणायचे होते मला.
>> आदर्श नेहमी उच्चच असावेत. नाही का ?
Dinesh You said it all!
आणि हो तो उल्लेख विसरलेच. आणि तो चित्रपट आशावादी होता म्हणूनच मी परत पाहिला.
>> जनू बांडे च्या चित्रपटांना वाह वाह करायचे
अरे पण! कोणी केलेय वाहवाह? मी पहातही नाही ते चित्रपट. पाहिलेच तर विनोदी म्हणूनच पाहीन. (आता त्याचे ड्वायलॉक स्पीकरवर लावत नाहीत त्याला मी काय करू? :-) )
उगीच काहीही कारण सांगून गप्प बसा चेष्टा करू नका या ऍप्रोचमुळं मूळ चर्चा बाजूला रहाते. आता पुढच्या वेळी या अशा सगळ्या संवेदनशील आणि भावनिक दृष्ट्या कुणी दुखावले जाऊ शकणार्‍या विषयाशी संबंधित इतर काहीसुद्धा न लिहीणे हेच शहाणपणाचे. (हुश्श!)


Ajjuka
Wednesday, May 23, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही त्यामुळे इथे बोलायची माझी सवयही अशी सुटणार नाही!! असो.. तर हुडा तुझ्या सगळ्या पोस्टसचे हे थोडेसे disection

|हा चित्रपट पहाणार्‍या अल्पशिक्षीत महिला ज्या वातावरणात जन्मल्या, वाढल्या, चूल अन मूल या चक्रात अडकल्या त्यांच्या संवेदना चुकिच्या असतील पण त्या हास्यविषय व्हाव्यात हे खरच अमानुष आहे. |
संवेदना चुकीच्या असं कोणीच म्हणत नाहीये. पण माझ्या वरच्या एका पोस्टमधे मी जसं म्हणलंय तसं केवळ काळ्या आणि पांढर्‍या रंगात प्रत्येक व्यक्तिरेखा सादर होणं आणि वास्तवातील गोष्टी अतिशयोक्तीच्या पातळीपर्यंत ताणत नेणं यामुळे हा (किंवा असे) चित्रपट हास्यास्पद वाटू लागला तर त्यात चूक ते काय?

|परमेश्वरी योजनेने सुस्थितीतील, सुशिक्शीत कुटुम्बात जन्म झाल्याने पालकांच्या कृपेने चांगले शिक्षण मिळल्याने कदाचित तुमची रसास्वाद घेण्याची दृष्टी वेगळी झाली असली तर त्यात तुमचे contribution
सुस्थिती व सुशिक्षित असणं यावर रसास्वाद घेण्याची दृष्टी अवलंबून असते हा ठोकताळाच मुळात चुकीचा आहे पण तो वेगळा विषय.

|लक्षावधी लोकांशी भावनिक तादत्म्य साधणार्‍या कृतीत सर्व टाकाऊ असते अन ते सगळे हास्यास्पदच असते?|
जर कुठल्याही पद्धतीने कलाकृतीचा आयुष्याशी संबंध असतो हे अमान्य असेल तर मग तुमचे म्हणणे मान्य करावे लागेल पण मुळातलेच गृहितक चुकीचे आहे तेव्हा..

मुळात अभिरूची, दर्जा यांची सांगड तू पैशाशी आणि डिग्र्यांशी घालतोयस जे चुकीचे आहे. दुसरं म्हणजे कितीही relative असण्याचा घोषा लावला तरी मूळ दर्जा ही गोष्ट असतेच जी universal असते आणि त्या त्या कलाकृटीच्या मागचा विचार, तिचा focus आणि त्यानुरूप केलेली माण्डणी यावर अवलंबून असते.

आणि जसं तुमच्या दृष्टीने अनाकलनीय म्हणून पिकासो, गॉग ते अवचट अश्यांची टर उडवली जातेच की. वरतीही काही वेगळं दिसलं नाही मला.

असो.. contd


Bee
Wednesday, May 23, 2007 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी अमरावतीला शेवटच्या वर्षाला असताना हा चित्रपट लागला होता तिथे. तेंव्हा खास मुली बघण्यासाठी आमचा एक ग्रुप हा चित्रपट बघायला गेला होता..

ज्या साली हा चित्रपट आला त्यावेळी एकूनच Bollywood हिंदी आणि मराठी चित्रपट हे चाकोरीबाहेर गेलेले नव्हते. तेंव्हाची तरूण पिढी आजच्या तरूण पिढी इतकी बंडखोर नव्हती. त्यामुळे असे भावनांचा खेळ असलेले चित्रपट आणि त्यातील पात्रांचे न पटणारे चित्रण हे त्यावेळेसचे प्रेक्षक बिनबोभाट पटवून घेत. त्यावेळी हे असे का तसे का ह्यावर फ़ार काथ्याकुट होत नसे. तो जमाना घरघुती चित्रपटांचाच होता.

मला आठवतं आम्ही हा चित्रपट बघताना आजूबाजूच्या कितीतरी बायका मुसुमुसु रडल्या होत्या. बहुतेक त्यांची भावनिक कोंडी ह्या चित्रपटाने चांगली पकडली असेल..

मला तो काळ लक्षात घेता ह्या चित्रपटात काहीच अतर्क्य अचाट वाटतं नाही.. पण हो आजच्या काळात असे चित्रपट निघालेत तर नक्कीच माझा आक्षेप असेल. सुदैवाने हल्लीचे मराठी चित्रपट स्तुती करण्याजोगे असतात. हिन्दी तर तद्दन भिक्कार असतात.. एक ना धड भारंभार चिंध्या..


Lukkhi
Wednesday, May 23, 2007 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या साली हा चित्रपट आला त्यावेळी एकूनच Bollywood हिंदी आणि मराठी चित्रपट हे चाकोरीबाहेर गेलेले नव्हते. तेंव्हाची तरूण पिढी आजच्या तरूण पिढी इतकी बंडखोर नव्हती.
>>
काहीतरीच काय? अमिताभ चे angry young man type सिनेमे पाहिले नाहीत काय तुम्ही?


तेंव्हा खास मुली बघण्यासाठी आमचा एक ग्रुप हा चित्रपट बघायला गेला होता..

hmm... कश्या होत्या मग मुली? ;-)

Disha013
Wednesday, May 23, 2007 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माहेरची साडी हा एक अतिशय निराशावादी चित्रपट होता.पण त्याने अनेक निर्मात्यांना स्फ़ुर्ती मात्र दिली. त्यानन्तर मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी सौभाग्य वस्तु भांडारच सुरु केले! 'हळ्दी-कुंकु,चुडा,ओटी,वगैरे वगैरे.

Giriraj
Wednesday, May 23, 2007 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कश्या होत्या मग मुली?>>> अजूनही शोधताहेत यावरून काय समजायचे ते समजा! दिवे घे रे बी!:-)

Robeenhood
Wednesday, May 23, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गि-या का त्या बी ला त्रास देत असतोस रे?


Bee
Thursday, May 24, 2007 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लख्खे.. मी कौटुंबीक चित्रपटांबद्दल म्हणत आहे आणि त्यातल्या त्यात सासू सुनांचे चित्रपट...

मुली काय.. नेहमीच चांगल्या वाटतात मला.. :-) हेही काय विचारणे झाले युवकांना :-)

गिर्‍या मुली पहायला जाणे म्हणजे तिथे केपीचा कार्यक्रम नव्हता काही :-)


Giriraj
Thursday, May 24, 2007 - 5:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

RH मी कधी तुम्हाला म्हटलेय का की क त्या बिचार्‍या झक्कींना त्रास देतात म्हणून! :-)

बी,आता असेच पाहणे सोडून KP करा आणि फ़ोडा कुणा एकीचं तरी नशीब... उगीच बाकिच्या घाबरल्या आहेत त्या तरी सुटकेचा निःश्वास सोडतील किंवा टाकतिल! :-)


Farend
Thursday, May 24, 2007 - 8:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दादा कोंडक्यांनी याच चित्रपटाच्या नावाला प्रत्युत्तर म्हणून "सासरचं धोतर" काढला होता ना? दादा म्हणे असंच करायचे जसे "असला नवरा नको गं बाई" ला "ह्योच नवरा पाहिजे" :-)

Kedarjoshi
Thursday, May 24, 2007 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमोल जेव्हा माहेरची साडी निर्मान झाला तेव्हा दादा ह्यात न्हवते. म्हणुन तो विजय कोंडकेने केला. (दादाचच ब्यानर आहे बहुदा).

Robeenhood
Thursday, May 24, 2007 - 7:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,आता असेच पाहणे सोडून KP करा आणि फ़ोडा कुणा एकीचं तरी नशीब... >>>>
पहा एक शेपूट तुटलेला कोल्हा दुसर्‍या शेपूटवाल्याच्या शेपटाकडे कसा असूयेने पाहतोय अन त्याचे शेपूट तुटण्याची वाट पहातोय!!

Mahaguru
Friday, May 25, 2007 - 5:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सासरचं धोतर मधे दादा कोंडके यांनी काम केले आहे.
विजय कोंडके यांनी ज्योती पिक्चर्स बॅनर खाली माहेरची साडी १९९१ ला आला मग दादांनी सासरचं धोतर हा चित्रपट १९९४ ला काढला (एकदम खुन्नस मधे) . दादा कोंडके यांचे निधन १९९८ मधे झाले.
दादा कोंडके यांच्या आत्मचरित्रात ह्या चित्रपटाचा इतिहास आहे


Manya2804
Friday, May 25, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माहेरची साडी प्रदर्शीत झाल्यानंतर लगेचच श्रीकांत बोजेवार (CBDG) यांनी लोकसत्तेत 'सासरचे धोतर' म्हणून एक विनोदी लेख लिहीला होता. त्यात त्यानी अलका कुबल च्या जागी बारक्या बाबल, विजय कोंडके ऐवजी अजय बोंडके एत्यादी नावे वापरली होती.

Kedarjoshi
Friday, May 25, 2007 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओह! सासर चे धोतर त्यांचाच आहे का? मला उगीच आत्तापर्यंत वाटत होते की दादा गेल्यावर विजय ने काढला.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators