Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
"कुणी तरी आठवण काढतंय....!"

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » "कुणी तरी आठवण काढतंय....!" « Previous Next »

Mankya
Monday, April 23, 2007 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

" हसता हसता डोळे
अलगद येतीलही भरुन
कावरेबावरे होण्यासारखे
बिलकुल काही नाही ..
कुणी तरी आठवण काढतंय .. बाकी काही नाही !"

अश्या ह्रदयाचा ठाव अन टाळ्यांचा कडकडाट घेणार्‍या शब्दांनी या मैफिलीची सुरुवात झाली. थोडासा पुर्वार्ध सांगतो अगोदर .. मी साहित्य परीषदेला संध्याकाळी ६ वाजताच पोहोचलो ते बरोबर एक जबर उत्कंठा कार्यक्रमाबद्दल घेऊनच ! साहित्य परीषदेचं वातावरण एकदम सात्विक होतं, खूप कमी कार्यक्रमात अशी सात्विकता अनुभवता येते ! दारासमोर छोटीशी पण सुरेख रांगोळी रेखाटलेली, थोडीफार माणसांची वर्दळ !

सुरुवातीला बेताचीच संख्या होती रसिकांची पण जसजसा घड्याळ्याचा काटा ६.३० कडे सरकू तसा हॉल गच्च भरला रसिकांनी. वैभव आणि प्रसाद पारंपारीक वेषात अवतिर्ण झाले. प्रस्तावनेला सुरुवात झाली, साहित्य परीषदेचा थोडासा इतिहास अन पुढे होणारे कार्यक्रम अशी संक्षिप्त रूपात प्रस्तावना संपली. आता आजच्या कार्यक्रमाबद्दल माहिती सुरू झाली, दोघांची ओळख आणि त्यांच्या काव्यप्रवासाबद्दल थोडीशी माहिती अन थोडे प्रसंग सांगण्यात आले. जेंव्हा दोघांची ओळख ' मराठी साहित्याचे प्रासादिक वैभव ' अशी करुन दिली तेंव्हा भरून पावल्यासारखं झालं, अगदी योग्य शब्दात ती ओळख होती दोघांची !

लेखाच्या सुरुवातीला लिहिलेल्या ओळींनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रथम सुत्र आपल्या हातात घेत प्रसादने सुरुवात केली की " हा कार्यक्रम सर्व वयोगटातील तरुणांसाठी आहे, अन त्या निमित्ताने आम्हालाही आमचे तरुणपणीचे दिवस आठवतील तसा आमचा काव्यप्रवास आता तरुणाईत आलाय !" परत टाळ्यांचा कडकडाट.


Meenu
Monday, April 23, 2007 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुढे येऊ दे .. वाचतीये मी .. अगदी सविस्तर लिही ..

Mankya
Monday, April 23, 2007 - 1:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभवचा आवाज नम्र, थोडासा गंभीर अन काळजाला हात घालणारा तर प्रसादचा अगदि लयबद्ध अन मोकळा. विडंबने, हास्यकविता म्हणताना प्रसाद अगदि रंगून गेला तर " ती जाताना ' येते ' म्हणून गेली, अन जगण्याचे कारण बनून गेली " हे म्हणत वैभवचा आवाज आर्त आवाज थेट काळजाचा ठाव घेत होता. दिड तासात माझ्या अंगावर इतक्या वेळा शहारा कधीच आला नव्हता ! विशेष म्हणजे प्रत्येक कवितेच्या अगोदर त्याची प्रस्तावना सांगताना सुद्धा रसिक प्रचंड दाद देत होते. जस एका कवितेच्या अगोदर (KBC वरची हास्य कविता होती ती ) वैभव म्हणाला, " सध्या टिव्हीवर KBC द्वितीय चालू आहे पण आमच्या घरात KBC अद्वितीय झाला !" तर कविताच नाहीत तर तिची प्रस्तावनाही दाद घेऊन जात होती बरं ! दोघातील Timing सुद्धा सुरेख जमलं होतं.

रसिक मंत्रमुग्ध झाले होते. दोघांनी कविता सादरीकरणाच्या क्रमावर पण बराच भर दिला होता, दोन कविता अगदी आरपार जायच्या तर पुढच्या दोन अगदी खळखळून हसवायच्या. हास्यकवितामध्ये ' अतिरेक्याचं प्रेम कसं असेल ' , ' लहान मुलगा घरात हनुमँन झाला तर ' , ' मोबाईल प्रेम ' , ' बायको बोलते तेंव्हा ' ई. समाविष्ट होत्या. आता शब्दशः सगळं आठवण कठिणच ! तरीही जेवढ आठवतंय तेवढ तुमच्यापर्यंत पोहोचवायचा हा प्रयत्न !

रसिकमंडळी जवळजवळ प्रत्येक दोन ओळींना ' वाह ' , ' क्या कहेने ' अन टाळ्यांचा कडकडाट अशा स्वरूपात दाद देत होती. काही काही कविता तर दोघांनी एक एक कडवं Alternate असं सादर केल्या, तर शेवटी वैभव एक कवितेचा एक कडवं आणि प्रसाद एका ग़जलेचा एक शेर असेही अदभुत सादरीकरण झाले ( ती गजल म्हणजे जी झाड ने ग़जल बी बी वर पोष्ट केली होती ती ' चांदणे माझे तुझे '!) असा सादरीकरणाचा प्रकारही मी पहिल्यांदाच पाहिला ओ !


Mankya
Monday, April 23, 2007 - 5:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही लिंक्स देतोय त्या अविष्कारांच्या जे वैभव व प्रसादने सादर केले..

१. ती जाताना येते म्हणून गेली
ह्त्त्प्://व्व्व.माय्बोलिॅओम्हित्गुज्मेस्सगेस१९४०३११८४३३्त्म्ल?११६४१०२९१७

२. बायको बोलत असताना..
ह्त्त्प्://व्व्व.सध-सोपॅओम्नोदे१३३

३. प्रेमाचा रींगटोन
ह्त्त्प्://व्व्व.सध-सोपॅओम्नोदे१८६

४. पसारा पसारा
ह्त्त्प्://व्व्व.सध-सोपॅओम्नोदे१३२

५. मालकीहक्क
ह्त्त्प्://व्व्व.सध-सोपॅओम्नोदे१०९

६. एखादी तरी सर
ह्त्त्प्://व्व्व.सध-सोपॅओम्नोदे१०२

७. दरबार
ह्त्त्प्://व्व्व.माय्बोलिॅओम्हित्गुज्मेस्सगेस१९४०३११०७०४्त्म्ल?११५०१४३३५६

Itsme
Tuesday, April 24, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कार्यक्रमा साठी आत जातानाच, प्रवेश द्वारात सगळ्यांचे स्वागत एक सोन चाफ्याचे फुल देउन करण्यात आले. आणि नंतर पुर्णवेळ एक मंद - मधुर सुगंध सभाग्रुहात दरवळत राहीला. ही कल्पना प्रसाद - वैभव ची की साहित्य परीषदेची माहीती नाही पण होती खुपच छान.

Giriraj
Tuesday, April 24, 2007 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक,छान दिलायेस रे वृत्तांत! मी लिहितो लिहितो म्हणेपर्यंत तूउ पोस्टही केलास... :-)

टाळ्या,हशा या दाद देण्याच्या पद्धति आहेतच आणि ही दाद सगळ्यांना दिसूनही येते.. पण अजूनही एक पध्हत आहे,अगदीच गुपचूप दाद देण्याची.

माझ्या पुढच्या रांगेत एक आजोबा आणि आजी बसले होते. एखाद्या प्रेमकवितेतल्या एखाद्या नाजूक वळणावर आजोबा आणि अगदी सहजतेने एकमेकांकडे पाहत होते आणि दोघेही काहितरी आठवल्यासारखे स्वतशीच हसत होते.. आजी तर नववधूला काय लाजता येईल इतक्या छान लाजत होत्या.
एखाद्या हास्यकवितेतल्या वाक्यावर दोघे जण अगदी टाळी द्यायचेच काय बाकी ठेवत होते.

गंमत म्हणून मी इतरही रसिकांचं निरिक्षण केलं तर असेच आपल्या ओळखीच्या माणसाबरोबर प्रत्येक ओळींतली मजा sharr करतांना दिसले.

मला वाटतं की कवितेत आपलं म्हणून काही सापडण्याची भावना रसिकाला खूप आनंद देऊन जाते. आजोबा आजींच्या एकमेकांकडे बघून दिली जाणारी दाद मला तरी वाटते यापेक्षा अजून चांगली दाद मिळणे अशक्यच!:-)

वैभव,प्रसाद... हार्दीक शुभेच्छा!


Mankya
Tuesday, April 24, 2007 - 9:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होय गिरी .. अगदी खरं ! तीच दाद सर्वांग सुंदर अन सर्वोत्कृष्ठ म्हणायला हवी. प्रत्येक शब्द जीवाचा कान करून एकताना ते आठवणीत ठेवणं शक्य झालं नाही, दुर्दैव. जसं देवळाच्या गाभार्‍यात आरती तालासुरात सुरु झाली कि वातावरण भारावतं, प्रत्येकजण अगदी रमून जातो तसच अनुभव आला या मैफिलीत. मला तर मैफिल संपल्यावर काही सुचेचना, सरळ पुस्तकांच्या दुकानात गेलो अन आवडतं व. पु. चं वपुर्झा अन पार्टनर घेतलं आणि डेक्कनच्या बस स्टॉपवरच वाचत बसलो. निम्म पुस्तक वाचून झाल्यावरच तिथून रूमकडे प्रवास सुरू केला. पण मनाच्या गाभार्‍यात फक्त ते शब्द घुमत होते
" जेवता जेवता जीवघेणा
लागेलही ठसका,
घरचे म्हणतील, ' सारखा
कसा लागतो उठता बसता '
चेहरा लपवत, डोळे पुसत
पाणी प्यावे थोडे
बोलण्या आधी आवाजाला
सांभाळावे थोडे
सांगून द्यावे काळजी करण्यासारखे
खरच काही नाही,
कुणीतरी आठवण काढतंय .. बाकी काही नाही !"

एक विनंती आहे वैभवसाठी की त्याने त्या कार्यक्रमाची ध्वनिचित्रफीत आम्हाला द्यावी, एक ' कँसेट ' म्हणून नव्हे तर एक ' अँसेट ' म्हणून !

वैभव आणि प्रसादला पुढील कार्यक्रमांसाठी अन लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा !

माणिक !


Mahe
Tuesday, April 24, 2007 - 9:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक, ग़िरिराज,
नमस्ते
खूपच छान
तुम्ही एवढे छान वर्णन केलेत की क्षणात मनाने भारताकडे भरारी घेतली.. धन्यवाद.

भाग्यश्री


Jo_s
Tuesday, April 24, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणीक
छान, अगदी उत्तम वृत्तांत लिहीलाहेस. आणि जुन्या लिंक्स दिल्यास ते बरे केलेस. मझ्याही मनात होतं काहीतरी लिहायच पण वेळे आभावी....
आता त्याची गरजही नाही, तू ते काम केलच आहेस.


Zaad
Tuesday, April 24, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ्याची कल्पना आमची एक मैत्रीण श्वेता हिची होती!

Gs1
Tuesday, April 24, 2007 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच फार सुरेख कार्यक्रम. प्रसाद आणि वैभवमधला ताळमेळ आणि एकूणच प्रभावी मांडणी प्रेक्षकांची दाद मिळवून गेली. आणि कार्यक्रमाने तृप्त होऊनही अजून एक मेजवानी म्हणजे नंतर कार्यक्रमाला आलेले आम्ही दहा बारा मायबोलिकर एकत्र जेवायला गेलो असतांना नचिकेतच्याच तोंडुन त्याच्या परितोषिकप्राप्त गजलेसह आणखी एक गजल, आणि प्रसाद मोकाशीकडुन त्याची गजल ऐकायला मिळाली.

या कार्यक्रमाच्या आयोजनामागे झाड चे परिश्रम आहेत हे नंतर कळले. त्याचेही आभार.


Bhramar_vihar
Wednesday, April 25, 2007 - 5:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबईकर मुकले म्हणायच या मेजवानीला! :-( पण वृतांतामधुन बरचं काहि हाती लागलं, त्याबद्दल माणिकचे धन्यवाद!

Aamya
Wednesday, April 25, 2007 - 7:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"कुणी तरी आठवण काढतंय" ह्या कवितेची लिंक कुटे मिळेल?

Princess
Wednesday, April 25, 2007 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणिक, वृत्तांत दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. खुप छान लिहिलय.
इतक्या छान कार्यक्रमाला जाउ न शकल्याचे नेहमीच वाईट वाटेल.
वैभव आणि प्रसाद तुम्हाला अनेक शुभेच्छा आणि आम्हाला तुमची अशीच एकतरी मैफिल बघायला मिळावी ही प्रार्थना.
भविष्यात देखील असेच उपक्रम करत राहा.



Mankya
Thursday, April 26, 2007 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणीतरी आठवण काढतंय...

हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरून
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

रस्त्यामधे दिसतातच की चेहरे येता जाता
एकासारखे दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमधे दोनच जीव.. आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरून बिबरून जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही,
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही !

वैभव जोशी !

हि घ्या ती अप्रतिम रचना ... !!
वैभवची परवानगी न घेता देतोय .. वैभवा Sorry !!

माणिक !


Mahe
Thursday, April 26, 2007 - 8:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती छान कविता आहे ही, डोळे भरुन कधी आले तेच कळले नाही.
माणिक, मला आपण काही कवितांच्या पुस्तकांची नावे देउ शकाल का?
धन्यवाद

भाग्यश्री


Sumedhap
Saturday, April 28, 2007 - 9:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वैभव काय सुंदर हृदयस्पर्शी कवीता आहे
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही...
थेट मनाला भीडते....शेवटचे कडवे तर अगदी डोळे भरुन टाकणारं आहे....
फारच सुंदर!!!!!!!!!!! अप्रतीम!!!!!!!
मी मोजलं नाही...पण बर्‍याच वेळा वाचली ही कविता..

खरंच आम्ही मुंबईकर मुकलो तुमच्या इतक्या सुरेख कार्यक्रमाला!!! ही कविता वाचल्यानंतर तर फारच वाटतं की ती तुमच्या आवाजात ऐकायला तिथे हजर असायला हवं होतं...

पण हे शल्य थोडं कमी झालंय कारण माणिक आणी गिरीराज कडुन ह्या कार्यक्रमाचा इतका छान वृत्तांत मिळाला की खरंच तिथे असल्यासारखं वाटलं...

तुमच्या आणी प्रसादच्या पुढच्या वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेच्छा!





Shyamli
Monday, May 07, 2007 - 6:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणीक अरे शतश: धन्यवाद तुझे आणि गिरीचे,
मी तीथे असुनही मला येता न आल्याचा सल बोचतोय अजुनही पण दिवस असा होता की जमणारच नव्हतं, तुम्ही दोघांनी केलेल्या वर्णानानी दुधाची तहान ताकावर.
झाडाचे श्रम सार्थकी लागले तुझ अभीनंदन आणि आभार
प्रसाद आणि वैभवचही अभिनंदन
प्रसाद आणि वैभव खरच याचं recording केलं असेल तर पाठवा रे आम्हाला, फार वाईट वाटत हे सगळ अनुभवायला नाही मिळत म्हणुन


Maanus
Thursday, January 24, 2008 - 5:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणालाच उचकी लागली नाही इतक्या दिवसात.

Anaghavn
Thursday, January 24, 2008 - 10:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी पुण्यात असुन मला य बद्दल काही माहीती नाही... काय म्हाणावे.पण मी माय्बोली वर असते, मला काळजी करण्याच कारण नाहि.
वैभव, सर्वप्रथम तुज़ अभिनन्दन. ही कविता ग्रेट!!!
अजुन काय्-- माझी तेव्हढी लायकी नाही.
मायबोली करांनो, मल पामराला बर्याचदा कळत नाही इथल्या (पुण्यातल्या) कार्यक्रमांविषयी. तेव्हा मला please कळवत रहावे, आवर्जुन्--ही विनन्ति.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators