Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 27, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through April 27, 2007 « Previous Next »

Nandini2911
Monday, April 23, 2007 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश.. मजा आली
मी २५ तारखेच्या रात्रीच्या ट्रेनचे रेझर्वेशन पनवेल वरून केलं होतं. ती ट्रेन साडेबाराला पनवेलला येते. दुसर्या दिवशी २६ तारखेच्या रात्री साडेबाराला मी बापडी स्टॅडिंग...


Music
Monday, April 23, 2007 - 6:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरंय सन्मि

थोडक्यात इथेही मुली मागे नाहीत हे हे .. :-)


Zakasrao
Tuesday, April 24, 2007 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे चतुर्भुज होता होता तुम्ही षटपाद होणार हे नक्की >>>>

आणि हा च्यायलाचा षटकार.

योगेशा अरे तु तिकडे गेल्यापासुन काय चालवलयस हे? कुछ तो हुवा हे कुछ हो गया हे.
cool तुम्हीसुधा!


Mandard
Tuesday, April 24, 2007 - 9:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगेश दामले दिल्लीत कुठे असता.मी पण दिल्लेत असतो म्हणुन विचारले.

Disha013
Wednesday, April 25, 2007 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलमोहरावरचा माझा नेहमीचा वेंधळेपणा... प्रतिक्रिया दिली की नाही तेच विसरुन जाते आणि परत सगळ्या प्रतिक्रियांमधे माझे नाव शोधत बसते. :-)

Chaffa
Wednesday, April 25, 2007 - 8:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुलमोहरावरचा माझा नेहमीचा वेंधळेपणा... प्रतिक्रिया दिली की नाही तेच विसरुन जाते आणि परत सगळ्या प्रतिक्रियांमधे माझे नाव शोधत बसते
म्हणजे दाही दिशा शोधतेस असे म्हण ना!!!!


Monakshi
Thursday, April 26, 2007 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझाही एक किस्सा:

मला लहानपणी तंद्रीत चालायची ख़ूप सवय होती. काहीतरी विचार डोक्यात चालू असल्याने काय करते आहे तेच कळत नसे.

एकदा आमच्या बिल्डिंगची ट्रिप गेली होती माथेरानला. सगळ्यांनी ख़ूप चालून झाल्यावर एका जागी थांबायचं ठरलं त्याप्रमाणे सगळे एका जागी थांबले पण मी तंद्रित ना, आमच्यापुढेच एक ग्रुप चालत होता, त्यांच्यातील एक बाई मला माझ्या आईसारख़ीच वाटली, मी लागले चालायला तीच्यामागून, चालत चालत बरीच लांब गेले, मध्येच ती बाई एकदम वळली, मी तिला पाहिलं आणि मराठी भाषेत जे काही घाबरणे या अर्थी वाक्प्रचार असतील ते सर्व आठवले. मग परत फिरले आणि चालायला लागले, एका वळणावर आल्यावर सगळा ग्रुप दिसला, आणि धडाम्मकन जीव भांड्यात पडला. पण आश्चर्य म्हणजे कोणालाच मी त्यांच्यासोबत नाही हे समजले नाही. पोपटच झाला पण नशीब, आईचा ओरडा नाही ख़ावा लागला.


Suvikask
Thursday, April 26, 2007 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा पण वेंधळेपणा आपला की group चा..???? होऊ शकतो ना... जसे चोरावर मोर..तसे मला यात ३ प्रकारे वेंधळेपणा आढळला
१. आपला स्वत्:चा
२. ग्रुपचा -- ते आपल्याल सोडुन मागेच थांबले
३. ग्रुपचाच -- त्यांच्या लक्षात ही आले नाही कि आपण त्यांच्याबरोबर आहात की नाही?


Nandini2911
Thursday, April 26, 2007 - 8:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी गाडी चालवताना अशा तंद्रीत चालवते. कित्येकदा उजवीकडचा indicator देऊन डावीकडे वळवते.

Milindaa
Thursday, April 26, 2007 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कित्येकदा उजवीकडचा indicator देऊन डावीकडे वळवते. <<<
हा वेंधळेपणा नाही, निष्काळजीपणा आहे. तुमच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळ आहेत हे.

Zakki
Thursday, April 26, 2007 - 2:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाऊ द्या हो मिलिंद. एव्हढे गंभीर होऊ नका.
१. भारतात बर्‍याच ठिकाणी लाल, हिरव्या सिग्नलकडेसुद्धा कुणि लक्ष देत नाहीत, तर इतर गाड्यांच्या सिग्नलकडे कोण पहातो.
२. त्यातून कुणि पाहिलेच तर, गाडी चालविणारी बाई आहे म्हंटल्यावर कोण त्यांचे वळायचे सिग्नल बघून त्याप्रमाणे चालवेल??



Chyayla
Thursday, April 26, 2007 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिन्दा तो कदाचित नन्दिनीचा ईब्लिसपणा असेल, चुकीचा Indicator देउन मग मागच्याला कस फ़सवल म्हणुन फ़िदीफ़िदी हासत असेल ती...

मोनाक्षी येत जा असेच इकडे.. कधी कधी... तन्द्रीत

अरे झकासा, म्युजिकची क्रान्तिकारी आन्तरचरणीय विवाहाची टुम (भले ती करो वा न करो) समजा लोकप्रिय झालीच... तर हे असले किस्से ऐकायला मिळतील...

१)वर पाहिजे: ४ चरण असलेला, २ चरणाच्या वधुला सुयोग्य. खोगीर व नालची अट नाही.
२)प्रिये मी जोपर्यन्त माझ्या ४ ही पायान्वर उभा रहात नाही लग्नाचा विचारच करु शकत नाही. म्हणजे कस.. पळुन जाउन लग्न करायला सोप्पे.
३) वरातीमागुन घोडे आल्यामुळे ऐनवेळेवर विवाह रद्द होण्याची नामुष्की आली होती
४) वधुने वराच्या एवजी घोड्यालाच हार घालुन, भर मान्डवातुन पळ काढला... प्रेमविवाहाची कुजबुज वर्हाडीनमधे सुरु होती
५)वधु: स्वामी थोडे उलटे फ़िरता का मागचे दोन्ही चरणावर नमस्कार करायचा राहीला आहे.
६)काही (च्या काही) उखाणे:
वधु: तब्येल्याच्या मागुन येतो घाणेरडा वास अश्वरावाचे नाव घेते भरवताना चार्याचा घास.
वर्: सचिनने शतक केले चौकार मारुन, अश्विनीच (घोडीच)नाव घेतो खिन्काळुन
७) लग्नानन्तर सन्सारातल्या काही कुरबुरी चव्हाट्यावर..
बायको: मी तुमच्याशी घोडा समजुन लग्न केले (हिन्डण्या फ़िरण्याची आयती सोय) तुम्ही चक्क गाढव निघालात, व्यर्थ माझे जीवन होSSS..
८) कार्ट्या.. गाढवा.. स्वता:च्या बापावर गेलास नुसता भटकत असतो गावभर आणी तशीच तुझी ती बहीण "गर्दभी" कुठे गेली ती?




Suyog
Thursday, April 26, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गेल्या भारत वारीत आम्ही वहिनीच्या मावशीकडे जेवायला गेलो होतो. त्यानच्याकडे कुत्र होत. जेवन झाल्यावर त्या म्हणे बसा हॉलमधे. मी परत किचनमधे जाउन बसले. त्यानी विचरले का? तर मी म्हणे हॉलमधे सनी आहे नन्तर कळाले, सनी त्यान्चा मुलगा आणी प्रिन्स कुत्र!

Disha013
Thursday, April 26, 2007 - 6:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नावघेवुन बोलायचं नाही. कुत्रं आहे म्हणायचं की नुसतं!


ता. क.-- तुमचे बोबडे बोल कष्टाने समजलेत.


Runi
Thursday, April 26, 2007 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाय (ला),
तुझे उखाणे मस्तच आहेत रे.


Tanyabedekar
Thursday, April 26, 2007 - 7:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकदा मी सकाळी ४ वाजता डेमोसाठी एका कॉम्प्युटरवर अप्लिकेशन टेस्ट करत होतो. मला काहितरी कॉपी करायचे होते आणि बराच वेळ झाला तरी ctrl+C मारत होतो आणि ctrl+V मारल्यानंतर काहीच पेस्ट होत नव्हते. आधीच सकाळचे ४ वाजले होते, सलग २ दिवसांपेक्षा जास्ती काम झाले होते. जाम वैतागलो. चिडलो. जगाला शिव्या घातल्या. थोड्या वेळाने माझा मॅनेजर आला. आणि जोर्-जोरात हसायला लागला. मग माझ्या लक्षात आले. मी माझ्या कॉम्प्युटरवर ctrl+C दाबत होतो आणि शेजारच्या मशिनवर ctrl+V

Tivlyabavlya
Thursday, April 26, 2007 - 9:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला... अप्रतिम लिहिले आहे... :-)
B T W गेल्याजन्मीचे तुम्हाला आठ्वायला लागले तर... बापुन्ची कमाल तर नाहीना??? तसे असेल तर तिकडे बापु BB वर पोस्टुन द्या.... फ़क्त नन्दिनी पत्ता मागेल एवढे लक्षात घ्या :-)


Yogesh_damle
Friday, April 27, 2007 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहीच रे तनय!! :-) कंप्यूटर्स वरून आठवलं... लॅब मध्ये अशी सीपीयूंची लांब रांग होती. कित्येकवेळा आपल्या सीपीयूचं बटन समजून शेजारच्या माणसाचा कंप्यूटर 'बूट' करून त्याची सगळी मेहनत आम्ही एका क्षणात 'ढगात' पाठवायचो! :-) मग तो किंवा ती आपल्या नावाने 'हाऽऽऽरी विठ्ठल' करणार!! :-)

Nandini2911
Friday, April 27, 2007 - 5:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या कॉलेजाच्या लॅबमधे आम्ही की बोर्डाची अदलाबदल करून ठेवली होती. अर्धा दिवस सगळा घोळ चालला होता..
अरे पण हे वेन्धळेपणा मधे नाही लिहायचं. इब्लिसपणाम्धे. चला हा नवीन वेंधळेपणा...


Sheshhnag
Friday, April 27, 2007 - 10:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायलाचे किस्से - ह. ह. पु. वा.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators