Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 10, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through May 10, 2007 « Previous Next »

Chyayla
Monday, May 07, 2007 - 11:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीन्ना अनुमोदन अरे कुणी छानसा किस्सा टाका की वेन्धळेपणाचा. दरम्यान झक्की तुम्ही तुमची जन्मपत्रिका एकदा परत बघा... हुडा, गोबु, लालभाई (लुक्खी) तुमच्या मागे राहु, केतु आणी शनी सारखे का मागे लागतात

Gobu
Tuesday, May 08, 2007 - 7:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोबिनभाऊ,
अहो, किती हा वेन्धळेपणा!!!
अहो ते टाळके ठिकाणावर आणायचे औषध च्यायला कडे पाठवायला विसरलात की काय?
(अहो, खरी गरज तिकडे आहे!!!)
आता मात्र हद्द झाली बुवा तुमची!!!
किती हा वेन्धळेपणा!!!

मन्डळी, दिवे घ्या बर!


Kashi
Tuesday, May 08, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सकाळी उठायला उशिर झाला...गcसवर एकीकडे भाजीसाठी फोडणी टाकली व एकीकडे चहाचे आधण ठेवले...तेलात चहाची पावडर टाकली व आधणात मोहोरी....

Sheshhnag
Tuesday, May 08, 2007 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेलात चहाची पावडर टाकली व आधणात मोहोरी....

हा हा हा हा!!!! कश्शी मज्जा झाली!


Runi
Tuesday, May 08, 2007 - 9:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेलात चहाची पावडर टाकली व आधणात मोहोरी....>>>
म्हणजे काशी, फोडणीचा चहा की चहाची फोडणी

Sakhi_d
Wednesday, May 09, 2007 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>तेलात चहाची पावडर टाकली व आधणात मोहोरी....
>>

म्हणजे सगळ्याची काशी झाली....

Cutepraj
Wednesday, May 09, 2007 - 3:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझा वेन्धळेपणा म्हणजे मी एकदा रिक्शावाल्यला पैसे देन्या ऐवजी हातातल्य बर्फीच्या खोक्यातली बर्फी दिली होती..!

Zakasrao
Wednesday, May 09, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काशी
फ़ोडणीचा चहा आणि चहाची आमटी
आणि हे दोन्ही पदार्थ नवर्‍यासमोर मांडले घ्या नवीनच आहेत. माझा शोध. ह्याची रेसिपी योग्य BB वर दिवा घेवुन टाक.

** म्हणजे बायका आपापल्या नवर्‍यांवर प्रयोग करयल सज्ज

Yogita_dear
Wednesday, May 09, 2007 - 6:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरचे सगळे गावी गेलेत.मी आणि एक मैत्रिण दोघी आमच्याकडे झोपतो. रात्री झोपताना एक SMS आला.मैत्रिणीने विचारल light घालवु का??मी म्हटल नको मला SMS वाचायचाय..वेंधळेपणाचा कळस होता..लक्षातच आल नाही cell ची light असते ते....

Nandini2911
Wednesday, May 09, 2007 - 6:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एकदा चहा मधे चहापूड समजून जवसाची चटणी घातली होती. बराच वेळ झाला चहा काळा का होत नाही याची तपासणी केल्यावर लक्षात आले.

एका मित्राच्या घरी सगळे जण असेच जमल्यावर त्याच्या आईला सांगितलं "काकू,. तुम्ही बसा मी करते चहा." मस्त चहा केला आणी फ़्रीजमधून दूध ऐवजी ताक काढलं आणि त्यात गाळला. फ़क्त पंधरा कप चहा केला होता. :-)


Chyayla
Wednesday, May 09, 2007 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकास फ़ोडणीचा चहा ही ही ही... अशी कशी ग तु काशी?. आणी ही नन्दिनी तुझी बहिण का?

क्युटप्राज.. रीक्शावाल्याला बर्फ़ी मग त्या रीक्शावाल्यानी परत जिथुन आणले तिथे पोचवुन दीले असेल ना?

अरेच्या तोन्डाची चवच बिघडली... अरे कोण आहे रे तिकडे, अरे छोटु सगळ्यानसाठी पेशल चहा लाव...


Nandini2911
Wednesday, May 09, 2007 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता केलेला वेंधळेपणा..
अख्खं ऑफ़िस हसतय.. बातमीची क्लिपिंग काढताना चुकून "शहबुद्दीन याना जन्मठेप" ही बातमी कापून चिटकवली आणि सगळ्याना पाठवून दिली. जो तो संभ्रमात.. याचा आपल्या कंपनीशी काय संबन्ध?? शेवटी माझ्या कलीगला लक्षात आलं. मला त्या बातमीच्या खालची बातमी कापायला हवी होती.


Cutepraj
Wednesday, May 09, 2007 - 7:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा मी कुळीथाच पिठलं करताना चुकुन गुळ घातला होता........ चव काय पण लागत होती??????????

Ajjuka
Wednesday, May 09, 2007 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रिक्षावाल्याचा किस्सा... उसगावात शिकत असतानाची गोष्ट. उसगावात त्यातून जॉर्जिया प्रांती रहात होते त्यामुळे हा.पा. थॅंक्यू म्हणायची सवय लागली होती. सुट्टीसाठी एक महिना देशात घरी आले होते. घरापासून (सदाशिव पेठ, पुणे) कुठेतरी जायला रिक्षा केली. रिक्षावाल्याला पैसे देउन उतरले. पैसे बरोब्बर दिले होते त्यामुळे सुट्टे परतची भानगड नव्हती. तरी मी त्याला पैसे देऊन मग जोरात थॅंक्यू म्हणाले. म्हणाले आणि माझ्या लक्षात आलं काहीतरी घोळ झाला... त्यामुळे एक सेकंद मी पण चक्रावून पाहात होते आणि तोही. आणि मग 'कुठे काय! काहीच नाही.' अशा आविर्भावात पटकन तिथून इप्सित स्थळाकडे कूच केले.

Sunidhee
Wednesday, May 09, 2007 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चहात मी पण मीठ टाकले आहे २-३ वेळा आणि पाहुण्यांना दिला पण.. :-( बिचारे उ** होता होता वाचले..

Nanya
Wednesday, May 09, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चहात २-३ वेळा मीठच काय.. साखर टाकली तरि उ** होइल..


Disha013
Wednesday, May 09, 2007 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चहाचे आधण ठेवलेले विसरुन तो उकळुन उकळुन २ चमचे उरलेला चहा मी पिलाय कसाबसा.केवळ दुसरा कराय्चा कंटाला आला म्हणुन.


नवीन नवीन सैपाक करायला सुरुवात केलेली. २ जणांच्या ग्लासभर वरणात मी २ चमचे हळद टाकलेली. अक्षरश्: औषध खाल्यासारखे लागत होते!


Sanghamitra
Thursday, May 10, 2007 - 4:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> केवळ दुसरा कराय्चा कंटाला आला म्हणुन.
थोडे पाणी आणि दूध घालून अजून उकळायचा ना


Gobu
Thursday, May 10, 2007 - 7:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधि आणि दिशा,
तुमचे (तुमच्या वेन्धळेपणाचे!) कौतुक करावे तितके थोडेच आहे!



Manjud
Thursday, May 10, 2007 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल ऑफिसला येताना cell समजुन TV चा Remote पर्समधे टाकला.

दिवसभर घरी सा.बा. remote शोधुन दमल्या आणि सा.बु. माझा cell attend ( switch off करायचे लक्शात न आल्यामुळे) करुन दमले.

संध्याकाळी घरी गेल्यावर पर्स मधुन remote काढुन दिल्यावर सा.बा. हु:श्श पावल्या आणि सा.बु. cell माझ्या हाती सोपवुन कपाळावरचा घाम पुसत फिरायला गेले.

आज सकाळी दोघेही कळजीपूर्वक पाहत होते मि पर्स मधे काय टाकत आहे ते!!!!


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators