Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 23, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » माझा वेंधळेपणा » Archive through April 23, 2007 « Previous Next »

Zakasrao
Wednesday, April 18, 2007 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मैत्रीणीला केलेला SMS १२१ वर पाठवला.....>>>>
एक भा. प्र. तुझी मैत्रीण custmar care मधे काम करते का? ~D
मग त्यात काय एवढ? मैत्रीणीला फ़ोन करायचा आणि balance विचारायचा.

Cool
Thursday, April 19, 2007 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही दिवसांपुर्वी पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेल मध्ये मित्र मैत्रिणींसोबत जेवायला गेलो होतो. बऱ्याच दिवसांनी सर्वजण भेटत असल्यामुळे जेवणाच्या साथीने गप्पा रंगत गेल्या. प्रत्येक जण आपापल्या ऑफिस मधुनच तिकडे येउन पोहोचला होता. जेवण झाल्यावर सगळे बाहेर आले, आणि मी सर्वात शेवटी निघालो. निघतांना टेबलावर एक फाईल दिसली, आणि आपल्यातल्याच कुणाची तरी फाईल विसरुन राहिली असे वाटल्यामुळे ती फाईल घेउन मी बाहेर आलो. बाहेर येताच एका मैत्रिणीला, "काय गं, काय हा वेंधळेपणा? असे काम करतात का? फाईल इथेच विसरुन चालली होतीस ना ?", असे विचारुन ती फाईल पुढे केली. माझे वाक्य संपत असतांनाच सर्वांनी माझ्याकडे पाहिले, काही क्षण सगळे स्तब्ध झाले आणि दुसऱ्याच क्षणी हास्याचा कल्लोळ उडाला. मला मात्र काय घडले याची काहीच कल्पना न आल्याने मी बावरुन त्यांच्याकडे बघत होतो. हळूच लक्ष हातातल्या फाईल कडे गेले, मी फाईल उघडुन बघितली आणि आता मात्र त्याच फाईल मागे डोके लपवण्याची वेळ आली होती. झाले काय होते की, फाईल समजुन मी हॉटेलातील भले मोठे मेन्यु कार्डच उचलुन आणले होते !! सर्व वेटर्स ची नजर चुकवत हळूच जाउन परत ती 'फाईल' ठेवुन आलो. आजही त्या हॉटेल समोरुन जातांना त्या 'फाईल'ची आठवण आल्याशिवाय रहात नाही.


Music
Thursday, April 19, 2007 - 7:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लग्न बिग्न म्हणजे पत्रिका जुळवणं आलच
इतर माहिती देता देता म्हणजे रास, नक्षत्र वगैरे वगैरे चरण ही विचारल गेलं
मी बावळटा सारखं, चरण? अहो दोन असं सांगितलं
नशिबाने चरण द्वितीयच आहे हुश्श


Giriraj
Friday, April 20, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे कूल तू त्यानंतर असाच एकदा हॉटेलमधला पेला घरी घेऊन आला होतास त्याबद्दल पण लिही ना असेच सविस्तरपणे

Sanghamitra
Friday, April 20, 2007 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्युझिक मग तो बावळटपणा समोरच्याच्या लक्षात आला असेल तर लग्गेच होकार आला असेल ना ('अगदी अस्साच नवरा हवा होता हो आमच्या मनीला' इति मुलीची आई ) :-)
गिरी
बुधवार होता का त्या दिवशी? नक्की कूलच घेऊन आला होता का तो पेला? बघ हं पेला म्हणालास म्हणून शंका आली.


Nandini2911
Friday, April 20, 2007 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नशीब चौथे चरण नव्हते...

Giriraj
Friday, April 20, 2007 - 12:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रा,एकच प्या(ले)ला होता! आणि तो मी नव्हतोच!


Tivlyabavlya
Friday, April 20, 2007 - 2:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काल कपाळाला विक्स ऐवजी आयोडेक्स लावले आणी मग १ तास कपाळ धुवत बसलो. झोपेची पार वाट लागली हो. :-(

Music
Friday, April 20, 2007 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लक्षात आलं तरीही sense of humour .. म्हणजे अगदी भारीच हो
असं काहीतरी कौतुक झालं असतं .. :-))

चरण ४
आवडलं
..!



Music
Friday, April 20, 2007 - 3:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sanghamitra, मनीला असा नवरा चालेल
पण हा प्रश्न मन्याला पडेल या केस मधे .. :-))


Adi787
Friday, April 20, 2007 - 10:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आजचा किस्सा, य नवीन office मध्ये मला एक आठवडाच झाला ... माझ्या एका मित्राचा मित्र याच office मध्ये आहे, मी त्याला एकवेळच भेटलेलो होतो याआधी. आज त्याला फोन करुन सांगीतले की मी या company ला join झालोय. मग आमचे ठरले त्याच्याकडे lunch ला जायचे. तो आमच्या bldg समोर येणार होता. to pick me up... मी आपला त्याची वाट बघत होतो.. तेव्हढ्यात एक कार समोर येवुन थांबली.. मी आपला काही विचार न करता, समोरील दर्वाजा उघडला आणी बसयला जाणार तोच driver seat वरील व्यक्तिचा आवाज : are you looking for someone?
( This guy was also an indian.. so I got cofused)

बघितले तर तो दुसराच कोणितरी होता.


Chyayla
Saturday, April 21, 2007 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्युजिकचे लग्न ४ चरण वाल्याशी झाले तरी आश्चर्य वाटुन घेउ नका मन्डळी... तो एक मानवजातीतला क्रान्तिकारी क्षण असेल आन्तरचरणीय विवाह म्हणुन म्युजिकचा विवाह मान्यता पावेल यात शन्का नाही... मग म्युजिक कधी होणार तुमचे २ चे ६ पाय? म्हणजे चतुर्भुज होता होता तुम्ही षटपाद होणार हे नक्की न

Ultima
Saturday, April 21, 2007 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आन्तरचरणीय विवाह म्हणुन म्युजिकचा विवाह मान्यता पावेल यात शन्का नाही... मग म्युजिक कधी होणार तुमचे २ चे ६ पाय...

च्यायला....{
}

Music
Saturday, April 21, 2007 - 7:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होईल होईल
आन्तरचरणीय विवाहासाठी 'दोन्ही' पक्षांकडून मान्यता हवी ना
तिकड्च्या होकारावर गाडी अडलीये


ठरलं की कळवेन हो च्यायला तुम्हाला.....
आन्तरचरणीय विवाहाचे साक्षीदार..............:-))

कसं सुचतं हो च्यायला असलं काही बाही
मानलं बुवा


Zakki
Sunday, April 22, 2007 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण ऐश्वर्या राय ने त्याच्या पुढची पायरी गाठून द्विचरणीय नि अचरणिय असे लग्न केले, झाडाशी!

Cool
Sunday, April 22, 2007 - 5:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असाच एक दिवस साखर झोपेत असतांनाच मोबाईल गुरगुरला. ऍप्लिकेशन मध्ये एक गोंधळ झाला असुन तो त्वरित ठिक करणे भाग आहे, हे सांगणाऱ्या बॉस चा फोन होता. नाइलाजाने उठलो, आवरले आणि खाली येउन स्टॉपवर कॅबची वाट पहात उभा राहिलो. सकाळच्या प्रसन्न वेळी बरेचसे लोक पायी फिरायला जात होते. जातांना प्रत्येक जण माझ्याकडे पहात होता. सिनेमातील नायका प्रमाणे आपण काही तरी विसरुन तर नाही ना आलो या भीतीने मी स्वतःकडे अनेक वेळा बघितले पण काही कळायला मार्ग नव्हता. खरोखरचं आपल्यामध्ये काहितरी पाहण्यासारखे आहे हे जगाला पटलेले दिसते या आनंदाने मी खुललो. पण त्यांची 'विचित्र नजर' मला अस्वस्थ करत होती. आता मात्र मी त्याचा विचार करणे थांबवले आणि जरा इकडे तिकडे बघु लागलो. हळुच माझी नजर माझ्या सावली कडे गेली. आणि मला 'त्या' हरणाची गोष्ट आठवली ज्याला आपल्या पायाचे प्रतिबिंब बघुन वाईट वाटले होते पण शिंगाचे सौंदर्य बघुन त्यांचा अभिमान वाटला होता. 'पण शेवटी पायानेच वाचवले ना' असा विचार करत असतांना माझी नजर माझ्या शिंगाकडे (अर्थात डोक्याच्या सावली कडे) गेली, आणि क्षणार्धात मला लोकांच्या त्या विचित्र नजरेचे कारण कळले. घाईने बाहेर पडत असतांना मी छोटासा कंगवा वापरुन भांग पाडत होतो आणि घराला कुलुप लावतांना तो कंगवा केसात तसाच राहिला होता. याचाच अर्थ मी गेले काही मिनिटे अर्थवट पींजारलेले केस आणि त्यात अडकलेला कंगवा अश्या परिस्थितीत स्टॉपवर उभा होतो. त्या तश्या अवस्थेत मी कसा दिसत असेन हे आठवले की हसुन हसुन पुरेवाट होते....

Yogesh_damle
Sunday, April 22, 2007 - 11:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयुष्यातली पहिली नोकरी... पहिली नाईट शिफ़्ट... रात्री १२:०० ते ९:०० ची... प्रचंड excited होतो! सकाळी आठच्या बुलेटिन मध्ये मी बनवलेली स्टोरी प्रक्षेपित होणार ह्या विचाराने मनमोराचा पिसारा इ. इ... :-)

मग काय? रात्रभर जागायचं म्हणून 'तयारी' सुरु केली! सकाळी सात ला जाग येऊनही निकराने दुपारी साडेतीनपर्यंत बळेबळे झोपून राहिलो. शरीराच्या घड्याळाचे काटे आपल्याच हाताने उलटसुलट करणं!

घरून निघतांना मोठ्या फुशारकीने रूममेट ला "आज आमची 'पहिली रात्र'!!" असं सांगून आलो होतो. :-)

आॅफिसला पोचल्यावर मात्र आमचा साधासुधा नाही- तर अगदी हिरवागार पोपट झाला! आम्ही २४ तास अगोदर पोचलो होतो! मस्टरप्रमाणे त्या दिवसाची नाईट शिफ़्ट मावळत्या मध्यरात्री सुरू होते हे आम्ही विसरलो होतो. मी आणि माझ्या सहकारिणीकडे (सहकारिणी= colleague . 'सहधर्मचारिणी' नाही!) लोक असल्या दयेने पाहत होते! अर्धी सुट्टी अक्कलखाती घालून जागत बसलेले नवे रिक्रूट्स पाहून सगळ्यांनी 'आॅलेलेले' केलं!

मग आम्ही पण उरलेली लाज झाकत, "कोई बात नहीं! तब तक कुछ और नया सीख लेंगे" म्हणून वेळ मारून नेली!!


Sanghamitra
Monday, April 23, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> साधासुधा नाही- तर अगदी हिरवागार पोपट झाला!

म्युझिक सॉरी गं. जनरली असा वेंधळेपणा मुलं करतात ना त्यामुळं..

Suvikask
Monday, April 23, 2007 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पिंजारलेले केस अन डोक्यात कंगवा तसाच... नशीब.. तोँडात tooth brush नव्हता... हो.. काही सांगता येत नाही हल्ली... काय काय होईल ते... चॉप स्टिक समजुन चघळत बसला असता....

Sheshhnag
Monday, April 23, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संघमित्रा, हिरवागार पोपट म्युझिकचा नाही, तर दामलेंचा झाला होता.
ए. भो. प्र. - दामलेजी, तुम्ही कोणकोणत्या रंगाचे पोपट पाहिले आहेत?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators