Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 23, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » नाव आणि प्रतिमा » Archive through April 23, 2007 « Previous Next »

Zakki
Tuesday, April 17, 2007 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्च्या, खरे की काय? म्हणजे रॉबिनहूडचे चुकले?
चला, आता छळू याला. काय हो, खुश्शाल थापा मारताहात? येत नाही काही तर मधे मधे बोलावे कशाला खुश्शाल अफवा पसरवायच्या नि स्वत: नुसती गंमत बघायची. छ्या, काय ही वृत्ति या माणसाची!, वगैरे वगैरे.

मला नीट जमत नाही. रॉबिनहूड तुम्हीच स्वत:ला शिव्या देऊन घ्या, तुम्हाला तेव्हढे बरिक बरे जमते!



Robeenhood
Wednesday, April 18, 2007 - 1:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेच ते!!
चंद्रकान्त काय अन चंद्रशेखर काय. की फरक पैन्दा?

आमच्याकडे एक माजी आमदार भाषण करीत होते. बोलताना ते म्हणाले' भारताचे राष्ट्रपती शंकर दयाळ वर्मा... प्रेक्षकातून एक ओरडला वर्मा नाही शर्मा..'

त्यावर ते म्हणाले' तेच ते!! वर्मा काय अन शर्मा काय एकच..
तेव्हापासून आमच्या घरात हा विनोद प्रचलित आहे' तेच ते' म्हणण्याचा..


Zakasrao
Wednesday, April 18, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हो का! मला माहीत नव्हत. असो ह्या चुकीमुळे रथी महारथी परत एकदा ह्या BB वर येवुन गेले.

Zakki
Wednesday, April 18, 2007 - 3:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबिनहूड, खालील गोष्ट विनोद म्हणून वाचली होती:

एक यहुदी माणूस एका चिनी माणसाच्या थोबाडीत मारतो, नि म्हणतो, 'तुझ्या लाँड्रीत मी शर्ट दिला नि तू त्याची बटने तोडलीस!' चिनी माणूस म्हणतो 'अहो, तो लाँड्रीवाला चॅंग आहे, माझे नाव चिंग आहे'. तर तो यहुदी म्हणतो 'चॅंग, चिंग. तेच ते!'

दुसर्‍या दिवशी चिंग त्या यहुदी माणसाला बेदम धोपटतो. म्हणतो 'तुझ्यामुळे टायटॅनिक बोट बुडली!' तो यहुदि म्हणतो, 'अहो, ती बोट आइसबर्ग मुळे बुडली. मी गोल्डबर्ग' आहे. चिनी माणूस म्हणतो, 'आइसबर्ग, गोल्डबर्ग, तेच ते!


Robeenhood
Wednesday, April 18, 2007 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला नीट जमत नाही. रॉबिनहूड तुम्हीच स्वत:ला शिव्या देऊन घ्या, तुम्हाला तेव्हढे बरिक बरे जमते! >>>>>
हो हो, तुम्हाला स्वत्:ला शिव्या देऊन घ्यायला जमत नाही. मान्य आहे. तो तुमचा प्रान्त नाही. तुम्हाला फक्त दुसर्‍याला शिव्या देता येतात...

Zakki
Wednesday, April 18, 2007 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण तुमच्या एव्हढ्या चांगल्या नाही. तुमच्या शिव्या कशा अस्सल नि जोरदार असतात, शिवाय समर्कपण!

Tivlyabavlya
Wednesday, April 18, 2007 - 10:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या बीबी चे नाव आता "नाव, प्रतिमा आणी प्रतिभा" ठेवायला हरकत नाहीये...
सगळ्यांची प्रतिमा तर उजळली जातेच आहे..बरोबर प्रतिभा पण "पणाला" लागते आहे....
म्हणजे..स्वत्:ला शिव्या देणे..दुसर्याला शिव्या देणे वगैरे वगैरे..
दिवाळी होउन जाउ द्या की झक्कीराव आणी हूडराव.... :-)


Sanghamitra
Thursday, April 19, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> समर्कपण!
या शब्दाचा अर्थ काय काय म्हणे?
इथे विषयांतर होत असेल तर शब्दार्थ बीबीवर सांगितला तरी चालेल.
टिवल्याबावल्या तुमचे पोस्ट वाचून फिस्सकन् हसू आले.
तुमच्या नावाला शोभेल असे पोस्टलेय अगदी.




Rmjadhav75
Thursday, April 19, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय वाटतं माझ्या आयडी बद्दल.:-)
कारण हा आयडी एकदम फालतू वाटतो


Robeenhood
Thursday, April 19, 2007 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होऊन जाऊ द्या म्हणताय?

मग होऊ द्याच आता...
बघतोच त्याच्या कडे.
सोडा मला तुम्ही
सोडा. बघू द्याच त्याच्याकडे
तंगडीच मोडतो..
सोडा हो तुम्हा मला!!!!


Lukkhi
Thursday, April 19, 2007 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कींच्या प्रत्येक पोस्ट पाठोपाठ 'विषयाला धरून बोला' असा पोस्ट आपोआप यावा अशी काहीतरी सोय केली पाहिजे.

Ultima
Thursday, April 19, 2007 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाय समर्कपण! ???

हे काय असत बर???


Giriraj
Thursday, April 19, 2007 - 11:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rmjadhav75 तुझा ID वरून मला एका जेलरची आठवण येते.. त्यांचे नाव राम जाधव असे होते.

बाकी तुम्हीम्हणताच आहात तर तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून सांगतो.. तुमचा ID फ़ारच फ़ालतू वाटतो! :-)

हुडाला सोडा! :-)
हुडा, incoming free हे माहित नहि वाटते अजून तुला!:-)


Zakki
Thursday, April 19, 2007 - 1:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'समर्पक' हा शब्द घाई घाई त लिहीला की 'समर्क' असा होतो. मुख्यत्वेकरून निष्काळजीपणाने लिहीणे, आधी वाचून न पहाणे इ. वैयक्तिक कारणाने अश्या चुका होतात माझ्या. यापुढे सर्क सतर्क राहीन, जमेल तेव्हढे.

आता मी पैसे भरून माझे स्वत:चे पान घेईन, नि सगळे काही तिथेच लिहीन. तेंव्हा मग विषयाला धरून बोला, वगैरे सूचना द्यायची गरज रहाणार नाही. कुणाला खरच मी काय लिहीले ते बघायचे असेल तर तिथे वाचत जा, किंवा न्यू जर्सी बीबीवर.


Disha013
Thursday, April 19, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप्पे लोक मितभाषी असतात, हा एक गैरसमज मायबोलीवरील posts पाहिल्या की दूर होतो.....

झक्कीकाका,तुमच्या ID चा अर्थ काय हो?


Tivlyabavlya
Thursday, April 19, 2007 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो हूडराव असं मायबोलीवर काय "सोडा" मागताय इथे WUI - Writing Under Influence मुळे मायबोली मोडरेटर सस्पेंशन देतील ना १०-१५ दिवसांचे :-)
हां आता नुसताच "सोडा" घेताय तर चालु द्या :-)

Gobu
Saturday, April 21, 2007 - 6:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा,
"झक्की" या नावाबद्दल मी मागेच (१२ एप्रीलला) लिहीले होते
(बहुतेक झक्कीनी देखील वाचले नाही ते!)
रमजाधव,
बैन्केत नोकरी करणारा, मुळचा कोकणी माणुस, गौरी गणपतीला हमखास गावाला जाणारा परळकर नायगावकर
रोबिनहूड,
वा वा!
धमाल करता तुम्ही!
लुक्खी,
मानल हो बुवा तुम्हाला!
(बाकी मनातल बोलला ह तुम्ही)
झक्की,
दिवे घ्या ह...
आणि येथे जरुर लिहा
(अहो रोबिनहूडाना थोडे काम तरी मिळेल)
टिवल्याबावल्या,
बहोत खुब! बहोत खुब
चला मित्रहो दिवे घ्या सर्वानी आता


Zakki
Sunday, April 22, 2007 - 2:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोबू, मी वाचले ते. त्यातले 'मूडी' एव्हढेच खरे आहे.

पण तुम्ही बुद्धिमान लिहीले हे वाचून बरे वाटले. अहो तुम्ही जर नाही सांगितले लोकांना, तर त्यांना कळणार कसे, माझ्या लिहिण्या, बोलण्यावरून!

दिशा, झक्की हा शब्द नागपुरात बराच प्रचलित आहे (निदान पन्नास वर्षांपूर्वी होता). त्याचा अर्थ जो माणूस केंव्हा काय करेल, बोलेल, कसा वागेल, कुठे जाईल, याचा भरोसा नही, तो. मी पण बराचसा तसाच आहे, म्हणून मी ते नाव घेतले.



Rmjadhav75
Monday, April 23, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरीराज,

बाकी तुम्ही म्हणताच आहात तर तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून सांगतो.. तुमचा आयडी फारच फालतू वाटतो

आभारी आहे. बरेच दिवस झाले म्हणत होतो आयडी बदलावा.
तर, आजच आयडी बदलतो, आजचा दिवस सुध्दा कसा जुळुन आलाय, कारण आजच माझा जन्म झालाय.:-)

गोबू,

बैन्केत नोकरी करणारा, मुळचा कोकणी माणुस, गौरी गणपतीला हमखास गावाला जाणारा परळकर नायगावकर

मी, ईंजिनीअर आहे, मी मराठी (कोल्हापूरचा) आहे, गावाला पळणारा मात्र एकदम बरोबर, मी गौरी गणपतीलाच काय पण शिमग्यालापण गावाला पळतो.


Gobu
Monday, April 23, 2007 - 11:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रमजाधव,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

तुमचा वाढदिवस आज आहे वाचुन आनन्द झाला.
कारण माझा वाढदिवस कालच साजरा झाला!!! (२२ एप्रिल!!!)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators