Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 11, 2007

Hitguj » My Experience » मी अनुभवलेले » मी केलेला इब्लीसपणा » Archive through April 11, 2007 « Previous Next »

Chaffa
Wednesday, March 28, 2007 - 1:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुनी,
नक्की कुठे आहे ते नाही माहीत.
हा किस्सा गप्पागोष्टी करताना मित्राकडून ऐकला. आणी कदाचीत शहराचे नाव चुकीचे ऐकले असण्याची शक्यता आहे.


Nandini2911
Saturday, March 31, 2007 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे. काय हे
आठ दिवस मी नव्हते तर काय शंख चालु आहेत.
घरी गेले होते.. यावेळेला भरपूर वेळ असल्यामुळे भरपूर इब्लिसपणा केला...
सोबत मामीचा तीन वर्षाचा तेजस घेऊन बाजारात गेले होते.
जवळ जवळ चार वर्षानी भेटलेल्या मैत्रीणीला हा बघ माझा मुलगा" अशी ओळख करून दिली.
बिच्चारी...


Heraspparesh
Sunday, April 01, 2007 - 8:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! म्हणजे तू लग्न होण्याच्या आधी आई होऊन मोकळी झालीस तर इब्लीसपणा करता करता!!!

Chyayla
Sunday, April 01, 2007 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नशीब तीने स्वता:चे नाव मेरी व मुलाचे नाव जिजस नाही सान्गितले.

Nandini2911
Monday, April 02, 2007 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सध्या ती मैत्रीण सर्वाना फ़ोन करून माझे लग्न झाले आणि मूल झाले तरी मी कुणाला सांगितले नाही... वगैरे सांगत आहे. (हे बाकीच्या मित्रवर्यानी कळवले आहे... ते साळसूदपणे "आम्हाला काहीच माहित नाही" असे म्हणून तिची अजूनच खेचत आहेत.) त्यातूनच माझा नवरा कोण हा शोध सुरू आहे. बिच्चारी..


Ultima
Monday, April 02, 2007 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग काय नन्दुताई तिचा हा शोध पुर्ण कधी करताय??

Nandini2911
Tuesday, April 10, 2007 - 7:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्टिमा... वेळ आहे हो अजून..
काल माझा एक गोडखाऊ मित्र घरी आला होता. साला कॉफ़ीत चार चमचे साखर घेतो. इतकं गोड खातो की याला एक दिवस मुंग्या खातील असं आम्ही म्हणतो.,
तर याला काल बेसनाचे लाडु खायला दिले. थोडी गंमत करून..
काय केलं मस्तपैकी बेसनचा लाडू घेतला अर्धा केला. आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा ठेवून परत वळला.
आणि खायला दिला... जास्त काही नाही... दोन सणसणीत धपाटे मिळाले आहेत.. आई गं.


Sakhi_d
Tuesday, April 10, 2007 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी मस्त....

मी पण माझ्या एका मित्राला कोकम सरबत फ़क्त पाणी टाकुन दिलेले, साखर, मीठ न टाकता


Ultima
Tuesday, April 10, 2007 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई शपथ हिरव्या आता यापुढे तो बेसनाचाच काय पण लाडु हा शब्द जरी ऐकला तरी धुम ठोकेल.....
नुसत्या कल्पनेनेच ह. ह. पु. वा.


Zakasrao
Tuesday, April 10, 2007 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सखि आणि नन्दिनी
ता. क. नन्दिनी मला तुझे उकडिचे मोदक नकोत.


Chaffa
Tuesday, April 10, 2007 - 3:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ता. क. नन्दिनी मला तुझे उकडिचे मोदक नकोत.
आता या पेक्षा चांगली पावती काय असणार तुझ्या इब्लीसपणाला नंदिनी?
सखी, मी आता आजीबात येणार नाही तुझ्या घरी. (झकासराव स्टाईल)


Chaffa
Tuesday, April 10, 2007 - 3:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणी हा किस्सा चाफ़्फ़ी के नाम
चाफ़्फ़ी लग्नाआधी कधी एकटी किचन संभाळत नव्हती आता लग्नानंतर तिचा उत्साह उतु जात असतो तिकडे किचनमधे. तिचे किचनकिस्से किंवा बिघडलेल्या पाककृती भरपुर आहेत ते मी नाही लिहीत बसत पण.........
कालचाच किस्सा:
आई सात आठ शिट्ट्या झाल्यातरी ते वाटाणे शिजतच नाहीयेत अशी तक्रार तिने आईकडे मांडली मी सोफ़्यावर पसरुन वाचत होतो पटकन जाउन एक लहानसा गारगोटीचा दगड आणला आणी तिच्या हातात दिला सांगितले हा टाक कुकरमधे आणी कर शिट्ट्या, तिनेही आजिबात विचार न करता मी सांगितले तसेच केले. थोड्या वेळाने मला येउन विचारले असे केल्यावर खरंच शिजतील वाटाणे लवकर? काय लॉजीक काय त्याच्यामागे? म्हंटलं कसलं डोंबल्याचं लॉजीक! आता कुकर उघड आणी बघ जर तो दगड शिजला असेल तर वाटाणेपण शिजले असतील.
कपाळावर हात मारण्याखेरीज काय करु शकणार होती चाफ़्फ़ी



Runi
Tuesday, April 10, 2007 - 4:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयला चाफ्फा तू बायकोला पण सोडत नाहिस इब्लिसपणा करण्यात खुपच चालु आहेस की. आणि तुझ्या चाफ्फीला पण मायबोली वर घेवुन ये म्हणजे ती पण तिचे धमाल किस्से सांगेल

Savyasachi
Tuesday, April 10, 2007 - 4:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hahaa... chafa, sahi re..

Runi
Tuesday, April 10, 2007 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव,
नंदिनीने उकडीच्या मोदकाने तुमची वाट लावली का, त्यात पण हिरवी मिरचीच का?


Zakasrao
Wednesday, April 11, 2007 - 5:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनीने उकडीच्या मोदकाने तुमची वाट लावली का>>>
अजुन नाही रुनी पण तिने परवा मोदकांची आठवण करुन दिली आणि मला खावेसे वाटले मग मी तिला बोल्लो की मला पण दे थोडे. वरचा किस्सा वाचुन वाटल रिस्क कशाला?
चाफ़ा मोड घरीपण सुरु का?
चाफ़्या संभाळुन रे, आता बायका आपला गिनिपिग करुन टाकतात.

Sanghamitra
Wednesday, April 11, 2007 - 5:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> आई शपथ हिरव्या आता यापुढे ...
अल्टिमा तुम्ही लाडाने नंदिनीला हिरव्या म्हणताय का?

Nandini2911
Wednesday, April 11, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफ़ा.. सांभाळून एखाद दिवशी असलाच एखादा दगड डोक्यात बसायचा..

Sanghamitra
Wednesday, April 11, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनी
चाफ्या तू नंदिनीच्या घरी जाऊ नकोस (नाहीतर ती उकडीचे मोदक किंवा लाडू खाऊ घालेल.)
आणि तिलाही तुझ्या घरी बोलवू नको. ती चाफ़्फ़ीला ही दगडाची आयडिया देईल


Ultima
Wednesday, April 11, 2007 - 5:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अल्टिमा तुम्ही लाडाने नंदिनीला हिरव्या म्हणताय का?

नाही हो....मला "आई शपथ !!!! हिरव्या??? आता यापुढे ... " अस म्हणायच होत......


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators